आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गावस्कर बरेचदा रोखठोक बोलतात.
तर काही वेळा फटकळही बोलतात.
कोहली त्यांचा विशेष लाडका आहे. त्याच्याबद्दल बोलायला त्यांना जरा अधिकच आवडते.
बाकी गावस्करच काय तंत्रशुद्ध फलंदाज आणि गावस्करांपेक्षाही रोखठोक बोलणारे समालोचक संजय मांजरेकर यांचे सुद्धा क्रिकेटचे ज्ञान आपल्यापेक्षा जास्त असावे. माझ्यापेक्षा तरी आहे. तरीही मी त्यांना मायबोलीवर ट्रोल होताना पाहिले आहे. त्यामुळे निकष एकदा ठरवून घेतलेले उत्तम. रहाणेला वेगळा, शर्माला वेगळा, सचिनला वेगळा, धोनीला वेगळा, गावस्करांना वेगळा, मांजरेकरांना वेगळा असे नको Happy

तुमच्या शब्दाला जेवढी किंमत जास्त तेवढी तुमचा शब्द आत्यंतिक गरज असते तेंव्हाच वापरण्याची जबाबदारीही जास्त. ॲज सिंपल ॲज दॅट ! Wink

पंजाबचे सारे सनसनाटीच असते
आज पंजाब जिंकल्याने आणि कलकत्ता हरल्याने पॉईंट टेबल अजून रोचक झालाय.

तुमच्या शब्दाला जेवढी किंमत जास्त तेवढी तुमचा शब्द आत्यंतिक गरज असते तेंव्हाच वापरण्याची जबाबदारीही जास्त. ॲज सिंपल ॲज दॅट ! >> गावस्कर कुठल्याही ऑफीशियल कॅपॅसिटी मधे नाहीये ना ? मग त्याने नावे घेऊन बोलले तर फार चुकीचे आहे असे मला वाटत नाही. तो त्याचे मत व्यक्त करतोय एक त्रयस्थ म्हणून. त्याला अधिक कळते म्हणून त्याच्या वक्त्यव्याला आपल्या लेखी किम्मत आहेत. त्याची जबाबदारी तो ऑफीशियल कॅपॅसिटी मधे नसेल तर खेळाडूंसाठी असण्यापेक्षा त्याच्या टारगेट ऑडिअयन्स साठी असणे अधिक सयुक्तिक आहे. तुमचा मुद्द लक्षात आला - पटला नही एव्हढेच. असो.

पंजाब कलकत्ता मॅच मधे तर चक्क अंपायर पण मॅच किक्सींग मधे सामील. राहुलला वेळेवर बाद दिले असते तर .... बीसीसीआय ने आता मनावर घ्यावे नि वर्ल्ड कप पण मॅनेज करावा. Wink

राहुल आज जिद्दीने खेळला असे वाटले. शेवटपरंत नेण्याचा प्रयत्न केला बाबा. मॉर्गन अगदीच क्ल्यूलेस वाटला आज.

*तुमचा मुद्द लक्षात आला - पटला नही एव्हढेच. असो.* तो पटावाच असा माझा दुराग्रहही नाहीं. मला प्रामाणिकपणे वाटलं व मीं त्याच्या टारगेट ऑडियन्समधलाच असूनही तीव्रतेने खटकःलं, म्हणून मांडलं.

पंजाब कलकत्ता मॅच मधे तर चक्क अंपायर पण मॅच किक्सींग मधे सामील. >> माझ्यामते टप्पा पडललेला होता. बॉल वर येताना दिसत होता. राहूल आउट नव्हता. पण काही लोक असही म्हणतील की अय्यर आणि चक्रवर्तीने ठरवून कॅच झेलायच्या ऐवजी षटकार दिले. मॅच तिथे फिरली. Happy
पण अय्यरचा कॅच झाला असता तर फार अफलातून होता. एका हातात मागे उडी मारून त्याने पकडल,, पण मोमेनटम मुळे उडवल्यावर परत बाहेरच राहिला. अय्यर फार भारी आहे. पुढे येणार.
काहीका असेना मुंबईला फायदा झालाय. एलिमिनेटर मध्ये पुनः शर्मा विरूद्ध कोहली?

पण काही लोक असही म्हणतील की अय्यर आणि चक्रवर्तीने ठरवून कॅच झेलायच्या ऐवजी षटकार दिले. मॅच तिथे फिरली >> म्हणजे तुम्हाला शंका आहे कि काय ? अंबानी ने बायकॉची टीम पुढे यावी म्हणून हे सगळे घडवून आणले आहे. पंजाब आत्ता पुढे गेले तरी ते अवसान घातकी आहेत हे माहित आहे नि शाहरुखला एक सिनेमाची ऑफर दिली कि कोलकत्ता लायनीवर येईलच. हाय काय नि नाय काय Wink

पण अय्यरचा कॅच झाला असता तर फार अफलातून होता. एका हातात मागे उडी मारून त्याने पकडल,, पण मोमेनटम मुळे उडवल्यावर परत बाहेरच राहिला. अय्यर फार भारी आहे. पुढे येणार. >> चांगला प्लेयर वाटतो खरा. वर्ल्ड कप मधे घ्या सर्प्राईज म्हणून.

मुंबई च्या बॉलर्स ने चांगली फाईट दिली, पण अय्यर वॉज टू जिंकली. राजस्थानचे होलसेल चेंजेस. लोमरोर ला का काढलं कळलं नाही. तो चांगला खेळला होता एक दोन मॅचेस. त्यापेक्षा तेवातिया ला बसवलं असतं तर जास्त योग्य झालं असतं. पराग ला ब्रेकची गरज होती. पण चेन्नईचं पारडं जड आहे.

मुंबईची मॅच ' लो स्कोअरींग' होणार याची दोन्ही कर्णधारांना कल्पना होतीच. पण मुंबै किमान कठीण असंही लक्ष्य उभारूं शकली नाहीं . श्रेयस अय्यरने खूपच शांतपणे औचित्यपूर्ण फलःदाजी केली.

ऋतुराज मस्त खेळतोय. त्याचा खेळ बघायला पण मजा येते. जसं रोहितचा लेझी एलेगन्स बघताना ‘सुकून’ मिळतो तसाच मझा ऋतुराज सारख्या क्लासिक बॅट्समनला बघताना येतो. (आज जरा ‘इंदौरी फटका‘ मोड ऑन आहे Happy )

दुसरी मॅच 'हाय स्कोअरींग '!! गायकवाड, दुबे व जायसवालने धमाल आणली. सॅमसनने दुय्यम भूमिका स्विकारून संयमित खेळ केला हेंही महत्वाचं.
पाॅईट टेबल मजेशीर हेलकावे खातंय !

काल कलकत्ता हरली. दुपारी मुंबई हरली. आता तळाच्या राजस्थानने चक्क चेन्नईला झंझावाती मात दिली. १९० चे टारगेट अडीच ओवर शिल्लक ठेऊन पार केले. सिरीअसली धमाल चालू आहे. शेवट पर्यंत क्वालिफायचा घोळ कायम राहणार वाटते. ब्यूटी ऑफ आयपीएल Happy

श्रेयस अय्यरने खूपच शांतपणे औचित्यपूर्ण फलःदाजी केली. >> पर्फेक्ट शब्द वापरलात.

ऋतुराज सारख्या क्लासिक बॅट्समनला बघताना येतो. >> हाणामारी न करता खेळतो ते मस्त वाटते. पड्डीकल बरोबर एक चांगला बॅटसमन येतोय. जैस्वाल पण त्याच्या प्रॉडिजी शब्दाला जागायला सुरू झाला आहे. हेझलवूड ला आज कसले खणखणीत रट्टे दिले आहेत. नो स्मॉल फीट. राजस्थान जाता जाता नडणार आहे १-२ दोघांना - नथिंग टू लूज मोडमधे.

*नथिंग टू लूज मोडमधे.* - विश्वचषक तोंडावर आल्याने बरेच खेळाडू पण निवडीसाठी ' मस्ट शो बेस्ट फाॅर्म ' मोडमधे . त्यामुळेही उलथापालथ करणारया खेळी अपेक्षित !

ऋतुराज चांगला खेळतो पण स्लो खेळतो. पडीकल पण तसाच खेळतो. त्यांच्या स्लो खेळण्याने वैयक्तिक धावसंख्या चांगली उभारतात पण टीमचं नुकसान करतात.

ऋतुराज चांगला फलंदाज वाटतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फिरकी खेळणारा तो सर्वोत्तम भारतीय युवा फलंदाज आहे

पंजाबने आरसीबीला गॅसवर ठेवलं होतं. थोडक्यात वांचली आरसीबी ! 164 वि. 158 !
आतां पुढच्या बाद फेरीसाठी चौथ्या जागेसाठी खरी लढत.

आणखीन एक tense encounter!! पिचेस स्लो असल्यामुळे आणि बर्याच टीम्स च्या मिडल ऑर्डर्स कमकुवत असल्यामुळे सेट झालेले ओपनर्स / टॉप ऑर्डर बॅट्समेन आऊट झाल्यावर बॅटींग कोलॅप्सेस होण्याचं प्रमाण जास्त वाटतं. आरसीबी ला मॅक्सवेल फॉर्ममधे असण्याचा फायदा आज मिळाला.

हा उमरान मलिक कोण आहे नवीन.. १४५-१५० मध्ये बॉलिंग टाकतोय. अ‍ॅक्शनही मस्त. नितीश राणाला कसली ओवर टाकली आता त्याने. स्लिप लावली लगेच विल्यमसनने..

केकेआर २.० वेगळ्याच आक्रमकतेने खेळतायत. मॉर्गन फॉर्ममधे नाही, रसेल आणि फर्गसन इंज्युअर्ड आहेत पण ह्याचा कुठलाही परिणाम त्यांच्या कामगिरीवर होताना दिसत नाहीये. उरलेले बॅट्समेन (स्पेशल मेन्शनः अय्यर), आणि स्लो बॉलर्स अतिशय प्रभावी कामगिरी करतायत. मॅक्कलम च्या कोचिंगचा प्रभाव असावा - खूप सकारात्मक खेळतीय केकेआर ची टीम.

केकेआर फायनल चार मधे असणे डिसर्व्ह करतात. पंजाब, मुंबई किंवा रॉयल्स अगदीच गचाळ खेळले आहेत.

*नथिंग टू लूज मोडमधे.* - विश्वचषक तोंडावर आल्याने बरेच खेळाडू पण निवडीसाठी ' मस्ट शो बेस्ट फाॅर्म ' मोडमधे . >> भाऊ विश्वचषक टीम आधीच जाहिर झालेली आहे नि त्यात बदल करणे अलाऊड आहे कि नाही ह्याची कल्पना नाही. निव्वळ करंट फॉर्म ह्या मापदंडावर त्यातले ७०% लोक बाहेर जातील. जैस्वाल, अय्यर, हर्शल पटेल , मयांक अग्रवाल वगैरे आत येतील.

नि त्यात बदल करणे अलाऊड आहे कि नाही ह्याची कल्पना नाही.
>>>
१० ऑक्टोबरपर्यंत बदल करू शकतो असे कानावर आहे
लंकेने काही राखीव खेळाडू वाढवलेत काल परवा

*केकेआर फायनल चार मधे असणे डिसर्व्ह करतात.* +1. पण मुंबईला आपण डिझर्व्ह करतो हें खूप उशीरा दाखवायची जुनीच खोड आहे ! Wink
*भाऊ विश्वचषक टीम आधीच जाहिर झालेली आहे * -
' प्लेईंग इलेव्हन 'मधे येण्यासाठीही फाॅर्म दाखवणं आतां अत्यावश्यक झालं आहे.
*10 ऑक्टोबरपर्यंत बदल करू शकतो असे कानावर आहे * - तसं असेल तर धवन देखील जिद्दीने आपला क्लेम लावण्याच्या प्रयत्नात आहेच.

ब्राव्होला खास मॅच घालवायलाच राखून ठेवलेले. आल्यापासून नुसते वाईड बॉल. नुसते वाईड बॉल. लास्ट ओवरलाही ६ रन्स हवे असताना कसला शेजारच्या पीचवर वाईड टाकला. ईतके होऊनही अक्षर बाद झाला. आणि ५ बॉल २ चे ३ बॉल २ करून टेंशन दिले. तसे लगेच ब्राव्होने लेगसाईडच्या बाहेर बॉल टाकला. कुठे स्टंप दिसत होते त्याला नक्की Proud बर्र त्याच्या बॉलिंगला हेटमायरची हातातली कॅच सोडली आणि तो फोरही गेला ते तर बोनस. धमाल असते आयपीएल Proud
काही का असेना, चुम्मा ऑन टॉप. बड्डेला मॅच जिंकला आणि पहिल्या दोन मध्ये जागा बूक केली Happy

Pages