कारमध्ये शिरेलेले डास कसे घालवावेत?

Submitted by मानव पृथ्वीकर on 17 February, 2018 - 06:31

काल रात्री पार्कींगमध्ये कार पार्क केल्यावर एकाबाजूची काच चुकून उघडी राहीली. आज सकाळी ऑफिसला जायला निघालो तर काय कारमध्ये खूपच डास शिरलेले दिसले. सगळी दारं उघडून फडक्याने डास घालवण्याचा प्रयत्न केला, बरेच गेले पण बरेच या सीट खालून त्या सीट खाली, दाराला असलेल्या सामान ठेवायच्या खोबणीत जाऊन बसू लागले.
मग मी सगळ्या काचा उघड्या ठेवून कार ऑफिसला घेउन गेलो, वाटले हवेने जातील निघून. काही वेळाने बहुतेक डास निघुन गेले असे वाटले. ऑफिसमध्ये आल्यावर मग सगळ्या काचा बंद केल्या. पण आता थोड्यावेळा पूर्वी काही कामानिमित्त बाहेर जायचे होते म्हणुन कार काढली तेव्हा लक्षात आले की अजून भरपूर डास आहेत कारमध्ये. परत काचा उघड्या ठेवून गेलो, तेव्हा निघुन गेले असे वाटले. परत आल्यावर थोड्यावेळाने पाहिले तर डास भरपूर आहेत कार मध्ये.

हिट स्प्रे वगैरे मारला तर खूप वास येईल व गाडी चालवणे अशक्य होईल कित्येक दिवस, त्यामुळे तसे करणार नाही.

दुसरा काय उपाय करता येईल कारमधून डास घालवायला, जेणे करुन गाडीत उग्रवास रहाणार नाहीत? कुणाला काही सुचते का सांगा.

सिरियस प्रॅक्टीकेबल उत्तरांची अपेक्षा आहे, पण मनोरंजक गमतीदार उत्तरेपण चालतील.

आगाउ धन्यावाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाल डास खाते
एखादी मोठी पाल गाडीत सोडून ठेवता येईल.>> चांगला उपाय. फक्त गाडी चालवताना पालीला बांधुन ठेवावे लागेल किंवा इथे नवा धागा काढावा लागेल:-'ड्रायव्हींग करतांना पाल हातावर चढली तर काय करावे.'

डास घालवायला पाल, पाल घालवायला मोर, मोर घालवायला लांडगा, प्राणी संग्रहालय व्हायचे कारचे.

एक रात्र प्राणी संग्रहालयात कार दरवाजे उघडून पार्क करा. प्राण्यांना ही त्यांचे दरवाजे/एनक्लोजर उघडून यायचे आमंत्रण देऊन टाका. होऊन जाऊदे गटग... गटगला खायला काही लागणारचं.

महत्त्वाची सूचना : तुम्ही घरी निघून या. तुम्ही मानव आहात.

यावरून आयडीया आली.
फुलपुडीचा दोरा पालीला बांधून आत सोडायचे(दोरा कोणी कसा बांधायचा ते तुमचं तुम्ही बघायचं)
दोरा 20 फूट लांब पाहिजे .पालीला आत सोडून दार लावायचं.एसी आणि एअर डक्ट ला चिकट पट्टी लावून बंद करायचे.
असं 3 दिवस ठेवलं की पाल उपाशी राहून सर्व डास खाईल. आपण गाडीत बसताना दोऱ्याने तिला काढून बाल्कनीत बांधून ठेवायचं.

सरळ चिट्टीला सांगा, रंगुस्की ला सांगून तो डासांची मिटींग बोलवून शिस्तीत समजावेल कि मानवाची कार सोडून जा आणि परत कधी येऊ नका.

डासांची racket फिरवा गाडीमध्ये
(डास घेऊन खेळतील ती नव्हे, त्यांना मारणारी racket )

ढल गया दिन टूक्
हो गई शाम टूक्
जानेदो टूक्
जाना है
हे गात मारा. नुसतच काय मारायचं.

तुम्ही अगदी देवेन वर्मा सारखेच दिसता म्हणून मला वाटतं बाहेर बसून प्रीतम आन मिलो असं जोरात गायलात तरी ते येतील. Wink
शिवाय हे साधेसुधे नसून 'शिरेलेले' डास आहेत , आवडती शिरेल लावा , बाहेर टिवी ठेवा. येतीलच बाहेर पहायला मगं पटकन दार बंद करा. Proud
हे वाचून बघा. काही तरी उपयुक्त लिहिते.
https://www.topgear.com.ph/features/tip-sheet/how-to-get-rid-of-pesky-mo...

https://www.getridofallthings.com/how-to-get-rid-of-mosquitoes-in-the-car/

मी एकदा ते शिरल्यावर सगळ्ञा खिडक्यांच्या काचा खाली करून १०० च्या स्पीडने गाडी हाणली
-- गाडीत मागे असलेली माझी इस्पितळाची फाईल उडून गेली
- हवालदाराने १००० ची पावती फाडली
-घरी परतल्यावर पाहिले तर डांस...... डान्स करत होते
-इति

तिथे लॉकडाऊन आणि जमावबंदी नाही का?
सरळ पोलिस कंप्लेट करा डासांची.. मोजत बसू नका, पन्नासच्या वर आहेत सांगा. पोलिस येऊन पकडून घेऊन जातील. उगाच कायदा हातात घेत हत्या करायची काही गरज नाही. अश्याने चुकीचा पायंडा पडतो. लोकं तरी काय सल्ले देतात एकेक Sad

धमाल धागा Lol

मी सिरीयसली विचारतेय, मानव तुम्ही कार घरी आणल्यावर थोडं black hit मारून काचा थोड्या वेळाने बंद केल्यात तर डास मरतील किंवा बाहेर जातील. एखादी माशी किंवा एखादा डास असेल तरी हा उपाय करतो आम्ही.

धमाल उत्तरं.
पण डास खरंच घालवायचेय.
@अंजु: त्या ब्लॅक हिटचा वास नाही का दरवळत रहात कारमध्ये मग? माझे डोके भणभणते त्याने.

@रेव्यु: हो, काचा उघड्या ठेवुन कितीही वेगाने गेले तरी फारच थोडे डास निघून जातात, बोटावर मोजण्या इतके, बाकीचे खालच्या बाजूला लपून बसतात. गाडी वेगात असते तेव्हा आपल्याला वाटते गेले डास. पण गाडी थाम्बवली की थोड्याच वेळात डास परत हैदोस घालायला लागतात.

गाडी सुरू करून, हँडब्रेक लावायचा,काचा बंद ठेवायच्या, एसी किंवा फॅन फुलवर लावायचा आणि बॅट, टाळ्या वाजवत जमेल तितके मारायचे.

उपाय नं १.
सर्वप्रथम कारमधे बसण्याआधी उघड्या अंगाला ओडोमॉस लावा.
गाडी चालु करा. (चालु करायची चालवायची नाहीये)
खिडक्या बंद असताना गाडीचा हीटर चालु करुन तापमान २७-२८ सेट करा.
हवेचा झोत समोरच्या काचेकडे आणी पायांकडे वळवा.
३ ते ४ मि. गाडी अशीच चालु राहु द्या.
हवेच्या झोताचा वेग वाढवुन गाडीच्या काचा उघडा.

ह्याने डास गेले नाहीत तर,
उपाय २
गाडी पुर्ण दिवस भर उन्हात पार्क करा (खिडक्या बंद राहु द्या)
संध्याकाळी डासांचे मृतदेह झटकुन बाहेर काढा.

बेसमेंट ऐवजी गाडी टेरेस वर लावावी.
डास चिकटतील असा कागद गाडीत लावावा... (अमेझॉन वर मिळेल)
गाडीत कोळी पाळावा, तोही डास मारेल.
खिडक्या कायम खाली करून ठेवाव्या.. डास आले काय गेले काय, फरक पडणार नाही.. Happy

त्या ब्लॅक हिटचा वास नाही का दरवळत रहात कारमध्ये मग? माझे डोके भणभणते त्याने. >>> थोडा वेळ काचा उघड्या ठेवल्या तर नाही त्रास होत. घरात पण मारतो ना आम्ही म्हणून सवय झालीय, तसंही आम्ही दोघे हल्ली मास्क लावतो गाडीत, जातही नाही बाहेर पण हा उपाय करतो गरज पडली तर. घरी गाडी आणल्यावर हा उपाय केला तर थोडा वेळ काचा उघड्या ठेवतो, मग बंद करतो, आठ पंधरा दिवसांनी गाडी काढणारी माणसे आम्ही. रोज नाही लागत, ट्रेन प्रवास असल्याने. ( लाल hit मात्र उग्र वाटते, ते मी घरात झुरळांसाठी ठेवते ).

आम्ही फिरताना शक्यतो संध्याकाळी नाही जात, तरीही डास किंवा माशी एखादी जरी आली तरी हा उपाय करतो आणि काचा ओपन ठेवतो. एक काहीतरी लिक्विड आहे ते एकेक थेंब कपड्यावर लावतो, डास जवळ येऊ नयेत म्हणून, कारण मुलगा आमचा मागे बसलेला असतो, तो सांगू शकत नाही काही त्यामुळे त्याच्यासाठी कपड्यावर लावलेलं बरं पडते, डास शिरले तरी त्याच्या जवळ जात नाहीत. आता ते गाडीत आहे का संपले ते बघायला हवं, असेल तर नाव सांगेन. ते जरा सुगंधी असते. हल्ली lockdown मुळे गाडीने फिरता येत नाहीये.

बाकी कोणाकोणाला त्रास होऊ शकतो, भावाला वगैरे घरात फार मारायला पण black hit नको वाटतं.

गाडी उचलुन टेसेसवर कशी न्यावी, आणि परत कशी आणावी हे ही सांगा देसाई. Proud का मानवनी धागा काढू द्या म्हणताय?
मग लगे हात 'टेरेसवरच्या गाडीवर नारळ पडला.' , माकाचु? पण धागा काढून टाका.

कोळी पाळलात तर 'एका कोळीयाने' भाग दोन लिहा मानव.

खेळण्यातली गाडी असेल तर डासांनाच सांगा ड्राइव्ह करत गच्चीवर जा....... !
एका कोळियाने.... नेमका कोंचा कोळी स्पायडरमॅनवाला की आजोबा कोळी Lol

एक काहीतरी लिक्विड आहे ते एकेक थेंब कपड्यावर लावतो, डास जवळ येऊ नयेत म्हणून...
Good Knight चे येते, शिवाय माझ्याकडे आहे Veilect नावाचे. झाडपाल्याच्या वासासारखा वास आहे.

धूप लावण्यासाठी बंद झाकणाचे भांडे असते तसे असेल तर loban dhoop लावून काचा बंद करून ठेवा.

एक काहीतरी लिक्विड आहे ते एकेक थेंब कपड्यावर लावतो, डास जवळ येऊ नयेत म्हणून...
Good Knight चे येते, शिवाय माझ्याकडे आहे Veilect नावाचे. झाडपाल्याच्या वासासारखा वास आहे. >>> thank u. गुडनाईटचं असेल बहुतेक आमच्याकडे.

Pages