चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रेलर बघुन मला आधि वाटल हा पण सलिभचाच आहे की काय !! एकसारख्या गुलाबी पगड्या ,शुभ्र पान्ढरे झगे .एरियल शॉटमधे हवेलीत असो नाहितर युद्धात सगळे दिलेल्या मार्कवर रिन्गण करुन उभे, दिसायला कितिही रेखिव दिसल तरी हे सगळ भयकर क्रुत्रिम दिसत हे कधि कळणार डायटेक्टरर्सला?
मानुषीला अ‍ॅक्टिन्ग येत नसावी हे कळतय, अक्षय कितिही फिट असला तरी वय दिसतय आता, खरोखरच कुणी तरी तरूण घ्यायला हव होत मे बी टायगर श्रॉफ तो फिट वाटतो, त्याचा एकही मुव्ही पाहिला नाही त्यामुळे अ‍ॅक्टिन्ग कितपत येते त्याला हे माहित नाही.

तरुण आणि ऍक्टर हवा तर रणवीर सिंग घ्यायला हवा होता...>>> खरय पण त्याने ऑलरेडी बाजिराव, खिलजी करुन ह्या टाइपचे रोल करुन झालेत अर्थात त्याने केला असता तर नक्की चान्गलाच केला असता.
मे बी रणबिर कपुरने ट्राय करायला हवे असे रोल, तोही अ‍ॅक्टिन्ग बरी करतो म्हणजे फार मुव्हिज करताना दिसतच नाही तो, या एक दोन वर्षात तर एकही मुव्ही नाही आला त्याचा.

पडेल बहुतेक
रामचरण चा कुठला पडला

गेल्या आठवड्यात भरपूर पिक्चर येऊन गेले

प्राजक्ता, सहमत आहे. प्रचंड कृत्रिम वाटतंय, अक्षय कुमार अजिबात चांगला वाटत नाहीये भूमिकेत.

अवतार 2 चे टिझर अतिशय सुंदर आहे!
https://youtu.be/NdrknJJXAmM

अवतार 2 चे टिझर अतिशय सुंदर आहे! >> हो आम्ही ३डी मध्ये पाहिले. अवतार हा चित्रपट ३डी करताच बनवलेला आहे असे मला वाटते.

दीपाली विचारे, फुलवा वगैरेंच्या नाचात काही स्टेप्सफार रिपीट होतात. महागुरू पण त्याची एकच लाडकी स्टेप सतत करतात. अमृताच्या स्टेप्स नाचापेक्षा फिगर दाखवण्याकडे झुकतात. कंबर हलवणं पण फारच झालंय तिचं. खरंच जयश्री गडकर, माया, लीला गांधीचा नाच बघावा ह्यांनी. अंगभर नऊवारीत आणि एकदम डिसेंट हालचालींनींही लक्ष वेधून घेतात.

अक्षय कुमार रौडी राठोडच्या भूमिकेतून बाहेर पडलाच नाहीये.. कुठलाही दमदार डायलॉग मारताना तो राऊडी राठोडच वाटतो. दोन दिवसांपूर्वी पोस्टर पाहिलं, आणि पोस्टरमुळेच एवढी घोर निराशा झालेली की युट्युब ट्रेलर दाखवत होतं तरी पाहिलं नाही. शेवटी आज सकाळी ट्रेलर पाहिला. वाया घातलंय पैसे आणि कथेला. काय ती चिटकवलेली मिशी, बारकी अंगकाठी.. शत्रूच्या सेनापतीला घोड्यासकट उभं चिरणाऱ्या सम्राट पृथ्वीराज चव्हाणांच्या मनातील प्रतिमेच्या अगदीच विरुद्ध.
शांत धीरगंभीर अभिनय हवा तिथे हे उछ्ऋंखल वानर घेतलंय. अकू शेवटचा बेबी आणि एअरलिफ्टमध्ये गेलाबाजार तो नानावटी मध्ये बरा वाटलेला.
मला वाटतं, rhitik शोभला असता इथे. अगदी आपला शरद केळकर देखील. फेस व्हॅल्यूच्या नादात चित्रपट आपटणार

जुन्या सवाल जबाब मधे लीला गांधी चा ठसका जबरदस्त आहे. तिच्या अपोझिट जी दुसरी आहे ( आपल्या दोन मुलातलं एक तुमचं नाही फेम) ती पण तोडीस तोड आहे. ती एका जुन्या तेलगू हिरॉइन सारखी दिसते. पण कास्ट अ‍ॅण्ड क्रू मधे तिचं नाव येत नाही. एक्स्ट्रा असलेल्या उषा चव्हाण, मधू कांबीकर यांचीही नावे आहेत.
एक गाव बारा भानगडी, पडछाया, सवाल माझा ऐका अशा बऱ्याच चित्रपटात असून नाव का बरे नाही?

उषा नाईक.

ती हसली की रडल्यासारखी दिसायची असं दादा कोंडकेंच्या पुस्तकात लिहीलंय.

चंद्रा गाणं पाहिलं. आजिबात त्या काळची लावणी वाटत नाही. डान्सस्टेप काहीतरीच आहेत. मॉर्डन लावणी. श्रेया घोषालचा आवाज आणि अजय अतुलचं संगीत भारी.
अम्रृता सुंदर दिसतेय का नाही तेच कळत नाही.

पृथ्वीराज हा बाजीराव पद्मावती सारखाच पुढचा भाग वाटतो. तीच द्रुश्ये, तेच कपडे, त्याच मारामार्‍या आणि तश्याच अदबशीर संस्कारी जड रोमांटीक डायलॉगवाल्या लव्हस्टोर्‍या

सगळ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा संपवत आणल्या की मग हे उलटे प्राचीन काळाकडे जातील का पुढे येत शरद पवारांवर सिनेमा काढतील Happy

हे उलटे प्राचीन काळाकडे जातील का पुढे येत शरद पवारांवर सिनेमा काढतील>> मंग पप्पुजीवरचा पिच्चर तं फुल्ल कॉमेडी व्हईल.

अमृता आणि प्राजक्ता नाचात (चंद्रमुखी), अमृता फार लवचिक आहे हे जाणवलं. प्राजक्ताकडे लक्षच जात नव्हतं. माझ्याकडून तरी हॅट्स ऑफ टू अमृता, अगदी थोडा वेळ बघितला तो डान्स.

बाकी चंद्रमुखी मध्ये मॉडर्न लावण्या आहेत हे बरेच जण म्हणतायेत ते पटते. लावणी प्रकार प्रत्यक्ष कधीच बघितला नाही पण पूर्वी जुन्या चित्रपटात बघितला आहे, त्याचा बाज वेगळाच.

समहाऊ अमृता मला zee हिन्दी ने जी कलाकार शोध मोहीम स्पर्धा घेतलेली, तिथेच आवडलेली आणि impressive वाटलेली.

चन्द्रमुखीची काहि गाणि अगदी भन्साळी छाप असल्यासारखी वाटताय, तो चान्द राती तेजाळताना, बाई ग गाण्यातला शेवट.तरी आर्याने कमाल केलिये मला आवडल बाई ग! आशिश पाटिलची कोरियोग्राफी जास्त चान्गली आहे.
चन्द्रा मलाही नाही आवडल अगदी मॉडर्न लावणी वाटते, नटरन्गची गाणी फार सुदर झाली होती.

प्रसाद ओक चा गेटअप चांगला केलाय >>> हो सेम दिसतात.

मी काही महीने ठाण्यात जॉब करत होते तेव्हा येताना टेंभी नाक्यावरून चालत स्टेशनला जायचे, मध्येच त्यांचं कौलारू घर होतं आणि तिथे आनंद दिघे बरेचदा उभे असायचे, सोबत थोडे कार्यकर्ते असायचे पण अगदी गराडा नव्हता, त्यामुळे प्रत्यक्ष बघितलं आहे . प्रसाद ओक हुबेहुब वाटला मला तसा.

Pages