Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाहिलाय हा सिनेमा.
पाहिलाय हा सिनेमा.
चांगला आहे.
आमे काल रात्री बघायला घेतला
आमे काल रात्री बघायला घेतला.सुरुवातीपासून भयानक वाटला
अजून मूळ कथेत यायचे आहे
आज रात्री बघेन
तापसी पन्नू चा रश्मी रॉकेट
तापसी पन्नू चा रश्मी रॉकेट कुणी पहायला आहे का?
ट्रेलर वरून तरी नेहमीच्या पठडीतील स्पोर्ट्स बायोपीक वाटतोय.
मुलाला असं बघायला आवडत. त्यामुळे त्याच्यासाठी आणि त्याच्यासोबत बघावा लागेल.
काल रश्मी रॉकेट पाहिला.
काल रश्मी रॉकेट पाहिला.
छान आहे. मला आवडला. तापसीची अजून एक कडक भुमिका. स्त्रीप्रधान भुमिका कराव्यात तर हिनेच.
भुजच्या एका भूकंपग्रस्त गावातली मुलगी आशिया कप स्पर्धेत रनिंग चॅम्पियन होते. गोल्ड मेडल मिळवते. पण आपले लोकं तिची जेंडर टेस्ट घेऊन तिला बॅन करतात. ती बाई आहे का पुरुष, राणी आहे का राजा अशी मिडीया बदनामी करते. ऑर्गनायझेशनला हेच हवे असते जेणेकरून ती खचून जावे. पण ती उसळून ऊठते. कोर्टात केस जाते. केसचा निकाल काय लागतो ते चित्रपटातच बघा. जजच्या भुमिकेत सुप्रिया सचिन पिळगावकर सुद्धा मस्त वाटल्या
ही तर आफ्रिकन अॅथलेटची कहाणी
ही तर आफ्रिकन अॅथलेटची कहाणी आहे. ऑलिंपिक मेडल विनर.
आफ्रिकेचे माहीत नाही पण थोडे
आफ्रिकेचे माहीत नाही पण थोडे गूगल केल्यावर हे एक भारतीय नाव सापडले.
Dutee Chand, a double silver medallist at the Asian Games and India’s National record-holder in 100 m, was banned and dropped from India’s Commonwealth and Asian Games teams in 2014. This was on grounds of hyperandrogenism - a condition where the female body produces more testosterone, almost at the level of men. She was just 19 at the time. She fought back. She won. And had her ban overturned. In 2018, she won two Silver medals at the Women's 100 m and 200 m at the Asian Games.
उत्तम पोस्ट रुन्मेष
उत्तम पोस्ट रुन्मेष
द्युती चंद ची कहाणी खूप inspirational आहे
आज टडोपा सिच्युएशन झाली.
आज टडोपा सिच्युएशन झाली. आशूचॅम्पने चक्क ऋन्मेषला अनुमोदन दिले
आशू, दिवा घ्या
मी देतोच अहो, तो इरिटेत करतो
मी देतोच अहो, तो इरिटेत करतो एरवी म्हणून तो चांगलं बोलत असतानाही उगाच टीका करावी इतकाही मी वाईट नाही
धन्यवाद आशूचॅम्प !
धन्यवाद आशूचॅम्प !
भूत पोलीस मीपण बघितला. जिओ
भूत पोलीस मीपण बघितला. जिओ सिनेमा वर आहे. मला वाटलेलं तो जुना पिक्चर आहे .
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=j0ks1VR3MQU
ADVENTURES OF SRIMANNARAYANA (2021) Full Movie Hindi Dubbed Movie | Rakshit Shetty | New South Movie
हिण्दी ड्ब आवाज कुणाचे आहेत ? हिरॉइन चा आवाज तिचाच आहे म्हणे , हिरोचा हिण्दी आवाज कुणाचा आहे का ? जयराम चाआवा़ज डार्क लॉर्ड चा आहे का ??
Avane Srimannarayana मुळ
Avane Srimannarayana मुळ कन्नड.
कन्नडमधेच पाहिला होता प्राईमवर.चांगला आहे.
हिण्दी वाल्यानी थिएट्र दिले
हिण्दी वाल्यानी थिएट्र दिले नाही म्हणे , म्हणुन बाकी भाशात तिकडे थेटरात लागला, हिण्दी मात्र फक्त युट्युबवर आहे म्हणे
उधम सिंग पाहिला.सुरुवातीला 40
उधम सिंग पाहिला.सुरुवातीला 40 मिनिट अत्यंत रेंगाळतो.बंद करावासा वाटतो.पण नंतर पिक्चर वेग घेतो.
फ्लॅशबॅक आणि प्रेझेंट मध्ये बरेच मागे पुढे केले आहे पिक्चरभर.नीट बघावा लागतो.
विकी कौशल आणि सर्व आजूबाजूच्यानी खूप चांगला अभिनय केला आहे.मला बरेच लोक ओळखू आले नाही.विकिपीडियावर बघावे लागतील.
हिंसा, कथेतला फिल्मी पणा याच्या पलीकडे जाऊन मागची भूमिका पण नीट प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे या पिक्चर ने चांगले केले आहे.
(माझ्या डोक्यावर यापूर्वी हा असा इम्पॅक्ट मनःशक्ती माईंड जिम च्या तिसऱ्या मजल्यावर झाला होता.)
सरदार उधम - इतिहासाच्या
सरदार उधम - इतिहासाच्या पुस्तकात एका ओळीत निपटवलेल्या हिरोची ही कहाणी (सिनेमॅटीक लिबर्टीसहीत का होईना) बघाच.
या चित्रपटात दाखवलेले जालियांवाला बाग हत्याकांड हे त्या ऐतिहासिक क्रौर्याचे व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन आहे. पुस्तक, लेख किंवा डॉक्युमेंटरीमधून ते अंगावर येत नाही जसे इथे येते. आणि हे गरजेचे आहे.
विकी कौशलने चांगले काम केलेय. अमोल पराशरने भगत सिंग यांची भुमिका केलीय. आणि ही भुमिका आणि त्यांच्यामधील नातं चित्रपटात न कम न ज्यादा ठेवण्याचं कसब दिग्दर्शकानं साधलय. एकाला मोठं करण्याच्या नादात दुसर्यावर अन्याय झाला नाही. उधम सिंगचा वकील ओळखीचा चेहरा आहे.
फार पूर्वी उधम सिंग यांच्यावर एक पंजाबी चित्रपट विथ इंग्लिश सबटायटल्स पाहिला होता. त्यात त्यांचा परदेश प्रवास व वास्तव्य जास्त विस्ताराने दाखवले होते. त्या मानाने हा चित्रपट taut आहे.
भुत पुलिस काहिही अपेक्षा न
भुत पुलिस काहिही अपेक्षा न ठेवता बघितला, मस्त टाईम पास झाला.
अर्जुन कपुर असल्याने काही भारी असेल असे नव्हते वाटले, तरी त्याला लायकीतच ठेवून सैफ वर बरीचशी मदार सोपवली आहे ते बेस्ट केलेय.
जॅकलीन आय कँडी म्हणुन ठीक पण अगदीच मठ्ठ रोल करते. एकच भाव सेंशुअस, बस, झाले काम असे समजते.
सैफ ने धमाल उडवली आहे.. मधेच दचकायला होते..बॅग्राउंड स्कोअर तितका खास नाही. स्त्री शी तुलना न करता पाहिला तर १ टाईम वॉच आहेच.
उधमसिन्ग बघायचा आहेच .
उधमसिन्ग बघायचा आहेच .
चाफेकर बंधूंवर कोणता चांगला चित्रपट आहे का ? लेकाला दाखवायचा आहे .
मागे मीच एक बघायचा प्रयत्न केला होता पण ईतका ड्रामा , पहिल्या १५ मिनिटात बंद केला .
२२ जून १८९७ असा एक चित्रपट
२२ जून १८९७ असा एक चित्रपट आहे. चांगला आहे कि नाही हे बघून ठरवावे.
गोंद्या आला रे - वेब सीरिज -
गोंद्या आला रे - वेब सीरिज - झी ५
मी पाहिलेली नाही.
सरदार उधम पाहिला. अतिशय
सरदार उधम पाहिला. अतिशय परिणामकारक आणि भेदक. आवडला तरी कसं म्हणावं? खूप अस्वस्थ करून गेला. जालियनवाला बाग हत्याकांड इतिहासात खूप त्रोटक शिकवलं गेलं होतं. इकडे ते अक्षरशः अंगावर येतं. विकी कौशल भूमिका जगलाय जणू. खूप दिवसांनी अशी फिल्म पहिली. जरूर बघा.
उधम सिंग खूप संथ आणि विस्कळीत
उधम सिंग खूप संथ आणि विस्कळीत घेतला आहे
सारखा फ्लॅशबॅक आणि सतत वर्तमान यामध्ये गोंधळ उडतो
निर्मितमूल्य आणि विकी कौशलचा अभिनय यामुळे तरलाय
खूप अस्वस्थ करून गेला.
खूप अस्वस्थ करून गेला.
>>> cancel kela.. was about to watch it
उधम सिंग .. पहायला सुरवात
उधम सिंग .. पहायला सुरवात केली पण बॉकग्राऊंड ला बाईचं निवेदन .. खूप बोरींग आहे.. अब लोक आ जा रहे हौ, उधम सिंग सोच रहा है, बाल और दाढी बढे हुए है, वो चल रहा है..... हे असच सग्ळ्यांना ऐकू येतय की.. मलाच ऐकू येतय काय माहित .. सेटींग मध्ये काही गडबड तर नाही असं हि वाटलं मला...!!
सेटिंग्ज चेक करा प्राइमचे.
सेटिंग्ज चेक करा प्राइमचे.
ऑडिओ मध्ये हिंदी विवरण ऑप्शन ऑन केला असेल तुम्ही चुकून.
ते फारच विनोदी वाटेल.
ते फारच विनोदी वाटेल.
गलगले निघाले सारखं.
चेक केलं सेटींग मध्येच गडबड
चेक केलं सेटींग मध्येच गडबड झाली होती.
हिंदी विवरण ऑप्शन सिलेक्ट झालं होतं ...
धन्यवाद..!
ते फारच विनोदी वाटेल.
ते फारच विनोदी वाटेल.
गलगले निघाले सारखं. >>>>
गलगले निघाले सारखं. >>>
गलगले निघाले सारखं. >>>
गलगले निघाले सारखं. >>
गलगले निघाले सारखं. >> व्हिज्युअली इंपेअर्ड लोकांसाठीचा ऑप्शन आहे. कधी चुकुन सिलेक्ट झाला तर अशक्य त्रास होतो, आणि दरवेळी ढीगभर शोधाशोध करुन सापडतो.
Pages