चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे मी पण फुट फेअरी फार आशेने बघायला चालू केला होता. पण बोर झाला. तो गुलशन डेविया का कोण चांगलं काम करतो पण यात फार काही
खास रोल नाहीये.

वेळ नाही दवडणार आता. पण तो लीड इन्वेस्टिगेटर आणि त्याचा असि. यांच्यात सेमसेक्स इंटिमेट रिलेशन दाखवतील असं त्यांचा पहिला शॉट बघुन वाटलं. होतो का तो चेकमार्क चेक?
शेजारची कॉलेज गर्ल मरत असेल ना? .. पण ते अगदीच ऑब्युअस आहे.
फूटफेअरी पकडला जात नाही मग काय दुसरा पार्ट आणणार का असा एक फूटफेअरी आपल्या सगळ्यांच्या मनात दडलेला असतो. किंवा तो आजूबाजूलाच असेल... असला काही हायक्लास हायफंडू स्विच मारलाय?

शेजारची कॉलेज गर्ल मरत असेल ना? .>>>>>>> नक्कीच नाहीतर नुसतं तिला कॉलेजला सोडायला, तिच्या घरचा गाजर हलवा खाण्यासाठी दाखवलं नसेल तिला Proud

Submitted by अमितव on 28 July, 2022 - 10:39>>>
मी नाही सांगणार Proud एकटीच का सहन करू

गुलशन डेविया का कोण चांगलं काम करतो >> तो मला मर्द को दर्द नही होता मधे फार आवडलेला..पण ह्यात बोअर केलं

>>नाहीतर नुसतं तिला कॉलेजला सोडायला, तिच्या घरचा गाजर हलवा खाण्यासाठी दाखवलं नसेल तिला >> काही सांगता येत नाही. तिला दाखवल्यावर आणखी दोन पोरी मेल्या तरी ही मरेना. आणि हिच्या आई बरोबर परत एक सीन मध्ये कामवाली मिळत नाही वरुन हा फ्लर्ट करतो सीन आला. तेव्हा आता त्या पोरीला मारताय का आईला... आणी कधी??? असं वाटू लागलं.

कठीण आहे. धागालेखकच उडाले Uhoh
Submitted by रानभुली on 28 July, 2022 - 09:31

>>> हे कसे कळते? या आधीदेखील पाहिले आहे लोक म्हणताना कि हा आयडी उडाला.. तो उडाला... हे समजते कसे?

हे कसे कळते?
लॉजीकली उडालेल्या आयडीच्या डुआयडीलाच हे सर्वात आधी कळणार ना. आता काही शांत प्राणी अशांत होतील.
असो, नेटफ्लिक्स वर The Silencing नावाचा चित्रपट पाहिला. चित्रपट बहुदा कॅनडियन आहे. चित्रपटाची कथा जंगला जवळच्या एका छोट्या town मध्ये घडते. एका फॉरेस्ट रेंजरची मुलगी हरवली असते. फॉरेस्ट रेंजर जंगलात तिचा शोध घेत असतो. अशाच इतर ही मुली हरवल्या असतात. तो त्या अपहरण करणाऱ्या पर्यंत कसा पोचतो याची कथा आहे.

हे समजते कसे?>> त्या आयडी (नावावर) क्लिक करायचे जर त्या आयडीच्या माहिती ऐवजी ‘हे पान पहायची परवानगी नाही.’ असे दिसले तर आयडी उडाला.

Submitted by झम्पू दामलू on 28 July, 2022 - 23:10 >>> मला तुमच्यासारख्या विकृत आणि गुंड प्रवृत्तीच्या आयडींशी काहीही बोलायचे नाही.

अरे पण कोणत्या आयडीवर क्लीक करायचे हे कसे कळते? का प्रत्येक आयडीवर क्लीक करत बसायचे? >>> सकाळी ऑनलाईन असताना, गारंबी या आयडीने " मी च्रप्स सरांच्या कटप्पा या आयडीच्या लेखन यादीत शोधले" असा प्रतिसाद दिलेला वाचला. एका सेकंदातच तो उडाला म्हणून मी चेक केले होते. त्या वेळी तो ब्लॉक झाल्याचे समजले होते. तुम्ही मला कोट करून प्रश्न विचारल्यावर मला ड्युआयडी म्हटल्यामुळे मला कसे समजले हे इथे सांगावे लागले. मी हे आधी लिहीले नव्हते. कधीच लिहीलेही नसते.

अरे पण कोणत्या आयडीवर क्लीक करायचे हे कसे कळते? का प्रत्येक आयडीवर क्लीक करत बसायचे?>>> २-३ आयडींची हमरी-तुमरी होते. मग त्यातले कोणीतरी ॲडमीनकडे तक्रार करतं. मग प्रतिसाद/धागा/आयडी उडतो. तेव्हा लोक म्हणतात कि हा आयडी उडाला... आपण नाही प्रत्येक आयडीवर क्लीक करत बसायचे.

रानभुली किती वेळा प्रतिसाद एडिट करताय.. दर वेळी उघडला धागा तर तेच... एक ते ठरवा...

सोनाली- धन्यवाद.

च्रप्स - तुम्ही मुद्दामून माझे नाव कोट केले असे मी म्हटले का ? तुम्हाला फक्त आयडी उडाला हे कसे कळते हे पण विचारता आले असते. आयडी कसा उडतो हे माहिती असणे शक्य नाही असे तरी मी म्हटले का ? तुमचेही एडिट केलेले प्रतिसाद असतात तेव्हा इतरांनाही असेच होत असेल. ते सगळे असे प्रतिसाद देतात का ? अवतरण चिन्ह द्यायचे राहून गेले तर ते द्यायला एडिट केले तर तुमचा आक्षेप का ? कि तुम्हीच जाणूनबुजून ठरवून असे प्रतिसाद देताय ?
सकाळी इतक्या वेगाने प्रतिसाद आणि आयडी उडाला कि मला तुम्ही अ‍ॅडमिन किंवा वेमा असावेत असे वाटले होते. पण हे असे जाहीर प्रतिसादात लिहीले नाही. तुम्हीच तो दुसरा गलिच्छ आयडीही चालवत असाल तर मग बाय. माझ्याकडून तुम्हाला यापूर्वी काही त्रास झाला असेल तर तसे कळवावे.

चिल... इतका लोड का घेताय... मी जेन्यूनली विचारले होते..
सोनाली नि उत्तर दिले कि...
असुदे- फारच झाले विषयांतर...

मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं बरोबर नाही असा मुद्दा आहे.

Submitted by वावे on 28 July, 2022 -

अमेरिकेत roe v wade कायद्याचे समर्थक म्हणतात की स्त्रीला कोणत्याही कारणाने गर्भपात करण्याचा हक्क असावा- सरकारने ढवळाढवळ करू नये.
त्या लॉजिकने पाहता मुलगी नको हेही कारण गर्भपात करायला का चालू शकत नाही?
भारतात मुलींना व त्यांच्या पालकांना rape culture, patriarchy, dowry अशा अनेक भयानक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे एखादं जोडपं 'मुलगी नको, मुलगा चालेल' असं म्हणत असल्यास दोष त्यांचा की समाजाचा?

व्हाईटहॅट, प्रॉब्लेम असा आहे मी मुलगी नको हा निर्णय आईचा नसून तिच्या सासरच्यांचा असतो. जरी मग ती आई म्हणाली मला मुलगी नको तरी तिला तसे म्हणायला भाग पाडणारे तेच असतात. बाकी स्त्रीजन्माला आल्यावर फार सोसावे लागेल या आणि याच कारणासाठी मुलीचा गर्भपात करणारी माता हजारांत एखादी असेल.

हे over-generalization झालं.
तसं तर काही केसेसमध्ये अबोर्शन (regardless of gender of foetus) पण घरच्यांच्या दबावामुळे होतं. पण म्हणून भारतात अबोर्शनवर सरसकट बंदी घातलेली नाही. कारण ज्या स्त्रियांना स्वतःहून अबोर्शन करायचं आहे त्यांना तो पर्याय उपलब्ध हवा. तसंच जेंडर सिलेक्शनवर पण बंदी असू नये.

आधीच दोन/तीन मुली असतील आणि नंतरही मुलगी होणार असेल तर तो निर्णय आईचाही असू शकतो... ( हे मुलांबाबतही)
जनरलायझेशन नको...

हे over-generalization झालं.
>>>

मला नाही वाटत तसे.
बायकाच यावर योग्य प्रकारे यावर सांगू शकतील की कोणाचाही दबाव नसल्यास केवळ मुलींना या समाजात दुय्यम स्थान आहे आणि अत्याचार सहन करावे लागतात म्हणून येणाऱ्या मुलीला गर्भातच संपवावे असा विचार त्या करू शकतात का..

असो, लोकहो वेगळा धागा काढा रे चर्चा करायला..
दरवेळी ऋन्मेष येऊन काढेल अशी वाट बघू नका..
शुभरात्री Happy

हे मुलांबाबतही
>>>

दोन मुलगेच झाले.. आता तिसराही मुलगाच होतोय म्हणून त्याला गर्भातच संपवायचा विचार आपल्याकडे लोकं करताहेत ... अश्या काहीतरी समाजाचे स्वप्न बघत आता झोपी जातो.
जसा आपला समाज आहे तो तसा आहे रे.. ॲक्सेप्ट करा हे फॅक्ट..
तुम्हालाही शुभरात्री च्रप्स Happy

Reproductive autonomy हा प्रगत जगात स्त्रीचा बेसिक राईट मानला जातो.
'एखादी स्त्री x, y अथवा z कारणाने गर्भपात करूच कशी शकते, मला नाही वाटत कोणी स्त्री असा विचार करत असेल, आणा तिला माझ्यासमोर'- या टाईपचं judging , shaming करणं हा misogynistic व्यक्तींचा आवडता खेळ.
Still- स्त्रीच्या reproductive autonomy वर कायद्याने बंदी आणून criminalize करण्याऐवजी समाजाने महिलांचं स्टेटस सुधारण्यावर फोकस केलं तर मुलगी नको ही मानसिकता आपोआपच संपेल.

मला नाही वाटत कोणी स्त्री असा विचार करत असेल, आणा तिला माझ्यासमोर'- या टाईपचं judging , shaming करणं ...
>>>>

या वाक्यात असे वाटतेय की त्या गर्भवती स्त्री ला आरोपीच्या पिंजऱ्यात ऊभे केलेय. जे माझ्या वरच्या पोस्टमध्ये नव्हते. वा तसे प्रतीत होत असेल तर ते तसे नाहीये हे समजून घ्यायला हवे. त्यात फक्त अमुकतमुक विचार करणारी जनता किती असावी ईतकेच सांगितले आहे. तुम्ही मूठभर लोकांना निर्णयस्वातंत्र्य द्यायला बहुसंख्या लोकांना मारक कायदा नाही करू शकत. ते प्रॅक्टीकल नाही ना लॉजिकल.

तुमच्यामते गर्भपाताचा अधिकार- reproductive autonomy हे "मूठभर स्त्रियांचं निर्णयस्वातंत्र्य" आहे जे तुमच्या मते totally disposable ही आहे.
एखाद्या कायद्याचा misuse होऊ शकतो म्हणून तो हक्क वा कायदा मुळातच नको हे तत्व लावायला गेलं तर असे misuse होणारे कायदे इतरही अनेक आहेत. त्यांचाही नंबर लागेलच हळूहळू.

विक्रम रोणा

भयानक आहे

आता इंटर्व्हल झाले

Pages