Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Pondicherry - मराठी मुव्ही
Pondicherry - मराठी मुव्ही आहे. "राजवाडे अँड सन्स" इतका भयानक पथेटिक मुव्ही होता की त्यानंतर सचिन कुंडलकर या नावाचा धसकाच घेतला होता. गुलाबजाम बरा निघाला असला तरी कुंडलकर नाव बघून अपेक्षा नव्हत्या. चित्रपट आयफोनवर शूट केलाय अशी पाटी सुरुवातीला आली त्यामुळे हा काय reels सारखा प्रकार आहे का अशीही शंका आली. उगाचच समलैंगिकतेचा उदोउदो केला असेल असंही वाटलं. मुख्य भूमिकेत सई ताम्हणकर म्हणजे अजून एक बाजू पडकी.
पण सगळे अंदाज साफ चुकले. चित्रपट एकदम चांगला निघाला. सई ,वैभव तत्ववादी आणि इतर सर्व सहकलाकारांची कामं छान आहेत. (अमृता खानविलकर, गौरव घाटणेकर, नीना कुलकर्णी, शुभांगी दामले). सईच्या मुलाचा रोल तर मस्तच आहे. प्रत्येकाचा एक भूतकाळ , त्यातली रहस्ये आणि त्याची होणारी उकल ही संकल्पना आहे. पॉंडीचेरीचं सुन्दर शूटिंग आहे.
गुलाबजाम प्रमाणे इथेही योगायोग जरा जास्तच आहेत पण ते ठीक आहे. जरा उच्चमध्यमवर्गीय फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत पण आपल्याला ते(च) रिलेट होतात त्यामुळे आवडला. पॉंडीचेरी शहर तर अगदी चार दिवस जाऊन राहावं अशा प्रकारे प्रेझेंट केलं आहे.
टर्मिनल बराच जुना सिनेमा आहे
टर्मिनल बराच जुना सिनेमा आहे ना. > हो. २००४ चा. नेफ्लि वर इतक्यात आलाय बहुतेक.
व्हिएतनाम युद्धाला भारत-पाक
@लालसिंह चढ्ढा-
व्हिएतनाम युद्धाला भारत-पाक युद्ध करतील. टेबलटेनिसचे क्रिकेट करतील. चीन ऐवजी श्रीलंका, काही सांगता येत नाही.
ट्रेलरवरून आमिर खान 'माय नेम ईज' मधल्या शाखा सारखा 'कडकनाथ' वाटला. टॉम फॉरेस्ट वाटलाय, पण लाल सिंग चढ्ढा'टॉम हँक्स' वाटायचा अशी भीती आहे. करीना काही त्यातल्या मैत्रिणीसारखी कधीच सैरभैर, अविचारी, गोंधळलेली वाटत नाही, तिचा 'she knows what she wants' look आहे. आपल्याकडे हिरोलाच सगळे पैसे व फुटेज देतात, त्यामुळे इतरांच्या जसे तो फिशींग विषयी बोलणारा मित्र, आई, कर्नल वगैरेंच्या रोल्सना श्रिंक करतील व आपोआपच माती होईल. तरीही 'फॉरेस्ट गंप' ऑटॉफे असल्याने उत्सुकता आहेच!!!
>>>>>>>ज्यांची सिरीयल असेल
>>>>>>>ज्यांची सिरीयल असेल त्यांना बाकीचे सगळे वंदन करतात हा रुल असतो Happy
>>>>>>>ज्यांची सिरीयल असेल
>>>>>>>ज्यांची सिरीयल असेल त्यांना बाकीचे सगळे वंदन करतात हा रुल असतो Happy << हो, भारत पाकीस्तान सिनेमात तर हे खुप बघितलं आहे.
आपल्या देशात व्यक्तिपूजेचे
आपल्या देशात व्यक्तिपूजेचे स्तोम अपरंपार आहे त्यामुळे बायोपिक मध्ये असं काही घुसडून द्यायची उबळ येते >>
विवेक ओबेरॉयचा नरेंद्र् मोदी चित्रपट याचे अगदी उत्तम उदाहरण. अक्षर्शः कहर व्यक्तीपुजा दाखविलेली. आपल्याकडे ग्रे शेडची माणसं जणु काही नसतातच. एकतर काळा किंवा पांढरा.
फारसं तपशीलात न शिरता, ह्या
फारसं तपशीलात न शिरता, ह्या सगळ्या गोष्टी पाहून मला नेहमीच वाटतं की बॉलीवूड (फॉर दॅट मॅटर - भारतीय फिल्ममेकर्सनी) इतिहास, चरित्रपट वगैरे गोष्टींच्या नादी लागू नये. >> टोटली फेफ!
सरकारी सेन्सॉर, संघटनांचा दबाव, संतप्त चाहते वगैरे या सर्व कचाट्यातून इव्हन खरेखुरे व्यक्तिमत्त्व दाखवणे अवघड आहे. "दिग्दर्शकाच्या नजरेतून" वगैरे तर सोडूनच द्या. त्यात आजकाल ऐतिहासिक चित्रपटांत साउथ मधले हीरो लोक जशी फायटिंग करतात, स्टंट्स करतात तसले प्रकार आले आहेत. वर आणखी "तुम्हाला सुपरमॅन, बॅटमॅन वगैरेंनी हे केले तर चालते..." टाइप जस्टिफिकेशन येते उत्साही फॅन्स चे
शिवाजी महाराजांवर फेकलेला भाला त्यांच्या चेहर्याच्या अलीकडे ८-१० इंचांवर अडवणारी एक भक्कम मूठ आख्ख्या स्क्रीनवर येते. मग तो कोयाजी आहे हे दिसते. तोपर्यंत सगळे नुसते बघत बसलेले असतात. इतकेच नाही तर ज्याने तो भाला फेकला तो सुद्धा याने तो भाला अडवून पुन्हा त्याच्याकडे फेकेपर्यंत तो नुसता बघत बसलेला असतो. असली लढाई.
या "पूर्ण स्क्रीनवर लास्ट मिनिटला ते जे काही मारलेले असेल ते अडवणारा एक हात" चे पेव फुटलेले दिसते. "धर्मवीर" मधेही आनंद दिघे एक जळती काडी अशीच अडवतात.
तरीही 'फॉरेस्ट गंप' ऑटॉफे
तरीही 'फॉरेस्ट गंप' ऑटॉफे असल्याने उत्सुकता आहेच!!!>>> बहुधा ह्या उत्सुकतेवरच चालला तर चालेल, कशी आणी किती माती केलिये ते तरी बघु म्हणूनच जातिल पब्लिक.
मला तरी ट्रेलर बन्डल वाटला .आमिरचा एलियन लुक ३इडियट,पिके आणी इथे रिपिट होतोय जे भयकर इरिटेटिन्ग आहे, पन्जाबी/शिख अॅक्सेन्ट गन्डले आहेत, करिनाच वय जाणवत आहेच.
आमिरचे पिक्चर तसे बरे असतात पण हा आपटेलच अस वाटतय...
ब्रम्हास्त्र शमशेराच्याच वाटेवर जाणार अस दिसतय.
मुळात ओरीजनल क्लासिक सिनेमा
मुळात ओरीजनल क्लासिक सिनेमा असताना आणि तो प्रसिद्ध असताना निव्वळ त्याचे भारतीयकरण केलं आहे (म्हणजे काय देव जाणे, मला ट्रेलरमध्ये तो पाणीपुरी खाताना दिसतो, चॉकलेट खात नाहीत का भारतात, त्याची पाणीपुरी कशाला करायची आणि ती अशी सोबत घेऊन खायची, पार माती केली त्या सीनची ) म्हणून लोकांनी सिनेमा बघावा ही अपेक्षाच अती आहे आमिर खानची
फ्लॉप झाला तर उत्तम, परत अशा कुठल्या सिनेमाची माती करायला धजावणार नाही
पायरेट्सवरून काही धडा घेतला नाही अर्थात त्याने
या "पूर्ण स्क्रीनवर लास्ट
या "पूर्ण स्क्रीनवर लास्ट मिनिटला ते जे काही मारलेले असेल ते अडवणारा एक हात" चे पेव फुटलेले दिसते. "धर्मवीर" मधेही आनंद दिघे एक जळती काडी अशीच अडवतात.>>>>
पूर्वी भाषणात टाळीखाऊ वाक्ये असत, आता सिनेमात तसे टाळीखाऊ प्रसंग असतात
अतुल कुलकर्णीने म्हणे याची
अतुल कुलकर्णीने म्हणे याची पटकथा १० वर्षापूर्वी लिहिली आणि आमीर ला दाखवली, त्याने ती वर्षभराने पाहिली आणि मग पॅरामाउंट कडून परमिशन घेणे वगैरे मधे पुढची ७-८ वर्षे गेली. ट्रेलर तर पाहिलेलाच नाही मी अजून, बघते आता
फॉरेस्ट गंप नावाचा काही
फॉरेस्ट गंप नावाचा काही चित्रपट होता हे मला आमीरखानचा लालसिंग चड्ढा आला तेव्हा समजले.
भारतात किती लोकं असतील ज्यांना फॉरेस्ट गंप आधीच माहीत असेल? (ईथे मायबोली आणि पुणे-मुंबई-अमेरीकेच्या बाहेर जाऊन प्रामाणिकपणे विचार करा)
बर्रं माहीत असणाऱ्यांमध्ये किती असतील ज्यांनी तो पाहिला असेल?
बर्र तो फॉरेस्ट गंप पाहिलेल्यांपैकी किती जण केवळ त्या कारणामुळे लालसिंग चड्ढा बघणार नाहीत?
मूठभर आकडा ऊरेल.
बर त्या मूठभर लोकांमध्येही ती लोकं सोडाच जे असेही वर्षाला दोनतीनच सिनेमे बघतात आणि सिनेमे चालायला फारसा काही मोठा हातभार लावत नाहीत.
मॉरल ऑफ द प्रतिसाद - फॉरेस्ट गंपमुळे चित्रपटाच्या धंद्यावर जवळपास शून्य फरक पडेल. किंबहुना मिळाला तर पब्लिसिटीचा फायदाच. पण तो ही जास्त नाही. एका ठराविक वर्गातच. जसे की आता माझी उत्सुकता चाळवलीय.
आठवतेय,
दुनियादारी चित्रपट पुस्तकासारखा नाही म्हणून काही पुस्तकप्रेमी नाराज होते. तेव्हा चित्रपटप्रेमी दुनियादारीला बॉक्स ऑफिसवर धो धो चालवत होते. पुस्तकप्रेमीही आपल्याजागी योग्य असावेत. पण ज्यांना चित्रपट चालवायचा होता त्यांनी तो चालवला.
बॉस हा धंदा आहे. किती लोकं चित्रपट बघणार नाहीत आणि किती बघणार हा हिशोब करा एकदा. मला तर पिक्चर हिट दिसतोय.
अर्थात चित्रपट थ्री ईडियटस, दंगल, पीके वगैरे दर्ज्याचा असल्यास हिट जाणारच. हो, पण जर धूम किंवा मेला दर्ज्याचा असेल तर मग मेलाच, त्याला कोणी वाचवू शकत नाही. सांगायचा मुद्दा ईतकाच की या फॉरेस्ट गंप फॅक्टरने काही फरक पडणार नाही.
बॉस, ईटस आमीर खान मूवी. ईंडियाच्या पब्लिकला तेच मॅटर करते.
जाता जाता.. अगदीच राहावत नाहीये म्हणून..
चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होतोय!
म्हणजे हमखास ब्लॉकबस्टर !!
गम्पच्या देसी रिमेक बद्दल
गम्पच्या देसी रिमेक बद्दल उत्सुक्ता आहे.
बाकी भारतीय ऐतिहासिकपट, चरित्रपट टाळलेलेच बरे.
ग्रे मॅन बघितला (नेफ्लि). रायन गॉसलिंग, अॅन -डी- अर्मास, बिली बॉब थ्रॉनटन आणि आपला धनुष आहेत. धनुषचा अगदीच बारका इनसिग्निफिकंट रोल आहे.
सीआयए बँकॉक मध्ये जाऊन एकाची सुपारी (हो मग काय!) एका खुनासाठी जन्पठेपेत असलेल्या इन्मेटला देते. त्याच्या बदल्यात त्याची जेल मधुन कायमची सुटका असा अफलातून प्लॅन असतो. हा इनमेट म्हणजे रायन गॉसलिंग. हिरो. म्हणजे परत वरच्या चर्चेप्रमाणे सर्वगुणसंपन्न असणारच. हातुन घडलेला खून हा ही ग्रेटर गुड मध्ये विनाशायच दुष्कृताम असलाच पाहिजे. मग सुपारी ज्याची घेतली त्याला हा दोन मजले खाली उभे राहुन काचेच्या फ्लोरिंग असलेल्या इमारतीत मारणार असा एकदम फिजिबल प्लॅन ठरतो. पण आयत्यावेळी कोलॅटरल डॅमेज म्हणून एक मुलगा लाईन ऑफ साईट मध्ये असतो. आता दोन मजले खालून त्याला न्यू इअर च्या पार्टीच्या गदारोळात आणि गर्दीत बरोबर हाच पोट्टा कसा काय लाईन ऑफ साईट मध्ये दिसतो... असले प्रश्न सोडून देऊ. तर आपला आहे हा हिरो! अंडरएज हत्येचे महापातक शिरी घेणे हा महाअपराध. मग भले शहरच्या शहर बेचिराख होवो! मग हा गोळी मारत नाही. पण आठवा... परित्राणाय साधूनां, विनाशायच दुष्कृताम! आणि व्हिलन मेला नाही तर कसं चालेल? परत हे सगळं पहिल्या १० मिनिटांत घडलंय. पिक्चर अभी बाकी हैईच!
मग कोलांट्या उड्या, धावपळ यांची मालिका.. आणि तो व्हिलन मरायच्या आधी 'मी व्हिलन नाही तर तू इतका वेळ ज्याला हिरो समजतोयस तोच व्हिलन आहे.' हे ग्यान एन्क्रिप्टेड फाईल मध्ये आपल्या हिरोला देतो. इतके पिक्चर बघितल्याने आपल्याला त्याच क्षणी ते डिक्रिप्ट होऊन कळतं ते ग्यान. पण अगेन पिक्चर अभी बाकी है.
मग उरलेला सगळा वेळ ती फाईल डिक्रिप्ट करण्यात, त्या व्हिलन पासून वाचवण्यात... आणि शब्दशः विश्वरूप दर्शनात अर्थात बँकॉक, पॅरिस, व्हिएन्ना, क्रोएशिआ, प्राग, डीसी मध्ये जातो. अचाट दाखवण्याच्या नादात सीआयएचा आवरली बेसिसवर काम करणारा एक कॉंट्रॅक्टर एकहाती वरील सगळ्या शहरांची (अर्थात डीसी सोडून) अक्षरश: धूळदाण उडवतो. सीआयएने धाडलेले/ हायर केलेले लोक तिथल्या लोकल पोलिसांवर, सामान्य नागरिकांवर असॉल्ट व्हेपनने बिंधास बेछूट गोळ्या चालवतात. अर्थात अमेरिकन पिक्चर असल्याने कोणीही असॉल्ट व्हेपन शाळेत ओपनली नेतं आणि दर दुसर्या दिवशी बेफाम चालवतं. त्यामुळे अमेरिकन लोकांना त्यात काहीच वावगं वाटणार नाही. उलट सद्य परिस्थितीचे मनोज्ञ दर्शन वगैरे वाटेल. तर ते असो.
मग काय दोन इकडची चार तिकडची माणसं मरतात. आणि संभवामी युगेयुगे पिक्चर संपतो.
असलं काही बघायचं असेल तर बघा नाहीतर काही बघायची गरज नाही.
फॉरेस्ट गंप नावाचा काही
फॉरेस्ट गंप नावाचा काही चित्रपट होता हे मला आमीरखानचा लालसिंग चड्ढा आला तेव्हा समजले.>>>>
अपेक्षाही नव्हती, इतका गाजलेला आणि सहा अकादमी अवॉर्ड मिळालेला सिनेमा तुम्हाला माहितीही नसेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण बॉलिवूड आणि शाखा पलीकडे काही असतं यावर तुमचा विश्वास नाही
तसेच जगात भारतात तुम्ही आणि तुमचे ड्यु आयडी सोडून अन्य लोक असतात आणि ते क्लासिक्स वगैरे बघतात यावरही तुमचा विश्वास असणे शक्य नाही
रच्याकने शुभ रात्री म्हणून गेला होतात
इतक्यात दिवस उजाडला? कुठल्या गोलार्धात राहता नक्की?
का आयडी बदलायला विसरला?
११ ऑगस्ट तुमचा वाढदिवस आहे का
.
सलमान खान बिग चा रीमेक करणार
सलमान खान बिग चा रीमेक करणार होता अशा बातम्या होत्या काही वर्षांपूर्वी. चालला ही असता.
पण सलमानच्या रीमेकचा इतिहास बघता त्याने विचार बदलल्याने खूप लोकांनी मनात त्याचे आभार मानले असतील.
आत्ता परत फॉरेस्ट गम्प बघितला
आत्ता परत फॉरेस्ट गम्प बघितला. अरे काय मूव्ही आहे!
असा मॅटर ऑफ फॅक्ट आमिर खानला जमेला का तो विनोदी होईल, का ड्रामा होईल, किंवा ड्रीम होईल, का ऐतिहासिक घटनांची जंत्री होईल ... कारण फॉरेस्ट गम्प यापैकी काहीच नसून सर्व काही आहे. कारण फॉरेस्ट जस्ट पुरेसा हुषार आहे, आणि जस्ट पुरेसा वेडा नाही. टॉम हॅक्स शिवाय इतका डिग्निफाईड तरीही साधा सगळी कडून फॉरेस्ट दिसणारा कोण करू शकेल?
परत आर्मीची, युद्धाची खिल्ली उडवणे, एलबीजेला ढुंगण दाखवणे, निक्सनने वॉटरगेट हॉटेलात रहायला जा सांगणे, याने एल्विसला डांस मूव्ह्ज शिकवणे... आणि हे सगळं आपल्याला गोड, टंगइनचिक वाटत रहाणे सगळ्या ऐतिहासिक घटनांच्या वेळी, अशा इंटरॅक्शन्स मध्ये गालावर हसू येणे हे भारतात कसं काय शक्य करणार? आपले लोक आर्मी बिड्या फुकत पत्ते खेळत बसली आहे इतका शॉट दाखवला तरी बोंबलत सुटतील. तिथे बाकीच्याचं काय करणार? नकोच.
फॉरेस्ट गंप बघितलेलं कोण सांगत नाही तोवर नाही बघणार.
आमचा विचार आहे लालसिंग
आमचा विचार आहे लालसिंग बघण्याचा. बघितला तर इथे लिहीनच. (फॉरेस्ट गम्प आवडतो, भारतीयीकरण नक्की कसं केलंय याची उत्सुकता आहे. अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून आवडतो. आता हे लिहिण्याचं काम कसं केलंय तेही बघायचंय.)
बबा च्य स्वप्नातली झिंगे
बबा च्य स्वप्नातली झिंगे पकडायची बोट पण कशी दाखवणार कुणास ठाउक. त्यासाठी कदाचित केरळ ला जाईल चढ्ढा. किंवा पंजाबातील सरसो चे खेत खलीहान स्वप्न ही दाखवतील. कॅप्टन चे काम समंथाचे एक्सश्री नाग चैतन्य करणार आहेत म्हणे. आनंदी आनंद आहे एकूणच.
मी पण बघणार आहे लाल चड्डा...
मी पण बघणार आहे लाल चड्डा... बॉयकॉट आमिर वगैरे वाचूनच चीड येतेय... मूर्खांचा बाजार आहे सोशल मीडिया वर...
मी पण चढ्ढा बघणार आहे थेटरात.
मी पण चढ्ढा बघणार आहे थेटरात. वडिलांना इंग्रजी समजत असले तरी इंग्रजी सिनेमे बघणे हे "आरामात, फारसे लक्ष न देता सिनेमा बघणे" या तत्वाच्या अगेन्स्ट जात असल्याने ते इंग्रजी सिनेमे अगदी क्वचित बघतात. त्यामुळे फॉरेस्ट गम्प हा माझा आवडता सिनेमा अमीर खान हिंदीतून रिमेक करतोय म्हणल्यावर बघायचा, हे आम्ही सिनेमा अनाऊन्स झाल्यावरच ठरवले होते.
मी तो गंप पाहिला होता.मला जरा
मी तो गंप पाहिला होता.मला जरा डॉक्युमेंटरी वाटला.बहुधा मनाचं 98% कंडिशनिंग बॉलिवूड असल्याने असेल.म्हणजे आम्ही जेन्यूईन चायनीज हॉटेल चं खाणं न आवडता चायनीज पद्धतीने थोडं जास्त तिखट घालून बनलेलं इंडियन चायनीज आवडणारे लोक.
लाल सिंग बघणार नाही कारण मूळ कल्पना विशेष रोचक वाटली नाही.
आम्ही ओटिटिवर यायची वाट बघू.
आम्ही ओटिटिवर यायची वाट बघू.
फॉरेस्ट गम्प आवडलेला आणि आमिर खानला त्या रोलमधे बघायची आणि इंडियनाईज कसं केलंय हे बघायची उत्सुकता.
Room (2015) काल पाहिला
Room (2015) काल पाहिला प्राईमवर.
पाच वर्षाचा मुलगा आणि त्याची आई एका शेडमधे सात वर्षापासून राहत असतात...समहॉव तिथून बाहेर पडण्यात यशस्वी होतात..मुलानं जन्मापासून बाहेरचे जग पाहिलेले नसते..मुलगा बाहेरच्या जगात adjust करू शकेल कि नाही अशी त्याच्या आईला काळजी वाटत असते..
चांगला सिनेमा!
रॉकेट्रीमधे दाखवलेलं फ्रेंच
रॉकेट्रीमधे दाखवलेलं फ्रेंच टेक्नॉलॉजी 'चोरणं' यात मला तरी काही आश्चर्यकारक वाटलं नाही. असे व्यवहार हे शुद्ध, निरागस वगैरे नसणारच. अगदी प्युअर सायन्समधेही कुणाला मदत करायची, कुणाला नाही यात राजकारण म्हणा, स्वतःचा फायदा पाहणं म्हणा, हे असतं खूप वेळा. इथे तर आंतरराष्ट्रीय संबंध, त्या टेक्नॉलॉजीचा व्यावसायिक वापर होणार असल्याने मिळणारा पैसा असे मोठे घटक आहेत. त्यामुळे समोरची पार्टी सरळपणे वागत नाहीये हे माहिती असतानाही आपण सरळपणे वागायचं असं त्यांनी केलं नाही याचं मला आश्चर्य वाटत नाही.
अब्दुल कलामांना साराभाई सुनावतात हे बघितल्याचं मलाही आठवत नाही.
दा विंची कोड वाचल्यावर मूव्ही
दा विंची कोड वाचल्यावर मूव्ही इतका नव्हता आवडला. पुस्तक वाचतानाच डोळ्यासमोर आख्खा मूव्ही तरळून गेला होता.
फॉगं पाहिल्यावर लासिंच पाहण्यात पॉईण्ट वाटत नाही.
(चित्रपट का पाहणार - का नाही, /कुठला हिट होणार - का हिट होणार ...असे धागे असतील तर तिकडे लिहीन ).
अगदी 'चोरणं' नाही पण जिथे
अगदी 'चोरणं' नाही पण जिथे स्पर्धा असते तिथे त्यातल्या त्यात कायद्यात चूक नसणाऱ्या पण एथिकली चूक असणाऱ्या गोष्टी बरेच वेळा कराव्या लागतात.
नंबी सरांनी त्यांच्या
नंबी सरांनी त्यांच्या पुस्तकात फ्रान्स मधे आम्हाला टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर साठी आधी फ्रेंच शिकवलं आणि मग टेट्रा केली असं लिहीलं आहे.
रूम फार क्लेशकारक सिनेमा आहे.
रूम फार क्लेशकारक सिनेमा आहे. पण आवडतो.
पण चोरी ही चोरीच आहे.
पण चोरी ही चोरीच आहे. चिन्यांनी / पाकिस्तान्यांनी केली तर ती चोरी आणि आपण केली तर ती देशभक्ती - हा दुटप्पीपणा पटत नाही. शिवाय आपण केलेली चोरी हे 'दुसरे पण करतात म्हणून' अजिबात समर्थनीय नाही. ह्यात सुरुवात कुणी केली हा प्रश्नच चुकीचा आहे. चूक ही चूकच. तसं नसेल तर सगळे पायरेटेड सिनेमे बघतात, मग आम्हीही बघतो; आम्ही पायरेटेड विंडोज आणि ओफिस सॉफ्ट्वेअर वापरतो, त्यामुळे देशाचा पैसा देशातच राहतो - असं काहीतरी लॉजिक होईल.
Pages