शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील सर्व नाही.

शस्र घ्या >> निशाणा साधा >>>> .......फत्ते !

हे :
5. पाणी साठणारी जागा (3)

7...... शिकार
8. हिम्मत (३)

7. मोहिम नाही.
शस्त्र घ्या, जंगलात चला ... निशाणा .....

५ डबके >>> नाही.

सुटलेले अर्थही पाहिले पाहिजेत

खाचर
अगदी बरोब्बर !
......
फक्त ८ 'हिम्मत' राहिले.
जरा शरीराकडे नीट पाहा !

उत्तरे :
1. लांबीला खूप पण अरुंद कापड (३)...... लंगोटी

2. अनाथांना देतात ( 3, एका जोडाक्षरासहित) ...... आश्रय
3. दर्जा (२, एका जोडाक्षरासहित) ...... प्रत

4. तळ (3).....जमीन
5. पाणी साठणारी जागा (3)...... खाचर
6. कोरडा असो वा ओला, त्रासदायकच (३) ..... खोकला

7. संधान (३)...... शिकार
8. हिम्मत (३)........ कंबर
....
मूळ शब्द ओळखण्यासाठी १ तास देतो.

मूळ शब्द कास

त्याचे अन्य दोन अर्थ असेही आहेत:
१. कुरण
२. सरळ फाडलेले कापड
……………………
छान सहभाग. धन्यवाद !

नवा प्रयोग
११ अक्षरी मराठी शब्द ओळखा.

सूत्र : मनसंयमना विषयी एका संताचा शब्द.

अक्षरे अशी घ्यावीत :
१. शब्दातील १० अक्षरे निव्वळ मुळाक्षरे आहेत. ती यापैकी घ्या :
न, म, श, द.
यातले प्रत्येक अक्षर किमान एकदा घेतलेच पाहिजे. काही अक्षरे अनेकदा घ्यावी लागतीलच.

२. वरील १० सोडून उरलेले फक्त १ अक्षर भ च्या बाराखडीतले आहे.

३. अक्षरे निवडून झाली की योग्य तो क्रम लावा.

४. संपूर्ण शब्द एकदमच लिहा. अर्धवट काही लिहिणे/विचारणे नको.

मनभेदनशमनदमन >>
छान प्र पण हा नाही.
फिरवाफिरवी लागेल !

Pages