भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
अरे रे!! काल टीव्ही वर आपच्या
अरे रे!! काल टीव्ही वर आपच्या "अतिशी" चा बंगला पाण्यात बुडलेला बघितला. " तीत" पाणी घुसले आहे असा विचार केला असता तर "अतिशीतीत" हा शब्द आठवला असता. Anyways, हा शब्द माझ्यासाठी नवीन आहे. धन्यवाद कुमार जी.
Revati1980
Revati1980
शब्द पावसाळा (२)
शब्द पावसाळा (२)
या खेळात तुम्हाला भातशेतीसंबंधी ८ मराठी शब्द ओळखायचेत. त्यासाठी खालील दोन चौकटी पहा :
...
या दोन चौकटींमध्ये मिळून एकूण आठ शब्द अडकलेत. ते हुडकून काढायचे.
शोध माहिती:
· प्रत्येक नाव ५ अक्षरी, सलग आणि मराठी भाषेतच.
· प्रत्येक नावाचे १ले व ५ वे अक्षर चौकट क्रमांक १ मध्ये शोधायचे,
तर दुसरे व चौथे अक्षर चौकट क्रमांक २ मध्ये.
आणि
३रे अक्षर इथे दिलेले नाही. ते तुम्हीच संदर्भाने ओळखायचे..
· प्रत्येक अक्षर एकदा आणि फक्त एका शब्दासाठीच वापरले गेले पाहिजे.
· एक बरोबर उत्तर दिल्यानंतर त्याची ४ अक्षरे पुढच्या खेळासाठी बाद होतील
· एखाद्या अपेक्षित उत्तराऐवजी जर पर्यायी उत्तर दिले गेले तर ते प्रलंबित ठेवले जाईल. खेळाच्या शेवटी ते आपोआप बाद ठरेल.
चला तर, काढा बाहेर या आठ भात-शब्दांना …
इमेजेस खूप मोठ्या आहेत. लहान
इमेजेस खूप मोठ्या आहेत. लहान करता येतील का?
अवघड आहे
अवघड आहे
फक्त मोबाईल जवळ आहे.
रेंज पण कमी आहे
कोणी मदत करून प्रतिसादात तसे करेल का?
(No subject)
भरत धन्यवाद
भरत धन्यवाद
कटाकटीत क्रॉप केलं की आकार वाढतो का ?
कळलं नाही. मी पेंटब्रशमध्ये
कळलं नाही. मी पेंटब्रशमध्ये रिसाइझ केलं.
मला तसं काही जमत नाही.
मला तसं काही जमत नाही.
फक्त स्क्रीनशॉट काढून क्रॉप करतो.
मी डेस्कटॉपवर केलं.
मी डेस्कटॉपवर केलं.
(No subject)
चला, आता उत्तराचे उद्घाटन
चला, आता उत्तराचे उद्घाटन कोण करतय.?
रोपवाटिका
रोपवाटिका
रोपवाटिका बरोबर!
रोपवाटिका बरोबर!
बीजारोपण
बीजारोपण
बीजारोपण चालेल.
बीजारोपण चालेल.
अपेक्षित बीजावरण.
बीजावरण असे बरोबर उत्तर धरूनच
बीजावरण असे बरोबर उत्तर धरूनच पुढचे सोडवावे.
जमीन, तांदळाची जात... असा विचार करा
चिमणसाळ
चिमणसाळ
--
कोरडवाहू
चिमणसाळ बरोबर!
चिमणसाळ व कोरडवाहू बरोबर!
.,...
४ उरले.
....
कचरा पण शेतीत उपयोगी असतो....
पालापाचोळा
पालापाचोळा
पालापाचोळा बरोबर! ३ उरले
पालापाचोळा बरोबर!
३ उरले
शेतजमीन कशीही असून नाही
शेतजमीन कशीही असून (ओबडधोबड) नाही चालणार....
....
सतत फक्त भाताचेच पीक ....?
उरलेली उत्तरे :
उरलेली उत्तरे :
१. फेरपालट (नागली, कापूस ही पिके देशाच्या काही भागात भाताबरोबर फेरपालट घेतात)
२. समपातळी (भात खाचरांची)
३. अतिहळवे (भाताच्या लागवडीतील एक प्रकार).
…..
सर्वांना धन्यवाद !
अतिहळवे भात खाल्ल्याने आपण
अतिहळवे भात खाल्ल्याने आपण अति हळवे होतो का? कर्क राशीचे जातक हळवे असतात असे म्हणतात. ते हा भात खात असतील असे वाटते.
चार प्रकार आहेत
चार प्रकार आहेत
१)अतिहळवे (२) हळवे : (३) गरवे आणि (४) अतिगरवे
८ अक्षरी मराठी शब्द ओळखा
८ अक्षरी मराठी शब्द ओळखा.
सूत्र : एक अभ्यास
उपशब्दांची सूत्रे अशी :
१ कौतुक
२३ लिहायला लागेल
३४५ जेवताना हवे
६१८ मुलाचे नाव
******************
वातावरण एवढं कळलं.
वातावरण एवढं कळलं.
पण वातस्थितिचिशास्त्र-न. (शाप.) हवेचा, वातावरणाचा, अभ्यास करणारें शास्त्र. (इं.) मीटिऑरॉलॉजी
वातावरणनिर्मिती
.
वातावरण >>
वातावरण >>
निम्मे उत्तर आलंय की!
वातावरणविज्ञान
वातावरणविज्ञान
Pages