चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी Happy Happy
आमित तू आणि मी बहुतेक सगळे सेम पॉइन्ट्स लिहिलेत. इतर पण २-३ रीव्हयू त्याच लाइन्स वर आहेत!

तिकडचा प्रतिसाद इकडेही टाकत आहे.
आज बघितला लालसिंग चढ्ढा! अमितवप्रमाणेच चार स्टार (कमी केलेला एक स्टार आमिर खानच्या तरुणपणाच्या अभिनयासाठीच!) बाकी चित्रपट अतिशय आवडला. भारतीयीकरण मस्त जमलेले आहे.
त्या 'मलेरिया'वाल्या संवादाचं पूर्णपणे misinterpretion झालं आहे. खरंतर छान जमून आलेली आहे ती स्टोरीलाईन सगळीच. फॉरेस्ट गम्पमधे जो कॅप्टन आहे (ज्याचे पाय जातात आणि मग तो फॉरेस्टचा पार्टनर बनतो) त्याऐवजी इथे पाकिस्तानी घुसखोर घेतलाय आणि परफेक्ट बसवलंय सगळं कथेत.

मग मियां काय वेगळे सांगत होतो? माझाच मायबोलीवरचा प्रतिसाद कॉपी-पेस्ट केलाय मतकरी सरांनी Proud Proud Proud
मोरोबा- "त्यात टॉम हॅंकने डोक्याने थोडा कमी असलेल्या नायकाची भूमिका साकारताना त्याचं जराही कॅरिकेचर होऊ दिलं नाहीये. वी आर रूटिंग फॉर हिम इव्हन व्हाईल लाफिंग ॲट हिम. त्याउलट अमीर सर सतत मोठ्ठे डोळे करून बावळट एक्सप्रेशन घेऊन वावरताना दिसतायत त्याचा ट्रेलर मध्येच कंटाळा येतोय. सर चांगले फिल्ममेकर असले तरी अभिनयात टॉम हॅंक्सच्या गुडघ्याला पण लागत नाहीत एवढंच सिद्ध होतंय."
मतकरी सर- "आमिर खान हा कामसू कलाकार आहे पण त्याच्या अभिनयाचा गुणात्मक दर्जा बेताचा आहे."
"लालची भूमिका त्या रेंजमधे करणं शक्य होतं पण त्याने व्यक्तीरेखेचा सूर पकडणं आवश्यक होतं. इथे कधी तो पकडला जातो तर कधी तो सुटून कॅरीकेचर होतं. आमिर खान टॅाम हॅंक्स सारखा दिसत असून टॅाम हॅंक्स अधिक मोठा अभिनेता का आहे याचं लाल सिंग चढ्ढा हे टेक्स्टबुक उदाहरण आहे."

तिकडचा प्रतिसाद मी पण इकडे टाकतो.
आत्ताच बघुन आलो. माझ्याकडून ४ स्टार! Happy

मजा आली. टॉम हॅन्क्स आणि आमिर तुलना केली तर टॉम फारच भारी अ‍ॅक्टर आहे. ती इनोसन्ट, साधा इ.इ. नस पकडायचा आमिर उत्तम प्रयत्न करतो, म्हातार्‍या ट्रेन मध्ये बसलेल्या आमिरला बर्‍या पैकी जमते ते, दाढी/ केस कमी असलेल्या आमिरला नाही जमत. त्या भुवया, डोळे जे करतो ते जरा वेडसर वाटतं. पण त्यासाठी तो एक स्टार कापू. बाकी मस्त बनवला आहे.

*******भरपूर स्पॉयलर आहेत. नेहेमी इतके दिले नसते. पण इथे इतकी टोकाची चर्चा झाली आहे त्यामुळे देतो आहे. तसाही फॉरेस्ट गंप इथे माहित आहे, सो ग्राफ माहिती आहेच सगळ्यांना. *******

चॉकलेट ऐवजी गोलगप्पे ऐकल्यावर... अरे काय मूर्खपणा आहे. चॉकलेट चाललं असतं. गाडीत गोलगप्प्याचा खोका नेतं का कोणी. उगाच करायचं म्हणून सगळ्याचं भारतीयीकरण कशाला. इ. वाटलेलं. पण वास्तवात गोलगप्प्याची बॅकस्टोरी, ते रुपाला शेवटी भेटल्यावर देताना पाणी वेगळं आणलंय सांगणे. क्युट आणि फॉरेस्टच्या इनोसंसशी अगदी चपखल बसलं. गोलगप्पे अजिबात नाही खटकले. रादर आता भारतात चॉकलेट खटकली असती इतके आवडले. Happy

साधारण १९८३ ते २०१८ काळाचा स्पॅन आहे. ८३ वर्ल्डकप, ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधी हत्त्या, शीख दंगली, मुंबई स्फोट, सुश्मिता सेन मिस वर्ल्ड, दाउद, बॉलिवुड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन, अबु सालेमची अटक, रथयात्रा, कारगील, वाजपेयी, मुंबई- ताज हल्ला, कसाब, अण्णा हजारे आंदोलन, मोदी, स्वच्छ भारत इथ पर्यंत लाल च्या आयुष्यातील घटना दिसत रहातात आणि फॉरेस्ट गंप मध्ये आपल्या चेहेर्‍यावर जे हसू येतं ते इथे येत नाही, पण त्या आठवणी तो पट डोळ्यासमोर फिरू लागतो. आपण तो काळ त्यातील अनेक घटना घडताना आपण प्रत्यक्ष बघितल्या असल्याने ते खूपच रिलेट होते. एक मनातील जखम असेल, नस असेल, केंद्र असेल ते जागे होते. त्याबाबतील फॉरेस्ट गंप पेक्षा लालसिंग जवळचा आणि सिक्सर मारतो. एलबीजे, केनडी, सिव्हिल वॉर इ. कितीही माहिती असलं तरी भारतीयीकरण करताना घेतलेल्या ऐतिहासिक गोष्टी जास्त आत पर्यंत पोहोचतात.

ज्यात त्यात मनं दुखावले जाणारे भारतीय माहित असल्याने कुठेही कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे स्मार्टली सांभाळलं आहे. सुरुवातीला नॉर्मल शाळेत प्रवेश घेताना त्याच्या आईला प्रिंसिपल बरोबर झोपायला लागलं असतं तर ख्रिच्शन लोक चिडते. मग आई त्या फादरला जेवण आणि घराची साफ सफाई करेल सांगते. मग फादर ते मान्य करता तर परत ख्रिश्चन लोक चिडते मग फादर हसुन डबा परत करतो. असेल अनेक प्रसंग शिताफीने हाताळून लेव्हल हेडेड राहिले आहेत. हे ही एक भारतीयीकरणच. चांगलं जमलं आहे. याची हिंदू उदाहरणे हवी असतील तर विचारा. सांगेन.

आता आपल्या लोकांनी वर महजब आणि मलेरिआ बद्दल गरळ ओकली आहे त्याबद्दल. तो तर एक इतका इनोसंट आणि व्यवस्थित बॅकग्राऊंड असलेला संवाद आहे. लहान लालला ब्लू स्टारच्या वेळी गोळीबार होताना आई सांगते गावात मलेरिआ पससरला आहे त्यामुळे बाहेर जाऊ शकत नाही. परत शीख हत्याकांड, इंदिरा गांधी हत्या इ, वेळी तो मलेरिआ संवाद येतो. अजुन अनेक रेफरंसेस मध्ये मलेरिआ म्हणजे काय ते येतं. आणि लाल अतीसामान्य बुद्धीमत्तेचा आहे. हे ही लक्षात असू द्या.
बाकी लाल अतीसामान्य आहे त्याचं भांडवल, गिल्ट ट्रिप इ. इ. बॉलिवुडी मसाला नाही. मूळ स्टोरीचं रुपांतर असलं तरी समजावुन सांगणे, भावनीक भेळ असलं काही नाही.

यात लाल चुकुन पाकिस्तानी मेजरला वाचवतो. ल्युटेनंट डॅन ऐवजी हा आहे मोहम्मद पाजी. हा भाग ही मस्त जमला आहे.
बस स्टॉप ऐवजी ट्रेन, त्यात हा सगळ्यांना गोष्ट सांगतो ते ही जुळुन आलं आहे. आणि आपल्याला भावुक करुन जातं
श्रिंप बोट ऐवजी रुपा चड्डी बनियान हे ही छान डेव्हलप केलं आहे. अजिबातच खटकत नाही.
करीनाने काम चांगलं केलय, पण जेनी वर चाईल्ड अब्युज झालेला इथे तो नाही त्यामुळे करीना आतुन तुटलेली अशी वाटत नाही. पण करीना पैशाच्या मागे वहावत जाते तो पार्ट चांगला आहे. अजुन थोडं मिसिंग आहे. जेनी प्रत्येक वेळी येते तेव्हा जे मनात होतं ते करीनाच्या बाबतीत होतंच असं नाही. मला नीट मांडता नाही येत आहे. पण काही तरी मिसिंग आहे.

कॅरेक्टर डेव्हलपमेंट, स्टोरी टेलिंग, कथेचा फ्लो/ वेग, गाणी असली तरी ती घडत जाणं आणि त्रासदायक न वाटणे अशा सगळ्या गोष्टी जुळल्या आहेत. मला आवडला. मुलाने फॉरेस्ट गम्प बघितलेला न्हवता. त्याला ही आवडला.

आमच्या इथे थिएटर ९०% तरी भरलेलं होतं. उद्याचे शोज ही भरलेले दिसत आहेत. भारतात किती गर्दी आहे कल्पना नाही.
फॉरेस्ट गंप आवडता असेल तरी मी सांगेन बघा. तुलना केली तरी त्रास होत नाही, उलट मजाच येते. हा भारतीय मातीत केला ते फार बरं केलं असच वाटतं. नसेल बघितला गंप तर मग बघाच. Happy
त्यात कुठल्याही धर्माच्या, देशाच्या, पंथाच्या, आर्मीच्या भावना दुखावण्यासारखं किंचितही काही नाही. आता देशद्रोही म्हणायचं तर म्हणा!

मी पण पाहिला लाल सिंग थिएटरमध्ये जाऊन. वर अमितव यांनी जे लिहिले आहे त्या पोस्टीला १००% अनुमोदन. त्यांनी सर्व काही cover केले आहे.
पण माझे २ आणे
इतरत्र वाचून मला थोडी भीती होती की सिनेमा lengthy आहे, बोर होईल पण अजिबात बोर नाही झाला. मी फॉरेस्ट गम्प पाहिला आहे, आवडलाही होता, पण लालसिंग मधल्या भारतातील घटना आपल्याला जास्त जवळच्या आहेत त्यामुळे आपण जास्त गुंततो. आमिर खानने acting थोडे tone down केले असते तरुणपनच्या सीनमध्ये तर चालले असते. हे त्याचे बेस्ट acting नक्कीच नाही पण एकदा दाढी वाढवल्यावर मात्र त्याने कमाल केली आहे. त्याचा पगडी बांधतानाच सीन अतिशय प्रमाणकारक बनला आहे. करीनाने खूप बॅलन्सड काम केले आहे. पण मूळ सिनेमांत जेनीचे character equally इंटरेस्टिंग वाटते. तितके इथे वाटत नाही.
एवढेच ऍड करेन कि सिनेमा चांगला आहे. काहीही आक्षेपार्ह नाही . केवळ बहिष्कार टाकायचा म्हणून एका चांगल्या सिनेमाला मुकू नका. नाहीतर पुढे तेच पाहावे लागेल rrr, पुष्पा वगैरे.

आमिर एवढा परफेक्शनिस्ट असताना त्याचा अभिनय आवडला नाही, म्हणजे बघायला हवा कुठे माती खाल्लीये Happy
फरहान अक्तर च्या मिल्खा कॅरॅक्टर शी तुलना केली तर मार खातोय का?

भाग मिल्खा मधेही भरपूर सिनेमॅटिक लिबर्टी घेतली होती
पण फरहान ने जीव ओतून काम केलं आहे त्यात

आमीर ने ओव्हर ॲक्टिंग केली आहे त्यामुळे थोडासा वेगळा असलेला गंपं इथे खूपच डोक्याने कमी वाटू लागतो..
मूळ चित्रपटात त्या इमोशनल कोशंट कमी असतो इथे मात्र त्याची सर्व सामान्य बुद्धिमत्ता कमी आहे असे वाटते .

आमीर ने तो अभिनय संयत पणे केला असता तर मात्र चित्रपट सुंदर झाला असतां...
तसेच पळण्याच्या प्रसंगाचे भारतीयीकरण करता आले असते . जसे की हिमालय यात्रा किंवा परिक्रमा वगैरे... डिअर कॉमरेड मध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे दाखवता आले असते.. अगदी माशी टू माशी कॉपी करायची गरज नव्हती

पण फरहान ने जीव ओतून काम केलं आहे त्यात
मिल्खासिंग मध्ये फरहान रनर कमी आणि बॉक्सर जास्त वाटतो. कोणत्या रनरला असे मसल बिल्ड अप करून पळता येईल? पानसिंग तोमर मध्ये इरफान खरंच रनर वाटतो

१३ लाईव्ह्ज बघितला. उत्तम सिनेमा.

कुठेही नाट्यकरण झाल्याचे वाटत नाही. डॉक्युमेंट्री पाहिल्यासारखेच वाटते, मसाला म्हणून थरार घातला नाही, प्रसंगाचा असलेला थरारच पुरेसा रंजक आहे.

कोणत्या रनरला असे मसल बिल्ड अप करून पळता येईल? >>>>>>
शॉर्ट डिस्टन्स वाले असतात की
गटलीन, पॉवेल चे कसले मसल्स होते
कार्ल लुईस, बेन जॉन्सन चे पण

अर्थात खऱ्यात मिल्खा सिंग इतक्या पिळदार शरीरयष्टी चे नव्हते
त्याला उगाच ग्रीक गॉड केलाय हे बरोबर आहे
पण तरीही मला आवडला तो मुवि

फरहान अक्तर च्या मिल्खा कॅरॅक्टर शी तुलना केली तर >> पण त्याचा काय संबंध? त्याच्याशी तुलना कशाला करायची? टॉम हॅन्क्सशी सोडून मिल्खा का आला इथे समजलं नाही. का एक सरदार म्हणून दुसरा सरदार म्हणताय? त्याने सीख माणसाची व्यक्तिरेखा चांगली वठवली आहे. डोळे, भुवया, ओव्हर अ‍ॅक्टिंगहीचा भागही १० एक टक्के वेळातच असेल.
लाल लहान असतानाचा, धावतानाचा, टेबल टेनिस (जे इथे फार नाही) खेळतानाचा, करीनाला शेवटी भेटल्याचा, मुलाला वाढवतानाचा आणि ही सगळी स्टोरी कथन करतानाचा अभिनय, चेहेरा चांगलाच आहे. आर्मी आणि चड्डी-बनियन काळात तो तरुण चेहरा आहे फक्त. त्यातही आर्मीचा तो डार्क हिरव्या रंगाचा पोषाख घालून राष्टपती पदक घेतो, दिल्लीत करीनाला भेटतो, तिला घेऊन घरी येतो.. ती प्रेग्नंट रहाते त्या भागातही फार खटकत नाही. आर्मीच्या पोषाखात अँटी वॉर रॅली पार्ट मध्ये जसा टॉम हॅन्स्क राजबिंडा दिसतो तसा आमिरही छान रुबाबदार दिसतो.
मूळ पिक्चर मधला तो माईक बंद पडणे पार्ट अमेरिकेतील कट्टर लोकांच्या वाईटात जायला नको म्हणून पीसी प्रकार होता की काय असं मला फॉग बघताना पूर्वी वाटलेलं. तो व्हाईट हाऊस मध्ये शू लागली पार्ट मध्ये काही वेगळं दाखवायचं असेल, त्यात काही स्मार्ट कमेंट असेल तर मला समजलं नसेल... पण जर रुट बिअर आणि मग शू इतकंच दाखवायचं असेल तर त्या जोकची काय इतकी गरज न्हवती. पाच मिनिटं वाचली असती. ढुंगण दाखवणे मात्र जाम फनी आणि त्याचा इनोसंस दाखवणारे होते.

काल 'बुलेट ट्रेन' पाहिला. हसून हसून गाल दुखायला लागले Happy

एकदम मस्त आणि रिफ्रेशिंग मूवी आहे. Action sequence पण मस्त आहेत सगळे.

काल एकदाचा सापडला "बिग". २००३ ला व्हीसीडी प्लेअर आला होता त्यासोबत व्हीसीडी पण मिळाली होती तेव्हां पारायणे झालेली. काल पुन्हा बघताना टॉम हॅंक्स कसला अ‍ॅक्टर आहे तेच फक्त दिसलं. लहान मूल शरीराने मोठं झालेलं पण त्याची बुद्धी तेव्हढीच हे बेअरिंग कसलं सूक्ष्म निरीक्षणाने पकडलंय. त्यात तो अभिनय करतोय असे वाटतच नाही.

बाय द वे, आत्ताच लाल सिंग चड्डाची सगळी गाणी ऐकली.. मस्तच आहेत..गाण्यांमुळे बराच इमोशनल टच आला असेल मुव्हीमधे.. आज जाईन बघायला.

हो सुरुवातीचं गाणं तर फार सुंदर आहे. ओळी, संगीत, आवाज, चित्रीकरण.. सगळंच! >>> +११११ कालपासून रिपीट ऐकते आहे.
मैं की करा पण मस्त. पहिल्यांदा रिलीझ झाले तेव्हापासूनच आवडलेले.

त्यात कुठल्याही धर्माच्या, देशाच्या, पंथाच्या, आर्मीच्या भावना दुखावण्यासारखं किंचितही काही नाही. आता देशद्रोही म्हणायचं तर म्हणा!>>
आपण इकडे आलोय त्यामुळ अलरेडी देशद्रोही लेबल कॅटेगरी मध्ये ढकलल आहे. जोवर हे म्हणणारे इकडे येत नाहीत किंवा त्यांची मुल इकडे येत नाहीत तोवर आपण देशद्रोहीच. Wink
छान रिव्यु लिहिलेत सगळ्यांनी. आता बघावासा वाटतोय.

हो. ती सुरवातीची ट्युन ओळखीची आहे (तारे जमीन पर मध्ये आहे का अशीच?) त्यामुळे आधी न्हवतं ते आवडलं गाणं. पण चित्रपटात ते बॅग्राऊंडला अनेकदा येतं आणि आवडलं.
मै की करा पण मस्त गाणं आहे. एकदम टिपिकल पंजाबी/ सीख चाल आहे, शब्द पण छान आहेत.
शेवटी पगडी घालताना ती गुरुबाणी टाईप आहे ते पण ऐकताना छान वाटतं. सीख लोकं केस कापतानाचा सीन बघुन दुखावले नाहीत बघुन ते आमच्या हिंदूबंधूभगिनींपेक्षा मचुअर आहेत हे ही कळलं.

मी तर बऱयाच दिवसांनी सोनू निगमचं नाव बघून खूष झाले. तरीही मला सगळ्यात जास्त अरिजितचं तेरे हवाले आवडलं.

मी पाहिला चड्डा.
जिथे जिथे भारतीयीकरण केलंय तो भाग चांगला आहे. जिथे माशी टू माशी कॉपी मारलीय तिथे आपल्याला आधीच स्टोरी माहित असल्याने बोर होतो. अर्थात ज्यांनी फॉगं पाहिलाच नाही त्यांना तोही भाग आवडायला हरकत नाही.
सुरवातीचा लहानपणीचा भाग चांगला झाला आहे. त्यानंतर 'तरूण' चड्डा येतो तो भाग चांगलाच ढेपाळला आहे. अमीरचे डेव्हलपमेंटली चॅलेंज्ड व्यक्ति साकारण्याचे प्रयत्न क्रिंजी आहेत. जुन्या चित्रपटांमध्ये वेड्याची भूमिका करणारे लोक 'एक मैलावरूनसुद्धा हा वेडा आहे हे कळलं पाहिजे' एवढा अभिनय करून देत त्याची आठवण होते. एवढा अर्धा तास बाहेर फिरून, रेस्टरूमची एक राऊंड मारून या Happy
पाकिस्तानी सैनिकाचा आर्क हा पिक्चरचा हाय पॉईंट आहे. मला 'वाचवल्याबद्दल' आभार असं तो लिटरल आणि फिगरेटिव्ह अर्थाने म्हणतो तो भाग जमलाय.
उर्वरित पिक्चर फॉगं ने दाखवलेल्या वाटेवरून ठीकठाकपणे शेवटाकडे घरंगळत जातो.

जुन्या चित्रपटांमध्ये वेड्याची भूमिका करणारे लोक 'एक मैलावरूनसुद्धा हा वेडा आहे हे कळलं पाहिजे' एवढा अभिनय करून देत त्याची आठवण होते.

>>> Biggrin

कृष्णाच्या हातातील सोन्याच्या कड्यावर कोविड वॅक्सिंनचा फॉर्म्युला असतो म्हणे

असे काल्पनिक लिहिले तर हिंदू संस्कृतीचा अपमान होत नाही , उलट सन्मान होतो.

राजा महाराजा आणि देऊळ दाखवून त्यात हिंदू गाणे म्हटले की पब्लिक खुश , मग भले तो राजा स्वतकडेच सगळी इस्टेट ठेवून प्रजेला भिकेला का लावेना आणि राजाच्या घरात किती का षडयंत्र अन खून पडेनात

आमीर खानचा चित्रपट लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यानं तो संकटात सापडलाय. वितरकांना (Distributor) या चित्रपटामुळं मोठं नुकसान सहन कराव लागलंय. त्यांनी चित्रपट निर्मात्यास मोबदला देण्याची मागणी केली. आमीर खान स्वतः या चित्रपटाचा निर्माता आहे. प्राप्त माहितीनुसार, चित्रपट फ्लॉप झाल्याची जबाबदारी आमीर खाननं स्वतः घेतली आहे. परंतु, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

Pages