आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
ह्या वर्षी मुलांनी कंदील घरीच करायचा घाट घातला. बाजारातून तयार कंदीला ऐवजी कंदीलाचे कागद घरी आले. मी खळ केली. तरुण मुलांना खळ माहीत नसेल कदाचित तर सांगते . खळ म्हणजे कणीक पाण्यात शिजवून केलेली घट्ट पेस्ट. कणकेतल्या ग्लुटेन मुळे ही कागद चिकटवण्याच काम झकास करते. सांगाडा होताच घरी. पूर्वानुभव ही होता गाठीशी. घरातले सगळेच उत्साहाने पुढे आले कंदील करायला. मी ही त्या करंज्या करायचा घाट पुढे ढकलून ह्या करंज्या ( वरच्या आणि खालच्या पट्टीला जे सजावटी साठी लावलं आहे त्या कंदिलाच्या करंज्या,☺ ) करायला सरसावले. ☺ गप्पा मारत, मागे कसा कंदील करायचो त्या आठवणींना उजाळा देत कंदील कधी झाला ते कळलं ही नाही. अक्षरशः चोवीस तासात कंदील तयार होऊन गॅलरीत टांगला ही गेला.
खूप मस्त वाटतंय आणि कौतुक भरली नजर सारखी तिकडेच वळतेय. दिवाळी संपली की कंदील काढला जाईल पण ह्या कंदील in making च्या आठवणी मनात कायम राहतील आणि मनाला उभारी ही देतील.
हा फोटो.
मनीमोहोर .
मनीमोहोर .
पण श्रेय तुमच्या या धाग्याला म्हणजेच तुम्हांला.
तुम्ही लिहिल्यामुळे आणि तो कंदिल स्वतः: करून पाहिल्यामुळे अनेकांनी प्रेरणा घेतलेली दिसतेय. मस्त जमलेतही.
चिन्मय यांनी रंगसंगती चांगली साधली आहे.
सोनालींनी केलाय तसल्या क्लासिक कंदिलांची बातच न्यारी.
माझा कंदिल मी अनेक वर्षांनी मोडीत काढला.
.
भरत, तुमचं म्हणणं अगदी पटलं.
भरत, तुमचं म्हणणं अगदी पटलं. हेमाताईंच्या धाग्यामुळे तुम्ही केलेला आकाशकंदील बघितला गेला. बाकीच्यांचे कंदील बघून 'आपल्यासारखे हौशी लोक आहेत' हे कळलं.
आता दरवर्षी घरचाच कंदील. फिनीशिंग बाहेरच्या इतकं नाही जमलं तरी आपलंच बाळ असल्याने गोड वाटतं!
धन्यवाद अनु , पुढच्या वेळी
धन्यवाद अनु , पुढच्या वेळी लक्षात ठेवते . हेमाताई , खरे आहे , तुमच्या ह्या धाग्यामुळे नवनवीन आयडिया मिळाल्या आकाशकंदील करण्याच्या !!
ममो, अवल , अनाया, स्वस्ती ,
ममो, अवल , अनाया, स्वस्ती , चिन्मय, श्रद्धा, अश्विनी, मस्त कंदील
बाकीच्यांचे कंदील बघून
बाकीच्यांचे कंदील बघून 'आपल्यासारखे हौशी लोक आहेत' हे कळलं. >> अगदी अगदी ..त्यामुळे आता कंदिल करायला उत्साह येईल आणखी. नाहीतर बरेच वेळा एवढी काटकसर करून कुठे जायचय, आणायचा विकत चार पैसे त्या पोरांना तरी मिळू देत हे मिळायचं ऐकायला . असो. ह्यातली मजा जो करेल तोच अनुभवेल.
नवीन नवीन कल्पना कळतायत आणि मस्त मस्त कंदिल बघण्याचं नेत्रसुख ही खूप मिळतंय. धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा.
मी पुढच्या वर्षी अवल सारखा
मी पुढच्या वर्षी अवल सारखा करून बघणार आहे.
अवल, काय कॉपीराइट असेल तर आत्ताच सांग गं बाई!!
सर्वच स्फटिकदीप, वेड्यासारखे
सर्वच स्फटिकदीप, वेड्यासारखे सुंदर आहेत.
सगळ्यांचे आकाशकंदील मस्त...
सगळ्यांचे आकाशकंदील मस्त...
मनीमोहोर,
मनीमोहोर,
तुम्ही लिहिल्यामुळे आणि तो कंदिल स्वतः: करून पाहिल्यामुळे अनेकांनी प्रेरणा घेतलेली दिसतेय >> +1
तुमचा धागा बघून गेल्या वर्षी देखील कंदील घरीच केला होता. यावर्षी मुलीबरोबर करायला दुसरा प्रकार सोयीचा वाटला. तुम्हाला आणि भरत यांनादेखील अनेक धन्यवाद !
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!
माझ्या मुलीने ही केलाय घरी
माझ्या मुलीने ही केलाय घरी कंदिल ह्या वर्षी. सांगाडा तिने बार्बेक्यू काड्या वापरून गेल्या वर्षीच केला आहे. ह्या वर्षी कागद लावले. नोकरी ,घर सांभाळून ते करणं अजिबात सोपं नाहीये. पण माझा घरी कंदिल करण्याचा वारसा ती पुढे नेतेय म्हणून छान वाटतय. आत बॅटरी चा दिवा लावला आहे. वायरी फिरवा व्याप नको. ही आयडिया उपयोगी पडेल म्हणून लिहून ठेवतेय इथे.
हा फोटो
छान झालाय आकाशकंदील.
छान झालाय आकाशकंदील.
चला चला, दिवाळी आली.
चला चला, दिवाळी आली. हेमाताईंचा धागा वर काढायची वेळ झाली!
ह्या आकाशकंदिलाची युट्युब लिंक देऊन ठेवते. म्हणजे कोणाला करावासा वाटला, तर शोधाशोध करायला नको. बाकी मंडळींनाही विनंती आहे की लिंक किंवा थोडक्यात वर्णन लिहा.
सर्वांची दिवाळी सुख-समाधानाची आणि सुरक्षित होण्यासाठी शुभेच्छा.
अनया मस्तच दिसतोय. एक रंगी न
अनया मस्तच दिसतोय. एक रंगी न केल्यामुळे छान वाटतोय अधिक. शेडिंग फारच सुंदर दिसतंय.
लिंक बद्दल थॅंक्यु. ती ही बघितली , तसा सोपा ही वाटतोय करायला, त्या बॉक्स मुळे डायमेंशन मिळाली आहे त्याला.
आता आणखी ही घरी केलेले कंदिल पाहायला उत्सुक आहे , अनया म्हणलीय तसं थोडं वर्णन आणि लिंक ही द्या म्हणजे सोपं पडेल.
हा मी केला होता, तसाच वाटतोय.
हा मी केला होता, तसाच वाटतोय. फक्त त्रिकोण उलटे (आतली बाजू बाहेर ) असे चिकटवलेत. त्यामुळे वेगळाच वाटतोय.
अनया मस्तच आहे कंदील.
अनया मस्तच आहे कंदील.
लहानपणी घरी कंदील करायचो. कारण तेव्हा बिल्डींगमधील कलाकार पोरं सोबत असायची. गेले काही वर्षे विकतच आणतोय. पण करून बघायला हवे एकदा असे हा धागा बघून वाटले.
हा मी केला होता, तसाच वाटतोय.
हा मी केला होता, तसाच वाटतोय. फक्त त्रिकोण उलटे (आतली बाजू बाहेर ) असे चिकटवलेत. त्यामुळे वेगळाच वाटतोय. >> होय भरत , साधारण आहे तसाच करायला पण दिसायला वेगळा वाटतोय थोडा.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
भरत, काहीसा तसाच पॅटर्न आहे. पाच युनिट्स जोडायची पद्धत तशीच आहे. पण युनीट वेगळं आहे. ह्या धर्तीचे बरेच प्रकार पिंटरेस्टवर सापडले.
मस्त!
मस्त!
आकाशकंदिल आले की दिवाळी आली वाटतं. हा पारंपारिक आकाराचा पण पुठ्ठ्यांपासून बनेल असा एक व्हिडिओ सापडलाय. मुलांबरोबर करायला मस्त आहे. आम्ही हा करू बहुतेक https://www.youtube.com/watch?v=HFvXYwvLkV4
त्या व्हिडिओतली सांगाडा
त्या व्हिडिओतली सांगाडा बनवायची आयडिया मस्त आहे अमित. तेवढ्या सफाईने कापता आलं पाहिजे मात्र.
पुढचं पट्ट्यापट्ट्यांचं डिझाइन मात्र मला फारसं नाही आवडलं. वर आणि खाली करंज्या छान वाटतात. मधल्या कागदांवर आम्ही कधीकधी उदबत्तीने चटके देऊन छिद्र पाडून डिझाइन करायचो, पणती, चांदणी, कुयरी अशी.
हो. सांगडाच आवडला मला पण.
हो. सांगडाच आवडला मला पण. बाकी पुढचं डिझाइन चार बाजूला करंज्या आणि बाकी कागद झिरमिळ्या काय आवडेल/ जमेल ते.
ती ब्लेड-नाईफ आणि अशीच पट्टी ठेऊन केलं तर जमेल नीट कापायला वाटलं.
कामट्यांनी करायला बार्बेक्यू स्टिक आणलेल्या. पण त्या दोर्याने गुंडाळत बसण्यात पोरांचा आणि माझा उत्साह संपेल वाटलं. हा जमला तर बघू नाही तर मग काटक्या आहेतच
हो दोरे गुंडाळताना आकार
हो दोरे गुंडाळताना आकार कधीकधी लहानमोठे होतात. सगळे त्रिकोण आणि चौकोन आकाशकंदिलाच्या अंगावर मापं घेऊनच कापावे लागतात एका मापाचे करून नाही चालत. शिवाय 'सपाट' नाही रहात बाजू.
अनया छान झाला आहे कंदील.
अनया छान झाला आहे कंदील. माबोकरांचे नवीन कंदील पहाण्याची उत्सुकता आहे.. पाहूया.
त्रिकोण आणि चौकोन
त्रिकोण आणि चौकोन आकाशकंदिलाच्या अंगावर मापं घेऊनच कापावे लागतात >> त्या कुलाब्यातल्या चायनीज शिंप्यासारखी अंगावर ठिगळं चढवून खडूच्या रेघोट्या ओढल्यागत ना!
अमितव बघितला व्हडिओ , मस्तच
अमितव बघितला व्हडिओ , मस्तच झालाय सांगाडा कामट्या न वापरता. एकदा सांगाडा तयार असला की मग पुढे आपल्याला हवा तसा करावा कंदिल. मला स्वतःला ही वर खाली करंज्या आवडतात आणि झिरमिळ्या लांब
त्रिकोण आणि चौकोन आकाशकंदिलाच्या अंगावर मापं घेऊनच कापावे लागतात >> त्या कुलाब्यातल्या चायनीज शिंप्यासारखी अंगावर ठिगळं चढवून खडूच्या रेघोट्या ओढल्यागत ना! Lol भारी कमेंट.
होय, अंगावर माप घेऊनच कापावे लागतात त्रिकोण चौकोन . थोडी माया चालते कारण त्या जॉईंट वर चांदी लावली जाते नंतर पण फार नाही.
काल रात्री सांगाडा केला. त्या
काल रात्री सांगाडा केला. त्या ब्लेड - नाईफने छान कापता आलं.
आता आज कागद -झिरमिळ्या लावतो. मग नवीन घर असल्याने वरती टांगायची सोय करायला काय करावं लागेल ते बघतो.
ममो आणि धागावर काढणार्यांचे स्पेशल आभार. आळस झाडायला लावलात
हा माझा यंदाचा आकाशकंदील.
हा माझा यंदाचा आकाशकंदील.
खूप मजा येते दरवर्षी आकाशकंदील बनवायला. गेली ६ वर्षं दर दिवाळीत हा एक प्रोजेक्ट आवर्जून करते. यावर्षी अगदी मनाजोगता कागद मिळाला आहे
काय सुंदर प्रो झालेत आकाश
काय सुंदर प्रो झालेत आकाश कंदील मनिमोहोर आणि rmd!!
अमित सांगाडा मेहनतीचं फळ दिसतंय.मुख्य प्रॉडक्ट झालं की दाखवा.
रमड सुंदर झालाय कंदील!
रमड सुंदर झालाय कंदील!
अमित, चायनीज शिंपी डोक्यात नव्हता
सांगाडा छान झालाय. पक्का आहे ना? म्हणजे हलत नाही ना ? जमल्यास मीही करेन असाच. बघूया.
दिवाळी पुरता टिकेल इतका मजबुत
दिवाळी पुरता टिकेल इतका मजबुत वाटतोय. फक्त सध्या इकडे फॉल असल्याने फार जास्त वारा आहे आणि तापमान शून्याच्या खाली जायला सुरुवात झाली आहे. याचा सगळा डोलारा सेलोटेपवर असल्याने कमी तापमानात सेलोटेपचा ग्लू कसा आणि कितपत टिकाव धरतोय आणि त्यात सोसाट्याचा वारा आला तर काय ही चिंता आहे. कागद लागताना जॉईंट्सना आतून बाहेरुन फेविकॉलचा एक लेअर देणार आहे.
कंदिल लावायचा तर तो बाहेरच. त्यामुळे घरात लावायला माझाच सक्त विरोध आहे. बघुया
अमितव, छानच झालाय सांगडा ,
अमितव, छानच झालाय सांगडा , आता कागद लावले की काम झालं.
इथले घरी केलेले कंदिल बघून खूप उत्साह येतो. आपल्यासारखे अजून ही अनेक जण कंदिल घरी करतात म्हणून छान ही वाटत. नाहीतर बरेच वेळा " किती काटकसर ही , कंदिल पण घरी ! चार पैसे टाकायचे आणि आणायचा ना विकत" असे लुक्स देतात मंडळी स्वतः केलेला कंदिल पाहून. मग माझी ही द्विधा मनस्थिती होते ती हा धागा पाहून निघून जाते.
तेव्हा घरी कंदिल करणाऱ्या सर्वांना मला मॉरल बुस्ट देण्यासाठी धन्यवाद.
Pages