Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रॉन्स आहेत का?
प्रॉन्स आहेत का?
नवीन Submitted by पाथफाईंडर on 31 July, 2020 - 05:23
>>>>>>
हो
पण आमच्याकडे याला कोलंबी बोलतात
Batatyale सॉं ग..आंबट,गोड
Batatyale सॉं ग..आंबट,गोड,तिखट चवीची बटाट्याची रस्सावाली भाजी.
@श्रवु्:
@श्रवु्:
धन्यवाद श्रवू !
म्हणजे नेहमीचे तेल + खो तेल असे मिक्स वापरायचे का सुरवातीला ? खोबरेल तेलाचा स्वयंपाक साठी कोणता ब्रँड चांगला आहे ?
बाकी रेसिपी मध्ये काही बदल लागतो का ? उदाहरणार्थ - जास्त तापवू नये वैगेरे ?
मी एकदा वापरले होते पण पचायला थोडे जड असते असे वाटते पण बाकीचे फायदे पण आहेत असे ऐकून आहे म्हणून मला वापरायचे आहे
खोबरेल तेल आम्ही नेहमीच
खोबरेल तेल आम्ही नेहमीच वापरतो, पाश्च्यात वेव येण्याधीपासून आणि रुजुता दिवेकर सांगण्याआधीच.
तात्पर्य हेच की, सवय करायची हळू हळू, काही नाही होत.
शुद्ध घाणीचं घ्यायचं.
उलट तळायला वगैरे उत्तम आहे.
शोधक फोडणीत कधीच मिक्स तेल
शोधक फोडणीत कधीच मिक्स तेल वापरू नये.. फेस येतो तेलाला..
zhampi म्हणतायत त्याप्रमाणे घाण्याचे तेल मिळत असेल तर उत्तम.. पण आमच्याकडे मिळत नाही. मंगलोर किंवा केरळी स्टोअर्स मध्ये मिळते. KPL किंवा KERA ते वापरते..Rs १४०/- १/२ Kg सुरवात तर करा.. काही नाही होत..मासे खोबरेल तेलात तळून खातात..
देवकी बटाट्या सॉन्ग गोड नाही
देवकी बटाट्या सॉन्ग गोड नाही बनवत.. मस्त खोबरेल तेलात केले तर छान लागत.
मानव सोंग नाही सॉन्ग आहे ते..
मानव सोंग नाही सॉन्ग आहे ते..
zampi खोबरेल तेलाची परंपरा
zampi खोबरेल तेलाची परंपरा हि आपल्या पूर्वजांपासून चालत आलेय..हे MCT किंवा ऋजुता दिवेकर हि आताच फॅड आहे..
देविका बन्स एकदम भारी झाले
देविका बन्स एकदम भारी झाले आहेत.. गरम गरम खायला मज्जा येते..कॉफी आणि बन्स ..मंगलोर च्या जनता deluxe आणि ताजमहाल मध्ये बन्स भारी मिळते
महालसा पॅनकेक भारी दिसतोय एकदम.. मागे एकदा किल्ली ने पण भारी पॅनकेक चा फोटो टाकला होता..
>>zampi खोबरेल तेलाची परंपरा
>>zampi खोबरेल तेलाची परंपरा हि आपल्या पूर्वजांपासून चालत आलेय..<<
अगदी बरोबर.
देविका कणिक रवा केली वापरून
देविका कणिक रवा केली वापरून बॅटर थोडे पातळ करून त्याचे अप्पे करतात.. less oily .. more healthy ..
दिवसांची सुरुवात गरमागरम
दिवसांची सुरुवात गरमागरम भजीपावने.....
वडापाव एकदम मस्त,नेहमी
भजीपाव मस्त
खोबरेल तेल मिळतं की ऑनलाईन.
खोबरेल तेल मिळतं की ऑनलाईन. अॅमेझॉन वर शोधा. आम्हाला आमचे गावचे देतात आणून. एकच पारंपारीक लाकडी घाणा उरलाय खोबरेल तेलाचा एका ओळखीच्या काकांचा. बैल अजुन आहेत तोवर ठिक चाललेय. आधी बाहेर विकायचे , आता नाही विकत.
( स्वगतः एक तुनळीवर विडिओ टाकायला सांगायला पाहिजे हे बंद व्हायच्या आत)
zampi तुमचे गाव कोणते.. मग
zampi तुमचे गाव कोणते.. मग मी पण मागवेन..
तीळाचे तेल वापरतय का कुणी?
तीळाचे तेल वापरतय का कुणी?
मी वापरते तिळाचे तेल..
मी वापरते तिळाचे तेल.. लोणच्यासाठी.. आणि दिवाबत्ती साठी..
इथे तामिळनाडू मधे कुकिंग साठी
इथे तामिळनाडू मधे कुकिंग साठी वापरतात,नॉनवेजसाठी स्पेशल, मी पण आणले एकदा पण नाही जमले, खूप उष्ण असते, पोट दुखले सगळयानचे
भजीपाव भारी दिसतोय.
भजीपाव भारी दिसतोय.
खोबरेल तेल नाही वापरले कधी,
खोबरेल तेल नाही वापरले कधी, इथे घाणयाचे मिळते
खोबरेल तेल वापरून बघ.. कदाचित
खोबरेल तेल वापरून बघ.. कदाचित आवडेल तुला.. सांबार करशील तेव्हा फोडणीत खोबरेल तेल वापर.. आणि नाहीच आवडले तर. केसांसाठी वापर..
भजीपाव भारी .
भजीपाव भारी .
मंगलोर बन्सची पाकृ टाका देविका
आम्ही मूळचे कोकणातले पण फिरत
श्रवु, आम्ही मूळचे कोकणातले पण फिरत फिरत पुण्ञात स्थिरावलो.
ते काका , बाहेर नाही विकत पण पुण्ञात एक घाणा आहे प्रभात रोडवरच बहुधा तिथे मिळतं.
ओके zampi ..आम्ही गणपतीला
ओके zampi ..आम्ही गणपतीला मंगलोर ला जातो तेव्हा. खोबरेल तेल २/३ Ltr पॅकेट्स आणून ठेवतो. मग ते संपले कि..मंगलोर स्टोअर्स झिंदाबाद.. मंगलोर वरून आणतो ते एकदम pure असते..
काकडीची तवसोली... कोकणात
काकडीची तवसोली... कोकणात सांदण....धोंडस म्हणतात..
काकडीची इडली.. तवसोली सारखीच
काकडीची इडली.. तवसोली सारखीच फक्त गूळ नाही घातला.. ज्यांना गोड नाही आवडत त्यांच्यासाठी.. चटणी बरोबर खायची..
पाकृ लिहा दोन्हींची, वेगळा
पाकृ लिहा दोन्हींची, वेगळा धागा काढून.
ब्रेडच्या भाजीत / उपम्यात
ब्रेडच्या भाजीत / उपम्यात स्क्रम्बल अंड घालायचं. मीठ मीरपुड वालं. वरुन किसलेलं चीज. एक नंबर ब्रेफा.
अहो मानव धागा काढण्याएवढा
अहो मानव धागा काढण्याएवढा आत्मविश्वास नाही आला अजून..
येईल लिहिता श्रवू. छोटी
येईल लिहिता श्रवू. छोटी पाककृती लिहा आधी जेव्हा शांतता असेल तेव्हा म्हणजे फक्त लिखाणात लक्ष देता येईल.लॅपटॉप वापरत असाल तर आधी वर्डमध्ये टाईप करून इकडे पेस्ट करा.
Pages