चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

गाणी बरी आहेत. घोडे पे सँवार वगैरे १-२ चांगली वाटली. काही फार कंटाळवाणी वाटली. गाण्यात त्यांनी जुन्या काळचा फील येईल असं संगीत दिलं आहे, पण गायक गायिका अजिबात जुन्या पद्धतीने (खुल्या आवाजात, ब्रिदिंग पॅटर्न, falsetto वगैरे न वापरता, शब्दांपेक्षा सुरांना महत्त्व देत (हा शेवटचा मुद्दा वादग्रस्त होऊ शकेल)) गात नाहीत. त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.

प्राईमवर ट्रान्स नावाचा मूव्ही बरेच दिवस दिसत होता. काल आणि आज थोडा थोडा पाहिला. प्रभूच्या नावाने चमत्कार करणारा एक पास्टर आणि त्याआडून चालणारा माफिया धंदा हा विषय आहे. पण त्याची हटके हाताळणी अनुभवण्यासारखी आहे. शेवट उगीचच अगम्य केला आहे. कदाचित दुसर्‍या भागाची लालसा असेल. मूव्ही सर्वसामान्य मनोरंजन करत नाही. प्रत्येकासाठी एंगेजिंग असू शकत नाही. अधून मधून ट्रॅक घसरून न-नायकाच्या अंगात खरंच दैवी शक्ती येते असे ओ एम जी प्रमाणे दाखवतोय कि काय असे वाटते.

चुका शोधायला गेल्या तर मिळतील. पण तसा वेळ मिळत नाही. किंवा तशी गरज वाटत नाही. बरीच पात्रं डिप्रेशन मधे गेलेली किंवा मनोविकारग्रस्त असणारी आहेत. गायब होणार्‍या पात्रांची चौकशी होत नाही. इतकं मॅनेज करणे आपल्या पॉलिटिशियन्सना तरी जमत असेल का? पण अशा काही त्रुटींमुळे अडत नाही.

नवीन Submitted by रघू आचार्य on 21 January, 2023 - 10:57>>>+ ११
मल्याळम मधे पाहिलेला..आता हिंदीत आहे बहुतेक.

बरोबर. आधी मल्याळम मधेच दिसायचा. पण सबटायटल्स वाचायला नको म्हणून पाहिला नव्हता.

दृश्यम 2 बघितला, मला आवडला. शेवटी 20 मिनिटं भारी आहेत, इतक्या कमी वेळेत हा विजय कसा सुटणार हा प्रश्न सतावत होता, कसली कलाटणी होती.

>>>>मी ही पाहिला काल. पोस्टशी पूर्णपणे सहमत.

खूप कमी वेळा असे होते कि सिक्वेल ओरिजिनल पेक्षा भारी होतो... द्रिश्यम 2 तसाच आहे.. स्क्रिप्ट जबरदस्त स्ट्रॉंग आहे...

Y मल्याळम पाहिला प्राईमवर.
एक मुलगा-मुलगी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधे सेल्फी काढत फिरत असतात..काही टगे त्यांना त्रास देतात..मुलगा त्यांच्याबरोबर भांडत असतो तोवर मुलगी मागच्या मागे पब्लिक प्लेसमधून किडनैप होते..पुर्ण सिनेमा शोधाशोध.. स्लो वाटू शकतो..आवर्जून पाहण्यासारखं काही नाही..

Atlantis साऊथ आफ्रिकन सिनेमा पाहिला प्राईमवर.
एका मुलीचा भाऊ गायब होतो आणि मग मेलेला सापडतो..मुलगी त्याच्या खुन्यापर्यंत पोचते का?कशी पोचते? चांगला आहे.

ट्रान्स पाहिला आहे महिन्याभरापूर्वी.
हिंदीत prime वर.
Acting चांगली.
खरंतर जे आणि जितकं दाखवलंय त्यावर objection घेउन मूवी बॅन कसा व्हायला हवा ह्यावर आंदोलनं झालीत का ते माहीत नाही.
त्याचं बॅकग्राऊंड म्युजिक जबरदस्त आहे.
Value addition करणारं.
लोकांना चमत्कार दाखवताना केलेले म्युजिक अफाट.

नुकताच वाळवी बघून आलो.
अजून कोणी बघितला असेल वा बघायचा असेल तर (मी तर म्हणेन बघाच आणि) या, ईथे खालील धाग्यावर चर्चा करूया

https://www.maayboli.com/node/82902

"मिशन मजनू" - नेफिवर नवीन आला आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा रोल मस्त आहे. परमीत सेठी आणि कुमुद मिश्रा यांचेही रोल चांगले आहेत. स्पाय मूव्ही आहे - अगदी 'राझी' लेव्हलचा नाही पण तरीही बघणेबल आहे. बघताना एंगेज करतो.

मी ही काल पाहिला मिशन मजनू. सफाईदार आहे (राझी इतका प्रभावी नाही. फारेण्डशी सहमत )
ओटीटीवर सध्या सर्वात छान पर्याय आहे मनोरंजनाचा. सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच आवडला. कुमुद मिश्रा अशा सिनेमात असतोच. पाकिस्तानच्या बाजूची पात्रं उभी करणार्‍या कलाकारांची नावे लक्षात नाहीत, पण त्यांनी उत्तम काम केले आहे. फॅमिली मॅन मधला मनोज वाजपेयीचा सहकारी यातही भाव खाऊन जातो.

SPOILER ALERT
इथला परिच्छेद वेगळ्या धाग्यावर हलवला आहे. चिकवा या धाग्यावर त्याची आवश्यकता नाही.

इंटरेस्टिंग माहिते, रघू आचार्य! हो मला आधी वाटले मोरारजी देसाईंना एकदम भोंगळ वगैरे दाखवतील. पण बर्‍यापैकी समतोल आहे चित्रण नेत्यांचे.

त्यावेळेस इतके फोन कॉल्स थेट रावळपिंडी-दिल्ली होताना कोणालाही संशय येत नाही हे आश्चर्य आहे. दुसरे म्हणजे रॉ ने सुद्धा एक दुसराच देश असे फोन करायला का वापरला नाही ते ही कळत नाही. दुबई वगैरे. पिक्चर पाहता असे वाटते की हे फोन थेट नसते, तर कोणालाच पत्ता लागला नसता.

रे फिनस, कोलिन फारेल आणि ब्रेंडन ग्लीसन असलेला In Bruges पाहिला.
डार्क कॉमेडी आहे. तिघांची पात्रे खूप मस्त रंगवली आहेत. आवडला !

हाॅट स्टार वर The Banshees of inisherin पहिला पॅडरिक व क्लाॅम या दोन जिवलग मित्रांची कथा पण एके दिवशी क्लाॅम अचानक पॅडरिकला म्हणतो मला तुझ्याशी बोलायच नाही आजपासून आपली मैत्री संपली व क्लाॅम त्याला टाळू लागतो पण पॅडरिक काही त्याचा पिच्छा सोडत नाही व पुढे कथा रंजक घडत जाते...जबरदस्त चित्रपट

महेशकुमार, मला सुद्धा banshees आवडला.

वर लिहिलेला In Bruges सुध्दा म स्त आहे, आणि पद्रिक आणि colm ज्यांनी साकारले आहेत तेच दोघे मुख्य पात्र म्हणून आहेत. (Colin Farrell and Brendon Gleeson)

मी ही काल पाहिला मिशन मजनू. सफाईदार आहे >> हे मान्य. मिशन मजनू नंतर मी उंचाई बघितला त्यामूळे मिशन मजनू म्हणजे एकदम थेट गॉडफादर च्या लेव्हल चा सिनेमा वगैरे वाटला मला. Lol एव्हढा भोंगळ सिनेमा नसावा. खरतर चांगली स्टोरी लाईन पूर्णपणे वाया घालवली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा अमिताभ असल्याच्या थाटात सगळे काम करतो. रॉ ला एव्हढे हास्यास्पद दाखवले आहे. एकंदर पाकिस्तान नि झिया उल हक्क ला एव्हढे बावळट दाखवून रॉच्या कामगिरीचे मूल्य कमी होते असे कोणाला वाटले नाही का ?. ती बिचारी हिरवीण प्रेमात एव्हढी आंधळी दाखवायची होती कि तिला एकदाही आपला नवरा रात्री बेरात्री कुठे नि का जातो हे बघावेसे वाटत नाही ? शेवटची मारामारी तर एकंदर धन्य प्रकार आहे. तिकीट चेक-ईन झाले कि प्ले मधे बसवून उडवावेच लागते असा निर्मात्याचा समज का होता देव जाणे ! नेफ्ली किंवा झी वर मुखबीर नावाची ह्या च विषयाच्या आसपास जाणारी - पाकिस्तान मधले अंडर कव्हर भारतीय हेर - सिरीयल आहे. त्याच्याशी नकळत तुलना होते. त्यात सिरीयल मधेही थोडा अतर्क्य प्रकार आहे पण तो सहज दुर्लक्ष करता येतो. त्यातली आयेसाय नि रॉ ची चेस मॅच नि पॉलिटीक्स नि गुतहेरांचे काम कसे इंटर लिंक होते हे ह्याची हातळ्णी बघितल्यावर मजनू किती हास्यास्पद आहे ते जाणवते.

असामी , बऱ्यापैकी सहमत.
मला सिद्धार्थ मल्होत्रा अजिबात आवडत नाही. रश्मिकाला तर बसमधे बसवून कुणीतरी साऊथला परत पाठवावं असं वाटतं. ह्याच्यामुळे मी शेरशहा बघितला नाही व रश्मिकेमुळे मी गुडबाय बघू शकले नाही. हिच्या अभिनयाने कृष्णविवरासारखे अमिताभ व नीना यांनाही गिळून टाकले आहे. ती तोंड पूर्ण उघडतच नाही. रामदास पाध्ये आणि अर्धवटराव आठवत रहातात. मजनूत ऊर्दू मिश्रीत हिंदी संवादांचा बोलविता धनी कोण आहे हे पहायला पाहिजे. त्यामुळे ह्या सिनेमाकडून फार अपेक्षा नव्हतीच. ठीकठाक आहे सिनेमा. शेवट अ आणि अ आहे. एवढा गोळीबार झाला तर विमान थांबवतील नं ते, अगदी गोळ्या झेलत महान वगैरे व्हायचं काही समजलं नाही. तुकडेतुकडे जोडल्यासारखा वाटला. एकदा तर तिच्या समोर फोनवर बोलतो तरी तिला शंका येत नाही. ही अन्ध नाहीतर बहिरी दाखवायला हवी होती, जास्त चपखल वाटलं असतं. पटकथा सत्यकथेवर बेतलेली म्हटलं तरी सिनेमा म्हणजे एक हात लाकूड दहा हात ढलपी प्रकार असतो. इंदिरा गांधींच्या पात्राचा लूक व्यंगचित्रातल्या सारखा वाटला !!! मोरारजी देसाई आवडले. बाकी सर्व आपापल्या भूमिकेत ठीक, तो मित्र आवडला. झियाउलहकचे डोळे असेच होते का? त्या भूमिकेला फार आर्कच दिसली नाही. झटपट गुंडाळलेयं त्याला. हिरोला दमदार दाखवण्यासाठी व्हिलनला लिंबूटिंबू केलयं.

मी रविवारी राझी बघितला, पुन्हा एकदा ... या मजनूमुळे.

अस्मिता त्या रश्मिकाच्या ऑप्ट वर्णनासाठी तुला आक्ख मोदकाच ताट तिला कुणीतरी धाडा रे परत साउथला भयकर इरिटेटिन्ग आहे ती.
त्या वाळवीचही मेल असच झालय, बघावासा वाटतोय पण दोन फुगे त्यात दाते काकू , देवा रे देवा ! त्यातल्या त्यात मोगरा नतर स्वजोने आपल्या लिमिट्स ओळखल्यात अस वाटतय.

झियाचा रोल ओम पुरीने "चार्ली विल्सन्स वॉर" मधे केला. तो अगदी "अर्क" वाटला होता त्यात, अमेरिकेच्या उद्योगांचा फायदा घेणारा.

हिच्या अभिनयाने कृष्णविवरासारखे अमिताभ व नीना यांनाही गिळून टाकले आहे. >>> Lol हिला पाहिले नाहिये अजुन तरी अंदाज आला.
प्राजक्ता, तुझ्या २ दाते पहायला जाते आता. Lol

मिशन मजनु पाहिला... सुरुवातीला उत्साहाने पहायला सुरुवात केली. पण नंतर अगदीच पळवत पाहिला.
रश्मिका चे डोळे केवढे मोठे आहेत.. त्यात आणि आंधळेपणा दाखवायला ती ते अजुन मोठे करते आणि त्यामुळे भितीदायक दिसते.
मला शेवटपर्यंत आशा होती की रश्मिका पाकिस्तान ने पेरलेली हेर असेल. पण कसचं काय.वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे शत्रु ला बावळट दाखवलंय. शिवणकाम करणारा नवरा असा रात्री अपरात्री गायब होतोय हे कळु नये इतकी कशी मठ्ठ असु शकते एखादी बायको.
सतत राझी सोबत तुलना केली जात होतीच.
रश्मिका चं चेक-ईन झाल्यावर ती विमानात बसुन ते विमान उडेपर्यंत पाकीस्तान मधल्या कोणालाही ते विमान रनवे वरच थांबवुन तपासणी करायचं सुचलंच नसेल असं समजणं म्हणजे मूर्खपणा आहे.काहीहीही दाखवलंय. रेल्वे वरची मारामारी तर कळस.
मी पण आता परत राझी पाहाणार म्हणजे जरा बरं वाटेल

वीकांताला द मेन्यु बघितला. एकदम सशक्त स्क्रीन प्ले. हॉरर व डार्क कॉमे डी. खरच काही ठिकाणी हसू येते लेखन व अ‍ॅक्टिन्ग फर्स्ट क्लास टॉप क्लास आहे.

त्या आधी नेटफ्लिक्स वर ट्रायल बाय फायर बघितली. फारच वाइट घटना. पण सर्वांची कामे, लेखन दिग्दर्शन एकदम टॉप क्लास. राजश्री देश्पांडे उत्तम अ‍ॅक्टिन्ग. अभय देवोल सुद्धा. ( ही वेब सीरीस आहे.)

पण जे दोन आव्डीचे उद्योग एक फाइन डायनिन्ग आउट आणि थेटरात जाउन सिनेमा पाहणे. ते काही दिवस बाद झालेत.

Wink

Pages