आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
ह्या वर्षी मुलांनी कंदील घरीच करायचा घाट घातला. बाजारातून तयार कंदीला ऐवजी कंदीलाचे कागद घरी आले. मी खळ केली. तरुण मुलांना खळ माहीत नसेल कदाचित तर सांगते . खळ म्हणजे कणीक पाण्यात शिजवून केलेली घट्ट पेस्ट. कणकेतल्या ग्लुटेन मुळे ही कागद चिकटवण्याच काम झकास करते. सांगाडा होताच घरी. पूर्वानुभव ही होता गाठीशी. घरातले सगळेच उत्साहाने पुढे आले कंदील करायला. मी ही त्या करंज्या करायचा घाट पुढे ढकलून ह्या करंज्या ( वरच्या आणि खालच्या पट्टीला जे सजावटी साठी लावलं आहे त्या कंदिलाच्या करंज्या,☺ ) करायला सरसावले. ☺ गप्पा मारत, मागे कसा कंदील करायचो त्या आठवणींना उजाळा देत कंदील कधी झाला ते कळलं ही नाही. अक्षरशः चोवीस तासात कंदील तयार होऊन गॅलरीत टांगला ही गेला.
खूप मस्त वाटतंय आणि कौतुक भरली नजर सारखी तिकडेच वळतेय. दिवाळी संपली की कंदील काढला जाईल पण ह्या कंदील in making च्या आठवणी मनात कायम राहतील आणि मनाला उभारी ही देतील.
हा फोटो.
माझा आकाशकंदील. सध्या
माझा आकाशकंदील. सध्या मॅक्रमेचं खूळ भरलय डोक्यात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![IMG-20221021-WA0007.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28034/IMG-20221021-WA0007.jpg)
अमितव, कंदिलाच्या चौकोनावर अस
जयु मस्त झालाय कंदिल , ह्या वर्षी असे विकायला पण खूप दिसतायत.
अमितव, कंदिलाच्या चौकोनावर अस काही तरी नक्की चिकटवा पातळ कागद लावलात तर , आत दिवा लावला की ते डिझाईन खूप सुंदर दिसत. स्नो फ्लेक्स म्हणून सर्च केलं तर खूप आहे यु ट्यूब वर.
हे मी नाती बरोबर कातरकाम करत होते तेव्हा केलेलं आहे.
थँक्यू mi_anu आणि वावे!
थँक्यू mi_anu आणि वावे!
अमितव, सांगाडा छान जमलाय. पूर्ण झाला कंदील की फोटो टाक इथे.
जयु _/\_
ओह! म्हणजे तुमच्या वरच्या मूळ
ओह! म्हणजे तुमच्या वरच्या मूळ लेखातील चित्रांत तुम्ही असं केलंय होय!
जरा उलगडून सांगा. म्हणजे पांढर्या कागदावर अशी कागदाच्या घड्या पाडून कापून नक्षी करायची आणि मग तो पांढरा कागद रंगित कागदवर चिकटवून मग रंगित कागद चौकोनात लावायचा असं का? ही भारी आयडिआ आहे. मी विचारच करत होतो की नुसते दोन रंगाचे रंगीत टिश्यू पेपर लावू का आणखी काही करू. आणि काही कल्पना असतील तरी त्या सुद्धा सांगा.
हेमाताई, तुमच्या ह्या
हेमाताई, तुमच्या ह्या धाग्यामुळे खूप वेगवेगळे स्वनिर्मित आकाशकंदील बघायला मिळतात आणि करावेसे वाटतात. शिवाय आपल्यासारखे वेडे अजून आहेत जगात, हा आधारही मिळतो! हा हा
आधी चौकोनी त्रिकोणी सगळे
आधी चौकोनी त्रिकोणी सगळे कागद चिकटवून घ्या करंज्या लावा, शेपट्या, चांदीचा कागद सगळं चिकटवा . शेवटी वरून नक्षी केलेला कागद चौकोनांवर चिकटवा. कंदिलाचा पातळ कागदच घ्या नक्षी करण्यासाठी. जाड कागद नको. अगदी थोडी थोडी खळ लावली तरी तो नक्षीचा कागद छान चिकटतो चौकोनी कागदावर. पणती वैगेरे केली तरी छान दिसते. व्हिडीओ आहेत त्याचे . आणि वेळ कमी असेल तर नका करू अडत नाही त्याशिवाय फक्त कंदिलाची शोभा वाढते इतकंच. होप तुम्हाला समजलं आहे मी लिहिलेलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाय आपल्यासारखे वेडे अजून आहेत जगात, हा आधारही मिळतो! हा हा °>> हा मोठाच फायदा आहे. वेडेपणा करायला आपल्याला बळ देणारा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
rmd मगाशी लिहायचं राहिलं मस्त कंदिल झालाय. करंज्यांचा कागद रेडिमेड असाच मिळालाय की दोन तीन कागद जोडून तुम्ही घरी केलाय ?
मी अगदी धोपटमार्गी ममव आयुष्य
मी अगदी धोपटमार्गी ममव आयुष्य जगते. गंमत जी आली ती त्यातल्या ह्या वेडेपणाच्या ठिणग्यांनीच. बाकी सगळं...... असोच.
थँक्यू ममो! करंज्या आणि
थँक्यू ममो! करंज्या आणि झिरमिळ्या एकाच गिफ्ट पेपरने बनवल्या आहेत. कागदच असा रंगीबेरंगी शोधला होता. करंज्यांच्या दोन्ही टोकांना ज्या गुलाबी आणि हिरव्या पट्ट्या आहेत त्या glitter tapes आहेत.
रमड, सुंदर आकाशकंदील! देखणा
रमड, सुंदर आकाशकंदील! देखणा आणि सुबक.
अमितचा पण खूप नेटका सांगाडा दिसतो आहे. मला आधी वाटलं स्टीलचा आहे. मग नीट पाहिल्यावर कळलं. खूपच काटेकोरपणे कापला आहे पुठ्ठा.
सर्व आकाशकंदील देखणे आहेत .
सर्व आकाशकंदील देखणे आहेत .
थॅक्यू ममो ,rmd.
थॅक्यू ममो ,rmd.
हे सांगाडेवाले कंदील बनवणे फारच अवघड काम . पण हेच पारंपारीक कंदील छान दिसतात. rmd तुमचाही कंदील सुंदर झालाय .बाकी सगळे आकाश कंदीलही मस्तच.
सगळेच कंदील मस्त!! सर्वांना
सगळेच कंदील मस्त!! सर्वांना शुभ दिपावली.
तुम्ही सगळे एवढे भारी
तुम्ही सगळे एवढे भारी आकाशकंदील बनवत आहात हे बघून लाज वाटून निदान सोपे छोटे तरी बनवू या म्हणून हे बनवले आज.
तुम्ही सगळे एवढे भारी
.
हरपा मस्त झालेत कंदिल.
हरपा मस्त झालेत कंदिल.
धन्यवाद मनीमोहोर
धन्यवाद मनीमोहोर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Thanks<img src="/files/u33121
.
सगळेच कंदील मस्त!! सर्वांना
सगळेच कंदील मस्त!! सर्वांना शुभ दिपावली.![Screenshot_20221023-133746_0.png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75995/Screenshot_20221023-133746_0.png)
हा आमचा,साडी आणि लेस वापरून केलेला
(No subject)
असा आडवा का अपलोड झाला काय
असा आडवा का अपलोड झाला काय माहित
सुंदर कंदील सर्वांचे.
सुंदर कंदील सर्वांचे.
एकसे एक झकास कंदिल.
एकसे एक झकास कंदिल.
तेजो अनामिका दोघींचे ही छान
तेजो अनामिका दोघींचे ही छान झालेत कंदिल, दोघींच्या ही पणत्या छान दिसतायत.
ममो काकु, तुमचा आकाशकंदीलाचा
ममो काकु, तुमचा आकाशकंदीलाचा धागा वाचून कधीपासून आकाशकंदील करायचं मनात आहे पण कामासाठी अॅव्हेलेबल हात आणि वेळेचा विचार करता ह्यावर्षीसुद्धा ते शक्य झालंच नाही. सजावटीतले काहीतरी घरी करायचे म्हणून पणत्या रंगवल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Screenshot_20221025-185405.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u63445/Screenshot_20221025-185405.jpg)
थँक्स टू यू. :-)
अनामिक>>वा सुरेख रंगवल्यात
अनामिका>>वा सुरेख रंगवल्यात पणत्या
आम्ही दसरा ते दिवाळी प्रत्येक कस्टमर ला 2 पणत्यांचा सेट देतो,दिवाळी भेट म्हणून,यंदा 600 रंगवल्या मी घरी
![IMG_20221004_211002677.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75995/IMG_20221004_211002677.jpg)
त्यातली ही झलक
(No subject)
मी केलेला macrame कंदील
मस्त झाले आहेत सगळ्यांचे
मस्त झाले आहेत सगळ्यांचे आकाशकंदिल.
पणत्या पण खूप सुंदर.
मॅक्रम कंदील मस्त
मॅक्रम कंदील मस्त
बारीक सुंदर कलाकुसर आणि भलतं पेशन्स चं काम आहे.आत दिवा लावून पण फोटो काढा.
आरती,मॅक्रम कंदील नाजूक आणि
आरती,मॅक्रम कंदील नाजूक आणि मस्त
इथे शेअर करायचा राहिला.
इथे शेअर करायचा राहिला.
![kandil-final.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8461/kandil-final.jpg)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान झाला आणि व्यवस्थित राहिलाय. करंज्या करायचा मलाच कंटाळा आला आणि माझ्या स्पीडने दिवाळी होऊन गेली असती त्यामुळे झाला तो पटकन टांगून टाकला.
ममो, स्नो फ्लेक सर्च केले आणि बघितले करुन. एकदम सोपे आणि मस्त आहेत. छान झालेले पण ते असेच रफ पेपरवर केलेले. चांगले जमले त्यामुळे परत रंगित कागदावर करायचा उत्साह मावळला. पुढच्यावर्षी!
Pages