चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?
Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
लिओनार्डो डीकॅप्रिओ....जर्मन आई आणि इटालियन वडील...दोघेही अमेरिकन नागरीक, यांचा मुलगा. जगभर अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून, अतिशय देखणा आणि लोकप्रियतेचे प्रतीक बनून राहिला आहे. १९७४ मध्ये जन्मलेल्या या मुलाने बालपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती आणि अमेरिकन टीव्हीमधून जाहिरातीद्वारा तो सतत छोट्या पडद्यावर चमकत राहिला. याचा अनुभव आणि फायदा त्याला पूर्णवेळ चित्रपट उद्योगात प्रवेश मिळवून देण्यास झाला.