चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण जे काय आहे ते कार्तिक ने कॉपी करु नये
या बाबतीत आपलं एक मत.
शारुकने पण दिलीप कुमार आणी बकरीला कॉपी करु नये.

पण जे काय आहे ते कार्तिक ने कॉपी करु नये >>> छे, कॉपी का करेल, रिमेक थोडी ना आहे. तो आपल्या स्टाईलमध्येच वावरेल.

वर्गातल्या सरांना मुलं प्रश्न विचारतात आणि सर सर्वांच्या शंका खोडून काढतात, त्याप्रमाणेच इथे दृश्य दिसत आहे. सगळे जण सरांना आपले मत सांगत आहेत. सर ते खोडून काढत आहेत.
(गळेकाढू वात आला गँग नाईलाज आहे).

अक्षय la कॉपी करायला तो काही फार महान अभिनेता नाही... त्याची तुलना मी सलमान. बरोबरच करेन ... लूक्स , बॅड बॉय इमेज आणि स्टाईल मुळे ते तरुणी मध्ये फेमस झाले... त्यात सलमान जास्त बॅड बॉय आणि अशा लोकांबद्धल सुप्त आकर्षण असल्यामुळे तो स्त्री वर्गात जास्त फेमस...
अक्षय कुमार पेक्षा भारी अभिनय अक्षय खन्ना करतो... कोणताही चित्रपट घ्या...

सगळे पैश्यासाठी पळतात अक्षय कुमार काय नी बाकी काय
मागे बोलला आपण गुटख्याची जाहिरात करत नाही आणि आता ...
पहाटे 4ला उठणे हेच सर्वस्व असेल तर मी पण दिवसा झोपून रात्रभर जागेल
Peace

पण ट्रेलर वरुन तरी त्याने अक्षय ला कॉपी केल्याचे च दिसते
>>>>
हां, आता हे वाचून पुन्हा ट्रेलर बघितले तर काही द्रुश्यात वाटले तसे. आधी डोक्यात नव्हते तर वाटले नाही तसे.

बाई दवे,
हे रंधावा कोण असतात?
डायलॉग वादग्रस्त आहे त्यात एक...
हम ठाकूर है, और हम मुसीबतसे कभी भागते नही है..
हा तो हम भी रंधावा है, मुसीबत आतेही ना, निकल लेते है...
कॉन्ट्रोवर्सीला स्कोप आहे..

हे गूगलवरून
Randhawa is a Jat clan in the Punjab Region of India and Pakistan.

A submission from the United Kingdom says the name Randhawa means "Brave" and is of Indian (Sanskrit) origin Happy

निकल लेते है म्हणजे घर से बाहर निकलकर मुसीबत से गले लगाते है

असे असेल

मुसीबतपासून दूर नव्हे , मुसीबतकडे पळतो , असे असेल

<<<हम ठाकूर है, और हम मुसीबतसे कभी भागते नही है..
हा तो हम भी रंधावा है, मुसीबत आतेही ना, निकल लेते है...>>>

जोइ आणि रेचेलचा बोटवरचा संवाद कॉपी केलाय.6012b612d82692e4b147918199858400--joey-tribbiani-friends-forever.jpg

इन्स्टिट्युट ऑफ पावटॉलॉजी चा ट्रेलर पाहिला. मस्त वाटतोय.
संतोश शींत्रेंची ह्याच नावाची धमाल कथा आहे तिच्यावर आधारलेला आहे.
https://www.youtube.com/watch?v=HnXKqnJdxJQ

स्पॅम लिंक >>> मान गये उस्ताद.
पहिल्या लिंकवर क्लिक केले की फर्स्ट क्लास आयडींचं एक्सेल शीट बनतं. दुसर्‍या लिंकवर क्लिक केलं की फर्स्टेतरांचं एक्सेल शीट बनतं. आता उपयोग नाही. बर्‍याच एण्ट्र्या आल्या. काहींची शाळा सेमच दिसतेय.

कार्तिक आर्यन मला सुद्धा पहिल्यांदा त्याचा सिनेमा बघितला- सोनू के टिटू कि स्विटी- चांगला वाटलेला सिनेमा आणि अभिनेता.

आता मात्र कार्तिक नेहमी तीच तीच acting करतो असे मत झालेय. आणि भयंकर बोर मारतो असे वाटते.

चन्द्रमुखीचे नविन सवाल जवाब गाणे आले आहे. ते पाहिले. फॅन्सी ड्रेस किवा गॅदरिंग मधला नाच वाटला एकूण. प्राजक्ता माळी तर अशीच टाइमपास ला डोकावली सेट वर आणि प्रसाद ओक म्हणाला चल रहा बरं उभी, अशा थाटात. हावभाव वगैरे अगदी तकलादू. त्याहून वाईट ती मराठी सिरियल मधे नेहमी दिसणारी एक ज्येष्ठ व्हिलन बाई घेतली आहे, ती सिनियर तमासगिर असते. तीही शेवटी स्टेज वर येऊन काही स्टेप्स करते. ती तर बालगटातल्या मुली ग्यादरिंग मधे नाचतील तसे नाचली आहे. या प्रसाद ओक किंवा त्यातल्या कोरिओग्राफर्स पैकी कुणालाच काही खटकले नसेल का? त्यांनी जुन्या तमाशापटातल्या लावण्या, जयश्री गडकर , हंसा वाडकर, लीला गांधी, यांना किंवा आताच्या सुरेखा पुणेकर वगैरेंना पाहिले नसेल का? सुरेखा पुणेकर वय किमान ६० च्या आस पास असेल पण अजून नृत्य, अदा टिकून आहेत त्यांच्या. असो.
एकूण सिनेमाबद्दल कितपत अपेक्षा ठेवाव्या याबद्दल शंका येत आहे.

मैत्रेयी +१ , प्राजक्त +१ , इतका खर्च केलाच आहे तर एकदा जुने कृष्ण धवल सिनेमे पाहून घ्यायचे ! निदान एखादा खरा खुरा तमाशा पहायचा !

कधीही फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये न गेलेला एखादा मध्यमवर्गीय लेखक कादंबरीत नायकाला तिथे पाठवतो व थालीपीठ, कोथिंबीर वडी वगैरे ऑर्डर देतो तसे झाले आहे.

सहमत +१
वरच्या लिंक मधे उषा चव्हाण आणि माया जाधव एक्स्ट्रा मधे दिसताहेत. योगायोगाने काहीच दिवसांपूर्वी हे सवाल जवाब पाहिले होते.
ही लीला गांधी आणि बहुतेक अमीना बाई / कमल दुनबळे यांची ठसकेदार जुगलबंदी
https://www.youtube.com/watch?v=lGPxSiu1jkM

आरारा! वरच्या सगळ्याला +१
संगीतपण सवालजवाब टाईप ठसकेदार नाही. आणि सवाल जबाब काही कसे स्मार्ट, मजेदार पाहिजेत. इथे अगदीच लहान मुलांचे प्रश्न आणि सेंटी मारुन टाकली. काही इर्षा, चढाओढ नाहीच.

मला अमृता आवडली आहे डान्स आणि एक्सप्रेशन्स मधे !
प्राजक्ताने डान्स चांगला केलाय पण तिथे मानसी नाइक /सोनाली कुलकर्णी/उर्मिला कानिटकर वगैरे जास्तं आवडल्या असत्या (राखी सावन्तही चालली असती Wink )
दीपाली विचारेची कोरिओग्राफी मला नाही आवडत, आशिष पाटिलने बैठकीची लावणी मस्तं कोरिओग्राफ केली आहे, त्यालाच सवाल जवाबही द्यायचा होता !
सिनियर लावणी डान्सर म्हणून सुरेखा पुणेकर्/सुरेखा कुडची का नाही आठवल्या? जर फिल्मीच हव्या॑ होत्या तर किशोरी शहाणे/ वर्षा उसगावकर /प्रिया अरुण वगैरेही चालल्या असत्या त्या बाई पेक्षा !

हो एकदम बंडल वाटला सवाल जवाब. ती बैठकीची लावणी चांगली आहे , चाल आणि गायन दोन्ही आवडलं. पण नाच बोर एकदम. डायलॉग प्रोमो मध्ये अमृता खानविलकरने तोंड उघडताच सगळाच विचका. ते इट्ट का काय असतं ते तिच्यात अजिबातच नाहीये.

दीपाली विचारेची कोरिओग्राफी मला नाही आवडत, आशिष पाटिलने बैठकीची लावणी मस्तं कोरिओग्राफ केली आहे, त्यालाच सवाल जवाबही द्यायचा होता !>>> सहमत!

कंगनाची धाकड ट्रेलर आला आहे. प्रत्येक फ्रेम मध्ये कंगना ! वंडर वूमन !
एखाद्या हिरोईनचा पूर्ण action असलेला हा पहिलाच हिंदी सिनेमा असेल का ? इम्प्रेसिव्ह आहे.

पण इतकी action मी तरी २ तास नाही पाहू शकत. माझ्याकडून पास..

https://www.youtube.com/watch?v=Br1Kr77Lv4M

Pages