शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी या धाग्याला चालना देतोय.

चार अक्षरी शब्द ओळखा. तो वस्त्रनिर्मितीशी संबंधित आहे.

त्यातील उपशब्दांची सूत्रे अशी :
१४ शरीराला अपायकारक
३४ तुकडा

( अंक म्हणजे शब्दातील संबंधित अक्षर क्रमांक)

आर्या
हरकत नाही. प्रयत्न केलात हे छान !

गूढकोडे
पाच अक्षरी शब्द
सूत्र : प्राण्याच्या बारशाची तयारी करणे फारच कंटाळा आणणारे बुवा !

त्याचा अर्थ त्रासदायक कंटाळवाणे काम.
'सकाळ'च्या दैनंदिन कोड्यात हा मजेशीर शब्द मिळाला. म्हणून इथे घेतला
Happy

आपण स्वयंपाकघरात ज्या कृती करतो त्या सर्वांची एकशब्द क्रियापदांचा रूपात यादी करायची आहे (सुमारे 50) .

नमुन्यादाखल दोन देतो
भाजणे, कापणे

आता पुढे चालू करा.....

मळणे, लाटणे, परतणे, घुसळणे, कालवणे, उकडणे, उकळणे, शिजवणे, मिसळणे, किसणे, चिरणे, मुरणे, भिजवणे, धुणे, सोलणे, कुटणे, वाटणे, खलणे, खोवणे

दळणे, तापवणे, विरजणे, फोडणे, वळणे, पाडणे (उदा. बुंदी), थापणे, हलवणे, ढवळणे, कुस्करणे, चुरणे, कातरणे, उलथवणे, आटवणे, पेरणे, चाळणे, गाळणे, फेटणे, निथळणे, तिंबणे, वाळवणे, घोळणे, भरणे.

सुंदर !
आता एकदा माझी यादी बघतो .
चुकून काही राहिले आहे का

फेसणे, कांडणे, कोळणे, भुरभुरणे, घोटणे, मुरवणे

(वर झाले असल्यास दुर्लक्ष करावे)

शेकणे, कोचणे(काकडी), भरडणे(जात्यावर जाडसर भरडतात), खान्देशात 'कलचणे' अशी पण एक क्रिया आहे! मटण वै पातेल्यात कलचुन घे, अस म्हणतात. किंवा कधी कधी खिचडी उलथण्याचा उलट्या टोकदार बाजूने खाली वर करतात.. त्यालाही कलचणे म्हणतात!

आमच्याकडे काकडी चोचणे/चोचवणे म्हणतात, चोचवलेलीच असते कोशिंबीरीमधे , सहसा चिरत नाहीत.

बिघडणे, फसफसणे, जळणे, आटणे, हटणे (पिठले हटतात) ,मिसळणे, तडतडणे, खवणे, वाटणे, उलटवणे, भाजणे, तळणे, शेकणे, थापणे, उकडणे, घुसळणे, कालवणे.

एक खुराक देतो
तीन अक्षरी शब्द ओळखा:
* * द

सूत्र : दुरुस्त/ मजबूत/ बळकट

हपा, तिकडच्या प्रश्नाचे उत्तर तिकडे अवंतारातून अवांतर होईल म्हणुन इकडे देत आहे, या धाग्यावर या किंवा आधीच्या भागात गूढशब्दकोडी खेळले असल्याने इथे त्यावर माहिती/चर्चा योग्य असेल.

गूढ शब्दकोड्यात (cryptic cross word) सरळ अर्थ न घेता शब्द आणि अक्षरांचे काय करायचे याच्या सूचना खुबीने दिल्या असतात. वर वर ते साधे वाक्य वाटत असले तरी त्यातील सूचना ओळखून उत्तर शोधायचे असते. त्यात ढोबळपणे अक्षर जोडणी (charade), श्लेष, शब्दात शब्द, शब्दा भोवती , अक्षरे गाळणे, अक्षरांची अदलाबदल करणे (anagram) अशा सूचना दिल्या असतात.
विखुरणे, मिसळणे, कालवणे, बिथरणे नाचणे, चुकणे अशी क्रियापदे आणि नवीन, विचित्र, वेगळा अशी विशेषणे अक्षरांची अदलाबदल दर्शवण्यास वापरतात, त्याला anagram indicator म्हणतात.

एक उदाहरण:
What's most strange about lady's jar that keeps hot things hot (7)

यात strange हा anagram indicator आहे. About हे शब्दाभोवती शब्द दर्शवते. Most मधील अक्षरांची अदलाबदल करून ती lady's साठी पर्यायी शब्द (her) भोवती ठेवून t{her)mos हे उत्तर, जो एक गरम पदार्थ गरम ठेवण्याचा जार.

आजच्या सकाळमधील गूढ कोड्यातील एक शोधसूत्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. जमते का बघा:

" सृष्टीत गोष्टीत रमलेले"
चार अक्षरी

(गरज लागल्यास नंतर पहिले अक्षर सांगतो.
मी एक उत्तर काढले आहे).

Pages