शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिंगो

फक्त हे राहिलेत:
16:- कलीसातु चीबु चीपाजु
17:- चाचामी व्याचीरवतरचा

16 साजुक तुपाची बुधली?
ध missing aahe पण

हो हे बरोबर वाटतेय, दोन ची आहेत त्या ऐवजी एक ध असायला हवा.

.17............ठेचा

हो.

मी पण तुमच्या सोबतच सोडवत आहे.

खाली दिलेल्या परिच्छेदामध्ये कंसातील शब्द पुसून त्याजागी अंक घातले आहेत. अंक म्हणजे संबंधित शब्दाची अक्षरसंख्या. हे सर्व शब्द सुसंगत होतील अशा प्रकारे लिहा.
उत्तरे ३ तासांनी लिहा. मूळ परिच्छेद सर्वात शेवटी लिहीन.
...

(९) मालिका पाहणे मी खूप (४) सोडले. त्यानंतर काही काळ त्यावरील बातम्या पहात असे. पण अलीकडे त्याही (४) झाल्याने त्या पण (५). आता (७) अन्य माध्यम शोधणे आले. आता (७) प्रसारित होणाऱ्या काही वाहिन्या चांगल्या (५) व (४) चित्रपट दाखवतात. सुरुवातीस त्यावर इंग्लिश कार्यक्रमांचे (३) होते. पुढे त्यात हिंदी व मराठीचीही भर पडली.

मला तीन तासांत संपणारा (४) पाहणे (५) आवडते. (४) संपला की विषय संपला. परंतु (४) मात्र तसे नसते. त्या भरपूर भागांमध्ये (५) असतात. त्यांचे (४) पहिला भाग अशा (४) थांबवतात, की तुम्ही त्यापुढचा भाग पाहण्यास (४) होता. त्यांच्यात प्रेक्षकाला (३) लावण्याचे (३ ) असते. अशा काही मालिका (७) माझे त्यांच्याबद्दलचे (२ ) सांगतो. पहिला (४ ) मुद्दा म्हणजे त्यांच्यावरील प्रसिद्धीपूर्व (४) मंडळाचे नियंत्रण बरेच (२) आहे. त्यामुळे त्यात अतिरेकी (३) दृश्ये, हिंसाचार आणि (५) भरणा असतो. यावरून समाजात (६) चर्चा झडतात आणि (४ ) होतो.

अर्थात काही संगीतावर आधारित मालिका मात्र याला (५) अपवाद आहेत. (७) तुलना करता हे नवे माध्यम तरुण आणि (६) प्रेक्षकांना अधिक प्रिय आहे हे मात्र खरे. अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे (५) व्यत्ययाविना तुम्ही हे कार्यक्रम (३) पाहू शकता - तेही तुमच्या (३) वेळानुसार. या लोकप्रिय माध्यमाची दखल घेऊन (७) कालानुरूप (४) लागेल असे वाटते.

(९ उपग्रहवाहिन्यांवर) मालिका पाहणे मी खूप (४ वर्षांपूर्वी) सोडले. त्यानंतर काही काळ त्यावरील बातम्या पहात असे. पण अलीकडे त्याही (४ साचेबद्ध ) झाल्याने त्या पण (५ कुलूपबंद). आता (७ करमणुकीसाठी) अन्य माध्यम शोधणे आले. आता (७ वेबमाध्यमांवर ) प्रसारित होणाऱ्या काही वाहिन्या चांगल्या (५ लघुमालिका ) व (४ नवनवे ) चित्रपट दाखवतात. सुरुवातीस त्यावर इंग्लिश कार्यक्रमांचे (३ प्राबल्य) होते. पुढे त्यात हिंदी व मराठीचीही भर पडली.

मला तीन तासांत संपणारा (४ चित्रपट) पाहणे (५ मनापासून) आवडते. (४चित्रपट )संपला की विषय संपला. परंतु (४ मालिकांचे) मात्र तसे नसते. त्या भरपूर भागांमध्ये (५ लांबवलेल्या) असतात. त्यांचे (४ दिग्दर्शक ) पहिला भाग अशा (४ प्रसंगाला) थांबवतात, की तुम्ही त्यापुढचा भाग पाहण्यास (४ उत्सुकच ) होता. त्यांच्यात प्रेक्षकाला (३ व्यसन) लावण्याचे (३ कसब ) असते. अशा काही मालिका (७ बघितल्यानंतर) माझे त्यांच्याबद्दलचे (२ मत) सांगतो. पहिला (४ महत्वाचा ) मुद्दा म्हणजे त्यांच्यावरील प्रसिद्धीपूर्व (४ नियामक) मंडळाचे नियंत्रण बरेच (२ कमी) आहे. त्यामुळे त्यात अतिरेकी (३ कामुक) दृश्ये, हिंसाचार आणि (५ अपशब्दांचा) भरणा असतो. यावरून समाजात (६ अधूनमधून) चर्चा झडतात आणि (४ उहापोह ) होतो.

अर्थात काही संगीतावर आधारित मालिका मात्र याला (५ सणसणीत) अपवाद आहेत. (७ सद्यपरिस्थितीत) तुलना करता हे नवे माध्यम तरुण आणि (६ संगणकप्रेमी) प्रेक्षकांना अधिक प्रिय आहे हे मात्र खरे. अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे (५ आजूबाजूच्या) व्यत्ययाविना तुम्ही हे कार्यक्रम (३ सहज) पाहू शकता - तेही तुमच्या (३ सोयीच्या) वेळानुसार. या लोकप्रिय माध्यमाची दखल घेऊन (७ दुरदर्शनलाही ) कालानुरूप (४ बदलावे) लागेल असे वाटते.

) मालिका पाहणे मी खूप वर्षांपूर्वी सोडले. त्यानंतर काही काळ त्यावरील बातम्या पहात असे. पण अलीकडे त्याही (४) झाल्याने त्या पण (५). आता मनोरंजनासाठी अन्य माध्यम शोधणे आले. आता (७) प्रसारित होणाऱ्या काही वाहिन्या चांगल्या वेबसिरीज व प्रादेशिक चित्रपट दाखवतात. सुरुवातीस त्यावर इंग्लिश कार्यक्रमांचे प्राबल्य होते. पुढे त्यात हिंदी व मराठीचीही भर पडली.

मला तीन तासांत संपणारा चित्रपट पाहणे मनापासून आवडते. चित्रपट संपला की विषय संपला. परंतु मालिकांचे मात्र तसे नसते. त्या भरपूर भागांमध्ये विभागलेल्या असतात. त्यांचे (४) पहिला भाग अशा शेवटाला थांबवतात, की तुम्ही त्यापुढचा भाग पाहण्यास उत्सुक / उद्युक्त होता. त्यांच्यात प्रेक्षकाला (३) लावण्याचे कसब असते. अशा काही मालिका (७) माझे त्यांच्याबद्दलचे मत सांगतो. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यावरील प्रसिद्धीपूर्व जाहिरात मंडळाचे नियंत्रण बरेच कमी आहे. त्यामुळे त्यात अतिरेकी (३) दृश्ये, हिंसाचार आणि (५) भरणा असतो. यावरून समाजात साधकबाधक चर्चा झडतात आणि गदारोळ होतो.

अर्थात काही संगीतावर आधारित मालिका मात्र याला सन्माननीय अपवाद आहेत. (७) तुलना करता हे नवे माध्यम तरुण आणि (६) प्रेक्षकांना अधिक प्रिय आहे हे मात्र खरे. अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जाहिरातींच्या व्यत्ययाविना तुम्ही हे कार्यक्रम सलग पाहू शकता - तेही तुमच्या सोयीच्या वेळानुसार. या लोकप्रिय माध्यमाची दखल घेऊन (७) कालानुरूप बदलावे लागेल असे वाटते.

(९ इडीयटबॉक्सवरील/ प्रसारमाध्यमांवरील/ दूरदर्शनप्रसारीत) मालिका पाहणे मी खूप (४ वर्षांपुर्वी ) सोडले. त्यानंतर काही काळ त्यावरील बातम्या पहात असे. पण अलीकडे त्याही (४ एकसुरी) झाल्याने त्या पण (५ सोडल्यातच ). आता (७ करमणूकीसाठी) अन्य माध्यम शोधणे आले. आता (७ इन्टरनेटवर/ ईमाध्यमांवरुन ) प्रसारित होणाऱ्या काही वाहिन्या चांगल्या (५ विषयांवर/ वेबसिरीज/ वेबमालिका) व (४ दर्जेदार) चित्रपट दाखवतात. सुरुवातीस त्यावर इंग्लिश कार्यक्रमांचे (३ वर्चस्व) होते. पुढे त्यात हिंदी व मराठीचीही भर पडली.

मला तीन तासांत संपणारा (४ चित्रपट) पाहणे (५ एकंदरीत) आवडते. (४ चित्रपट) संपला की विषय संपला. परंतु (४ मालिकांचे) मात्र तसे नसते. त्या भरपूर भागांमध्ये (५ विभागलेल्या) असतात. त्यांचे (४ दिग्दर्शक) पहिला भाग अशा (४ नोडवर) थांबवतात, की तुम्ही त्यापुढचा भाग पाहण्यास (४ उस्तुकच ) होता. त्यांच्यात प्रेक्षकाला (३ व्यसन ) लावण्याचे (३ सामर्थ्य ) असते. अशा काही मालिका (७ संपवल्यानंतर) माझे त्यांच्याबद्दलचे (२ मत ) सांगतो. पहिला (४ महत्वाचा) मुद्दा म्हणजे त्यांच्यावरील प्रसिद्धीपूर्व (४ नियामक ) मंडळाचे नियंत्रण बरेच (२ कमी) आहे. त्यामुळे त्यात अतिरेकी (३ कामुक) दृश्ये, हिंसाचार आणि (५ अपशब्दांचा) भरणा असतो. यावरून समाजात (६ अधूनमधून) चर्चा झडतात आणि (४ उहापोह ) होतो.

अर्थात काही संगीतावर आधारित मालिका मात्र याला (५ खणखणीत) अपवाद आहेत. (७ प्रसारमाध्यमांची) तुलना करता हे नवे माध्यम तरुण आणि (६ संगणकप्रेमी) प्रेक्षकांना अधिक प्रिय आहे हे मात्र खरे. अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे (५ जाहिरातींच्या) व्यत्ययाविना तुम्ही हे कार्यक्रम (३ सलग) पाहू शकता - तेही तुमच्या (३ सोयीच्या) वेळानुसार. या लोकप्रिय माध्यमाची दखल घेऊन (७ दूरदर्शनलाही) कालानुरूप (४ बदलावे) लागेल असे वाटते.

अश्विनी, कविन
छानच. काही वेगळ्या शब्दांनी मजा येते.
देतो आता मूळ ...

मूळ उतारा :
..
(दूरचित्रवाणीवरील) मालिका पाहणे मी खूप (वर्षांपूर्वी) सोडले. त्यानंतर काही काळ त्यावरील बातम्या पहात असे. पण अलीकडे त्याही (आक्रस्ताळी) झाल्याने त्या पण (बघवेनात). आता (करमणुकीसाठी) अन्य माध्यम शोधणे आले. आता (आंतरजालावर) प्रसारित होणाऱ्या काही वाहिन्या चांगल्या (जालमालिका) व (लोकप्रिय) चित्रपट दाखवतात. सुरुवातीस त्यावर इंग्लिश कार्यक्रमांचे (प्राबल्य) होते. पुढे त्यात हिंदी व मराठीचीही भर पडली.

मला तीन तासांत संपणारा (चित्रपट) पाहणे (मनापासून) आवडते. (चित्रपट) संपला की विषय संपला. परंतु (मालीकांचे) मात्र तसे नसते. त्या भरपूर भागांमध्ये (विभागलेल्या) असतात. त्यांचे (दिग्दर्शक) पहिला भाग अशा (दृश्यावर) थांबवतात, की तुम्ही त्यापुढचा भाग पाहण्यास (उतावीळ) होता. त्यांच्यात
प्रेक्षकाला (चटक) लावण्याचे (सामर्थ्य) असते. अशा काही मालिका (पाहिल्यानंतरचे) माझे त्यांच्याबद्दलचे (मत) सांगतो.
पहिला (महत्त्वाचा) मुद्दा म्हणजे त्यांच्यावरील प्रसिद्धीपूर्व (परीक्षण) मंडळाचे नियंत्रण बरेच (ढिले) आहे. त्यामुळे त्यात अतिरेकी (लैंगिक) दृश्ये, हिंसाचार आणि (अपशब्दांचा) भरणा असतो. यावरून समाजात (अधूनमधून) चर्चा झडतात आणि (काथ्याकूट) होतो.

अर्थात काही संगीतावर आधारित मालिका मात्र याला (सन्माननीय) अपवाद आहेत. (दूरचित्रवाणीशी) तुलना करता हे नवे माध्यम तरुण आणि (मध्यमवयीन) प्रेक्षकांना अधिक प्रिय आहे हे मात्र खरे. अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे (जाहिरातींच्या) व्यत्ययाविना तुम्ही हे कार्यक्रम (मजेत) पाहू शकता - तेही तुमच्या (फावल्या) वेळानुसार. या लोकप्रिय माध्यमाची दखल घेऊन (दूरचित्रवाणीला) कालानुरूप (बदलावे) लागेल असे वाटते.

छान उत्तरे दिली सगळ्यांनी. मी काल रात्री थोडा प्रयत्न केला होता, पहिला शब्द दूरदर्शनसंचावर असा मला सुचला. पण पुढिल मोठ्या शब्दांपैकी काही सुचेना म्हणुन नाद सोडला.

धन्यवाद.
.....
एक नवा प्रयोग :
६ अक्षरी मराठी शब्द ओळखायचा आहे.

सूत्रे (क्रमवार नाहीत) :
१. यातील दोन समान अक्षरे मिळून प्राण्यासंबंधी शब्द होतो.

२. दोन समान अक्षरे ही मूळ स्वरूपातील एकच व्यंजन आहे.

३. दोन अक्षरे मिळून भारतातील एक महत्त्वाची भौगोलिक गोष्ट.

संपूर्ण शब्द : शारीरिक स्वच्छतेसंदर्भात.

कोणी प्रयत्न करत असेल तर कुठपर्यंत विचार केलाय ते लिहा.
म्हणजे गरजेनुसार भर घालता येईल.

सुधारित सूत्रे :

१. यातील दोन समान अक्षरे मिळून मुलांच्या भाषेतील प्राण्यासंबंधी शब्द होतो.

२. दोन समान अक्षरे ही मूळ स्वरूपातील एकच व्यंजन आहे. अक्षरे एक आड एक आहेत.

३. दोन अक्षरे मिळून भारतातील एक महत्त्वाची भौगोलिक गोष्ट.
संपूर्ण शब्द : शारीरिक स्वच्छतेसंदर्भात.

भूभू >>> होय !

नंतर शुद्धलेखनाचे बघा ..

गंगा

गंगा बरोबर

भुरभुरगंगा >>> नाही.
र नाही; दुसरे

Pages