शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तरे :

५. प्रपंच ( ३, १ जोडाक्षर) = पाल्हाळ
६. अति बडबड (५, १ जोडाक्षर ) = अतिशयोक्ती
७. कुजबुज करणारी व्यक्ती (६) = नगरभवानी

आता फक्त मूळ शब्द ओळखा.

खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ८ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
सूत्र : दुर्गुणासंबंधी

माणिकमोतीशिंपले
मनपसंतीनुसार
काकाचीजहागिरी

अनन्यसाधारण
मनमानीकेल्यामुळे
मनकर्णिकेकडील

रमणावाटपासाठी
प्राध्यापकमहोदय

उत्तर : अप्रामाणिकपणाची
...................................
'कवडीचुंबक /चिक्कू साठी ४ अक्षरी शब्द ?
संस्कृतचा प्रभाव आहे

एक छोटेसे :
सहा अक्षरी आंब्याची जात ओळखा .
शोधसूत्र :

गुरु मध्ये निवडलेला मिळवा !

ही जात माहीत नव्हती . बरेच शोधले पण नेहमीच्याच येत होत्या सगळीकडे . कुतूहल म्हणून , कुठे मिळतो हा ?

एक गूढ शब्दकोडे देतेय.
साधारणपणे शब्दाचा अर्थ आणि उपशब्द सूचक दिले आहेत.
अक्षरसंख्या कंसात.

१. काल्पनिक स्त्रीचे वागणे बदलले {५}
२. केशरी बोका, त्याने साधला मोका (४)
३. ठरवून नाही पण यात्रेला बरोबरच जाऊ (३)
४. उपदेश देऊन तो उडाला, किती वेळ जुगार खेळेल , त्यालाही भूक आहे (३)
५. याजन्मी इथेच फेडावे म्हणून उन्हात पडलेत नि पाडलेत (३)
६. शेवटी हे तर उलट्या महिन्यातले छोटे झाड (४)
७. ओला कावळा चिडला (३)
८. उकाड्यातले स्वादिष्ट तारुण्य (४)

३. सहज (सह + हज, ह सामायिक)

६. समा <-- रोप

८. मे जवानी?

कोडे रचताना काही चुकत असेल/ फारच (सोपे /अवघड) होत असेल तर प्लीज बदल सुचवा

अशा प्रकारची कोडी कुठे एकत्र उपलब्ध आहेत का

Pages