खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनघा आमच्यकडे ह्याला नूची (मंगलोर) .. कोकोनट राईस म्हणतात फक्त ओले खोबरे घालतात.... पास्ता अगदी भारी दिसतोय..त्यामध्ये फोडणीला उडदाची डाळ आणि मेथी आहे का ?

श्रवु, फोडणी rice बद्दल विचारते आहेस ना ? पास्त्याला जोडून आलेय म्हणुन विचारले Proud . हो, फोडणीत उडदाची डाळ आणि मेथ्या आहेत.

गेल्या शनिवारचे होमवर्क. १. संदेश (बंगाली स्वीट). जगातली सगळ्यात सोप्पी स्वीट डिश. रणबीर ब्रार रेसिपी - यू ट्यूब. मी वेलदोडा पूड अ‍ॅड केली.
टेकश्चर, चव व स्वाद एकदम टॉप क्लास. ( Certified by my Bengali Bhabi).
IMG-20200919-WA0026[1].jpg

गेल्या शनिवारचे होमवर्क. २. सुरळीच्या वड्यातील काही निवडक. (बाकिच्यांचे पिठले झाले. नीट गुंडाळता आल्या नाहीत. तज्ञ मंडळींची मदत घ्यावी लागली) व्ही फॉर विक्रमसिंह व्हिक्टरी Happy
IMG-20200919-WA0025[1].jpg.

सुरळीच्या वड्या आणि सोंदेश एक नं..
होमवर्क 100/100 Happy

संदेश सोपे आहेत काय बनवायला?? कधी बनवले नाहीत..
एकदा बनवले पाहिजेत.. सोप्या रेसिपीज आवडतात मला..

सुरळीच्या वड्यांचा गोळा मायक्रोवेव मधे भाजला. दिड दिड मिनिटे असे ४ वेळा. मधे मधे ढवळायचे. मधुरा आणि अजून एका बाईंची रेसिपी पाहून.
थोड्या जाड पसरल्या गेल्याने गुंडाळताना तुटत होत्या. म्हणून निम्म्या पिठल्यात गेल्या. माकाचू मधे लिहाव लागेल. Happy

...

Pages