चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सिनेमा रंजक असेल तर चालायला हवा. कुठल्याही वादामुळे वा चर्चेमुळे चालला तर फेअर नसेल. आजकाल इतके स्ट्रक्चर्ड प्रमोशन्स करतात की इंटेलिजेंंट करमणूक हवा असलेला एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला put off केल्यासारखे वाटते. कपिल शर्मात किंवा चला हवा येऊ द्यात येणे/ अचानक पहा शहारुखचा चित्रपटातील प्रवास या ईन्स्टा रील्स/ त्याच्या मुलीचेे-सुहानाचे कायली जेनर सोबत दुबईतल्या पार्टीचे फोटो, गौरीने फराह खानच्या घराचे केलेले मेकओव्हर , दीपिकाचा पहिल्या वाढदिवसाचा फोटो मगं रणवीरने त्याला दिलेल्या हार्ट ईमोजी, अनन्या शर्माने दीपूला दिलेल्या शुभेच्छा, मधेच उकरुन काढलेले धार्मिक वाद आणि ते चहाच्या कपातल्या वादळासारखे अचानक शांत होणे( यातल्या दोन्ही पार्टीला वहात्या गंगेत हात धुवायचे असतात ), मगं हा रोल कसा आयुष्य बदलणारा होता हे त्या सिनेमाच्या स्पॉट बॉय पासून दिग्दर्शकापर्यंत बोलल्याचे मेकिंगचे पॉपअप व्हिडिओ , या गाण्याच्या वेळेस हा किंवा ही पडूनही कसे कंटिन्यू केलेले नाच , काय हे समर्पित जीवन. मला द्या २० करोड मी पण होईन समर्पित. आपल्याच कलेला बेकिंमत करत आहेत असं वाटत रहातं. हा ट्रेंड अंगावर येतो व सामान्य प्रेक्षक म्हणून मला कुणावरही विश्वास टाकता येत नाही. हे ह्या सिनेमाबाबतच नाही जनरली लिहिलेयं. हे नैसर्गिक वाटत नाही. आजकाल सिनेमाच नाही तर त्याभोवतीचे हे वलयही अतिरंजित झालंय. शेवटी हा एक करोडोंचे टर्न ओव्हर असलेला बेभरवशाचा बिझनेस आहे , जिथले कस्टमर्स लॉयल नाहीत व त्यांचा अटेन्शन स्पॅन ४ वर्षाच्या मुलाचा आहे हेही खरंय. हाकानाका.

पठाण व त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा! Happy
----
पठाणवरची चर्चा इथेही दिसल्याने इथेही आणली पोस्ट .

ईथे काय राडा चालू आहे बघा...
आजवर मी माझ्या आयुष्यात ईतकी क्रेझ पाहिली नाही... जिओ पठाण.. जिओ शाहरूख खान

https://scroll.in/video/1042567/watch-shah-rukh-khan-returns-with-pathaa...

पठाणची चर्चा तिकडे हलवा +१. काय क्रेझ, बॅन इ. हलकल्लोळ करायचा तो तिकडेच बरा.
चिकवा असू दे आम्हाला. मेक चिकवा बोरिंग अनेग!

पठाणची चर्चा तिकडे हलवा + मेक चिकवा बोरिंग अनेग! = अनेग तर अनेग.
मी 'एका दगडात दोन पक्षी' केलेयं समजा. Wink

पठाणची चर्चा तिकडे हलवा +१. काय क्रेझ, बॅन इ. हलकल्लोळ करायचा तो तिकडेच बरा.
चिकवा असू दे आम्हाला. >>>> +१००

का?
पठान is आल्सो चित्रपट. त्याला इकडे काय बॅॅन केलय का?

नेटफ्लिक्सवर गुड नर्स बघतेय. वेळेअभावी अर्धाच बघता आला. ..
थोडे लुप होल्स आहेत पण तरी ओके आहे . >> हि सत्य घटना आहे त्यावरचे पुस्तक मी वाचले आहे. बर्‍यापैकी अशाच गोष्टी घडल्या आहेत. सगळा शॉकिंग प्रकार आहे.

पठान is आल्सो चित्रपट. त्याला इकडे काय बॅॅन केलय का?
>>>>
शाहरूख धाग्यावर आला की तो धागा हायजॅक करतो. ईथे ईतरांना संधी मिळायला हवी चमकायला. यात काही बॅन वगैरे नाही. यू कान्ट इग्नोर शाहरूख. त्यावर बॉयकॉट हे शस्त्र कुचकामी आहे. म्हणूनच ईंग्लिशमध्ये म्हणतात. Only Shah Rukh Khan can save bollywood. Happy

पिच्चर बघितल्यावर कोणी लिहिलं तर आवडेलच वाचायला. पण एकानेही अजुन पिच्चर बघितलेला नाही. आणि न बघता राजकारणाच्या पोस्ट असतील तर इकडे कशाला? हौशी व्यक्तींनी धागा काढला आहेच तर तिकडेच गुर्हाळ लावा. काही रसाळ मौक्तिके पडली तर येऊच तिकडे वाचायला. Wink

Let sanity prevail.
Truth वगैरेचे नंतर बघता येईल.

मी पाहिला पठाण. इतक्यातच संपला.
टायगर पेक्षा बरा आहे पण इथेच (माबोवर कुठेतरी लिंकमधे) वाचल्याप्रमाणे अजिबातच कनेक्ट होत नाही. सुरूवातीला काय चालू आहे नेमके हे कळत नाही. फ्लॅशबॅक कुठे संपतो, कुठे सुरू होतो, फ्लॅशबॅक मधला फ्लॅशबॅक हे किचकट झालेय. हे सगळे तुकडे जोडल्यानंतर जरा जरा कळायला लागते.

आयएसआय एजंट आणि रॉ एजंटचं प्रेम प्रकरण असं काही नाही. पण दीपिका त्याला दोनदा फसवते तरीही तिसर्‍यांदा तो विश्वास ठेवतो. सलमान खानची एंट्री आणि त्यानंतरची सगळी मारामारी अ आणि अ आहे. एकीकडे मिसाईल्स सुटत असतात, अक्राळविक्राळ मशीनगन्सच्या राऊंडस चालू असताना हे दोघे एकमेकांशी हवापाण्याच्या गप्पा करत असतात.
" तू डर गया क्या "
" हां. तेरे लिये"
हे सगळं बालिश वाटलं. गोठलेल्या समुद्रावर गाड्या चालवतानाचे स्टंटस आणि ट्रेनवरचे स्टंट्स हे खरंच व्हिडीओ गेम सारखं वाटतं.
मोठा वाटला. संपला एकदाचा असं झालं.
कमर्शिअली सक्सेस मिळेल. तो मुद्दाच नाही. पठाण टीमने मेहनत केली आहे ती बॉण्डपट बनवण्याची. पण त्यात पाकिस्तान हिंदुस्तान प्रेम वगैरे टायगर मधे होता तो मसाला घातलाय. त्यामुळे पठाणचा प्लॉट कोणत्याही क्षणाला सिरीयस वाटला नाही.
सिनेमा मरते दम तक या वेबसिरीज मधे दाखवल्याप्रमाणे त्या ही चित्रपटांना पब्लीक असायचं तसं पठाण आवडणारं ही पब्लीक असणारच. मलाही आवडायचे असे सिनेमे. ओटीटीमुळे आवड बदलली.
ज्याची त्याची आवड. प्रत्येकाच्या आवडीचा आदर करूयात.

हो पाहिला. आता संपला.. चांगला होता.
एक हसीना थी सारखे एक दिवाना था होता

कार्तिक आर्यनच्या कॉमेडीवर अक्षय कुमारची कॉपी केल्याचा शिक्का मारला जातो. पण त्याचा अभिनय त्या वरचढ आहे हे त्याने सिद्ध केले या चित्रपटातून..

हेटर्स कडून अपेक्षा ठेवू नका. फॅन्स कसे असतात बघा.
एका चाहतीने आपल्या आयुष्याची कमाई ७२ कोटी रूपये संजय दत्तच्या नावे करून घेतला अखेरचा श्वास. हा घ्या पुरावा.
https://marathimaaj.in/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0...

ज्यांची एकापेक्षा जास्त घरे असतील त्यांनी एकच घर ठेवून बाकीची घरे आपल्या आवडत्या स्टार च्या नावे करायला काय हरकत आहे ? (कुणीही स्वतःवर ओढून घेऊ नये)
इथेच वर एका चाहत्याने पठाणची तिकीटे वाटल्याचा उल्लेख आहे.
असलं काहीही न करता फॅन म्हणवून घेणार्‍यांची लाज वाटते. थू: अशा फॅन्सवर.
आक थू आक थू . थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू: थू:

(पठाणची चर्चा इथेही असल्याने इथेही)

पण त्याचा अभिनय त्या वरचढ आहे हे त्याने सिद्ध केले या चित्रपटातून >> Rofl लै मोठा जोक केला राव तुमी Rofl

भू भू २ फक्त तब्बू मुळे पहावला गेला नाहीतर त्याने माती केलीच होती.

पण त्याचा अभिनय त्या वरचढ आहे हे त्याने सिद्ध केले या चित्रपटातून >>> चपलेने हाणा पण मिथुन म्हणा छापाचे प्रतिसाद असतात हे. कुठूनही कशीही चर्चा यांच्या प्रतिसादावर व्हावी याची सोय. कधी कधी वाटतं नवग्रह मंदीराच्या बाहेर जेवणार्‍यांची लाईन असते तिथे अशांचे फोटो ठेवून त्याच्यापुढे ताट वाढावे.

पण त्याचा अभिनय त्या वरचढ आहे हे त्याने सिद्ध केले या चित्रपटातून>>> अशाच प्रतिसादाची अपेक्षा ह्या आयडी कडून..

द्रिश्यम २ थरारक आहे पण पहिल्याची सर नाही. त्याच्या वर तिन्ही त्रिकाळ (वर्षानुवर्ष) लक्ष असताना मुळात उचापत्या करताना (स्पॉइलर असल्याने लिहित नाही) कुण्णी कुण्णी बघत नाही ह्याला. आणि इतका चौफेर विचार करून केलेलं प्लॅनिंग खरंच कुणी करेल का हा विचार येतो मनात. जरा काय च्या काय वाटला. पण पार्ट १ फ्लॉलेस अगदी.

हीट केस १ & २ पाहिला. केस १ राजकुमार राव चा हिंदी बघितला तो खूप एंगेजिंग आहे. केस २ (सुबटयटल्स) मधे अ तिरेक रक्तपात आहे..अगदी करवती ने कापणे वगैरे. आणि केस २ चे रहस्य पण यथा तथा च आहे. केस ३ ची हिंट देऊन ठेवलेली आहे..
अशा अगणित केस येऊ शकतील. केस १ आणि २ चे हीरो आणि कॅरॅक्टर्स वेगळे आहेत पण अधून मधून रेफरन्स येतो.

हिट सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवायचं असा निर्मात्यांचा प्लॅन आहे. हिट 3 नानी सोबत डिक्लेर हि केला आहे.

तसाही आजकाल पूर्ण भारतात अशा सिनेमांची हवा आहे.

तामिळ मध्येही कैदी (KAITHI), विक्रम नंतर आता त्याच स्टोरी शी कनेक्टड तिसरा सिनेमा येऊ घातला आहे.

सुनील शेट्टी गल्ल्यावर बसायचा???
हात दाखवायचा म्हणजे काम धंदे सोडून तो तिकडे च असायचा???,
आणि हे दुकान होतं तरी कुठे???
मला त्याच्या दुकानाचे लोकेशन माहीत आहे म्हणून मी एकदा कन्फर्म करून घ्यायला बघतेय बाकी काही नाही.....

हे केशवकुल नावाचं जे काही आहे (प्रभूदेसाई) ते पण च्रप्स - झंपू - कटप्पाच आहे का ?
लोचटगिरीसाठी वेगळा आयडी घेतला असता तर या आयडीचा रिस्पेक्ट राहिला असता.

पण त्याचा अभिनय त्या वरचढ आहे हे त्याने सिद्ध केले या चित्रपटातून
>>>>

मला वाटते या वाक्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी फ्रेडी पाहिला नसावा Happy

भूलभुलैय्या पलीकडेही जग आहे ...

@अस्मिता - मस्त पोस्ट. मनातलं लिहीलंय.
इंटेलेक्च्युअल सोडाच पण किमान फॅमिलीसहीत जातोय तर मनोरंजन तरी १००% सोडा ६०% तरी असावं ना ! इतकी वर्षे पर्यायच नव्हता तेव्हां आहे तेच चालवून घेण्याची सवय लागलीय. तरीही तेव्हांही उत्तम सिनेमे बनायचेच. यश चोप्रा आणि करण जोहर यांनी बघायचे तर बघा असा ट्रेण्ड आणला. प्रत्येक पिक्चर हटके असावा असा आग्रह अजिबात नसतो. सेलेब्रेशन मूड मधे त्या प्रकारचे सिनेमे आवडून सुद्धा घेत असतो आपण. चेन्नई एक्सप्रेस असाच आहे. बर्‍याच जणांना न आवडलेला हॅपी न्यू इयर पण दिवाळीच्या मुहूर्तावर आलेला म्हणून आवडून घेतला होता.

गेल्या काही वर्षांपासून मात्र जुलमाचा रामराम सुरू झाला आहे. एखादा पिक्चर बघू नका म्हणून एका बाजूने फर्मान काढायचं. तर तो बघा म्हणून दुसर्‍या बाजूने. पाहिला तर देशद्रोही आणि नाही पाहिला किंवा नाही आवडला तर मग बर्नॉल, आग लागली सहीत कुळाचा उद्धार. तुमचं जे काही आहे ते आपसात ठेवा ना. बाकिच्यांना कशाला मधे ओढताय ? कुणी तरी बहीष्कार घालायची भाषा करतंय म्हणून त्यांना हरवण्यासाठी पिक्चर पहा हे अजब लॉजिक आहे. या लॉजिकने गुंडा सुद्धा हिट होऊ शकतो.

पठाण समजा पाहिला आणि नाही आवडला तर किमान बघायला गेले होते म्हणजे ते भक्त नाहीत एव्हढं साधंसं लॉजिक न लावणारे तरी काय भक्तांच्या पेक्षा कमी असतील ? रिपब्लिक डे परेड संपली कि मस्तपैकी डालो करून बघावा आणि आवडला तरच फॅमिलीसहीत जावं या निष्कर्षाला आलो आहे.

'छत्रपती' तेलुगू युट्युबवर.राजामौलीचा प्रभासला घेऊन पहिला सिनेमा, वीस वर्षे जुना.
सुरुवातीला श्रीलंकेत एक आई आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्या वापरून सातफुटी शैतान अफजलखानाला कसं मारलं अशी गोष्ट सांगत असते...जाळपोळ, दंग्यात आई,मुलांची ताटातूट होते.. तमिळीयन्स श्रीलंकेतून रेफ्युजी म्हणून भारतात येतात, सगळे लोक विशाखापट्टणम मधे एका जुलमी,क्रुर गुंडाच्या राज्यात गुलामगिरी करत असतात.. तेव्हा उदय होतो नायक प्रभासचा त्याचं नाव शिवाजी असतं सिनेमात.. फुल्ल ऑफ स्टाईलीश ऐक्शन,वायोलंस सिनेमा..
युट्युबवर तेलुगूमधे पूर्ण बघितल्यावर सेम सिनेमा हुकुमत कि जंग नावाने हिंदी डब्ड सापडला.

हे केशवकुल नावाचं जे काही आहे (प्रभूदेसाई) ते पण च्रप्स - झंपू - कटप्पाच आहे का ?
>>> मायबोली चा प्रचंड अभ्यास दिसून येतोय... मान गये ...

पठाणची चर्चा तिकडे हलवा +१. काय क्रेझ, बॅन इ. हलकल्लोळ करायचा तो तिकडेच बरा.
चिकवा असू दे आम्हाला. मेक चिकवा बोरिंग अनेग!>>

हे केशवकुल नावाचं जे काही आहे (प्रभूदेसाई) ते पण च्रप्स - झंपू - कटप्पाच आहे का ?
लोचटगिरीसाठी वेगळा आयडी घेतला असता तर या आयडीचा रिस्पेक्ट राहिला असता.
आता?
मिठाची गुळणी हंं!

Pages