Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हिला पाहिले नाहिये अजुन
हिला पाहिले नाहिये अजुन
>>>>
much before her Hindi film debut, she had a huge impact on audiences all over the country, not just south. So much so, that's she's been tagged as the 'national crush'.
नॅशनल क्रश आहे ती..
पुष्पाची श्रीवल्ली आहे
पारंपारीक सौण्दर्याच्या निकषात बसवू नका तिला..
आर बालकी चा चूप पाहिला नाही
आर बालकी चा चूप पाहिला नाही का कोणी... मस्त आहे.... सनी देवल इज बॅक ...
ठरलं तर मगं, रघू आचार्य आणि
ठरलं तर मगं, रघू आचार्य आणि आबा हे रश्मिकाला साऊथच्या बसमध्ये बसवून येणार आहेत व त्यासाठी दोघांनी रूमाल टाकले आहेत. मगं मी प्राजक्ताच्या सर्व मोदकांपैकी काही मोदक व बसच्या तिकिटाचे पैसे त्यांना देईन. तोपर्यंत स्मिता श्रीपाद अजून एकदा राझी बघेल व सुनिधी व अजून काही जणं किमान 'गुडबाय' तरी बघणार नाहीत आणि फारएन्ड तुलनात्मक 'अर्कांचे' संशोधन करत रहातील.
नॅशनल क्रश वगैरे वर विश्वास नाही. एवढी मोठी लोकसंख्या आहे सुनील शेट्टी व उदय चोप्रा सुद्धा कुणानकुणाचे क्रश असतील.
द मेन्यू मी ही बघेन.
द मेन्यू मी ही बघेन.
कॉमी यांची निवड नेहमीच 'हटके' वाटते. काही तरी नवीन सुचवण्या मिळतात.
रघू आचार्य आणि आबा हे
रघू आचार्य आणि आबा हे रश्मिकाला साऊथच्या बसमध्ये बसवून येणार >> अरे देवा ! हे वाचण्याआधी बंद का नाही झाले ? डोळे नाही मायबोली !!
सलीमने हेलनशी लग्न करावे तद्वत आम्ही आपले कुठलीही पडेल, टाकाऊ हिरवीन उद्धार करण्यासाठी चालवून घेऊ म्हणतो. हिने तर आत्ताच तिचे (मोठ्ठाले) डोळे बॉलीवूड मधे उघडले होते. जग पहायला सुरूवात केली होती. आणि लगेचच पाठवणी ?
धरणीकंप होऊन पृथ्वी पोटात घेईल तर किती छान होईल !! मला नाही, या टवाळखोरांना !!
मेनु आवडला होता. आल्या आल्या
मेनु आवडला होता. आल्या आल्या धावत जाऊन पाहिला होता. मला ती मुलगी खूप आवडते. शेफचे काम अफलातुन.
मी काल आटो पाहिला, टॉम हँक्सवाला. मला आवडला. फार मास्टरपीस वगैरे नाहिये पण टॉम हँक्स आहे, अजुन काय हवं? असे किती बुजुर्ग अभिनेते आहेत जे आपल्या खांद्यावर मुख्य पात्राचा डोंगर लिलया पेलतात? त्यात ‘आटो’ ची नवी शेजारीण पण फार गोड आहे. दोघांनी सिनेमा उचललाय.
माधुरी, कतरीना ,जॅकलिन. सारखे
माधुरी, कतरीना ,जॅकलिन. सारखे अभिनयातले ठोकळे चालतात रश्मीका ने काय पाप केलेय ...
>> दोन आव्डीचे उद्योग एक फाइन
>> दोन आव्डीचे उद्योग एक फाइन डायनिन्ग आउट आणि थेटरात जाउन सिनेमा पाहणे. >>
चीज बर्गर खाऊन जगू काही दिवस. तसंही फाईन डायनिंगला गेलं तरी बर्गर किंवा टाको यावरच नजर घुटमळत असते. सधाकुंप. स्टेक काही झेपत नाही आणि कार्ब खाल्ल्याशिवाय पोटभरीचा फील येत नाही, आणि पास्ता नको वाटतो.
व्हॉल्डी आणि क्वीन्स गँबिट दिसले आणि इथे कॉमी/ असाम्याने रेको दिलेला म्हणूनच लावला. जरा डोंपोउं आहे शेवट पण ठीक आहे.
काल आटो पाहिला, टॉम हँक्सवाला
काल आटो पाहिला, टॉम हँक्सवाला.
>>>>
'A man called Ove' ह्या पुस्तकावर बेतलेला सिनेमा आहे. पुस्तक घेऊन ठेवले आहे. ते वाचून झाल्यावर मगच सिनेमा बघायचा ठरवलंय. उत्सुकता वाटतेयं. बघू कितपत टिकतोयं हा संकल्प..!
------
रघू आचार्य
आचार्य
आचार्य
फारएन्ड तुलनात्मक 'अर्कांचे'
फारएन्ड तुलनात्मक 'अर्कांचे' संशोधन करत रहातील. >>>
सुनिधी - ऑटो कोठे पाहिला? थिएटर की स्ट्रीमिंग?
ऑस्कर नॉमिनेशन जाहीर झाली
ऑस्कर नॉमिनेशन जाहीर झाली आहेत.
Everything Everywhere All at Once
मी खूष. मल्टीव्हर्स थीम.
सुनील शेट्टी व उदय चोप्रा
सुनील शेट्टी व उदय चोप्रा सुद्धा कुणानकुणाचे क्रश असतील.
>>>
हो पण नॅशनल क्रश नसतील. ना होऊ शकतात. बंदी मे कुछ तो बात होगी..
Everything Everywhere All at
Everything Everywhere All at once
The banshees of Inisherin
Avatar 2
Top Gun Maverick
Pinocchio (Del Torro)
The Batman
RRR
Glass Onion
नॉमिनेट झालेले हे पाहिलेत.
आपला all that breathes- सर्वोत्तम डॉक्युमेंटरी फीचर जिंकणार आहे असे काही critics चॅनल्स मधुन खात्रीने ऐकले आहे. तो एक बघायचा आहे. बरेच नॉमिनेशन मिळालेला आणि केट ब्लांचेट असलेला Tár बघायचा आहे. Brandon Frassier चा The Whale हा आमच्या लाडक्या A२4 कंपनीने वितरीत केला आहे तेव्हा तो बघायचा आहेच आहे.
RRR फक्त गाण्याकरता नॉमिनेशन
RRR फक्त गाण्याकरता नॉमिनेशन आहे ना? पिक्चरकरता नाही.
होय, संपूर्ण नॉमिनेशन लिस्ट
होय, संपूर्ण नॉमिनेशन लिस्ट मधले कुठले बघितलेत ते लिहिलेत. त्यात सगळ्या काटेग्र्या आल्या.
सुनील शेट्टी ला बोलायचं नाही
सुनील शेट्टी ला बोलायचं नाही हां.एकदम हुशार माणूस आहे.बरेच बिझनेस केले.करियर मध्ये फार अफेअर्स नाहीत.आज मुलीच्या लग्नात सालस सारखं नीट वधुपिता मोड मध्ये पत्रकारांशी बोलून मिठाईचे डबे पण वाटले.रितभात आहे हो दादांना.
(उदय चोप्रा माझा क्रश नाही.पण तो धूम सिरीज मध्ये चांगला आहे.)
सुनील शेट्टी ला बोलायचं नाही
सुनील शेट्टी ला बोलायचं नाही हां.एकदम हुशार माणूस आहे.बरेच बिझनेस केले.करियर मध्ये फार अफेअर्स नाहीत.आज मुलीच्या लग्नात सालस सारखं नीट वधुपिता मोड मध्ये पत्रकारांशी बोलून मिठाईचे डबे पण वाटले.रितभात आहे हो दादांना. >>> हे पुणेरी कौतुक झाले हे वाचून एका चित्रपट अभिनेत्याबद्दल काही मजकूर आहे याचा पत्ता लागत नाही
Also define फार अफेअर्स
उदय चोप्रा सुद्धा कुणानकुणाचे
उदय चोप्रा सुद्धा कुणानकुणाचे क्रश असतील >> त्याच्या मुळे अनेक बॉलीवूड स्टार्सचं ढासळतं करीयर सुधारलं. जॉन अब्राहम, ऐश्वर्या, ईशा देओल, ऋत्विक, आमीर या सर्वांना उदयच्या क्रेझचा फायदा झाला. २०० कोटी, पाचशे कोटी, सहाशे कोटी. हे सगळं उचो च्या फिमेल फॅन फॉलोईंगमुळे झालं.
त्याच्या पॅक्सची काय ओरिजिनल अॅक्टींग आहे ! त्याच्यापुढे सलमानच्या पॅक्सची अॅक्टींग एकदम ग्लास फायबर वाटते.
सुनील शेट्टी ला बोलायचं नाही
सुनील शेट्टी ला बोलायचं नाही हां.एकदम हुशार माणूस आहे.बरेच बिझनेस केले.करियर मध्ये
>>>>
आमच्या मुंबईच्या घराच्या बिल्डींगखाली त्याचे दुकान होते. आता विकले त्याने ते. पण तो असायचा तिथे. हात दाखवायचो आम्ही त्याला. तोही दाखवायचा. आता ओळख दाखवेल की नाही शंका आहे. किंवा कदाचित दाखवेलही. का उगाच जजमेंटल व्हा..
तो भाडेकरू होता माझा. मला
तो भाडेकरू होता माझा. मला तरी देईल का ओळख ?
हा हा.. मी खरे सांगतोय असो
हा हा.. मी खरे सांगतोय
असो
मिशन मजनूबद्दल असलं काहीतरी
मिशन मजनूबद्दल असलं काहीतरी वाचून आता बघावा की नाही असा प्रश्न पडलाय. 'द मेनू' टायपातले हॉरर खरंतर नॉट माय टाईप. पण फारच भारी असेल तर बघेन. या आठवड्यात पठाण रिलीज होतोय तो आधी पाहणार
परवाच 'घोस्टबस्टर्स २' पाहिला. बरा आहे. मजेशीर पण. पण पार्ट १ जास्त चांगला होता असं वाटलं. प्रमुख भुताचा काही फारसा प्रभावच पडत नाही. पहिल्या भागात सिनेमा थोडासा तरी भीतीदायक होता तेवढाही नाही हा. काही काही गोष्टींचा चांगला वापर करता आला असता असं वाटलं पण तो तसा न केल्याने निराशा झाली.
गेल्या आठवड्यात 'द पेल ब्लू आय' पाहिला. तो आवडला. स्लो आहे पण चांगला घेतलाय.
फारेन्ड, ए एम सी मधे पाहिला
फारेन्ड, ए एम सी मधे पाहिला आटो.
Gerard Butler चा ‘प्लेन’ पण पाहिला. साधासुधा सिनेमा. वाईट नाही, उत्तम नाही. सभ्य सिनेमा.
‘सर्चिंग’ वाल्यांचा ‘मिसिंग’ पण लागलाय, तो पहावा झालं.
Ini utharam (now,the answer)
Ini utharam (now,the answer) झीफाईववर पाहिला. मल्याळम.
एक डॉक्टर नायिका पोलिस स्टेशन मधे जाऊन मर्डर केल्याचे कनफेस करून सरेंडर होते..कुणाला मारले,कुठे पुरले दाखवते आणि सुरू होता रिअल ड्रामा..ट्वीस्ट पे ट्वीस्ट..थ्रीलर,सस्पेन्स,वेगवान कथानक. बघण्यासारखा आहे.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/shahrukh-khan-deepika-padu...
वरील रिव्हूनुसार पठाण न पाहिलेला बरा असे वाटते....
ते ट्रेलर बघूनच वाटलं होतं
ते ट्रेलर बघूनच वाटलं होतं घिसापिटा विषयच असणार आहे.
कंटाळा आला आता तेच तेच बघून.
बाप रे! अॅक्टिंग मधे जॉन
बाप रे! अॅक्टिंग मधे जॉन अब्राहम सर्वात चांगलाय म्हणे?! धन्य. दीपिका आयएस आय एजन्ट? एक था टायगर मधे सेमच दाखवले आहे की. पुन्हा काय तेच. काही नविन स्टोरी तरी घ्यायची ना.
नेटफ्लिक्सवर गुड नर्स बघतेय.
नेटफ्लिक्सवर गुड नर्स बघतेय. वेळेअभावी अर्धाच बघता आला. आज पूर्ण करेन.
एका नर्सला तिच्या को वर्कर मेल नर्स वर काही पेशंटच्या मृत्युंमुळे संशय येतो की हा सिरिअल किलर आहे. ती तिच्यापरीने तपास करतेय सध्या तरी इथपर्यंत बघितलं.
थोडे लुप होल्स आहेत पण तरी ओके आहे .
Wow! पाकिस्तान la bollywood
Wow! पाकिस्तान la bollywood एवढे glorify का करत असते??? या कारणाने हा movie बघणार नाही. बाकी दीपिका पदुकोण,, जॉन अब्राहम वगैरे आनंदी आनंद! म्हणुन दुरूनच नमस्कार
Pages