चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

प्लिज पायरसी करू नका... >>> एक था टायगर, टायगर जिंदा है, जब तक है जान, वीरझारा आणि आत्ताचा ठग्ज ऑफ हिंदुस्तान हे सिनेमे थिएटरला जाऊन पाहीले. प्रत्येकी सरासरी २५० * ४ = १००० रूपये तिकीटाचे वाया गेले. त्याखेरीज इंटर्व्हलला दोन हजार रूपये गेले. धाकटं कार्ट एकटंच १५०० रूपये पाच मिनिटात सहज उडवतं. म्हणजे एकूण खर्च २५०० प्रत्येक सिनेमाचा. या पाच सिनेमापोटी रूपये साडेबारा हजार वाया गेले.
त्यातही ठग्ज ऑफ हिंदुस्तानला आख्खं खानदान एकत्र गेलो होतो ज्याची तिकीटं मीच काढली. एकूण १६ जण गेलेलो. म्हणजे १२ जणांचा खर्च एक्स्ट्रा.
त्या बारा जणांचे १२ * २५० = ३००० रूपये तिकीटांचे.
१२५०० + ३००० = १५५००
त्यांचा इंटर्व्हलचा खर्च लक्षात नसल्याने सोडून देतो.
जाण्यायेण्याचा खर्चही सोडून दिला.
माझे तासाचे उत्पन्न भयानक गरीबीमुळे ८५०० रूपये आहे (याच्या वर जात नाही).
पाच सिनेम्यांचे १५ तास अधिक जाण्यायेण्याचे दहा तास
म्हणजे एकूण पंचवीस तास.
हे ८५०० * २५ =212,500 रूपये
एकूण खर्च
212,500 + १५५०० = 228,000 रूपये फक्त.

यातले १५५०० माफ करतो. उरलेले देत असाल तर इथून पुढेही थिएटरलाच जाऊन वाया गेल्यास बिल पाठवून देत जाईन म्हणतो.
नाहीतर मग पायरेटेड बघून थिएटरला जायचे कि नाही याचा निर्णय माझा मला घेऊ द्यायला परवानगी असावी उपवेमा सर !

हे लॉजिक काही पटले नाही. जर पायरसी वाईट असेल (डिबेटेबल? कदाचित.) तर ती वाईटच. एखाद्या कलाकाराचे सिनेमे वाईट असतात म्हणून मी पायरेटेड बघतो हे काही बरोबर नाही. न बघणे किंवा चांगले रिव्ह्यू आल्यावर बघणे हाच एक नैतिक ऑप्शन आहे.

अर्थात, इन जनरल पायरसी वाईट नसते असे म्हणणारे असाल तर ओके आहे. तशीही भरपूर लोकं असतात.

कुणाला पटवून देणे हा काही माझा प्राधान्यक्रम नाही होऊ शकत. एखाद्याला मूळ मुद्दाच पटवून घ्यायचा नसताना पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यात अर्थ नसतो. एकाच प्रॉडक्शन हाऊसचे पाच पाच सिनेमे महागडे तिकीट लावून फसवणूक करत असतील तर अशांचे पुढचे सिनेमेही कसलाही मागचा पुढचा विचार न करता पुन्हा तीच चूक करत पाहणे हा मूर्खपणा नाही का ? फसवणूक हा गुन्हा नाही फक्त पायरसी हा खूनाइतका वाईट आहे का ?
म्हणतात ना दूधाने तोंड पोळले तर ताकही फुंकून पितात.
( ताक : मी फक्त गंमत म्हणून डालो केले असे लिहीले आहे. खरा बघणारा कधीच असे खरे लिहीणार नाही. इथे काही मंडळींना मुद्दा मिळण्याची सोय केली होती).

तुम्हाला पटवून द्यायचे नाहीये आणि घ्यायचे सुध्दा नाहीये. तुमचा मुद्दा अत्यंत विक आहे. जर प्रोडक्शन हाऊस वाईट सिनेमे काढत असेल तर सिनेमा बघू नका.

तुमचे आदेश पाळणे हे बॉयकॉट ग्यांयच्या आदेशाप्रमाणे झाले आहे. माझा मुद्दा वीक आहे हा आदेश द्यायला तुमची न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली असल्याचे मला ठाऊक नव्हते. माफ कराल ही अपेक्षा. Lol

तुम्हाला वाद घालायची हुक्की आलेली आहे. क्षमा करा पूर्ण न वाचताच वाद घालणार्यांना डोकं देण्याइतका रिकामा वेळ माझ्याकडे नाही. तुमच्याकडे चिक्कार असल्यास काय लिहीले आहे ते पुन्हा वाचा.

जमल्यास मराठीच्या एखाद्या प्राध्यापकाची मदत घ्या हो Lol
फक्त ने काय अर्थ होतो हे समजावून सांगेल तो. Proud

हे ही त्या प्राध्यापकाला दाखवून घ्या.
या आगीत उडी घेण्याचा मोह होण्याचे कारण समजले नाही. कुठला राखीव आयडी उडालाय का ? Lol

तुम्ही अग्ग्रेसिवेली उत्तरे दिली मी एनर्जी मॅच केली. सगळी मायबोली तुमचे जुने युद्ध आहे असे काहीसे वाटते आहे काय तुम्हाला ?

माझे तुमच्याशी कसलेही भांडण नाही. तुम्ही माझ्याशी वाद उकरून काढला आहे. माझ्या पोस्टचा अर्थ तुम्हाला समजलेला नाही हा माझा पॉब्लेम नाही. तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे असे मला वाटत नाही. तुमचे माझ्याशी कसले भांडण आहे हे मला माहिती नाही. तुम्ही म्हणजे मायबोली नाही. माझे मायबोलीशी संबंध कसे आहेत हा या पोस्टचा विषय होऊ शकत नाही.
तुम्ही राजकीय पत्रकाराप्रमाणे तुमचा भांडणाचा पवित्रा फसला म्हणून माझ्या वैयक्तिक भानगडीत नाक खुपसत आहात. तो ही तुमचा प्रश्न आहे. शेवटी तुम्हाला इच्छा असेल तेव्हांच तुम्ही समजून घ्याल. नाही का ? Wink
बाय !

कॉमी, कुणाची तरी जिरवायची हा उत्तम प्रेक्षक असण्याचा क्रायटेरिया असू शकतो का? तुमचे मत महत्वाचे वाटते.

उलटा चोर. पहिला द्यु आयडी वैगरे काथ्या कुटायला तुम्हीच चालू केला आणि मग परत मला "वैयक्तिक भानगडी" बद्दल लेक्चर देतात.

मी तुमची एनर्जी मॅच करून उत्तर दिले होते फक्त Lol
लेक्चरची सुरूवात पण मी नाही केली. Proud
तुमचा थयथयाट का चालू आहे मला कळले नाही. चालू द्यात. मला काही मजा येत नाही. सो आय टेक अ लीव्ह.

>>>कॉमी, कुणाची तरी जिरवायची हा उत्तम प्रेक्षक असण्याचा क्रायटेरिया असू शकतो का? तुमचे मत महत्वाचे वाटते.

नक्की सांगता येत नाही. असा काही सर्वव्यापी क्रायतेरिया असतो का माहीत नाही. माझ्या पुरते सांगायचे तर मी असे काही करायच्या भानगडीत पडत नाही. बॉयकॉट गँग ची जिरवायला मी (उदाहरणार्थ) सलमान खानने सिनेमे पाहणार नाही.

पण बॉयकॉट वाल्यांनी खरेच कारण नसताना शाहरुख खान विरुद्ध फार विष पसरवले आहे. जर कोणाला पठाण बघून solidarity दाखवावी वाटत असेल तर ते समजण्यासारखे आहे.

सुनील गजाकोश यांच्या प्रमाणेच अनेकांचे मत आहे कि सिनेमा ठीकठाक आहे. बॉयकॉट गॅंग च्या रिअ‍ॅक्शन मुळे चालला आहे. तुमची काय अडचण आहे कॉमी?

मला कसलीही अडचण नाही. सिनेमा बघायचा तर बघा, कोणत्याही कारणासाठी बघा. बघायचा नसेल तर बघू नका, कोणत्याही कारणासाठी बघणे टाळा.

मी सुनील गजकोष यांना ओळखत नाही.

आता इथे नको.

ज्यांना हा सिनेमा आवडत नाही ते तसे म्हणू शकतात का?

गजाकोश यांना तुम्ही ओळखत नाही हे ठीक. ते मायबोलीवर असतील तर ओळख जाहीर करतीलच. केली तर त्यांना विचारता येईल. त्यांना ओळख द्यायची नसेल तर मायबोली सक्ती करत नाही.

ओह !
सामना, पण कुणालाही ओळख लपवायची असेल तर ठीकच. पण इतरांचे मायबोलीशी जुने भांडण आहे का वगैरे वगैरे वैयक्तिक प्रश्न विचारण्याची गरज आहे का ? ते इथे चालते का ?
ही वयक्तिक भानगड आहे हे सांगितल्यावर चोर म्हणून उल्लेख करणे हे सभ्यपणाचे आहे हे आज समजले. Lol

जर कोणाला पठाण बघून solidarity दाखवावी वाटत असेल तर ते समजण्यासारखे आहे. >>> लालसिंग चढ्ढाच्या वेळी solidarity दाखवली असती तर एक उत्तम चित्रपट आपटला नसता. आज निव्वळ भक्तांची जिरवण्यासाठी एक मसाला पट चालवण्याची पाळी आली नसती. म्हणजेच या असल्या लॉजिकने भक्तांइतकेच त्यांना रिअ‍ॅक्शन देणारे सुद्धा महामूर्ख आहेत.

आत्ताच पाहिला पठाण...ठीक च वाटला मला.. ग्रुप मध्ये गेल्यामुळे आपापली मजा केली आम्ही.. आपापले जोक मारून.. पिक्चर मधले जोक बघून तर.. ओके ईथे हसायचं होतं का.. असं झालं खूपदा... माझ्या शेजारची १० मिनिट झोपली.. शेवटी डिंपल च्या फोटोपाशी शारुख बोलत असताना म्हणाली.. अगं ही कधी मेली... Lol
बाकी शारूख दिपू आणि जॉन जबरी दिसलेत... Cast वर च पैसे खर्च झाल्यामुळे VFX अगदीच उरकलेले आहेत असं वाटलं.. शरूख च्या ओव्हर अक्टिंग ची इतकी सवय झालिये की कधीतरी भसकन हात फैलावून डायलॉग बाजी करेल असं वाटत राहिलं... पण नशीब तसं काही झालं नाही.. क क क क caran सोडून.. गाणी प्रेक्षणीय आणि श्रवणीय!! मोस्टली predictable.. अगदीच एखादा ट्विस्ट unpredictable वाटला.

सो आय टेक अ लीव्ह.
बाय !
रिकामा वेळ माझ्याकडे नाही.

लिव्ह घेणे सुध्दा किती अवघड असते नाही ? Proud

ठीक आहे तुम्ही जिंकला मिस्टर सुनील गजाकोश उर्फ कॉमी !
जिले अपनी जिंदगी. आता हा धागा सोडा. Proud
बघा तुमचा मुद्दा काय होता , आता काय आहे Lol

Pages