Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता अॅडमिन यांनी वेळ मिळेल
आता अॅडमिन यांनी वेळ मिळेल तेव्हा इथे झाडू फिरवावा ही विनंती.
रोकेट्रि rocketry बघितला..
रोकेट्रि rocketry बघितला...आतून पूर्ण हलले... किती ते दुर्दैव आपलं आणि देशाचं की अशा महान प्रतिभेला नीट ओळखू नाही शकलो.. हे खूप नुकसान आहे देशाचं.. ब्रेन ड्रेन होण्यास आपली देशाची व्यवस्था आणि भोंगळ कारभार बऱ्याच अंशी कारणीभूत आहे
डार्लिंग्ज पाहिला नेफिवर.
डार्लिंग्ज पाहिला नेफिवर. आलिया, शेफाली व विजय वर्मा व त्या झुल्फीचे काम केलेल्या कलाकारांची कामे मस्त. स्क्रिप्टही काही ठिकाणी एकदम मजेदार आहे. पण जरा पेशन्स ने पूर्ण करावा लागतो. इंटरेस्टिंग आहे म्हणेपर्यंत बोअर होतो आणि बोअर आहे म्हणून बंद करावा तर एकदम चांगला सीन येतो
थोडेफार आपण ज्याला "डायरेक्शन" म्हणतो तसे सीन्सही आहेत पण खूप जमलेले नाही. आधी वाटेत कोणीतरी टाकलेला लिंबू दिसला तर बाजूने जाणारी आलिया नंतर मांजर आडवे गेले तरी सरळ पुढे जाते, तो सीन किंवा वरच्या मजल्यावर मारहाण सुरू आहे असे खालच्या मेक अप वालीच्या सलून मधे त्यांना वाटत असते, तेव्हा ती सलूनवाली "बायकांचे नशीब" वगैरे संवाद टाकते आणि तेव्हा तिच्यासमोर लग्नाच्या मेक अप करता आलेल्या मुलीची रिअॅक्शन वगैरे काही चांगले सीन्स आहेत. नीट पाहिले नाहीत तर निसटतील.
एक मात्र मला आवडले. मुंबईतील एक सर्वसामान्य मुस्लिम कुटुंब/चाळकरी लोक. हिंदी मधे स्टीरीओटाइप मुस्लिम व्यक्तिरेखा असतात तशा अजिबात न दाखवता सादर केल्या आहेत. त्यांचे मुस्लिम असणे व आपल्यासारख्यांना दिसणारे त्यांचे वेगळेपण हे एखाद्या उत्तरेकडच्या हिंदी बेल्टमधल्या हिंदू फॅमिलीच्या पिक्चरमधले त्यांचे वेगळेपण जितके दिसते तितकेच यात दिसते. नेहमीच्या बोलण्यात "तुमच्यात -आमच्यात" जितपत येते तितकेच सहजतेने यांच्या संवादांत येताना दाखवले आहे. त्याचा उगाच बाऊ ही नाही. बाकी ते इतर मुंबईकरासारखेच कुटुंब आहे.
नेटफ्लिक्स वर ‘डार्लिंग्ज’
नेटफ्लिक्स वर ‘डार्लिंग्ज’ आला आणि लगेच हावरटासारखा पाहिला , काय भारी जमलाय , सुपर्ब स्टोरी टेलिंग !
कितीतरी दिवसांनी असा एकाजागी बसवून ठेवणारा सिनेमा पाहिला !
आलिया, शेफाली, विजय वर्मा सगळ्यांचे अॅक्टिंग मस्तं एकदम , छोट्या रोल्स मधले मराठी कलाकारही छान !
डार्क कॉमेडी/थ्रिलर दोन्ही कॅटॅगरी मधे बस्स्णारा आहे थोडा .
फा,
तुला बोअर का झाला मधेमधे ?
हो मधे मधे. पण आणखी थोडा पाहू
हो मधे मधे. पण आणखी थोडा पाहू करत पूर्ण पाहिला
मी अर्धा पाहून बंद केलाय..
मी अर्धा पाहून बंद केलाय.. रात्री कम्प्लिट करणार आहे.. चांगला आहे...
माझाही अर्धा झाला बघून.. आता
माझाही अर्धा झाला बघून.. आता चहापाण्याचा ब्रेक घेतलाय.. ईथे आताच रात्र असल्याने आताच कम्प्लीट करणार आहे
पण पिक्चर आहे.. हटके ट्रीटमेंट आहे.. आणि काय मस्त ॲक्टींग केलीय सगळ्यांनी.. पिक्चरच्या मूडला साजेशीच. आवडलाय ईथवर.. अगदी वुई लव्ह शाहरूख खान पासूनच जो मूड बनला तो कायम आहे
रोकेट्री काल अर्धा पाहिला.
रोकेट्री काल अर्धा पाहिला. आपण फ्रेंच लोकांची technology चोरली असं दाखवलं आहे त्यात. शिवाय तो प्रकार देशप्रेमाच्या नावाखाली glorify केला आहे. ते बघून फार वाईट वाटलं. हेच जेव्हा चिनी लोक करतात तेव्हा आपण त्यांना चोर म्हणतो, शिव्या घालतो.
बाकी नंबी सर केंद्रस्थानी असल्यामुळे कलाम, सतीश धवन वगैरे मंडळींपेक्षा तेच भारी वाटतात. कुठलातरी भयानक प्रयोग करताना त्याचा स्फोट होऊ शकतो ह्याचं साधं रिस्क analysis न करता चक्क त्यापासून काही सेंटिमीटर अंतरावर उभे असणारे कलाम सर मला तरी पटले नाहीत. पुन्हा नंतर एका मिसाईलचा स्फोट होतो तिथेही तेच, सगळी शास्त्रज्ञ मंडळी रमत गमत जवळच बाजूला उभी आहेत आणि त्या स्फोटाचे तुकडे त्यांच्या दिशेने येत आहेत. असं खरंच घडलं असतं तर नम्बी सरांच्या आधी तो मिसाईल प्रोग्रॅम राबवणारे वरिष्ठ ह्यांनाच कोर्टात खेचलं गेलं असतं, की तुम्हाला सेफ्टी, workplace hazard वगैरे शब्द ऐकून तरी माहीत आहेत का म्हणून... कैच्या कैच
हा चित्रपट बहुतेकांना आवडलेला दिसतो आहे. ह्या गोष्टी खटकल्या जाणारा मी एकटाच आहे का? सॉरी लोकहो.
डार्लिंग - नेटफ्लिक्स - आलिया
डार्लिंग्स - नेटफ्लिक्स - आलिया, शेफाली vs विजय वर्मा
https://www.maayboli.com/node/82043
नवीन धागाच काढला. क्लास पिक्चर, चर्चा तर झालीच पाहिजे
एकदा काय झालं.
एकदा काय झालं.
सर्वांची खूप चांगली कामं असलेला, चांगल्या कथेचा चित्रपट.
आणि तरीहि सारखं 'या कथेचा जीव 30 मिनिटाच्या मिनी फिल्म चा आहे,2 अडीच तास ताणायची गरज नव्हती, जरा एका ठराविक एरिया मधल्या ठराविक क्लास साठी बनलेला वाटतोय,गाणी लाँच करायला बनलेला वाटतोय,हे काय इतक्या मुलांना भिकारी
माहीत नाही,कोणत्या बबलमध्ये आहेत' वगैरे डोक्यात येत होतं.बहुतेक स्वतःचाच स्वभाव सिनिकल झालाय.
पिक्चर आवडला अर्थातच.त्याच्यामागची कल्पना म्हणून नक्की बघावा.
काल कॉफी पळवत पळवत बघितला.
काल कॉफी पळवत पळवत बघितला. स्पृहा जोशी अगदी आगावु इन्सफरेबल बाई.व तिच्या मागे लागलेला सिद्धार्थ चांदेकर. ह्यांच्या काही पहिल्या म भेटी बघितल्या तर तो सरळ सरळ तिच्यावर फोर्स करत आहे ते दिसत आहे. पण हिला पण ते हवे आहे व त्याचे उगीच लांब लांब समर्थन.
ह्यात केस रंगवलेला दारु सिगरेट करणा रा पण हिरवीणीचे ओरिजिनल प्रेम असलेला नवरा पण आहे शेवटी चांदेकरतिला मुक्त करतो उगीच वाइट वागून व ती पतीकडे परत जाते. हे सर्व उगीच दोन तास खेचले आहे. असे पिक्चर असतील तर कोण बघेल.
PREY बघतोय. प्रिडेटरचा
PREY बघतोय. प्रिडेटरचा प्रिक्वेल. मस्त आहे आतापर्यंत तरी..
नावाहो इंडियन शिकारी वि. प्रिडेटर.
PREY बघतोय कुठे आहे?
PREY बघतोय
कुठे आहे?
फा +१ फॉर darlings.
फा +१ फॉर darlings.
काही फार मजेदार तुकडे आणि अनेकदा प्रचंड रेंगाळणाऱ्या फ्रेम्स. आवडला पण अर्धा एक तास कमी हवा होता. कामं मस्त आहेत सगळ्यांची. मुस्लिम निरीक्षण पण एकदम तसच वाटलं होतं. रोजचे लोक रोजच्या गोष्टी. म्याटर ऑफ फ्याक्ट!
म्हणायला HULU वर आहे. पण मी
म्हणायला HULU वर आहे. पण मी टॉरेंट वरून घेतलाय.
>>PREY बघतोय. प्रिडेटरचा
>>PREY बघतोय. प्रिडेटरचा प्रिक्वेल. मस्त आहे आतापर्यंत तरी..<<
छान आहे. सुरुवातीला थोडा रटाळ वाटेल पण नंतर पकड घेतो. पहिला प्रेडेटर (श्वास्नेगर) मस्तंच होता, पण नंतर आलेल्या सिनेमांपैकि हा एक चांगला आहे. इंडीयन पार्श्वभूमी, वॉरियर्स इ. ची भट्टी मस्त जमली आहे...
बिंबिसार पिक्चर कसा आहे
बिंबिसार पिक्चर कसा आहे
झोप येईपर्यंत The Terminal
झोप येईपर्यंत The Terminal बघेन आज. Forest Gump आवडला म्हणून रिकमंडेशन नसतानाही धाडसाने सुरू केलाय....
darlings आवडला. सगळ्यांची
darlings आवडला. सगळ्यांची कामं आवडली.
‘डार्लिंग्ज’ मलाही आवडला,
‘डार्लिंग्ज’ मलाही आवडला, कथेचा जिव फार छोटा आहे त्यामुळे काहि ठिकाणी ताणल्यासारखा वाटतो त्यामुळे तेवढे फिलर्स लागणारच पण ब्लॅक कॉमेडी जमलिये. अन्धाधुनचीही आठवण होते बघताना.
आलिया आणी शेफालीची जी नेत्रपल्लवी चालते ते फार भारी जमलय.विजय वर्मा छान काम करतोच, मिर्झापुर मधे पण आवडला होता.
बाकी छोट्या छोट्या रोलमधले मराठी कलाकार पण मस्तच आहेत.
द टर्मिनल बद्दल या आधी कुणी
द टर्मिनल बद्दल या आधी कुणी लिहीले होते का ? सुंदर चित्रपट आहे.
दोन तासाचा आहे पण कुठेच कंटाळा आला नाही.
रॉकेट्री..ह्या गोष्टी खटकल्या
रॉकेट्री..ह्या गोष्टी खटकल्या जाणारा मी एकटाच आहे का? सॉरी लोकहो.>>> हपा मला ही खटकल्या होत्या. आपल्या पौराणिक सिरियल्स मधे नाहि का, ज्या देवाची सिरियल असेल त्याला/तिला सगळे नमन करत उभे असतात. तसेच व्यक्ती चित्रण सिनेमे असतात. सगळ्यात भारी आणि केंद्रबिन्दू वाले लोक म्हणजे हिरो. त्यात जराही ग्रे शेड नसते पुर्ण सफेद
रॉकेट्री प्राईमवर आहे पण
रॉकेट्री प्राईमवर आहे पण कुठल्यातरी साऊथ इंडियन भाषेत आहे. हिंदी / इंग्रजी व्हर्जन आहे का कुठे?
काल thirteen lives बघितला
काल thirteen lives बघितला प्राईमवर.
13 मुलं एका गुहेत अडकतात..बाहेर धुवांधार पाऊस...आणि त्यांना वाचवण्यासाठी बाहेर सगळ्यांची धडपड..देशोदेशीहून मदत येतेय..जसजसा रेसक्यूला वेळ लागतोय तसतशी मुलांच्या पालकांच्या जीवाची होणारी घालमेल...
खिळवून ठेवणारा थ्रीलर सिनेमा.. छान आहे.
ह.पा. रॉकेट्री मला तर
ह.पा. रॉकेट्री मला तर अजिबातच आवडला नाही. अगदीच बालीश डिरेक्शन. इन्टर्वल मध्ये निघुन यावे कि काय इतका बोर झाला मला.
अय्यो
अय्यो
मला इतक्या खटकल्या नाहीत या चुका.अर्थात ते फ्रेंच टेक्नॉलॉजी घेण्याचं चूक होतं हे खरं.
धन्यवाद आशु आणि अनघा. मला
धन्यवाद आशु आणि अनघा. मला वाटलं होतं माझीच काही समजण्यात चूक होतेय का.
फेफ, मी तरी तमिळ पाहिला, एक डोळा सबटायटल्सवर ठेऊन. कथेतला अमेरिकेतला भाग इंग्रजीत आहे - साधारण १०-१५ मिनिटे (की जास्तीच). शिवाय तुम्हाला फ्रेंच आणि रशियन येत असतील तर आणखी १० मिनिटे विदाऊट सब्स बघू शकाल. तमिळ येत असेल तर फक्त इंग्रजी, फ्रेंच आणि रशियन शिकावं लागेल (एक डायलॉग हिंदीत पण आहे, पण तो मिस झाला तरी चालण्यासारखा आहे).
13 मुलं एका गुहेत अडकतात>>>
13 मुलं एका गुहेत अडकतात>>> ही अशी सत्य घटना मलेशिया च्या शाळे च्या मुलांबाबत घडली होती. वनविहाराला गेले असता भयंकर पाऊस वादळ ह्यांत अडकतात आणि गुहेत शिरतात. त्यांचा टीचर हिम्मतीने साथ देतो, शेवटी मरतो असं काहिसं आठवतं.
मलेशिया च्या शाळे च्या
मलेशिया च्या शाळे च्या मुलांबाबत>> थायलंड ना?
चला रॉकेटरी आवडला नाही असे
चला रॉकेटरी आवडला नाही असे काही जण आहेत
मला वाटलं मीच एकटा आहे का काय
>>>>
मी अर्धा तास बघितला, डॉ कलाम यांना विक्रम साराभाई सूनवतात ते पाहून कसंस झालं
ते देवादिकांच्या सिरीयल असतात तो प्रकार
शंकराच्या सिरीयल मध्ये विष्णू ब्रह्मा आणि अन्य देव कसे त्यांना वंदन करतात
आणि विष्णू च्या सिरीयल मध्ये शंकर, ब्रह्मा वगैरे त्यांना वंदन करतात
तसे काहीसे वाटलं
Pages