Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल नॉर्विक चालू केला (नेफ्लि
काल नॉर्विक चालू केला (नेफ्लि). युद्धपट आहे. खनिज स्वरुपात लोखंडाची हिटलरला युद्ध चालू ठेवण्यासाठी निकड आहे, तशीच ब्रिटनला पण आहे. नॉर्वे मध्ये मिळणारी ओर function at() { [native code] }युंतम प्रतीची असल्याने तिकडे दोघांचा डोळा आहे. अशात हिटलरचा पहिला पराभव नॉर्विक मध्ये कसा होतो यावर चित्रपट आहे.
चांगला वाटतोय.
अस्मिता - मस्त पोस्ट. मनातलं
अस्मिता - मस्त पोस्ट. मनातलं लिहीलंय.
>>>>धन्यवाद आचार्य. , तुमची सविस्तर पोस्टही आवडली.
Snatch (2000)
Snatch (2000)
धमाल सिनेमा ! ब्लॅक कॉमेडी - काहीसा थ्रिलर
ब्रॅड पिट, जेसन स्टँथम हे माहितीचे चेहरे, पण इतर भरपूर पात्रे आहेत.
अनेक पात्रे, प्रत्येकाचे वेगवेगळे मोटिव, ह्यांची एकमेकांत गुंतलेली गोष्ट आहे. गोष्टीचा सिनोपसिस देणे सुध्दा अवघड आहे. ब्रॅड पिट एका रोमानी भटक्या जमातीतील बॉक्सरचे पात्र साकारत आहे, वेगळ्याच रुपात दिसेल. जेसन स्टँथम सुध्दा ह्यात वेगळाच ॲक्टर वाटतोय कारण इथे नेहमीप्रमाणे हाणामारीचे काम नाहीये त्याचे.
कुठे पाहिला ते ही लिहा.
कुठे पाहिला ते ही लिहा.
अरे हो, “मिसिंग” मला आवडला. थेटरमधे लागलाय.
इंटरनेटच्या मदतीने शोधायचा प्रकार पहायला मजा येते. काहीवेळाने तर कीबोर्डचा आवाजपण संवाद वाटु लागतो. पासवर्ड्स शोधणे जरा जास्त सोपे वाटले पण तरी गंमत वाटते पहायला. पण हे सगळे शोधायचे मार्ग खरंच उपलब्ध आहेत का ते मात्र माहिती नाही.
भारतातले अॅमेझॉन प्राईम व
भारतातले अॅमेझॉन प्राईम व युएसमधले यात कंटेटमध्ये फरक असतो का?
Snatch हुलु वर उपलब्ध आहे असे
Snatch हुलु वर उपलब्ध आहे असे दिसतेय. पण मी १२३movies वर स्ट्रिम केला
भारतातले अॅमेझॉन प्राईम व
भारतातले अॅमेझॉन प्राईम व युएसमधले यात कंटेटमध्ये फरक असतो का? >> असतो तर!
हे वाचा लेख दोन-तीन वर्षे जुना आहे, आता भारतात प्राईमवर रेंटवर काही चित्रपट येतात, म्हणजे थोडा फरक पडला आहे.
प्राइमवर 'फनरल' (मराठी)
प्राइमवर 'फनरल' (मराठी) पाहिला.
एकदा बघण्यासारखा आहे. विषय वेगळा आहे, इमोशनल ड्रामा करण्याचा भरपूर चान्स असताना केलेला नाहीये.
परिस्थितीवर मात करून, वेगळी बिझिनेस आयडिया लढवून नेत्रदीपक यश मिळवणारा हिरो - वगैरे दाखवण्याचं सगळं टाळलं आहे.
स्क्रिप्ट छान आहे. स्क्रिप्टमधल्या काही काही लहान जागा छान घेतल्या आहेत.
आरोह वेलणकरचं काम आवडलं. तन्वी बर्वे - नवा चेहरा - ही सुद्धा आवडली. तिला फार फुटेज नाही, पण जेवढं आहे त्यात ती लक्षात राहते.
@अस्मिता : १००%. इतके प्रमोशन
@अस्मिता : १००%. इतके प्रमोशन अंगावर येते.
काय म्हणे, अमुक ऍक्ट्रेस सायकलवरून पडली आणि तिची करंगळी फ्रॅक्चर झाली तरी तिने कसा डान्स केला किंवा अंगात अमुक तमुक ताप होता तरी काय स्टंट केला. काम आहे तिचे/त्याचे ते. वट्ट पैसे मोजून घेतात त्यासाठी. आणि तेवढेच बरे नसेल तर देईल कि दिग्दर्शक सुट्टी. आम्ही काय गोळ्या/हेअर लाईन फ्रॅक्चर घेऊन हापिसला जात नाही का गरज असेल तर.
जरा सावळी हिरोईन (ऍक्ट्रेस म्हणत नाहीये मी प्लीज नोट) असली कि ती नेक्स्ट स्मिता पाटीलच असते. सोनम कपूरच्या लाँचच्या वेळी तिला नेक्स्ट वहिदा रहमान जाहीर केले होते. [वहिदाजी सभ्य आहेत म्हणून त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला नाही.]
ऍक्टर्स पेपरभर मुलाखती देतात कि त्यांनी या रोल साठी ६ पॅक कसे बिल्ड केले किंवा फलाण्या प्रकारचे मार्शल आर्टस्/डान्स शिकले. एवढ्या जाहिराती करून पैसे न उरल्याने बहुतेक कथा, ऍक्टिंग वगैरे फालतू गोष्टीवर लक्ष दिले जात नसावे, असा संशय येतो कधी कधी. आजकाल जास्त प्रमोशन पाहिले की मी नॉर्मल लोकांचे रिव्यू येईपर्यंत टाळतेच.
कुणी तरी बहीष्कार घालायची भाषा करतंय म्हणून त्यांना हरवण्यासाठी पिक्चर पहा हे अजब लॉजिक आहे. या लॉजिकने गुंडा सुद्धा हिट होऊ शकतो.
>>>
पाकिस्तान la bollywood एवढे
पाकिस्तान la bollywood एवढे glorify का करत असते??>>>
>>> कारण प्रेक्षक काही फक्त भारतीय नसतात. भारतीय उपखंडात, थोड्या फार प्रमाणात आखाती देशात बॉलीवूडचे चित्रपट आवडीने बघितले जातात. पाकिस्तानात बॅन केले असले तरी ओव्हरसीज मधून चांगली कमाई होऊ शकते, जर आऊट राईट पाकिस्तान विरुद्ध स्टॅन्ड घेतला नाही तर. भारतात नुकसान झाले तर ओव्हरसीजमध्ये भरून काढता येऊ शकते किंवा काळ्याचे पांढरे केले जाऊ शकतात.
या लॉजिकने गुंडा सुद्धा हिट
या लॉजिकने गुंडा सुद्धा हिट होऊ शकतो >> णिशेद. गुंडा याशिवायच हिट आहे.
सहमत, गुंडा हा एक कल्ट आहे
सहमत, गुंडा हा एक कल्ट आहे
त्याला हे हिट फ्लॉप असले परिणाम/परिमाण नसतात
तो ऑल टाईम ग्रेटेस्ट आहे
.माफी असावी सरकार
.माफी असावी सरकार
काल नॉर्विक चालू केला (नेफ्लि
काल नॉर्विक चालू केला (नेफ्लि). युद्धपट आहे.>>>>
मीही बघतोय, मस्त घेतलाय
काल नॉर्विक चालू केला (नेफ्लि
काल नॉर्विक चालू केला (नेफ्लि). युद्धपट आहे.>>>> धन्यवाद सांगितल्या बद्दल. मी पण बघे न वीकांताला. वर्ल्ड वॉर टू आपला फेवरिट सब्जेक्ट आहे. युट्युब वर वॉर फॅक्टरीज नावाची एक सीरीज आहे. त्याला पूरक आहे हे.
काल नेटफ्लिक्सवर Elephant
काल नेटफ्लिक्सवर Elephant Whisperer ही ४० मिनिटाची डॉक्युमेंटरी बघितली. याला ऑस्कर नॉमिनेशन आहे.
एक साऊथ ईंडीयन कपल रघु नावाच्या हत्तीचे केअरटेकर आहेत. त्यांचं नातं इतकं गोड आहे की ते रघुची अगदी मुलाप्रमाणे काळजी घेतात.
त्या तिघांमधे फार सुंदर बाँडिंग दाखवलंय. त्यांचं रोजचं जगणं त्याच्याभोवतीच. त्याला काय आवडतं काय नाही, तो हे खातच नाहीये बघा, त्याला असंच लागतं अशी त्या आईची लाडिक तक्रार करणं इतकं निरागस वाटलं.
बाकी निसर्गसौंदर्य तर काय म्हणू? एकेक फ्रेम आवडली आहे.
एकूणच फिल गुड.
हो फार अप्रतिम आहे
हो फार अप्रतिम आहे
त्यांचा लग्नातला फोटो कसला भारी घेतलाय
हॅपी फॅमिली
मी घरातल्या सगळ्यांना बघायला लावली
हॅपी फॅमिली>>> ++++१११
हॅपी फॅमिली>>> ++++१११
अरे वा. बघायला पाहिजे.
अरे वा. बघायला पाहिजे.
सहमत, गुंडा हा एक कल्ट आहे
सहमत, गुंडा हा एक कल्ट आहे
त्याला हे हिट फ्लॉप असले परिणाम/परिमाण नसतात >> मग काय एकदम "त्या ह्या आपल्या तुझ्या फेवरीट ह्यां'च्यासारखा आहे गुंडा ! अगदी 'अनादी अनंत कालातीत' असे ज्याचे वर्णन केले आहे तोच तो ! - ( " तो हा आपला तुझा फेवरीट आयडी" नाही, तर गुंडा ! )
गुंडा हा एक कल्ट आहे >>>
गुंडा हा एक कल्ट आहे >>> भरघोस अनुमोदन
गुंडा, आनंद आणि मुघले आझम
गुंडा, आनंद आणि मुघले आझम माझे आवडते चित्रपट आहेत...
गुंडा, शोले आणि डीडीएलजे
गुंडा, शोले आणि डीडीएलजे माझे आवडते चित्रपट आहेत
साने गुरुजी आणि आपण माझे
साने गुरुजी आणि आपण माझे आदर्श आहात सर
अहो आशूचॅंप कुठे आहात?
अहो आशूचॅंप कुठे आहात?
मी लिहीला बघा तो डोंगर जाळल्याचा किस्सा
https://www.maayboli.com/node/82895
अवांतर बद्दल क्षमस्व लोक्स
बघितला, ट्रॅप आहे तो
बघितला, ट्रॅप आहे तो
असलं फालतू लिहिण्यापेक्षा खरं काय ते का नाही लिहीत
वन विभागात माझे बरेच मित्र आहेत, ते पण विचारत आहेत हे काय प्रकरण आहे
म्हणलं एक सेल्फ ओब्सेस्ड व्यक्तीचे कृत्य आहे
आणि तो थापा मारण्यात पटाईत आहेत
जर तुम्हाला इतकिच खाज असेल तर मी देतो तुमचा पत्ता, आहे माझ्याकडे
धागा काढून असली चिंधीगिरी करायची तर त्याचे परिणाम पण भोगा
आहे का तयारी?
वर्ल्ड वॉर टू आपला फेवरिट
वर्ल्ड वॉर टू आपला फेवरिट सब्जेक्ट आहे.>>>
मामी अहो नेटफलिक्स ला तर लै आहेत वॉर मुव्हीज
नव्याने आल्यात एक the bombardment बघा
नाझीचे कार्यालय समजून गैरसमजुती ने एक शाळेवर बॉम्ब टाकले जातात ही सत्यघटना दाखवली आहे
तसेच forgotten battle
The photographer of mathusen
Operation finale
My best friend anne frank
तसेच एक वेगळ्या विषयावर असलेला resistance banker
हाही बघण्यासएखा आहे
बॅन केले असले तरी ओव्हरसीज
बॅन केले असले तरी ओव्हरसीज मधून चांगली कमाई होऊ शकते, जर आऊट राईट पाकिस्तान विरुद्ध स्टॅन्ड घेतला नाही तर. भारतात नुकसान झाले तर ओव्हरसीजमध्ये भरून काढता येऊ शकते किंवा काळ्याचे पांढरे केले जाऊ शकतात.::
वाह, मग स्वतः च्या देशाला किती ना का वाईट दाखवा... आणि भारतीय जनता ते पहायला जाऊन पहिल्या रांगेत जाऊन नाचणार सुद्धा. अमेरिकन चित्रपट ही जगभर पाहिले जातात पण इराणी रशियन वगैरे गुप्तचर संस्थांना इतके मानवतावादी दाखवलेले आठवले नाही.
पिक्चर आहे तो. मनोरंजन झालं
पिक्चर आहे तो. मनोरंजन झालं पाहिजे. देशाला वाईट दाखवा की डोक्यावर घ्या... मजा आली पाहिजे. स्टोरी टेलींग चांगलं आणि विश्वासार्ह पाहिजे, बाकी हू केअर्स!!! ते काय सरकारी वार्तापत्र आहे का मॅनेजेड पत्रकार परिषद आहे!
“ साने गुरुजी आणि आपण माझे
“ साने गुरुजी आणि आपण माझे आदर्श आहात सर” हेच आठवलं होतं
Pages