Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भक्तांनी भाजप नेत्यांच्या
भक्तांनी भाजप नेत्यांच्या नावाने शिमगा चालू केला आहे. पठाणला विरोध करण्यासाठी आमचा वापर केला असे म्हणतात आता. चोप्रा आणि भाजप यांची सेटींग होती का असे प्रश्न विचारताहेत. इथे एका भक्ताच्या युट्यूब चॅनलची लिंक मागे कुणीतरी दिली होती. त्याने पण हीच शंका बोलून दाखवली आहे.
सरांच्या धाग्यावर जाऊन
सरांच्या धाग्यावर जाऊन प्रतिसाद दिला नाही म्हणून सरांनी मी इथं लिहिलेला प्रतिसाद कॉपी करून स्वतःच्या धाग्यावर टाकला
मला न विचारता, न सांगता
याला प्रतिसाद पायरसी म्हणता येईल का??
आणि असल्या भुरट्या गोष्टी करणारे लोकांना नैतिकतेचे धडे देतात हे योग्य आहे का?
किती बाई त्या रूनमेशला ट्रोल करतात म्हणून गळे काढणारी गॅंग कुठं आहे?? सरांकडे टोटल दुर्लक्ष केलं तर ते असले माकडचाळे करून बोलायला भाग पडतात आणि वर तुमच्या गॅंग कडून सहानुभूती उपटतात, हेही योग्य आहे का?
फनरल मराठी पाहिला प्राईमवर
फनरल मराठी पाहिला प्राईमवर
ठिक आहे
Scott Pilgrim vs. the world
Scott Pilgrim vs. the world पाहिला. मस्त आहे. प्राईम वर आहे.
टिनेज प्रेमकहाणी आहे, पण रेडी प्लेअर वन सारख्या व्हिडिओ गेम जगात कल्पना करून लिहिली आहे. ॲक्शन सीन जबरदस्त आहेत. विनोदी संवाद सुध्दा छान आहेत.
सरांच्या धाग्यावर जाऊन
सरांच्या धाग्यावर जाऊन प्रतिसाद दिला नाही म्हणून सरांनी मी इथं लिहिलेला प्रतिसाद कॉपी करून स्वतःच्या धाग्यावर टाकला
मला न विचारता, न सांगता
>>>>
आशूचँप,
तुम्ही माझ्या डोंगर कथेसंदर्भातला प्रतिसाद दुसर्या धाग्यावर दिला म्हणून दुसर्या धाग्यावरची चर्चा भरकटू नये ईतकेच पाहिले.
बाकी वर्षभर मला डोंगर किस्सा कधी सांगतोस म्हणून मागे लागलेलात. आता खरेच लिहिले तर दुर्लक्ष करायचा बहाणा करून कानाडोळा करत आहात. धिस ईज नॉट फेअर. अॅप्रेशिएट करा की
असो,
आताही विनंती आहे की ईथे डोंगर जाळायची चर्चा नको. तिथेच या.
आधीच हा धागा पठाणमय झाला आहे. ते ही टाळा म्हणून मी लोकांना कालपासून विनंती करतोय. ईत्र तित्र शाहरूख नको. अश्याने मग लोकं चिडतात.
अश्याने मग लोकं चिडतात.>>>>
अश्याने मग लोकं चिडतात.>>>>
तेच तर हवं असतं की तुम्हाला
लोकं चिडली की तुम्हाला विकृत आनंद होतो
आणि मी कुठं काय लिहावं हे मी ठरवणार, तुम्ही नाही
तुम्ही अडमीन नाही का इथले मालक नाही
त्यामुळे माझा प्रतिसाद जिथं मला पाहिजे तिथेच लिहीन
तुम्हाला कडीमात्रही हक्क पोचत नाही प्रतिसाद चोरून दुसरीकडे टाकायचा
असल्या भुरट्या गोष्टी करणे बंद करा
एखाद्याचे लिखाण परवानगीशिवाय
एखाद्याचे लिखाण परवानगीशिवाय कॉपी पेस्ट करणे हे भयंकर कृत्य आहे.
प्लीज असं करत जाऊ नका. लिखाणाचे पावित्र्य जपा.
ओके
ओके
आयुष्यमान खुराणाचा अॅक्शन
आयुष्यमान खुराणाचा अॅक्शन हिरो पाहिला. खिळवून ठेवणारा आहे. सिनेमा संपल्यावर अनेक प्रश्न पडतात, पण किमान यात ओरिजिनल प्लॉट तरी आहे (ढापलेला असल्यास माहिती नाही).
चुकून झालेल्या अपघातात जीव जातो आणि सेलेब्रिटी असल्याने क्षणात मीडीयात न्यूज झळकते. अॅक्शन हिरो घाबरून पळ काढतो ते थेट इंग्लंडला. मीडीयाचा हाय व्होल्टेज ड्रामा आणि सेट होत जाणारे नरेटिव्हज आणि क्षणात पारडे उलटल्यावर झाल्यावर एक पलटी मारणारा अँकर, दुसरा तोंडावर पडल्यासारखा अँकर आणि तिसरा दोन्ही परिस्थितीत रॅशनल राहू पाहणारा अँकर हे मस्त घेतलेय. दाऊद बद्दल एक शक्यता दर्शवली आहे. ती ही विचार करण्यासारखी आहे. अॅक्शन हिरो खूनाचे बालंट कसे उलटवतो यापेक्षाही ज्याच्यावर आरोप आहे तो सेलेब्रिटी असल्याने देशभर कसा तमाशा चालतो हाच विषय आहे असे वाटले. आवडला. सर्वांचेच काम उत्तम आहे. आखु आणि ज अ टॉप.
अनामिका दे - स्पॉईलर अलर्ट
अनामिका दे - स्पॉईलर अलर्ट असे लिहा तुमच्या पोस्ट मध्ये.. तुम्ही स्पॉईलर टाकला आहे आणि त्यामुळे अजूनही चित्रपट ज्यांनी बघितला नाही अशा लोकांसाठी इट्स नॉट फेयर...
शेरलॉक च्या हँगओव्हर मध्ये
शेरलॉक च्या हँगओव्हर मध्ये द ईमिटेशन गेम बघितला . आवडला . शेवटी फार वाईट वाटलं . बेन्डिक्ट ची अॅक्टंग मस्तच .
रॉबर्ट क्रॉवलीचे दोन्ही जावई दिसले एकत्र ड्रिन्क्स घेताना
सध्या मिशन मजनू बघतेय . लोकांनी याची तुलना राझीसोबत का केलीय ?
राझी मध्ये , आलिया पाकिस्तानात आल्यापासून जो एक तणाव जाणवतो , तो आतापर्यन्त मिमजनूमध्ये तरी जाणवला नाही .
त्याच माहिती गोळा करीत फिरणं फारच सहज वाटतय . लश्कराच्या मोठ्या अधिकाराल्या हा निरागसपणे १० प्रश्न विचारेल प्ण त्याने बाव्ळटपणे उत्तर देणं पटलं नाही .
सिद्धार्थ आणि रश्मिकाची केमेस्ट्री पण जुळत नाही .
द इमिटेशन गेम्स भारी आहे.
द इमिटेशन गेम भारी आहे.
नेट फ्लिक्स वर आयुष्यमान
नेट फ्लिक्स वर आयुष्यमान खुराणा चा ऍक्शन हिरो खरेच भारी आहे .....
अॅक्शन हिरो बद्दल सगळ्यांना.
अॅक्शन हिरो बद्दल सगळ्यांना. खूप आवडला >>>> +++१११
ऍक्शन हिरो मध्ये अगोदर
ऍक्शन हिरो मध्ये अगोदर एकमेकांशी मारामारी करणारे आयुष्मान आणि जयदीप अहलावत ला इतर गुंड घेरतात .
तेंव्हा जयदीप तेथून पळून जाण्यासाठी त्या गुंडाच्या म्होरक्या ला गन पॉईंट वर घेवून आयुष्यमान ला कार काढायला सांगतो .
त्या वेळी कार मध्ये आयुष्यमान बसून सुसाट निघून जातो तेंव्हा जयदीप च्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन पाहण्यासारखे आहेत
Sorry च्रपस.. हे लिहितानाही
Sorry च्रपस.. हे लिहितानाही चुकलय.. सो पुन्हा एकदा माफी... आता पोस्ट एडिट करता येत नाहीये..
आज पाहिला ऍक्शन हिरो... मस्त
आज पाहिला ऍक्शन हिरो... मस्त आहे.. जयदीप पाताळलोक पासून आवडतोच... आयुष्मान ने पण छान काम केले आहे...
चक्क सरळ कॉमेंट ..
चक्क सरळ कॉमेंट ..
मी बघणार अॅक्शन हीरो
मी बघणार अॅक्शन हीरो विकांताला आ.खु. चे चित्रपट असेही चुकवत नाहिच.
Vivarium पाहिला प्राईमवर.
Vivarium पाहिला प्राईमवर.
सस्पेन्स, मिस्ट्री.
सुरूवातीला ते भुलभुलैया वगैरे चांगलं वाटलं..नंतर नंतर इतका नाही आवडला..
बघा किंवा नका बघू.
त्या वेळी कार मध्ये आयुष्यमान
त्या वेळी कार मध्ये आयुष्यमान बसून सुसाट निघून जातो तेंव्हा जयदीप च्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन पाहण्यासारखे आहेत>> हो आणि जेव्हा तो आयुशमानला मलायका बरोबर नाचताना बघतो तेव्हा सुद्धा
अॅक्शन हिरो आवडला, आयुष्यमान
अॅक्शन हिरो आवडला, आयुष्यमान आवडतोच यावेळेस अॅक्शन मोड मधे भारी दिसलाय,वावरलाय.
त्या वेळी कार मध्ये आयुष्यमान
त्या वेळी कार मध्ये आयुष्यमान बसून सुसाट निघून जातो तेंव्हा जयदीप च्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन पाहण्यासारखे आहेत>> हो आणि जेव्हा तो आयुशमानला मलायका बरोबर नाचताना बघतो तेव्हा सुद्धा >>>>>>>>
रात्री १२ .३० वाजता मी जाम हसत होतो
पाऊण तास पाहिला.. रोचक वाटला.
पाऊण तास पाहिला.. रोचक वाटला.. पुढेही असावा असे ईथले प्रतिसाद बघून वाटतेय.. जमल्यास आज संपवेन
गेल्या काहि दिवसात तीन
गेल्या काहि दिवसात तीन बॉलिवुडि सिनेमे पाहिले - मिशन मजनु, अॅक्शन हिरो, पठाण. तिन्हि बकवास, लो टु हाय इन दॅट ऑर्डर. रॉ, पाकिस्तान, दाउद यापलिकडे काहि नाहि. कुछ तो नया सोचो यार. मग त्यावर उतारा म्हणुन द कंपनी यु किप, नार्विक: हिटलर्स फर्स्ट डिफीट, यु पिपल पाहिले.. पहिला हुलु, बाकिचे नेफिवर...
अॅक्शन हिरो मी पण चालू केला.
अॅक्शन हिरो मी पण चालू केला. चुकुन घडलेली हत्या आणि काढलेला पळ बघितल्यावर पुढे बघावासा वाटला नाही. तो प्लॉट नको वाटतो आता.
यू people सगळाच गोंधळ वाटला.
यू people सगळाच गोंधळ वाटला. चित्रपट विनोदी करायचाय की गंभीर, हलका फुलका करायचाय की काही सामाजिक भाष्य करायचाय हे काही ठरलं नव्हते असे वाटले. बरेच प्रसंग ओढून ताणून केले आहेत असे वाटले.
पुस इन बुट्स: द लास्ट विश
पुस इन बुट्स: द लास्ट विश
सुरेख ॲनिमेशन, मस्त कथा, चटपटीत संवाद, हृदय पात्रे. एक नंबर सिनेमा आहे, अवश्य बघा. चुकून माकून अजून थेटर मध्ये असेल तर लगेच बघा. लहान मुलांना तर खूपच आवडेल.
आधीचे पुस आणि किटी आहेतच- अँटोनीओ बंडेरास द ग्रेट आणि सालमा हायेक नी आवाज दिलाय. नवीन पात्रं सुद्धा मस्त आहेत. कुत्रा आणि गोल्डीलॉकचे अस्वल कुटुंब खास आवडले. गोल्डिलॉक ला फ्लॉरेन्स पघ ने आवाज दिलाय. जिमिनी क्रिकेट चे पात्र सुद्धा भारी. नवीन व्हीलन (डेथ) भीतीदायक आहे.
ऍनिमेशन सुरेख आहे, ब्रश स्ट्रोक सारखे चित्रीकरण आहे. ॲक्शन सीन तर खास सुंदर.
मी बुक माय शो वर रेंट करून बघितला.
नर्विक नंतर बोर झाला
नर्विक नंतर बोर झाला
म्हणजे नक्की काय दाखवायचं आहे हेच कळेना
बऱ्याच गोष्टी एकत्र दाखवून सगळं विस्कळीत झालं आहे असं वाटलं
ऍक्शन हिरो पण बोर झाला
ऍक्शन हिरो पण बोर झाला
खुराणा कुठल्याही अँगल ने ऍक्शन हिरो वाटत नाही
सगळंच कमालीचे खोटे आणि तद्दन टाकाऊ वाटलं
काढायचातर मग ऍक्शन हिरो च्या गाडीखाली कशी माणसे मेली आणी ते सगळं द्रायव्हर वर ढकलून हिरो कसा राजरोसपणे मसीहा बनून फिरतोय हे दाखवायचं
पण तेवढी डेरिंग तर कुणातच नाही
Pages