Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रदीप पटवर्धन आणि नीलम
प्रदीप पटवर्धन आणि नीलम शिर्के यांची जोडी जेव्हा पडद्यावर फॉर्मला होती तेव्हा नीलम आमच्या बिल्डींगमध्ये राहायची. त्यामुळे प्रदीपला काही वेळा बघायचा योग आलेला.
आज तो गेला तर वय समजले. ६५ वर्षे. म्हणजे तेव्हाही फार असावे. वयाच्या मानाने तेव्हाही चिकणाच होता.
श्रद्धांजली !
लालसिंग चढ्ढा मधे शाहरुख चा
लालसिंग चढ्ढा मधे शाहरुख चा कॅमिओ अॅपियरन्स (अॅज हिमसेल्फ !) आहे असे आताच वाचले मी विचारच करत होते एल्विस च्या जागी कोणतं कॅरेक्टर घेतील, तर शाहरुख चे घेतलेय म्हणे!!
लालसिंग चढ्ढा मधे शाहरुख चा
डबल पोस्ट
आमीरच्या पिक्चरमध्ये शाहरूख ?
आमीरच्या पिक्चरमध्ये शाहरूख ??
चेक करायला हवे.. नाहीतर तेवढ्यासाठी जायचो आणि अफवा निघायची
अरे वा! मजा येईल बघायला काही
अरे वा! मजा येईल बघायला काही स्मार्ट केलं असेल तर. शारुख चांगला चॉईस असेल. त्याचा इगो त्याच्या पेक्षा मोठा नाही वाटत.
बास झालं ते राईट विंग आणि
बास झालं ते राईट विंग आणि पुरोगामी. चिकवा वर नका आणू ती धुणी. >>> अक्षरशः!
मजा येईल बघायला काही स्मार्ट केलं असेल तर >>> +१
त्याचा इगो त्याच्या पेक्षा
त्याचा इगो त्याच्या पेक्षा मोठा नाही वाटत. >>> हो धमाल करतो शाखा अशा वेळी. इव्हन एका हवा येउ द्या एपिसोड मधे सुद्धा मस्त होता. भाऊ कदम ने त्याची नक्कल केल्यावर "मै अपनी ही स्टाइल भूल गया" म्हंटला
आरत्या गाऊन गाऊन घसा दुःखला
आरत्या गाऊन गाऊन घसा दुःखला तर कोमट पाण्याने गुळण्या करा
चँप lol.
चँप lol.
बघणार नाही लाल सिंग. फॉरेस्ट गंपला अजिब्बात दुसर्या प्रकारे बघताच येणार नाही. तो फक्त पिक्चर नाही तर experience आहे. आणि तुमचा मुड असेल तसा प्रत्येक वेळी नविन काहीतरी सापडत.
आमीर खान पुर्वी खुप आवडायचा. जेव्हापासून तो स्व्तःला Tom Hanks म्हणुन प्रेझेंट करू लागला तेव्हापासून त्याचा अक्षरशः वैताग आला.
तसही बॉलीवुड मध्ये काही ओरिजिनल होत कि नाही कधी असा प्रश्न पडु लागला आहे. 90 जची कितीतरी गाणी कॉपी आहेतहे काय माहित आहेच . पण पिक्चर, सिन्स,अॅक्टींग स्टाईल सगळच्या सगळ चोरलय आपल्याकडच्या लोकांनी. बास आता.
आता नविन काही ओरिजिनल काढतात त्यात पण गे लेस्बिअन रिलेशनशिप, टू मच सेक्स नाहीतर हिंसा, किंवा मग ऐतिहासिक. जणु काही नविन स्टोरी लिहिणारे मिळतच नाहीत. करण जोहर, खान लोक, कपुर लोकांना घालविल्याशिवाय पिक्चर काही बदलणार नाहीत.
चोरी वाईट... मात्र कोणी
चोरी वाईट... मात्र कोणी ऑफिशियल रिमेक करत असेल हक्क विकत घेऊन तर त्यात चुकीचे काय... चांगला रिमेक असेल ( दिलीप देवदास) तर लक्षात राहील.. फालतू रिमेक असेल( कुली वरून ओके जानु श्रद्धा ) तर विस्मरणात जाईल...
बॉयकॉट तर रक्षा बंधन वरही
बॉयकॉट तर रक्षा बंधन वरही चालु आहे , त्याची लेखिका हिन्दुफोबिक आहे म्हणे
मुळात सिनेमे बरे बनवले तर पब्लिक निमुटपणाने शिणुमाला जाते!
आलियाला नेपो किड म्हणून ट्रोल करतात, पण डार्लिंग्ज्स सगळ्यांनी पाहिला, आवडला नाही असं एकही जण नाही, कोणाची हिंमत होईल तिला अॅक्टिंग येत नाही म्हणायची ?
राझी सुद्धा थिएटरला पाहिलाच आहे पब्लिकने, थोडक्यात चांगला कन्टेन्ट असेल तर हु केअर्स !
बॉयकॉट वगैरे सगळा सोशल मिडिया टाइमपास , रिव्हर्स मार्केटिंग वर्क होणार लालसिंगला , ट्रोलर्स सर्वात आधी जातील नावं ठेवत बघायला
एस...आणि जाऊ नका म्हटले कि
एस...आणि जाऊ नका म्हटले कि लोक आधी जातात...
चोरी वाईट... मात्र कोणी
चोरी वाईट... मात्र कोणी ऑफिशियल रिमेक करत असेल हक्क विकत घेऊन तर त्यात चुकीचे काय...
>>>>
काही चुकीचे नाही. अनुवादीत कथा लिहिणे सोपे असते. जसेच्या तसे भाषांतरही एकवेळ चालून जाते. पण चित्रपटाला ते लागू होत नाही. जसेच्या तसे मार खाते. किंबहुना एखाद्या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक बनवणे तितकेच आव्हानात्मक.
आणि क्रिएटीव्हीटीचे म्हणाल तर रिमेकमध्येही क्रिएटीव्हिटी दाखवायला बराच स्कोप असतोच की. ती मुळात अंगात असेल तर. त्यामुळे चित्रपट बघण्याआधीच काय कॉपी तर आहे म्हणून शिक्का मारणे पटत नाही.
आणि तसेही जे चित्रपट रिमेक नसतात ते तरी काय क्रिएटीव्ह असतात. बहुतांश चित्रपटात तीच दारू नवीन बाटलीत भरून वर्षानुवर्षे देत आलेत, आणि पिणारे चव घेत पित आहेतच ना..
चित्रपट हे द्रुकश्राव्य माध्यम आहे. एकच कथा पटकथा चार दिग्दर्शकांच्या हातात गेली तर चार वेगवेगळे चित्रपट तयार होतील. जर हा गंप चित्रपट आमीरच्या हातात गेलाय तर त्याने त्यात आपले काय टाकलेय हे बघायची उत्सुकता आहेच
अवांतर - या चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन याने आधी सिक्रेट सुपर्रस्टार हा चित्रपट केलेला. त्यातही आमीर होताच. तो चित्रपट आवडलेला. रिपीट बघून झाला आहे. आणि जे पिक्चर पुन्हा बघावेसे वाटतात त्यांची मी फार ईज्जत करतो
आता नविन काही ओरिजिनल काढतात
आता नविन काही ओरिजिनल काढतात त्यात पण गे लेस्बिअन रिलेशनशिप, टू मच सेक्स नाहीतर हिंसा, किंवा मग ऐतिहासिक.
>>>>
+७८६
म्हणूनच वेगळ्या धाटणीचा डार्लिंग चित्रपट आवडला.
https://www.maayboli.com/node/82043
अन्यथा हल्ली बरेच हिंदी चित्रपट प्रेमी साऊथचे गुणगाण गाऊ लागले आहेत. ते देखील पुष्पा, केजीएफ, आरारार अश्या सिनेमांचे. हे मला तरी धडकी भरवणारे होते. कारण मग तसेच सिनेमे ईथे निघायला सुरुवात होईल..
आणखी एक रुपांतरीत सिनेमा
आणखी एक रुपांतरीत सिनेमा येतोय.
दोबारा. अनुराग कश्यपचा आहे तापसी पन्नू आहे. स्पॅनिश मिराज चा रिमेक आहे. स्पॅनिश बघितलेला नाही, पण विकीवर प्लॉट वाचून भन्नाट वाटतोय. सायफाय ड्रामा आहे. असे चित्रपट हिंदीत कमीच असतात! तापसी आवडतेच. नक्की बघणार.
मूळ नेफ्लिवर दिसतोय. नेफ्लीला वाटतंय बघितलाय, पण मला काही आठवत नाहीये.
सर लाल सिंगवर सेप्रेट धागा
सर लाल सिंगवर सेप्रेट धागा काढा. गॅरंटीड हिट जातोय.
लाल सिंगवर सेप्रेट धागा काढा.
लाल सिंगवर सेप्रेट धागा काढा. >>> + १
लालसिंग चढ्ढाला शुभेच्छा ! मागे एकदा कुठल्या तरी (बहुतेक मराठी) पिक्चरला विरोध करणार्यांचा आणि निर्मात्याचा वाद असलेला व्हिडीओ पाहिला होता. इतके ठरले होते, नाही नाही गैस झाला असं काहीतरी. करणी सेनेला पण भन्साळीने पैसे वेळेत दिले नाहीत म्हणून त्यांनी धमक्या दिल्या होत्या. हे सगळं पाहिलं / ऐकलं की बॉयकॉट ट्रेण्ड्स आहेत कि निगेटिव्ह पब्लिसिटी साठी स्वतःच चालवलेला ड्राईव्ह आहे कळत नाही. बाकि, आमीर खानने नेहमीप्रमाणे हवा बनवलीच. वाईट असो चांगली असो, चर्चा होत राहिली पाहीजे याची काळजी तो घेतो.
( नाही पाहणार )
हे सगळं पाहिलं / ऐकलं की
हे सगळं पाहिलं / ऐकलं की बॉयकॉट ट्रेण्ड्स आहेत कि निगेटिव्ह पब्लिसिटी साठी स्वतःच चालवलेला ड्राईव्ह आहे कळत नाही. >>>> म्हणूनच बहुतेक अनुराग कश्यप चाहत्यांना म्हणतोय की " दोबारा" प्लीज बॉयकॉट करा
फॉरेस्ट गम्प हा काही एका
फॉरेस्ट गम्प हा काही एका माणसावरचा पिक्चर नाही. त्यात गम्प निमित्तमात्र आहे आणि ती साठ ते नव्वदच्या दशकातल्या अमेरिकेत होत गेलेल्या सामाजिक आणि राजकीय बदलांची कहाणी आहे. अशा पिक्चरचं भारतीय ॲडॅप्टेशन करणं ही मुळातच हुकलेली कल्पना आहे. म्हणजे अमेरिकन राष्ट्रगीताचे शब्द बदलून त्यावरून भारतीय राष्ट्रगीत बेतणं जितकं बावळटपणाचं असेल तेवढं. ह्यात थोडा भारताचा अपमान सुद्धा आहे. पुढे मग नगाला नग म्हणून व्हिएतनाम वॉर च्या जागी पाकिस्तान, एल्विसच्या जागी शाहरुख (हे ऐकून मी मोहरममधल्या मुसलमानासारखी छाती पिटून घेतली!) सिव्हिल राईट्स मुव्हमेंटच्या जागी काय असेल कोण जाणे. आणि बब्बा चा बाब्या करून त्याला 'कोळंबीचं हुमणं, कोळंबीचं दबदबीत, कोळंबीचं लिप्तं, जवळ्याची चटणी, झिंगा फ्राय, कोळंबी पुलाव, कोळंबी बिर्याणी...' म्हणायला लावलं असणार
त्यात टॉम हॅंकने डोक्याने थोडा कमी असलेल्या नायकाची भूमिका साकारताना त्याचं जराही कॅरिकेचर होऊ दिलं नाहीये. वी आर रूटिंग फॉर हिम इव्हन व्हाईल लाफिंग ॲट हिम. त्याउलट अमीर सर सतत मोठ्ठे डोळे करून बावळट एक्सप्रेशन घेऊन वावरताना दिसतायत त्याचा ट्रेलर मध्येच कंटाळा येतोय.
सर चांगले फिल्ममेकर असले (दंगल, लगान) तरी अभिनयात टॉम हॅंक्सच्या गुडघ्याला पण लागत नाहीत एवढंच सिद्ध होतंय.
मोरोबा अगदी हेच म्हणायच होत.
मोरोबा अगदी हेच म्हणायच होत. Forest Gump- American dream पुस्तक आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे,
Forest Gump- American dream - It's not just a dream, it is a national idea.
Forrest Gump reveals the aspect of the American Dream that if a person works hard for something, they can achieve his or her goals and improve his or her position in life.
लाल सिंगवर सेप्रेट धागा काढा.
लाल सिंगवर सेप्रेट धागा काढा. >>> + १
>>>
काढला धागा, ईथे या. हे फारच ईंटरेस्टींग प्रकरण दिसतेय..
https://www.maayboli.com/node/82055
फॉरेस्ट गम्प हा काही एका
फॉरेस्ट गम्प हा काही एका माणसावरचा पिक्चर नाही. त्यात गम्प निमित्तमात्र आहे आणि ती साठ ते नव्वदच्या दशकातल्या अमेरिकेत होत गेलेल्या सामाजिक आणि राजकीय बदलांची कहाणी आहे. >> हाच प्रकार भारतीय समाजकारणाबद्दल नाही करता येणार असे का म्हणताय ? छड्डा तसा असेल कि नाही माहित नाही पण संकल्पना फक्त अमेरिकास्थित असणॅ जरुरी नाही ना ? १९७० ते २००० मधले भारतामधे झालेले संक्रमण तेव्हढ्याच भल्या मोठ्या स्पेक्ट्रम वर आहे कि.
भारतातील संक्रमण ही सलमानने
भारतातील संक्रमण ही सलमानने "भारत" मध्ये बर्यापैकी मांडलेले आहे. अर्थात सलमानचा प्रेक्षकवर्ग जसा तशा तशा घटना त्याने घेतल्या आहेत. लालसिंग चांगला असेल पण "ओरिजिनल" नक्की नाही. जसा भन्साळीचा देवदास हा देवदास नं ३ का ४ होता पण तरी चालला. तसा लालसिंगही चालेल कदाचित.
सरांच्या धाग्याची आणि
सरांच्या धाग्याची आणि प्रतिसादाची सोय झाली
सर म्हणजे मटा, लोकसत्ता ची ऑनलाइन एडिशन आहेत, लोकांनी भरभरून शिव्या दिल्या तरी त्यांचे हिट्स वाढत असल्याने ते एन्जॉय च करत असतात आणि लोकं अजून चेकाळून लिहितात
आता हा सिनेमा यदाकदाचित फ्लॉप गेलाच तर एकवेळ अमीर खान ते मान्य करेल पण सर नाही करणार
तो कसा एकमेवाद्वितीय आहे हे ते सिद्ध करतील
आणि अजून एक धागा काढतील
सिनेमा यदाकदाचित फ्लॉप गेलाच
सिनेमा यदाकदाचित फ्लॉप गेलाच तर >> शुभ शुभ बोला हो. अनेकांच्या पोटावर पाय आल्याचा आळ तुमच्यावर येईल.
गारंबीचागरीबांचा बापू वरून फॉरेस्ट गंप काढला आहे असे वाचले. (तुंबाडचे खोत वरून तुंबाड तसंच)धागा आलासुद्धा आशु.. आहात
धागा आलासुद्धा आशु.. आहात कुठे?
गरीबांचा बापू वरून फॉरेस्ट
गरीबांचा बापू वरून फॉरेस्ट गंप काढला आहे असे वाचले. >>>>>
आरारारारा खतरनाक
“सरांच्या धाग्याची आणि
“सरांच्या धाग्याची आणि प्रतिसादाची सोय झाली” - नुसतं तसं नाही रे. वर परत ‘मोरोबांनी सांगितल्यावरून धागा काढला‘ अशी मखलाशी करून ‘अगं अगं म्हशी‘ आहेच.
“सरांच्या धाग्याची आणि
.
हाच प्रकार भारतीय
हाच प्रकार भारतीय समाजकारणाबद्दल नाही करता येणार असे का म्हणताय ?
>>> असामी +१
( जरा अवांतर होईल, पण
या चर्चेवरून 'काय पो चे' आठवला. त्यातही अशी एक अगदी मर्यादित टाइमलाइन आहे. भुजचा भूकंप, ईडन गार्डन्सवरचा फेमस विजय, गोध्रा... आणि त्याला जोडून इतर स्थानिक संदर्भ. त्या टाइमलाइनमध्ये आम्हीही गुजरातमध्येच राहत होतो, त्यामुळे हा सिनेमा मला खूप रिलेट झाला होता, आवडला होता.)
Pages