चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एडवर्ड नॉर्टन ल फार इगो आहे म्हणे..प्रत्येक गोष्टीत improvise करायला पाहतो.. डायरेक्टर चे काही ऐकत नाही...असेच एका गॉसिप मॅगझिन वर वाचले होते....त्यामुळे त्याला movies ऑफर करत नाहीत

कांतारा हिंदी बघितला.. जबरदस्त आहे. Suspense खतरनाक.. acting ला तोड नाही.. direction सिनेमॅटोग्राफी सगळेच झकास..

थोडक्यात कांतारा मूळे बॉलिवुड ला पुन्हा घाम फुटणार .
काही दिवसांपूर्वीच सलमानचा गॉडफादर मूव्ही रिलीज होऊन आपटला देखील .
माबो वरील तज्ञ सदस्यांनी त्या मुव्हीची दाखल देखील घेतली नाही म्हणजे सिनेमा खूपच साधारण असणार Happy

काही दिवसांपूर्वीच सलमानचा गॉडफादर मूव्ही रिलीज होऊन आपटला देखील .
>>>>

काय बोलता.. भाईंचा कुठलातरी चित्रपट आला आणि आपटलाही. आणि खबरही नाही. नावही ऐकले नाही. ना ट्रेलरची चर्चा.. ते ही सोडा बॉयकॉट बॉलीवूडची चर्चा देखील नाही. ईतके मार्केट डाऊन?

https://www.amarujala.com/amp/photo-gallery/entertainment/bollywood/godf...
हे घ्या तुमच्या भाईंनी चिरंजीवी ला देखील गोत्यात आणले !
गॉड फादर चे बजेट १०० कोटींचे असताना हिंदी पट्ट्यात ७ कोटी आणि दक्षिणेत ५६ कोटी कमावले आहेत .
तर कांतारा चे बजेट १६ कोटी आणि कलेक्शन १०० कोटी झाले आहे ,अजून चार पाच दिवस नक्कीच चालेल .

अरे तो सलमान चा चित्रपट नाहीय.. तो गेस्ट आहे.. हे म्हणजे लाल चड्ढा शाहरुख चा म्हटल्यासारखे झाले... सलमानचा चित्रपट हिट करायची जबाबदारी आम्हा फॅन्स ची...

अच्छा तेलगू पिक्चर आहे Proud

हे म्हणजे लाल चड्ढा शाहरुख चा म्हटल्यासारखे झाले >>>> मी रिवाईंड करून चारदा बघितला तो शॉट. कसला क्यूट दिसतो शाहरूख त्यात. आता घरच्यांसोबत पुन्हा बघणार तो पिक्चर.. आणि त्यांनाही दोनदा तरी दाखवणार तो शॉट Happy

प्रे पहिला डिस्ने हॉट स्टारवर
ठीक हें, सिनेफोटोग्राफी, बॅकग्राऊंड एक नंबर
वातावरण निर्मिती पण जमलीये
पण मेन लीड पोरगी अजिबातच रेड इंडियन वाटत नाही, तीच कास्टिंग मेजर चुकल्या सारख वाटतं
तिचा भाऊ मात्र मस्त घेतलाय
चित्रपट अपेक्षित वळणे घेत अपेक्षित शेवट करून संपतो
अरनॉल्ड आणि नंतरचा प्रिडेतर यांच्या काळाचा विचार करता हा त्यांचा प्रिकवेल असायला हवा
पण हा तर जास्त ऍडव्हान्स निघाला Happy

त्या आधी किंगडम ऑफ हेवन पण पहिला
कसला जबरदस्त मूव्ही, काय तगडी स्टारकास्ट, अतिशय भारी बॅकग्राऊंड स्कोर
मला ट्रेलर वरून वाटलेलं की सलादिन वर जास्त फोकस असेल पण नई
आणि कृसेड मध्ये ज्या हातीन च्या लढाईने सलादिन ला प्रचंड मोठविजय मिळाला ती अगदीच किरकोळीत संपवली आहे
म्हणजे रादर दाखवलीक नाही फक्त त्याचे आफ्टर इफेट्स डेड बॉडी वगैरे इतकंच
ही लढाई म्हमजे सलादिन च्या जबरदस्त लष्करी डावपेचांचा नमुना म्हणून अभ्यासली जाते ती अगदीच दुर्लक्षित केलीये हे खटकलं

बाकी इव्हा ग्रीन सगळ्या रोल मध्ये सारखीच वाटते सिडकटिव्ह
तरी नंतर तिला जरा बरा रोल मिळाला आहे

गेम ऑफ थ्रोन्स शी नकळतपणे तुलना होत राहते

पण वर्थ वॊचिंग
स्पेशली प्रोफेसर लुपिन साठी Happy

काल मजबूर संपूर्ण पाहिला. इतका नीटनेटका अमिताभपट असून त्याच्याबद्दल कमी बोललं जातं. अमर अकबर अँथनी किंवा डॉन बद्दल जास्त बोलंलं जातं

आशुचँप,
किंगडम ऑफ हेवनला ग्लॅडिएटरच्या मॅक्सिमस सारखा एक हीरो नाही पण बहुतांश स्टोरी बॅलिअनच्या साक्षीने किंग बाल्डविनचा दृष्टेपणा, त्याच्या आजुबाजुचे राजकारण आणि सलादिन ह्या तीन पटलांवर ऊलगडते.
बाल्डविनच्या मृत्यूनंतर माजलेली अंतर्गत बंडाळी आणि बाल्डविनच्या जाण्याने सलादिन सारख्या महान सेनापतीशी युद्ध/शांतता ह्या दोन्ही आघाड्यांवर डील करण्यासाठी निर्माण झालेली पोकळी भरू न शकणारा लीडर क्रुसेडर्स आर्मीकडे नसणे ह्यामुळे सलादिनचा विजय ईनएविटेबलच होता. किंगडम ऑफ हेवनची स्टोरी बाल्डविनच्या मृत्यूप्रसंगीच संपल्यातच जमा होती.

किंगडम ऑफ हेवनची स्टोरी बाल्डविनच्या मृत्यूप्रसंगीच संपल्यातच जमा होती.>>> हो
जर पुतण्या पण लेप्रस नसता तर सीबीलिया ने कदाचित धोरणीपणा दाखवत बाजू सांभाळली असती
पण तेही सगळं अल्पजीवी ठरलं

पण हा जो हिरो आहे त्याला सीबीलिया मिळते हेही सिनेमॅटिक लिबर्टी होती
कारण बलीयन ऑफ इब्लिन ची वंशावळ वेगळीच आहे

पण हा जो हिरो आहे त्याला सीबीलिया मिळते हेही सिनेमॅटिक लिबर्टी होती
>> बरोबर, सीबीलिया गाय शी प्रामाणिक राहिली.
हाउस ऑफ ड्रॅगन मध्ये लेपर किंगचे बरेच संदर्भ घेतले आहेत असे कोणाला वाटते इथे?
हॉलिवुडमध्ये कोणतेही ऐतिहासिक स्त्रीपात्र रंगवताना (मग ते अथेलरेड असो, जोन ऑफ केन्ट असो वा सिबिला) त्यांना प्रत्यक्ष घटनेपेक्षा खुपच जास्त पाताळयंत्री आणि व्याभिचारी दाखवले जाते.

दोबारा पाहिला प्राइम वर. साय फाय कन्सेप्ट. इन्ट्रिगिंग वाटला प्लॉट, आणि उगीच आपल्याला त्यातल्या कन्सेप्ट्स समजावून सांगत बसले नाहीत कोणी. ते आवडले. उत्सुकता टिकते शेवटपर्यन्त .

कुठे बघायला मिळेल किंगडम ऑफ हेवन? विषय आवडीचा आहे.>>> यौट्युब ला आहे पण प्रिंट इतकी चांगली नाहीये
मी yts वरून डाउनलोड केला

आशुचॅम्प

माझ्या माहिती प्रमाणे प्रे मध्ये जवळपास सगळे कलाकार नेटिव्ह अमेरिकन आहेत.

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको मध्ये शेकडो वेगवेगळे नेटिव्ह कबिले आहेत. अर्थातच त्यामुळे दिसण्यात भरपूर व्हेरिअन्स असतात.

आता त्याच्यात 5-6 पिढया पासूनची कॉकेशियन आणि इतर सरमिसळ पण आहेच.

ओहो चेक केलं आता गुगलवर
होय की ती नेटिव्ह ट्राईबची आहे पण आई थायलंडची असल्याने अशी वेगळी दिसते

भाऊ तर अस्सल घेतलाय नि त्याचा रोल पण आवडला
लक्षात राहण्यासारखा

Pages