खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाॅकडाऊन मधे छान भांडी घासायला येवू लागली आहेत.
अट फक्त एकच दिवसातून दोनदा असे मस्त मासे भरलेले ताट मिळावे Wink

समर स्पेशल सॅलड

लाल व पिवळी सिमला मिरची, किवी, स्वीट कॉर्न, गाजर, स्वीट लाईम

ड्रेसिंगसाठी स्वीट लाईम ज्युस, ऑलिव ऑईल, मिरपूड, मीठ

वन डिश मील करायचं असेल तर पनीर/छोले/राजमा बीन्स/चिकन/चीज घाला.

E615E7A5-6815-473D-A41D-F4475550AAD7.jpeg

डिनरला पाणीपुरी
ब्रेकफास्टला पाणीपुरी..
एकदा बनली की तीन दिवस ऊठसूठ खाणे होते Happy

IMG_20220419_021217.jpg
.
IMG_20220419_021228.jpg

सकाळी लालबागच्या लाडू सम्राट मधे केलेला मिसळ पाव, आमरस पुरी, थालीपिठाचा पोटभर नाश्ता -
D38D79DC-A7B5-47FB-B114-25F3E6DEBC77.jpegAC7A5160-4123-4EE1-8AF4-3D95059B8564.jpeg

पोटभर नाश्ता केल्यावर तो जिरवण्यासाठी राणीच्या बागेत २-३ तास फिरून झाल्यावर फिश थाळ्यांवर तुटून पडण्यासाठी भायखळ्याच्या दत्त बोर्डींगला गेलो-
तिथली कोळंबी मसाला थाळी आणि बोंबिल फ्राय थाळी
9908C58A-DB15-4F35-91B6-88FE26E64A4B.jpegBF42EBAB-2B6C-4AEB-A32E-89AF0FDDBCCB.jpeg

मी भेटायला येणार म्हणून मैत्रिणीने बनवलेले जेवण -
खिमा पाव, बोंबिल फ्राय, कोळंबी फ्राय, मूळा घालून बनवलेली कोळंबीची आमटी, गोडा मासा फ्राय
003E9FD2-BC43-4933-A634-E443F4AD0125.jpeg

वाह म्हाळसा.. जबर्रदस्त .. एक नंबर..

@ लाडू सम्राट माझ्याही आवडीचे. पण ईतक्यात तिथे जाणे झाले नाही. शेवटची आठवण म्हणजे तिकडे जवळपास राहणाऱ्या एका दूरच्या मावशीचे निधन झालेले. सकाळी सकाळीच आईला सोबत घेऊन निघावे लागले. अंत्यसंस्काराला अवकाश होता तसे चहा पिऊन येतो म्हणून निघालो ते लाडू सम्राट मध्ये येऊन बसलो आणि छान पोटभर नाश्ता केला की दुपारचे जेवायची गरज पडू नये.. बायकोला हे कळले तेव्हा म्हणाली, नालायका प्रसंग काय. आपण ईथे आलेलो कश्याला आणि तू हादडायला गेलेलास...
ते ही एकटाच

हो मलाही आवडतं लाडू सम्राट.. माझी नणंद घरी जेवण बनवत नाही.. ती आणि तीच्या घरचे सगळेच रोज लाडू सम्राटमधेच नाश्ता करतात.. तीच्याकडे गेलो की आम्हालाही ती तीथेच घेऊन जाते.. मला जवळपास तीथलं सगळंच आवडतं पण मिसळ सगळ्यात जास्त आवडते.

तुमचा अभिषेक, मस्त फोटो सगळे.. एकदम तों पासु... Coincidentally मीपण या विकांता ला केली होती पा.पू.. आणि तिचे इतर varients.. आणि तुमच्या प्रमाणेच उठता बसता तेच.. संपेपर्यंत.. Happy फक्त इथे पुर्या मिळत नाहीत.. बनवाव्या लागल्या..

पा.पू.. आणि तिचे इतर varients..
>>>>
हो. शेवपुरी आणि भेलपुरी सुद्धा होती. आणि त्यातही दर दिवशी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रमाणात टाकून आनंद लुटणे चालू होते. समारोपाच्या दिवशी तर मी किचनवर ऊभे राहूनच वीस पंचवीस पुऱ्या चापल्या. वरचा एक फोटो तेव्हाच काढला.

त्यानंतरही एका डब्यात पाणीपुरीच्या तुटलेल्या पुऱ्यांचा चुरा, पिवळी शेव आणि खारी बुंदी मिळून मिसळून पडून होते. ते काल कांद्यापोह्यावर टाकून फस्त केले Happy

कळण्याची भाकरी, वल्ल तिखट (ओल्या शेंगदाण्याची चटणी), खुडा (हिरव्या मिरचीचा ठेचा), लोणचं.

IMG-20210106-WA0003.jpg

माझ्या मम्मी ची मैत्रीण कळण्याची भाकरी आणि कांदा भाजून त्याची दाणे घालून आणि वर कच्चं तेल अशी चटणी असली अफाट बनवायची... हा वरचा फोटो पाहून एकदम 17 /18 वर्षा आधी तिच्या घरी खाल्लेली ही भाकरी चटणी आठवली....

खुडा बोलतात की खर्डा.. आमच्याकडे नाही पण आमच्या सासुरवाडीला छान करतात हा. मला जास्त तिखटाचा त्रास होतो. पण तरी मी माझ्या वाटणीचा डबा घेऊन येतोच Happy

व्हय व्हय.
कळण्याच पीठ म्हणजे, ज्वारी, काळे उडीद(आख्खे सालासकट यामुळे पीठ काळसर दिसते), चवीनुसार त्यातच मीठ टाकुन भाकरीसाठी लागणार्‍या पीठासारखे दळुन आणायचे.
सगळ्यात बेस्ट म्हणजे भाकरीचा पापुद्रा बाजुला करुन त्यावर फक्त शेंगदाण्याचं कच्च तेल टाकुन जरी खाल्ली तरी जामच भारी.
ब्लॅककॅट म्हणाताय त्याप्रमाणे कच्चा कांदा पण मस्त लागतो सोबत.
आमच्या कडे हिरच्या मिरचीला ठेचुन बनवलेल्या चट्णीला खुडा म्हणतात. काही ठिकाणी खर्डाही म्हटले जाते.

आईच्या हातचे बटाटेवडे आणि बेकरीवाल्या भैयाच्या पायचे मऊ लुसलुशीत पाव .. आणि मिरच्या मी तळल्या आहेत
14C74BE5-9776-4E1B-BD33-16875C737E82.jpeg

दाणेभक्ताला चटणीची कृती सांगण्याचे करावे.
दोन माणसांच्या वाढणीसाठी
१. पाव वाटी तीळ,(ऐच्छिक...पण घ्याल तर लै भारी) भाजुन
२. अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे
३. ४ लाल मिरच्या (तिखटानुसार कमी जास्त करु शकता)
४. मीठ चवीनुसार
५. वाटायला लागणारे पाणी १/२ टे स्पु.
६. २/३ लसुण पाकळ्या

तीळ मध्यम आचेवर भाजुन (जास्त भाजु नये),शेंगदाणे भिजत घालावे (दरवेळेस ओले शेंगदाणे मिळत नाहीत म्हणुन हा खटाटोप), मिरच्याही थोड्या भिजवुन घ्याव्यात.
पाट्यावर, भाजलेले तीळ, भिजवलेले शेंगदाणे (सालासहित..आवडत असतील तर...पण घ्याच) आणी भिजवलेल्या मिरच्या भरड वाटाव्यात मग त्यात चवीनुसार मीठ आणी १-२ पाकळ्या लसुण घालुन मस्तपैकी वाटुन घ्यावे.
भाकरी बरोबर वाढताना त्यात कच्चे शेंगदाणा तेल टाकुन खावे.

बेकरीवाल्या भैयाच्या पायचे Lol
मस्त दिसताहेत बटाटेवडे.. फोटोही छान आलाय.. वडापावच्या गाडीवर जाहीरातीला लावला तर धंदा वाढेल त्याचा..

IMG_20220428_203131.JPG
आजचा मेनू साधासाच.. दहीबुत्ती, पोह्याचा पापड आणि ताजे करकरीत भोकराचे लोणचे.

Pages