चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

>>भारतातले अ‍ॅमेझॉन प्राईम व युएसमधले यात कंटेटमध्ये फरक असतो का? >> असतो तर!
हे वाचा लेख दोन-तीन वर्षे जुना आहे, आता भारतात प्राईमवर रेंटवर काही चित्रपट येतात, म्हणजे थोडा फरक पडला आहे.

अच्छा. धन्यवाद मानव. इथल्या प्राईमवर मराठी चित्रपटांचा जो कंटेट आहे त्यात नवीन भर फारच कमी दिसते. ..

तहकीकात २ इथे वाचून पाहिला. तहकीकात या शब्दाचा अर्थ माहिती नसावा अशा बेताने बनवलाय. या पेक्षा डाकू हसीना किंवा एखादा भोजपुरी सिनेमा पाहिला असता तर जमलं असतं.

Unbroken पाहिला प्राईमवर.
दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेत ओलिंपिंक ट्रैक रेकॉर्ड होल्डर युध्दकैद्याची सत्यकथा..प्लेनक्रैश झाल्यानंतर जपान्यांच्या हाती सापडल्यावर, छळछावणीतले दिवस आणि युध्द संपल्यावर सुटका..

Korameenu (battle of egos) तेलुगू.प्राईमवर हिंदी डब्ड पाहिला.
एका पोलीस इन्स्पेक्टर ची वैजागला बदली होते त्याचं नाव मुछ्छड राजू असतं..बदली झाल्याबरोबर तीन अज्ञात माणसं त्याची मुछ कापून टाकतात.. हे कोणी केलं हे शोधता शोधता एकात एक गोष्टी उलगडत जातात..ड्रामा,थ्रीलर, पॉलिटिकल.
सुरूवातीला जरा कॉमेडी वाटतो पण नंतर नंतर सिनेमा सिरीयस पकड घेतो..क्लायमॅक्स ट्विस्ट अनपेक्षित..

अनेक वर्षांनी पुन्हा एकदा शान पाहिला. तरी आवडला. कुलभूषण खरबंदाने अशी भूमिका पुन्हा केली नाही, पण ते योग्यच केलं. असा शाकाल पुन्हा होणे नाही. ती भूमिका आधी संजीव कुमार करणार होता म्हणे.

अ मान नेम्ड ओव्ह सुरेख सिनेमा आहे. प्राइम वरती. एक दु:खी व खत्रुड वयस्क विधुर आहे. जो आत्महत्या करेन करेन करता करता, परत कसा माणसाळतो. त्याचे परिवर्तन व व्यक्तीरेखा मस्त रंगवली आहे.
हलका फुलका आहे.
————————
अस्मिता पुस्तक छान असणार. कसं वाट लं ते सांग.

स्टिव्हन स्पिलबर्ग चा द फेबलमन्स हा नवा सिनेमा पहिला.

स्पिलबर्ग च्या स्वतःच्या बालपणा आणी तरुणपणा पर्यंत चा आत्मचरित्रपट आहे असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही.

मला तरी सिनेमा आवडला. पॉल डेनो, मिचेल विल्यम्स, सेथ रोगेन आणि एमिल हर्ष सगळ्यांनीच चांगली कामे केली आहेत.

अनफॉर्च्युनेटली कुठल्याही स्ट्रीमिंग / OTT प्लॅटफॉर्म वर सापडला नाही त्यामुळे पायरेटेड वेबसाईट वर बघावा लागला.

“ ती भूमिका आधी संजीव कुमार करणार होता म्हणे.” - त्याने हार्ट अ‍ॅटेक आल्यामुळे तो सिनेमा सोडला. धर्मेन्द्रने सिप्पीशी वाद झाल्यामुळे सोडला (म्हणून हेमामालिनीने सोडला)- तिथे शशी कपूर-बिन्दिया गोस्वामी आले. विनोद खन्नाने रजनीशपायी सोडला (शत्रुघ्न सिन्हा ने त्याला रिप्लेस केलं) असं बरंच काही झालं होतं.

शान चांगला आहे, पण तुकडे तुकडे बघितल्यासारखे वाटतात. सुरुवातीला अमिताभ-शशी कपूरचे आणि मग परवीन बाबी-बिंदिया गोस्वामीबरोबरचे फसवाफसवीचे उद्योग हा एक तुकडा, सुनील दत्तच्या पाठलागाचा आणि मृत्यूचा एक तुकडा, शत्रुघ्न सिन्हाच्या स्टोरीचा एक तुकडा, शाकालचा एक तुकडा वगैरे. सगळे तुकडे मनोरंजन करतातच, पण एकसंधता नाही वाटत.
'प्यार करनेवाले' गाण्यानंतरचा सेठ गुलाबचंद और सेठ फूलचंद हा सगळा प्रसंग अतिशय भारी आहे. जॉनी वॉकर आणि बिंदिया गोस्वामी अमिताभ-शशी कपूरला गुंडाळतात तोही प्रसंग मस्त आहे.

फे फ, अच्छा! हे माहीत नव्हते. आत्ता विकीवर वाचले तेव्हा कळले की मूळ शोलेचा संच त्यांना इथे कायम ठेवायचा होता.

An Action Hero @Netflix
आयुष्मान खुराणा आणि जयदीप अहलावत आहेत. मला आवडला. वेगवान आहे, खूप मारामारी व ॲक्शन सिक्वेन्स आहेत. शेवट थोडा अधिक दमदार व विश्वसनीय होऊ शकला असता पण सिनेमा मसालेदार आहे व खिळवूनही ठेवतो. आयुष्मान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत आहे. तो यात खऱ्या आयुष्यात एक हिरो आहे जो हातून नकळत झालेल्या खुनापासून स्वतःला वाचवत वास्तवातही एक हिरो होतो. किंचित अ आणि अ आहे, पण मला आवडला. दोन गाणी आहेत, दोन्ही अनावश्यक ,अनॉयींग व चीप आहेत. आयुष्मान खुराणा व जयदीप अहलावत पर्फेक्ट वाटले. दोघांचीही कामे नेहमीप्रमाणे उत्तम!

नक्की सामो Happy
अंजली, एलिफंट व्हिस्परर बघायची ठरवूनही राहून गेली होती. नक्की बघेन.

पठाण डालो करून पाहिला. चांगली एचडी प्रिंट होती.
हा सिनेमा आवडला असेल तर मिशन मजनूची पिसं काढण्याचा हक्क आपल्याला नाही. जर मिशन मजनूची पिसं काढून पठाण आवडला असे आपण चारचौघात तोंड वर करून म्हणू शकत असू तर काशीला जाऊन प्रायश्चित्त करण्याची गरज आहे, नाहीतर पुढचा जन्म भाईजानच्या एण्ट्रीला आ वासून बघत मृत्यूच्या दाढेत जाणार्‍या रशियन पोलिसाचा मिळेल. ज्या कारणासाठी आता बॉण्डपट नको वाटतात ते सगळं पठाण मधे आहे. स्पायची कामगिरी काय असते या बाबतीत मिशन मजनू कितीतरी उजवा वाटू लागला पठाण पाहिल्यावर. सविस्तर अन्यत्र !

Lol
मी तर मिशन मजनूची पिसं काढून बसलेयं. 'नरो वा कुंजरो वा' झाले माझे, पठाण अजून बघितला नाही तरीही काशीची तिकिटं बघते.

काशी काय आळंदी काय Lol

बाय द वे रविंद्र कौशिक यांच्यावर पठाण आहे की मिशन मजनू . मी दोन्ही बघणार नाहीये, जस्ट विचारतेय.

पठाणची चर्चा या धाग्यात नका करू लोकहो. ईत्र तित्र सर्वत्र शाहरूख नको. अश्याने मग लोकं चिडतात. मी आज जातोय बघायला. दूध का दूध आणि साय की साय होऊन जाईल.

प्लिज पायरसी करू नका... थेटरात बघा चित्रपट... कोणाचाही रिव्यू ऐकू नका.. स्वतः पाहणे महत्वाचे... रिव्युज मुळे कागझ के फुल फ्लॉप झाला जो एक मास्टरपीस होता... रिव्युज मुळे अंदाज अपना अपना फ्लॉप झाला जो एक कल्ट क्लासिक आहे...

जी हुजूर. स्वतः उपवेमा सांगताहेत तर ऐकायला पाहीजे.
Submitted by अन्जू on 29 January, 2023 - 07:1 >> रविंद्र कौशिक यांच्यावर एकही नाही. पठाणचा आणि कौशिक यांचा दूरान्वयेही संबंध नाही. मिशन मजनूवर या धाग्यावर आणि अन्य एका धाग्यावर चर्चा आहे. त्यात तपशील मिळेल.

प्लिज पायरसी करू नका...
+७८६
फेसबूकवर मी बरेच अश्या पोस्ट पाहिले आहेत की शाहरूखचे द्वेष्टे हा चित्रपट बघून येतात आणि त्यावर टिका करतात. मग त्यांना विचारले की तुम्ही कश्याला मग बघायला गेलात पैसे खर्च करून तर म्हणतात आम्ही पायरेटेट कॉपी पाहिली. म्हणजे शाहरूखवर देशद्रोही अशी टिका करणारे स्वत: पायरेटेड मूवी बघून देशद्रोह करतात. गंमतच आहे एक.

बर्रं पायरेटेड बघतात म्हणजे मोबाईल वा टीव्हीवर बघतात..
शाहरूख मोठ्या स्क्रीनवर बघायची गोष्ट आहे. ईतक्या छोट्या जागेत कसे मावेल त्याचे स्टारडम Happy

ऍक्शन हिरो काल पाहिला.चांगला आहे.आयुष्यमान इमेज मधून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आहे.मध्ये मध्ये अंधाधून ची आठवण येईल.
भुरा चा भाऊ हे पात्र आहे अगदी छोटी भूमिका वालं त्याचे लुक्स मस्त आहेत.भुरा तर प्रसिद्ध आहेच.
फॅमिली मॅन मधल्या मुसा नीरज माधव ला चिमुकली भूमिका दिलीय.
दाऊद चं पात्र, अर्णब गोस्वामी चं आणि रवीश कुमार चं पात्र पण धमाल आहेत.

फेसबूकवर मी बरेच अश्या पोस्ट पाहिले आहेत की शाहरूखचे द्वेष्टे हा चित्रपट बघून येतात >>
दाऊद इब्राहीम वर टीका केली कि ते दाऊदद्वेष्टे
कसाब वर टीका केली कि ते कसाब द्वेष्टे
चालू द्या Lol

आत्ताच पठाण पाहून आले. मला जाम आवडला. विद्या बालन म्हणून गेलीच आहे - एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट! आणि हा पिक्चर छान एन्टरटेन्मेंट करतो. सगळ्यांची कामं चांगली आहेत. शाहरुख सुपर्ब hearteye.jpg
दीपिका एकदम फिट. एजंट शोभते. आणि जॉनचा खलनायक केवळ भारी. काय personality आहे त्याची! आणि सलमान असलेला सगळा सिक्वेंस केवळ आहे! भाई रॉक्स!! Happy आमच्या इथे शाहरुख आणि सलमानच्याही एन्ट्रीला शिट्ट्या पडल्या.
Vfx उत्तम आहेत. स्टंट्स अप्रतिम. Almost मिशन इम्पॉसिबल च्या लेव्हलला नेला आहे पिक्चर. फुल पैसा वसूल!!

Pages