
भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
अवचट?
अवचट?
अ * * ट
अ * * ट
हे बरोबर आहे; पण मी वेगळे उत्तर काढले आहे.
बघूया अजून काय काय येत आहेत
माझे उत्तरअरभाट हे होते
माझे उत्तर
अरभाट हे होते
( जीए कुलकर्णी असा संदर्भ लावून).
?
याची उकल कराल का?
याची उकल कराल का?
देवकी
देवकी
अपेक्षित उत्तर मला माहित नाही. त्यासाठी आपल्याला एक आठवडा (पुढचा सकाळ येईपर्यंत) थांबावे लागेल !
....
माझी उकल
१. जीए नी सृष्टीविषयक कथा लिहिलेल्या असल्यामुळे त्यात ते रमलेले होते. अरभाट आणि चिल्लार हे त्यांच्या एका पुस्तकाचे नाव.
२. अरभाट माणूस कथेत रमलेला असू शकतो
....
अवचट हे उत्तर सुद्धा बरोबर असू शकेल.
अवचट यांचे पुस्तक आहे त्या
अवचट यांचे पुस्तक आहे त्या नावाचे
मग बरोबर धन्यवाद !
मग बरोबर
धन्यवाद !
माझी विचारांची दिशा चुकली.
https://audio.bookganga.com/Books/Details/5341274131054800799
अपेक्षित ते मिळाले.धन्यवाद!
अपेक्षित ते मिळाले.धन्यवाद!
एक शंका विचारतो.अरभाट (?
एक शंका विचारतो.
अरभाट (? आरभाट) हा जीए कुलकर्णीनी वापरलेला शब्द कुठल्या कोशात बघायला मिळेल?
बृहदकोश किंवा शब्दरत्नाकरमध्ये नाही सापडला.
त्याचा अर्थ भन्नाट असाच ना?
तसेच चिल्लार हा चिल्हारचा अपभ्रंश आहे ना?
(= बाजारबुणगे).
आजच्या सकाळमधील गूढ कोड्या
आजच्या सकाळमधील गूढ कोड्या तील एकच अडले आहे ते इथे विचारतो.
शोधसूत्र :
आकाश छिलके- वाले चावल देखकर संतोष पाता है (हिंदी /मराठी).
चार अक्षरी.
त्यातली दोन अक्षरे सुटलेली आहेत
न * * स
न व र स ?
न व र स ?
(ब्राऊ) न रा इ स
(ब्राऊ) न रा इ स
नभतुस:-)
नभतुस:-)
आता येत्या रविवारी बघूया
आता येत्या रविवारी बघूया त्यांचं काय उत्तर येते !
न * * स>>> न धा मा स
न * * स>>> न धा मा स
त्यांचे उत्तर
समाधान
असे आहे . परंतु शोधसूत्र नंतर उलटे करायचे आहे हे त्यांनी दिलेले नव्हते.
सूत्रातील छिलके वाले चावल यांचा संबंध समजला नाही.
धान = भात= टरफलासह तांदूळ
धान = भात= टरफलासह तांदूळ
आणि समा चा एक अर्थ आकाश.
आणि समा चा एक अर्थ आकाश.
हो. उर्दूत.
हो. उर्दूत.
समजले. धन्स !
समजले. धन्स !
विविध उपक्रमांसाठी व
विविध उपक्रमांसाठी व खेळांसाठी या दुव्यावर टिचकी मारा.

pregnancy साठी एक सहा अक्षरी
pregnancy साठी एक सहा अक्षरी समानार्थी इंग्लिश शब्द शोधावा.
त्यातले शेवटचे अक्षर s आहे.
* * * * * s
नंतर मग त्या शब्दाबद्दलची विशेष माहिती लिहीन.
२ तासांनी उत्तर लिहीतो.
२ तासांनी उत्तर लिहीतो.
मी प्रयत्न केला होता.
मी प्रयत्न केला होता.
धन्स !
धन्स !
....
pregnancy साठी एक सहा अक्षरी समानार्थी इंग्लिश शब्द :
cyesis
वरील शब्द इंग्लिशने ग्रीक
वरील शब्द इंग्लिशने ग्रीक भाषेतून स्वीकारलेला आहे. हा शब्द आता वापरत नसतो, परंतु त्याला एक पूर्वप्रत्यय लावल्यावर,
pseudocyesis हा जो शब्द होतो,
तो वैद्यकात वापरात आहे.
याचा अर्थ "काल्पनिक गरोदरपण" असा आहे.
हा एक दुर्मिळ मनोविकार आहे. ज्या स्त्रीला स्वतःचे मूल व्हावे अशी तीव्र इच्छा असते परंतु ते होत नसते, तिच्या बाबतीत हा आजार होतो.
यामध्ये पाळी बंद होणे, पोट फुगणे (फुगवणे), उलट्या काढणे इथपासून ते अगदी प्रसववेदनांपर्यंत आभासी लक्षणे दिसतात.
हा शब्द माहिती नव्हता, पण या
हा शब्द माहिती नव्हता, पण या मनोविकारावर अशीच एक मराठी मालिका बघितली होती.
cyesis हा शब्द माहिती नव्हता
cyesis हा शब्द माहिती नव्हता,
>>
pregnancy synonyms असे गुगल करुन तो सहज सापडत नाही !
************
वरील माहिती इंग्लिश शब्दकोशांच्या धाग्यावर पण कॉपी करून ठेवत आहे.
अपकर्षक या शब्दावर कुठल्या
अपकर्षक या शब्दावर कुठल्या धाग्यात चर्चा झाली होती?
'साधना' साप्ताहिकात विनय हर्डीकरांच्या एका लेखात 'निंदक आणि अपकर्षक' असा शब्दप्रयोग वाचला.
'उत्कर्ष'चा विरुद्धार्थी शब्द अपकर्ष. तो घडवून आणणारा तो अपकर्षक असा अर्थ असावा.
अपकर्षक >>https://www
अपकर्षक >>
https://www.maayboli.com/node/78349?page=28
...................
हीनता आणणारा; अपकर्ष करणारा. [सं.]
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B0%...
धन्यवाद तुम्ही उल्लेख केलेला
धन्यवाद
तुम्ही उल्लेख केलेला राजकीय लेख आणि मी वाचलेला लेख एकच आहे का?

Pages