आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>११७ मिटर! Lol जबरी!
त्याच्यानंतर रशीद खानची रिॲक्शन भारी होती Wink

आज दिल्ली उगाच रन्स देत होती मारायला.. सामन्यात रंगत भरायला. लॉर्ड शार्दुल तर फुलटॉस शिवाय ऐकत नव्हता. तो कंबरेच्यावरचा बॉल नो बॉलच टाकलेला. पण दिला नाही आणि पूरन बाद झाला

आयपील च्या नेहमीच्या धबडग्यात पाहिलेल्या दोन वेगळ्या गोष्टी
१. उमरान चा १५७ च्या स्पीडचा बॉल नि त्याच स्पीड मधे त्याला मारलेला फोर
२. वॉर्नर ने स्विच हिट करायचा स्टान्स घेऊन बॉल स्कूप करायची हूल देत फक्त बॉल फाईन लेग ला प्लेस करत मारलेली फोर. ब्रिलियंत प्रकार होता.

रोहित भाई रीव्हर्स स्विप ? नॉर्मल स्विप वर एव्हढ्या वेळा बाद होतो .. का का ?

उमरान चा १५७ च्या स्पीडचा बॉल नि त्याच स्पीड मधे त्याला मारलेला फोर>>>>>> येस! एक नंबर आहे हे. जवळ जवळ प्रत्येक मॅच मध्ये हे होतय. कमेंटेटर कौतूकानी फास्टेस्ट बॉल दाखवतात पण बघावं तर फोर बसलेली असते. बार अप झालाय खुप ह्या नवीन ताज्या दमाच्या प्लेयरांमुळे. तुल्यबळ आहेत सगळे.

स्विचहिट पण भारी. मॅक्सवेल हे स्विचचे नाटक करतो नेहमी आणि त्याच्या बसतात बर्‍याच वेळा. अजून एक कोणीतरी स्विच करुन सिक्स मारली काल परवा. वॉर्नर मस्त फ्लो मध्ये आहे!

विराट आणो रोहित कडे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स आहेत , जे लॉन्ग फॉरमॅटसाठी जास्त उपयोगी ठरतात.
मुंबईच टीम सिलेक्टिव खूपच गंडलं आहे. पोलार्ड सारख्या म्हाताऱ्या नॉन परफॉर्मिंग खेळाडूपेक्षा ब्रवीस ला तरी चान्स द्या.बुमराह आता खूपच सामान्य गोलंदाज झाला आहे.

“ उमरान चा १५७ च्या स्पीडचा बॉल नि त्याच स्पीड मधे त्याला मारलेला फोर
२. वॉर्नर ने स्विच हिट करायचा स्टान्स घेऊन बॉल स्कूप करायची हूल देत फक्त बॉल फाईन लेग ला प्लेस करत मारलेली फोर” -

ह्या आठवड्यात काहीच बघता आलं नाही. Sad

नॉटी टाइम्स हेडलाईन : पोलार्डचा (केंद्र सरकार ) गुजरातला जिंकवण्याचा बेत मुंबई गोलंदाजांनी (राज्य सरकार) हाणून पाडला . Proud Proud Proud

आज नेमके कधी नव्हे ते ऑफिसला काम.. शून्य बॉल बघितला. आणि मुंबई चक्क जिंकली.. कामाच्या मध्ये कॉमेंटरी बघत होतो हेच काय ते सुख!

बुमराह एकटा सामना हरवायाचा प्रयत्न करत होता. पण अखेर बुमराह हरला आणि मुंबई जिंकली..
२०-२० वर्ल्डकपला विराट कोहली सोबत बुमराहलाही बसवावे का Happy

२०-२० वर्ल्डकपला विराट कोहली सोबत बुमराहलाही बसवावे का >> त्यापेक्षा तुला मॅचेस बघायला बंदी घालावी हे कसे वाटते Lol

२०११ चा धोनीचा वर्ल्डकप जिंकवून देणारा सिक्स याच डोळ्यांनी पाहिला आहे Happy

बाकी मी पण अंधश्रद्धाळू झालो तर सचिन आणि माझ्यात फरक काय Wink

बाकी मी पण अंधश्रद्धाळू झालो तर सचिन आणि माझ्यात फरक काय >> बराच आहे रे. शाहरुख नि तुझ्यात नसेल. Wink तू व्र्ल्ड कप पाहिलाच नसतास तर कदाचित धोनीला उतरायला लागले नसते रे

“ धोनीने उतरल्याशिवाय वर्ल्डकप यायचा असता तर २००३ चाच आला असता” - धोनीच्या उतरण्यामुळेच वर्ल्डकप आला असता तर १९८३ चा वर्ल्डकप आला नसता आणि २०१५ चा सुद्धा आला असता. Happy

१९८३ नंतर २०११ उजाडावे लागले.
२०१५ ला सर्व सामने जिंकत होतो. वर्ल्डकप आला नाही हे खरेय. पण बाकीचे संघ गोट्या खेळायला आले नसतात. मल्टीनॅशनल टूर्नामेंट आहे. वर्ल्डकप किती आले नाही हे न बघता किती आले हे बघितले जाते.
शर्माने १० पैकी ५ आयपीएल जिंकल्या. उरलेल्या ५ का नाही जिंकला म्हणून त्याला दोष द्यायचे म्हटल्यास डॉन ब्रॅडमन शेवटच्या ईनिंगला शून्यावर बाद झाला म्हणून त्याला चिडवण्यासारखे झाले Happy

“ १९८३ नंतर २०११ उजाडावे लागले.” आणि “बाकीचे संघ गोट्या खेळायला आले नसतात. मल्टीनॅशनल टूर्नामेंट आहे.” - ह्या दोन वाक्यांची बेरीज करून बघा जमलं तर सर. Proud

पंजाब ने चांगला स्कोअर उभा केलाय. रॉयल्स ने आज जैस्वाल ला परत खेळवलंय. नीशम, डुसेन पैकी कुणाला तरी जास्त संधी देता आली नसती का?

मी आज मॅचला आहे. बटलरला प्रत्यक्ष बघायला जबर मजा येते च्यायला. संजूने अपेक्षेप्रमाणे फेकली.

ह्या दोन वाक्यांची बेरीज करून बघा जमलं तर सर. Proud
>>>>

दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. वर्ल्डकप जिंकणे सोपे नाही Happy
ज्यांना ते जमले नाही त्यांना लगेच हलके लेखत नाहीये. किंबहुना सोपे नाही म्हणून जमले नाही असेच म्हणतोय.
पण ज्याच्या कप्तानीत आपण तिन्ही आयसीसी चषक जिंकलो त्याचे मात्र कौतुक आहेच Happy
आणि हो, त्याच्या पश्चात पुन्हा विश्चचषकांचा दुष्काळ नेहमीसारखा पडला आहेच. कारण तेच. वर्ल्डकप जिंकणे सोपे नाही Happy

Pages