चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल 'फूटफेअरी' (नेफ्लि) चालू केला. >>>
वेळ वाया जाईल.. फूटफेअरी शेवट पर्यंत पकडलाही जात नाही. >>> +२५००...
मी मराठी भाषेत लावला ... ईतके भयाण उच्चार..... एक वेळ अमराठी लोक्स आहेत त्यांचे उच्चास समजु शकतो पण सागरीका घाटगेचे उच्चारही एकदम विचित्र वाटतात.....
अन एकदम बाळबोध कथा टाईप्स वाटला... लैच बोर....

रोकेट्री मात्र आवडला....

विक्रम रोना 3 डी तच बघा

मस्त आहे

साऊथ चे जंगल मस्त आहे

पण एक कन्नड मुव्ही आहे , रंगीत रंगा , त्यातले बरेचसे घेतले आहे असे वाटते

आणि तो दिनो मारिओ चा एक आहे , त्यात एका ऐवजी दोन जोकर असतात

Proud

आता चेक केले

रंगीतरंगा आणि विकरांत रोनाचा डायरेकटर की प्रोड्युसर सेमच आहे

जंगलाचे काही शूटिंग महाबळेश्वरचे आहे , काही जंगल कृत्रिम सेटवरचे आहे.

पण थ्री डी तच बघा

95 कोटीचे बजेट
35 कोटी आजच वसूल झाले.

हिंदी कलेक्शन 1 कोटी , सर्व डब मुव्हीमध्ये सर्वाधिक

रंगीतरंगा युट्युबवर आधी पाहिलात तरी हरकत नाही .

पण मला रंगीत रंगा इतका आवडला नव्हता. फारच अशक्य कल्पना होत्या. यातही आहेत , पण जरा सुसह्य आहेत

हे over-generalization झालं.>>>> बरोबर.
अवांतर सुरूच आहे तर माझेच उदाहरण देते.
माझ्या आई वडिलांना माझ्या आधी एक मुलगी नंतर एक मुलगा. मी तीन नंबर. माझ्यावेळी जेव्हा आई गरोदर होती तेव्हा त्यांनी लिंगपरिक्षण केले होते. मुलगी नको होती पण दवाखान्यात जाऊन गर्भपात का केला नाही माहित नाही. पण आईनेच सांगितले होते की तिने तेव्हा भरपूर गर्भ पडावे म्हणून बरेच प्रयत्न केले होते. जसे डॉक्टर कडून गोळ्या घेतल्या होत्या, भरपूर पपई खाल्ली etc. परंतू माझ्या नशिबात जन्माआधीचा मृत्युयोग नसावा Happy म्हणून मी आलेच जन्माला.
माझ्या बारशाच्या वेळी द अक्षर आले होते. कुणीतरी विचारले काय नाव ठेवायचे तेव्हा बाबांनी ठेवा दगड धोंडा असे म्हंटले होते. तेव्हा शेजारच्या ताईने मी कांगारूंच्या पिल्लासारखी दिसते म्हणून पाळण्यात माझे नाव कांगारू ठेवले. जन्मदाखल्यावर माझ्या मोठया ताईने माझे निलम नाव लावायला लावले. कॉलेजला जाईस्तोवर सगळेच मला माझ्या पाळण्यातील नावानेच बोलवत असत. मग एका नवीन लग्न होऊन आलेल्या त्याच नाव ठेवणाऱ्या ताईच्या वहिनीने सगळ्यांना मला निलम हाक मारण्यास भाग पाडले. अजूनही काही जुनी, लांबची लोक मला जुन्या नावाने हाक मारतात.
मला समजायला लागल्यापासून मला तरी कधीच मुलगा मुलगी असा भेद घरातून जाणवला नाही. आईने हे सगळ सांगितलं नसते तर मला हे कळले ही नसते की मी नकोशी मुलगी आहे. पण हे कळल्यावर जी जखम झाली आहे ती भरतच नाही. कधी कुणी जुन्या नावाने बोलवले किंवा स्त्री भ्रूण हत्येचा विषय निघाला तर पुन्हा भळभळून वाहू लागते. Sad (आज पुन्हा काही मलमपट्टी करावी लागेल)
अति अवांतरासाठी क्षमस्व.

निल्सन, तुम्ही जन्मा आधी नकोसे अपत्य होता पण जन्मानंतर तुमच्या माता पित्यांनी तुमच्यात व तुमच्या भावात भेद केला नाही, तुम्हाला नंतर तशी वागणुक न मिळता तुम्ही इतर मुलांसारख्या वाढलात. म्हणजे गर्भलिंग कळल्यावरची भावना तेव्हाची होती व नंतर त्यांच्या मनात नकोशी मुलगी अशी भावना राहिली नाही असे म्हणता येईल.

हे बर्‍याच जणांच्या बाबतीत घडलेले असु शकते. माझी आईने सांगितलेले माझा सगळ्यात धाकटा भाऊ जेव्हा राहिला तेव्हा आईला मुल नको होते पण ह्या न त्या कामात डॉक्टरकडे जायचे राहुन गेले व भाऊ जन्माला आला.

निल्सन Sad
समजू शकते. माझ्या आईला ही पाडायचा प्रयत्न आज्जीने केलेला. पण त्याचे कारण तिला म्हणजे आज्जीला टी बी होता व तिला ही अधिकची जबाबदारी नको होती. मात्र आईला वाईट वाटेच की आपण नकोशा होतो याचे Sad

हे भयानक आहे. प्रत्यक्ष जन्मदात्यांनाही आपण नकोसे आहोत ही जाणीव बाळगत जगणं म्हणजे काय याची कल्पना इतरांना करता येणं कठीण आहे. तरी निल्सन यांची सौम्य केस आहे. कित्येक नकोशा मुलींना याहून बरंच काही भोगावं लागत असेल.
पण आई मुलीला मारू शकते का वगैरे खूपच डीप थिंकिंग झालं. माझा प्रश्न अगदीच बेसिक होता. आपल्या व्ह्युपॉईंट प्रमाणे गर्भपात आणि भ्रूणहत्या हे शब्द सोयीस्करपणे वापरले जातात.
अमेरिकेत अनिर्बंध अनप्रोटेक्टेड संबंध ठेवून प्रेग्नंट झालेली तरूणी गर्भपात करते तेव्हा तो तिचा 'माय बॉडी, माय चॉईस' असतो. (ही प्रो-चॉईस वाल्यांची प्रसिद्ध घोषणा आहे)
भारतातलं एखादं अतिदरिद्री जोडपं मुलगी झाली तर भविष्यातला हुंड्याचा खर्च परवडणार नाही म्हणून गर्भपात करायला गेलं तर ती 'भ्रूणहत्या' असते
अमेरिकेत प्रोचॉइस वाले लोक जबरदस्तीने जन्माला घातलेल्या मुलांची पुढे आबाळ होईल हे एक कारण सांगतात. हे वेलफेअर सिस्टीम असलेल्या प्रगत देशात.
भारतातल्या नकोशा मुलींच्या बाबतीत मात्र हा मुद्दा गैरलागू असतो. मग या मुलींचं पुढे काही का होईना.
अमेरिकेपर्यंत जायची पण गरज नाही. भारतापुरतंच बघू. एरवी कुठल्याही कारणासाठी केलेला गर्भपात, मग ते फॅमिली प्लॅनिंगसाठी असो, की कॉन्डॉम ने मजा येत नाही म्हणून असो, रुटिन मेडिकल प्रोसिजर असतं, मग याच केस मध्ये 'हत्या' कशाला? तुम्हाला गर्भलिंगचाचणी वर बंदी घालायची असेल तर घाला, पण सिलेक्टिव्हली 'भ्रूणहत्या' वगैरे शब्द वापरून लोकांना गिल्ट देऊ नका. 'आमचा तो चॉईस आणि तुमची ती हत्या' नको. या तो घोडा बोलो या चतुर.

भारतात गर्भलिंगचिकित्सेचा शोध लागायच्या आधी नवजात मुली मारल्या जात. भाताचं तूस खायला घालून, पाण्याने /दुधाने भरलेल्या घंगाळात बुडवून. ती जशी हत्या, तशीच गर्भलिंग कळल्यावर पाडलेला गर्भ हीही हत्या.

सद्य परिस्थितीत मुलीचा जन्म वाईट म्हणून मला मुलगी जन्माला घालायची नाही, असं कोणी स्त्री म्हणत असेल ; पण मुलगा मात्र हवा असेल तर हा निव्वळ ढोंगीपणा झाला. तिने संततीप्रतिबंधक उपाय वापरून गर्भच राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

स्त्रीभ्रूण मारणे हा चॉईस असेल तर मग हेच लॉजिक लावले तर सतीप्रथाही पुन्हा सुरू होऊ शकेल

> हे वेलफेअर सिस्टीम असलेल्या प्रगत देशात.
व्हाट अ जोक. वाल मार्ट सारख्या ठिकाणी मिनिमम वेज वर काम करणार्‍या सिंगल मदर चे इन्कम तिचे तिलाच पुरत नाही. शिवाय पगारी रजा, पेन्शन, मेडिकल इन्शुरन्स वगैरे नसतो. विशेषतः रेड स्टेट्स मध्ये. बाळंतपणाची रजा नसलेला अमेरिका एकमेव प्रगत देश आहे.

असो ही चर्चा इथे नको.

आज rocketry पाहीला. आवडला. माधवनचं काम खुपच छान आहे. नंबीं बद्दल कळलं नसतं कधीच हा चित्रपट आला नसता तर, एवढ्या हुशार सायंटीस्टला देशप्रेमाचे असे दुर्दैवी फळ मिळावे ,हे फार दु:खद आहे.

या चित्रपटावर इथे फारशी चर्चा झालेली दिसली नाही हाही एक धक्का आहे मला तर. तसेच असे चित्रपट फारसे चालत नाहीत हे box office collection बघून कळलं ही पण खेदाची बाब.

निल्सन Sad

निल्सन, तुमचे अनुभव/जीवनकथा ऐकून धक्का बसला पण तुमचे कौतुक वाटले. तुम्ही इतके क्लेशदायक अनुभव सौम्यशब्दात मांडले आहेत.

Big hug Nielson. Daughters are to be loved and treasured. Work on this issue. You have a great life ahead.God bless.

निल्सन, सामो,
इथे या विषयावर लिहीत असताना कोणाची खपली निघेल/दुखावले जाईल हे लक्षात आले नाही. तसा हेतू नव्हता. सॉरी Sad

इथे या विषयावर लिहीत असताना कोणाची खपली निघेल/दुखावले जाईल हे लक्षात आले नाही>>पण अशा बोलण्याने आयुष्यभराची जखम होऊ शकते हे मात्र लक्षात आलंय
मला पहिली मुलगी,तिच्यानंतर 7 वर्ष झाली तरी दुसरा चान्स घेतला नाही दुसरं बाळ नको म्हणून,नंतर नवऱ्याच्या समजवण्याने म्हणा किंवा आग्रहाने म्हणा दुसरा चान्स घेतला,दुसरा मुलगा किंवा मुलगी हा विषयही डोक्यात नव्हता फक्त एकच अपत्य नको असं नवऱ्याच् म्हणणं होतं,मला तेव्हा ते पटलं पण खोटं कशाला बोलू 3 महिन्या नंतर आपण उगाचच चान्स घेतला असं वाटत राहत होत,काहितरी प्रॉब्लम व्हावा आणि गर्भपात व्हावा असंही अधून मधून वाटायचं,पण मी बोलून दाखवला नव्हत कुणाला तेव्हा,दुसरा मुलगा झाला घरातले सगळे खूप खुश होते पण माझ्या डोक्यात कुठे तरी हूर हूर असायचीच
नंतर नंतर कधीतरी रागाने बोललं ही जायचं उगाचच ह्याला जन्माला घातलं म्हणून
आता तो 5 वर्षांचा झालाय,अर्थातच आमचा खूप खूप जीव आहे त्याच्यावर पण यापुढे चुकूनही त्याला याबद्दल समजणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन

मुल गा हवा असताना जन्माला आलेल्या मुलीचं नाव नकुशी ठेवायची पद्धत होती, अजूनही असेल. भारतात २ कोटी १० लाख नकुशा आहेत
माझ्या एका चुलत मावशीचं नाव नकुशा आहे. यावर नकुशी ही टीव्ही मालिका आली होती.

सातारा जिल्हा परिषदेने नकुशा हे नाव बदलायचा उपक्रम हाती घेतला होता.

Split (इंग्रजी) पाहिला काल प्राईमवर.
मल्टीपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर.. नायकात एक नाही दोन नाही एकूण 24 पर्सनॅलिटीज असतात..नायक एका सायकैट्रिस्ट ची मदत घेत असतो..
तीन मुलींना किडनैप करून एका तळघरात डांबून ठेवतो..त्या तिघीना नक्की का बंद केलंय? त्यांची सुटका होते का? तो बरा होतो का?
सायकोथ्रीलर खिळवून ठेवणारा सिनेमा..नायकाचा अभिनय चांगला आहे..

स्प्लिट मनोरंजक सिनेमा आहे.

पण.

काही खटकणाऱ्या गोष्टी आहेत. २३ स्प्लिट पर्सनॅलिटी डेक्सटॉप वरच स्वतःचे व्हिडीओ जर्नल्स का ठेवतील बुवा ? उलट 23 पासवर्ड प्रोटेक्टड कम्प्युटर प्रोफाईल्स असायला हव्यात.

23 पर्सनॅलिटी "बोलायचंय, बोलायचंय" असे मेल सतत सायकोलॉजिस्टला करत असतात. त्यांना सगळ्यांना एकच अत्यंत गंभीर गोष्ट डॉक्टरला सांगायची असते. सरळ जे बोलायचंय ते मेल मध्ये लिहून सोडलं असत तर काम झालं असतं.

स्पॉयलर !
वाचू नका.

बिस्टच्या व्यक्तिरेखेला उगाच सुपरपॉवर दिल्या आहेत असे मत पडले. नसते दिले तर सिनेमा अजून आवडला असता.

असो, सिनेमा चांगला रंजक आहे. आना टेलर जॉयने मस्त काम केलंय.

Pages