..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह.पा. बरोबर आहे उत्तर.
८/०४५
एक मधमाशी आणि एका बोकडाचे एकमेकांशी फार पटायचे. खरंतर प्रेमच होतं त्यांचं. सतत सोबत असायचे. पण ह्या विजोड प्रेमाला काही अर्थ नाही, हे कळत होतं. त्यामुळे ते दोघे सारखे देवाला प्रार्थना करायचे, की पुढच्या जन्मी तरी आम्ही एकाच प्रकारचे प्राणी असू दे.
शेवटी खऱ्या प्रेमाची प्रार्थना देवाने ऐकली आणि त्यांना पुढचा जन्म मनुष्याचा मिळाला. मधमाशी मुलगी आणि बोकड मुलगा. त्यांना मागचा जन्म लक्षात होता, त्यामुळे मोठेपणी एकमेकांना बरोबर ओळखून त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली. दोघेही खूप आनंदात होते. पण एक घोळ झाला होता. दोघे होते तर मनुष्यप्राणीच; पण वेगवेगळ्या धर्माचे. दोघांच्याही घरचे खूप कट्टर होते. त्यांनी खूप विरोध केला. काही केल्या दोघेही एकत्र येऊ शकत नाहीत. शेवटी दोघेही खूप निराश होतात. "आधीचा जन्मच बरा होता, माणूस म्हणून जन्माला येऊन काय मिळवलं आपण?"; असा विचार करून दोघेही एकत्र, एक गाणं गाऊन आत्महत्या करतात.
कोणतं गाणं?
उत्तर :-
चलो इक बार फिर से अज न बी बन जाए हम दोनो

८/०४६ सोपा पेपर.
इंदूरचा बबलू पश्चिम म्हाराष्ट्रात ट्रेकिंगला जातो. ट्रेकिंग करत असताना रस्ता चुकतो एकटा वाट शोधत भटकत असताना त्याला अचानक फेटा घातलेल्या रानगट आणि दांडगट लोकांचं टोळकं दिसतं. महाराष्ट्राचा इतिहास वाचला असल्याने तो हे कोण असावेत असा अंदाज लावतो आणि उगाच घाबरतो. बाबरलेला चेहरा करून थबकतो. ते पाहून टोळक्यालाही त्याचा जरा संशयच येतो. त्यातला एक जण त्याला जर दरडावण्याच्या स्वरातच विचारतो "कोण रं तू?".
गडबडलेला बबलू अचानक उसने अवसान आणुन मान ताठ करून उत्तर देतो "मी कायकुणा!"
कुठले गाणे आठवल्याने बबलू असे उत्तर देतो?

उत्तर:
शूर आम्ही सरदार आम्हाला...
('कायकुणा'ची भीती)

Submitted by मोरोबा on 17 November, 2022 - 21:24

माऊ मैय्या ,
एक मधमाशी आणि एका बोकडाचे एकमेकांशी फार पटायचे. खरंतर प्रेमच होतं त्यांचं....
Lol हे वाक्य फार आवडलं.....

दोन कोडी, एक सोप्प, एक जरा कठीण पण श्रद्धा सारखे लोक इथं असताना काय कठीण?

८/०४७: काही जुने चित्रपट थिएटर्समध्ये आलेले असतात. तो आणि ती अचानक जितेंद्रचा लागलेला चित्रपट बघायला जायचं ठरवततात. तिकीट मिळायला हवे म्हणुन ते पटापट तयार होतात, ब्लॅक मध्ये तिकीट न घेण्याची त्यांची प्रतिज्ञा असते. (हे कुणी नंतर पॉईंट काढू नये म्हणुन Wink )
तेवढ्यात त्याचा मित्र, एक माबोकर त्यांच्याकडे येतो. आता कोणी आले तर चहा तरी होतोच. तो हे लोक बाहेर जायच्या तयारीत होते हे ओळखतो आणि चहा घेऊन मी परत येईन निवांत असे सांगून निघुन जातो. पण तेवढ्यात दहा मिनिटे उशीर होतो निघायला. पटकन ऑटोरिक्षा पकडून थिएटरला पोचतात तर हाऊसफुलची पाटी. त्याचा खूप विरस होतो, त्या माबोकर मित्राचा उल्लेख करून तो गाणे म्हणतो. कोणते? गाण्याच्या पहिल्या दोन ओळींपैकी फक्त दुसऱ्या ओळीशी संबंध आहे.

८/०४८: एका कंपनीची सीईओ ममता बनर्जीच्या पार्टीला डोनेशन द्यायचे ठरवते. ही स्वतः चेक घेऊन तिला भेटायला जाते. पण ममता नको म्हणते. तिला आग्रह करण्यास ही कोणते गाणे म्हणेल?

८/०४७
अगर तूफान नही आता
किनारा (जीतेन्द्राचा चित्रपट) मिल गया होता
???

झिलमील बिंगो. ग्रेट!
जितेंद्रचा चित्रपट किनारा आणि तो मित्र म्हणजे फारेण्ड.
त्या गाण्यात लताचा उच्चार तूफान असा ऐकू येतो तर रफीचा तूफां असा ऐकू येतो. (याकरीता तो व ती मधील तो निवडलाय गाणे म्हणवायला.)

अगर तू , फां, नही आता, किनारा (देखने) मिल गया होता

काहीही हिंट न मागता हे गाणं ओळखणं म्हणजे दंडवत स्वीकारा _/\_.

धन्यवाद मानव!
८/०४८
सुन सुन सुन दीदी तेरे लिये
"एक रिशता" आया है

हे कदाचित चुकिच आहे!

चूक.
मला वाटले हे एकदम सोपे जाईल
असे डोनेशन म्हणजे नक्की कोणता हिंदी/मराठी शब्द याचा किस पाडता येईल पण एक सामायिक अर्थ असला तरी पुरे ना?

_/\_

सीईओ म्हटल्याने दिशाभूल झाली असेल तर क्षमस्व.

मुख्यमंत्र्यांना (या कारणास्तव) भेटायला जाते यासाठी उच्चपद वापरले

अगर तू , फां, नही आता, किनारा (देखने) मिल गया होता >>> Lol

सगळे वाट पाहात असताना मधेच चहा घेण्याचा संदर्भही अचूक आहे Happy

अगर तूफान नही आता
किनारा (जीतेन्द्राचा चित्रपट) मिल गया होता
???

>>> हे अशक्य महान आहे. झिलमिल, ग्रेट. मानव कोडं देखिल मस्त.

हे धागा पुढे ढकलण्याकरता बर्‍यापैकी सोपे पण होपफुली लोकांची हसून मुरकुंडी ई वळेल उत्तर समजले की Happy

भिकंभटांना श्रावण महिन्यात ब्राह्मण म्हणून अनेक ठिकाणी आमंत्रण येत असे. रोज जड जेवल्यावर त्यातून निर्माण होणारा विशेष "डिस्कम्फर्ट" त्रासदायक असूनही त्यांना ही जेवणे खूप आवडत व त्यामुळे हा महिना आला की त्यांना अत्यानंद होत असे. ते दरवर्षी कोणते गाणे म्हणतील?

हा हा!

फारएण्ड,नंबर दे कोड्याला

Pages