चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी सिनेमा आलाय असं कळलं, बोनस म्हणून. ललीत प्रभाकर, पूजा सावंत मोहन आगाशे. नवीनच आहे ना कि येउन जूना झालाय?

आणि आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार ( गुगल केलं) त्यात गश्मीर महाजनी आहे Sad ना की ललीत प्रभाकर. मी ललीत प्रभाकर साठी बघणार होते. पण मंजूताई सांगतेय बघ तर बघूया.

मराठी सिनेमा आलाय असं कळलं, बोनस म्हणून. ललीत प्रभाकर, पूजा सावंत मोहन आगाशे. नवीनच आहे ना कि येउन जूना झालाय?
>>>>>
गश्मीर महाजनी आहे. पिक्चर कधीचा आहे माहीत नाही. मी सात आठ महिन्यांपूर्वी पाहिलेला.
प्योअर टिपिकल आणि ओल्ड फॅशन चित्रपट आहे. श्रीमंतांचा मुलगा गरीबांच्या वस्तीत जाऊन राहतो आणि माणूसकीची किंमत कळते Happy
पण मला तरीही आवडलेला. दरवेळी काहीतरी भन्नाट आणि हटकेच बघायला हवे असे गरजेचे नाही. सरळधोपट पण हलकेफुलकेही बरे वाटते Happy

रिव्ह्यु महान आहे. Biggrin

मला तो 'कुतुन स्टिअरिंग वर ओढतानाचा' सीन बघण्याची भयंकरच उत्सुकता लागलीये.

दरवेळी काहीतरी भन्नाट आणि हटकेच बघायला हवे असे गरजेचे नाही. सरळधोपट पण हलकेफुलकेही बरे वाटते >>>> + १००० .
मलाही आवडलेला . उगाच काहीतरी भारी ,डोक्याला त्रास , preachy असेल असं वाटलं होतं .
पण मध्ये मध्ये काही काही भाग सोडला तर बराचसा हलकाफुलका आहे .

विकु, टोटली. पण हे वरती लिहीले आहे त्यापेक्षा भारी काय लिहीणार! जबरी धमाल आहे ते.

बोनस थोडा पाहिला आहे. चांगला वाटला.

पुनश्च हरी ओम - झी ५
सुंदर चित्रपट
कोकणात घडणारी कथा. कोरोनाकाळात दुकान बंद पडल्याने आर्थिक फटका बसलेले एक कुटुंब, त्यातून कसा मार्ग काढते ही स्टोरीलाईन.
प्रसंगी डोळ्यातून पाणी येते पण हृदय पिळवटून टाकणारा वगैरे बिलकुल नाही तर फील गूड चित्रपट
लहान मुलीपासून सर्वांचाच सहज सुंदर अभिनय. पिक्चर बघतोय असे न वाटता समोर घडतेय असे वाटते.
कदाचित असे आर्थिक संकटातून ईतक्या सहज बाहेर पडणे प्रत्यक्षात तितके सोपे नसावे जसे चित्रपटात घडले. पण तरीही चित्रपटात बघताना विश्वसनीय आणि महत्वाचे म्हणजे आश्वासक वाटते.
कोकण, दर्या, नारळाची झाडे, कोकणातले रस्ते, घरे, वातावरण, कोकणी माणसं आणि त्यांचा टिपिकल स्वभाव तसेच कोकणी खाद्यपदार्थांचे उल्लेख हे सगळं कदाचित मी कोकणातल्याच मातीतील असल्याने एक्स्ट्रा छान वाटले असावे.
पण आम्हा दोघांनाही फार आवडला Happy

पुनश्च हरी ओम - झी ५>> स्प्रू हा जोशी आहे ना? तिच्या पेजेस वर डिटेल येत होते.

काल प्राइम वर ते आठ दिवस नावाचा सिनेमा बघायचा प्रयत्न केला. रेणुका शहाणे व तुषार दळवी हे कपल . त्यांची एक प्राजू नावाची मुलगी.
हिचे आता हिच्या मनाविरुद्ध का होईना लग्न ठरले आहे. ती तिच्या बॉयफ्रेंडला रडत सांगते पण त्याला त्याचीए क्रिकेट मॅच महत्वाची वाटते. त्यामुळे परत घरी येते. मग एक लग्नाळू मुलींसाठीचे गाणे. सर्व फॅमिली फेर धरून गाते नाचते वगैरे.

तर रेणुका शहाणे ही अमेरिकेत ली नोकरी मिळाल्याने एक वर्शाच्या मुलीला सोडुन ( आयायी ग) चक्क घर सोडून निघून जाते. व तिथे यशस्वी होते. ( अधे मध्ये सुद्धा येत नाही) पण लग्न ठरल्यावर एकदम यायचे ठरवते आठ दिवस. मग घरचे गडब डतात. नवरा उखडतो वगैरे.
घरी प्राजूला संभाळ णार्‍या इतर काकू आत्या आहेत.

तर ती येते. ही भयंकर जाड व प्रौढ दिसते हे साहजिकच आहे मुलगी लग्नाला आली आहे. पण पँट घालून अगदिच विचित्र दिसते. व ते हसू जे फक्त हम आप के है कौ न मध्ये १७६० वेळा दाखवले होते त्यापलीक डे अभिनयात प्रगती नाही. आता ते हसू बोजड दिसते.

तर ही घरी येते. प्राजू व तिच्या भेटीचा प्रसंग इतका फालतू पद्धतीने घेतला आहे. की पुढे बघवला नाही. दिग्दर्श काला बडिवला पाहिजे.

पुनश्च हरी ओम - झी ५>> स्प्रू हा जोशी आहे ना? >>> हो, तोच. छान केलेय तिनेही काम. उत्तरार्धात तिचाच पिक्चर आहे.

आज टीव्हीवर मुळशी पॅटर्न बघितला. आवडला. मुख्य म्हणजे सगळ्याच प्रमुख कलाकारांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट झाला आहे. ओम भुतकर आणि क्षितिज दाते या दोघांचा अभिनय तर फारच भारी! पैशाच्या मोहाने शहराजळच्या, 'विकास' होत असलेल्या भागातील शेतजमिनी विकून ते पैसे खर्च होऊन गेल्यावर कफल्लक झालेले शेतकरी हा विषय आहे. राहुल-रावल्या (ओम भुतकर) हा अशाच एका शेतकऱ्याचा मुलगा. तो गुन्हेगारीकडे वळतो आणि 'भाई' होतो. त्याचा तो प्रवास प्रभावीपणे दाखवलाय. त्याचा मित्र गण्या (क्षितिज दाते) हाही त्याच्याबरोबर 'मोठा' होतो. दोघांनीही जबरदस्त अभिनय केलाय. दिग्दर्शन, संवाद मस्त आहेत. फ्लॅशबॅक आणि चालू काळ चांगला मिक्स केलाय. एकदोन ठिकाणी संवाद जरा कृत्रिम वाटले, पण तेवढं ठीक आहे.
रावल्या आणि गण्या एक 'डील' करण्यासाठी एका रेस्टॉरंटमधे बसलेले असताना मागे एक टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब जेवायला आलेलं असतं तो प्रसंग अतिशय परिणामकारक आहे. एकंदरीतच अशी समांतर चाललेली दोन जगं चांगली दाखवली आहेत.

हो च्रप्स. आणि कसलंही उदात्तीकरण केलेलं नाही हे आवडलं! गुन्हेगार कसा बनतो हे दाखवलंय पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतोच असं नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते, पण त्याचं चुकलंय हेही पटतं. त्याला दुसरा पर्याय नव्हताच असं नाही. त्याच्या वडिलांचंपण (मोहन जोशी) तसंच. त्यांच्याबद्दल वाईट वाटतं, पण त्यांचंही चुकलेलं असतंच की.

मुळशी पॅटर्न मुळे खरंतर मी प्रवीण तरडेंचा फॅन झालो. त्यांचे दिग्दर्शन एकदम जबरदस्त आहे. ह्या चित्रपटाचा वेग एकदम उत्तम आहे आणि वरती लिहील्याप्रमाणे फ्लॅशबॅक व चालू काळ एकदम मस्त मिक्स केला आहे. सर्व कलाकारांचा अभिनय एकदम भारी. उपेन्द्र लिमये आणि वकीलाचे प्रसंग आणि त्यांचे संवाद पण मस्त वाटतात. प्रवीण तरडे यांचा चित्रपट असूनही त्यांनी स्वतःवर जास्त फोकस ठेवला नाही आणि चित्रपटातल्या सगळ्यांनाच सारखी संधी दिली आहे असे वाटते.

उदात्तीकरण केलेले नाही पण अप्रत्यक्ष ते झाले आहे. तरुणाईच्या वागण्याचे निरीक्षण केले तर ते जाणवते.
(जसे की तलवारीने केक कापणे ,व्हॉटसअप स्टेटस ठेवणे याचे प्रमाण खूपच वाढले आहे)

काल थॉर रॅग्नरॉक परत पाहिला . पहिले थिएटर मध्ये बघितला होता. टिपिकल मार्वेल मुव्ही आहे. पण ह्यात क्लायमॅक्स मध्ये बहीण भावातील युद्ध आहे. ( रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर!!!) व त्याच्या क्लायमॅक्क्ष मध्ये बहीण भावाचा डोळा फोडते. भाउ गलितगात्र पडलेला असतो , मग कभी खुशी कभी गम मध्ये दिलेल्ल्या सल्ल्यानुसार वडिलांचे स्मरण करतो व परत मारामारी करायला तुटुन पडतो.

ह्या सीनला लेड झेपलीन गृपचे द इमिग्रं ट साँग हे गाणे घेतले आहे व अगदी चपखल बसले आहे. हा सीन नक्की बघा. मस्त जमला आहे.

गाणे पण मस्तच आहे. युट्युब वर उपलब्ध आहे.

ह्यात द हल्क / ब्रुस बॅनर आहे. आयर्न मॅन नाही.

ह्यात क्लायमॅक्स मध्ये बहीण भावातील युद्ध आहे. ( रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर!!!)
>>> पौर्णिमा असते का युद्धाच्या वेळी? राखी पौर्णिमा कशी ओळखली??

राखी पौर्णिमा कशी ओळखली??>> अरे नाही काल आपल्या इथे होती ना. ? जोक होता तो.>>> Lol
मी बोनस बघितला, ठिकठाक वाटला. एकतर ललित प्रभाकर नसून गश्मीर महाजनी आहे हे कळल्यामुळे आधीच जरा खट्टू होते. पण इथे बऱ्याच जणांनी म्हणलं कि चांगला आहे हलकाफुलका. मग बघितला. मला सुरवातीला मी एखादा केड्रामाच बघतेय की काय असं वाटावं इतके सिमीलर सीन होते. म्हणजे हिरो श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी त्याचे बरेच शुज, घड्याळं, वॉर्डरोब ,मग तो अंघोळ करून ड्रायर ने केस सुकवतो हे असं कितीतरी केड्रामाज मध्ये असतं. Proud

मग तो अंघोळ करून ड्रायर ने केस सुकवतो
>>>>
हे आता मी सुद्धा करतो... वॉव, खरेच अमीर झाल्यासारखे वाटते Proud

मला त्या पूजा सावंतमध्ये प्रियांका चोप्राची झलक दिसते. आणि पीसी माझे बालपणीचे क्रश होती. त्यामुळे पूजा सावंत सुद्धा आवडते Happy

Pages