चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकाल लोकांना कुठल्याही पिक्चर मध्ये लॉजिक कशाला हवे असते? लॉजिक पाहिजे असेल तर ते अर्धसत्य सारखे पिक्चर्स बघावेत. मागच्या आठवड्यात कोणीतरी झॉम्बीवलीत लॉजिक शोधत होतं आज ब्रह्मास्त्र मध्ये Lol

ब्रह्मास्त्र पाहूच पण मै म्हणती आहे त्याप्रमाणे रणबीर काय ठीक वाटत नाही. टायगर / रणवीर पण चालला असता. ह्रितीक तर भारीच

ज्यांना लॉजिक नको त्यांनी मिलिंद गुणाजीचाचा उंट का मुका हा चित्रपट नक्की पहावा. त्यातला सीन चिकवा वर आलेला आहे. जरूर लाभ घ्यावा.

लॉजिक हवंय म्हणून कुणी टीका करतंय असं वाटत नाही. तुम्ही युएसएच्या फटफटीऐवजी चायनीज स्वस्तात देतो म्हणाला तर आम्ही ठीक आहे म्हणतोय. पण तुम्ही देताय उल्हासनगर मेकची. .. इतकाच इश्यू आहे. बाकी टेन्शन घेऊ नये.

अ‍ॅक्शन द्रुष्ये तर मला बोअर वाटली. भगभगीत प्रकाश नुसता>> हो कारण थिम अग्नीची आहे

पण तो तसाच असायला पाहिजे ना? अस्त्र वगैरे गोष्टीत लॉजिक लावलं तर काय मजा?>> +१
ट्रेलरमधून तरी ब्लू लाईट्स म्हणजे चांगली शक्ती असलेले आणि रेड लाईट्स म्हणजे वाईट शक्ती असलेले व रणबीरसाठी दोन्ही कलरच्या लाईट्स म्हणजे चांगली आणि वाईट अशा दोन्ही पावर्स असतील असं वाटतंय

टायगर श्रॉफ.... ह्रितीक तर भारीच >>>
रणबिर कपूर काय वाईट आहे? लुक्स बद्दल म्हणताय काय? क्षणभर अस समजा कि Tobey Maguire
किंवा Chris Evansच्या ऐवजी ह्रितीक किंवा टायगर श्रॉफ. असता तर ?
गरज आहे अभिनयाची आणि सॅॅम रेमी सारख्या डायरेक्टरची.
vfx काय कोणी पण करू शकतो.

मला तर रणबीर खूप आवडतो. आणि आलियाही. मी पाहणार आहे ब्रम्हास्त्र. आणि अशा स्टोरीज ही आवडतात.
अमिताभ मात्र आता बोर वाटतो.

पण हा ब्रम्हास्त्र अमिश त्रिपाठीच्या शिवा triology वरचा आहे का ?

पण हा ब्रम्हास्त्र अमिश त्रिपाठीच्या शिवा triology वरचा आहे का >>> मी मागे असं वाचलेलं की करन जोहर अमिश चिया मेलूहावर पिच्चर बनवणार होता आणि ह्रितिक शिवाच्या भूमिकेत.. पण हि स्टोरी तशी नाही वाटत

बेसिकली मुव्ही मेकिन्ग् पासुन हा मुव्हि येतोच आहे येतोच आहे त्यामुळे रेन्गाळलेला, ड्रॅग झालेला अशी फिलिन्ग येतेय.
ट्रेलर ठिक आहे, सुपर नॅचरल मुव्हित कुणीतरी दमदार पाहिजे रितिक,रणविर जमले असते.टायगर श्राफचा एकही मुव्हि पाहिलेला नाही त्यामूळे त्याला अ‍ॅक्टिन्ग कितपत येते ते काय माहिती नाही.
रणबिर अभिनय चान्गला करतो पण तो यात रणबिरच वाटतोय कॅरेक्टर प्ले करतोय अस वाटत नाही.

रणबीर मेंगळा आहे , हेच तर त्याला घ्यायचे कारण

म्हणजे गंगाधर - शक्तिमान , पीटर पारकर- स्पायड्रमन ही दोन टोके उठून दिसावीत म्हणून

अगोदरच ताकतवान दाखवला असता , मग नंतर अजून काय करणार ?? म्हणजे अगोदरच सनी देओल असेल , तर अजून सुपरहिरो होऊन अजून किती मोठा होणार ?

रा वन मध्येही पहिला शाहरुख गबाळा दाखवला आहे , नंतरचा सुपरमॅन, रोबोटमध्येही एक रजनीकांत साधा आणि दुसरा मजबूत दाखवला आहे.

तोच ट्रेंड

बोअर आहे ब्रम्हास्त्र ट्रेल्रर , बाहुबली सारखी भव्य दिसत व्हिज्युअल्स , अगदीच बालिश !
ना धड साउथ न धड हॉलिवुड.. रणबीर मधे स्टार पॉवर नाही दिसत आता.. ‘ये जवानी है दिवानी’ पर्यन्त चांगला होता , आता थकलेला फ्लॉप हिरो दिसतो !
कुठल्याही सिनेमाचं नरेशन करायला बच्चन आजोबाच लागतात का ?
साउथ च्या लोकांनी पहावा म्हणून नागार्जुनला उचलून टाकलय सिनेमात.. सगळ्या ए लिस्टर लोकां मधे व्हिलन कोण, तर ती बी ग्रेड मौनी रॉय Uhoh प्रियांका चोप्रा वगैरे घ्यायचं बजेट नव्हतं का ?
ठग्ज ऑफ हिन्दुस्तान सारखा डिझॅस्टर नसला म्हणजे झालं !

साउथ च्या लोकांनी पहावा म्हणून नागार्जुनला उचलून टाकलय सिनेमात>> त्याचं बॅालिवूडशी फारसं कनेक्शन नाहीए म्हणून मलाही तो ॲाड वाटला .. नंदीच्या कॅरेक्टरसाठी दुसराही कोणी चालला असता
असो, पण पिच्चर चालेल.. थिएटरमधे बघायला मजा येईल.

लेझर बीम व्हीएफएक्स मधे नावीन्य वाटत नाही. सुमार हॉरर शोज मधे वापरून गुळगुळीत झालेत ते. डूम च्या टीम कडूनच ब्रह्मास्त्र साठी व्हीएफएक्स केले आहे. पण यात नेत्रदीपक सेटसचा अभाव जाणवला. बॅकग्राउंड सुद्धा व्हीएफएक्स चे सिलेक्ट केल्यासारखे वाटले. बघणार्‍यांना हार्दीक शुभेच्छा. इंटर्व्हलमधे माझ्या नावाने एक पॉपकॉर्न आणि एक आईस्क्रीम घेऊन एखाद्या गरीबाला द्या. मला पोहोचेल ते. रिअल लाईफ व्हीएफएक्स !
मौनी रॉयचे ओरिजिनल व्हीएफएक्स - नागीन
https://www.youtube.com/watch?v=3PeTx1eUE4w

लेझर बीम व्हीएफएक्स मधे नावीन्य वाटत नाही. सुमार हॉरर शोज मधे वापरून गुळगुळीत झालेत ते. डूम च्या टीम कडूनच ब्रह्मास्त्र साठी व्हीएफएक्स केले आहे.>>> अगदी अगदी !! मुव्ही अ‍ॅपटणार अस वाटतय.

ओरिजिनल तेलुगू सिनेमा HIT चा हिंदी रिमेक राजकुमार राव,सान्या मल्होत्रा.
https://youtu.be/XGKcyqSWZQw
ओरिजनल हिट प्राईमवर आहे..सस्पेन्स थ्रीलर सिनेमा.

https://youtu.be/lzr2PJXeHww
हे ट्रेलर ह्रद्य आहे. मार्केटिंग शून्य असल्याने आपल्याकडे माहिती नाही. ज्यांनी पाहिला त्यांनी आवडला असे सांगितलेय.
सुंदर लोकेशन्स, मानवी भावभावना यांना चित्रपट पारखे झाल्यासारखे वाटत असतानाच असा चित्रपट आला आहे.

मी पाहिलेला हा 777 Charlie Trailer
ट्रेलरचा पुर्वार्ध आवडला होता. पण उत्तरार्ध फारच मेलोड्रामा करून ठेवलाय असे वाटले. चित्रपटालाही हे लागू व्हावे असे वाटते. कारण चित्रपट ओपन झालाय ट्रेलरमध्ये..

धनि, +१ इतका regressive विचारांनी भरलेला ट्रेलर आहे आणि कॉमेंट्स सेक्शनमध्ये लोकांनी त्याला डोक्यावर घेतले आहे Uhoh

समशेराच्या ट्रेलर वरून तो क्रांती या भारतपटाचा उसना ढापू रीमेक वाटला. त्याला बाहुबलीचे काही सीन्स आणि आर आर आर चा तडका दिलाय. यशराज फिल्म्सची स्टोरी टेलिंग अशा पिक्चर्सची वाट लावते हे आधी पण टगे ऑफ हिंदुस्तान, टायगर मधे दिसलं आहे. धूम सिरीज तेव्हढी बरी जमली होती. तिसर्‍या भागात ती ही भरकटलीय. हे सिनेमे ओटीटी वर वेळ जात नसल्यास बघावेत असे आहेत.

शोमनशिप वाले डायरेक्टर्स नंतर भरकटतात. सुभाष घई, संलिभ , यशराज , रामू असे सगळेच. विधू विनोद चोप्राने दिग्दर्शक म्हणून काम बंद केले. पण त्याचे सिनेमे बरेचसे चांगले निघतात. तोच काय आता बॉलीवूडला सांभा़ळून घेईल.

शोमनशिप वाले डायरेक्टर्स नंतर भरकटतात. सुभाष घई, संलिभ , यशराज , रामू असे सगळेच. >>>>> खरे आहे. मला राजकुमार संतोषी चे चित्रपट खूप आवडायचे, घायल, दामिनी, अंदाज अपना अपना, घातक, भगत सिंग, खाकी असे कितीतरी चांगले चित्रपट दिले, ते पण आता मागे पडले. कुठेच दिसत नाहीत

Pages