खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रेड ची भाजी तशीच खातात
चहाबरोबर नाशता

ब्रेडचे बारीक तुकडे करून त्यात तिखट मीठ , जमल्यास थोडे मेतकूट घालून मिसळून ठेवावे , फोडणी करून त्यात भरपूर कांदा टोमॅटो घालून परतणे , मग त्यात ब्रेडचे तुकडे घालावेत , गरज वाटल्यास थोडे पाणी शिंपडून वाफ येऊ द्यावी, पोहे करतो तसे करावे,

किंवा शिळ्या पोळी , भाकरीची फोडणी पोळी , भाकरी करतो , तसेच ब्रेड वापरून करावे

श्रवु्
खोबरेल/नारळ तेलात रेसिपी च्या काही टिप्स द्याल का ? मी एकदा केले होते पण फार काही जमले नाही
पचायला थोडे जड असते असे वाचले आहे , काही अनुभव share कराल का ?

शोधक एकदम नका करायला जाऊ.. त्रास होईल.. म्हणजे..मळमळल्यासारखे होईल..म्हणजे मला तरी सुरवातीला असेच झाले होतं. मग हळू हळू होईल सवय. फोडणीसाठी सुरवातीला १/२ चमचा खोबरेल तेल घाला, म्हणजे फार सुवास येणार नाही खोबरेल तेलाचा. आमच्याकडे मंगलोर ला तिखट तळणीचे पदार्थ खोबरेल तेलातच होतात..मी फक्त फोडणीसाठीच वापरते खोबरेल तेल.. मधुमेह ..हार्ट साठी चांगले म्हणून

ब्रेडचा उपमा, थालीपीट मस्तच! काल रेसिपी दूधी धपाटे (किल्ली) शोधून ठेवली होती अन आज ती वर आली होती... तर त्या रेसिपीने धपाटे केले त्या थाळीचा फोटो व उद्याच्या थाळीचा पण ती थाळी पाहून किल्लीचीच आठवण येईल 20200730_134716.jpg20200730_134637.jpg

हं! तर काय सांगत होते ... उद्याच्या थाळीचा फोटो आज कसा काय असा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर त्याचं असं झालं धपाट्याचं जेवण संपता संपता शेजाऱयांकडून (मराठवाडी) ही थाळी आली ... अर्थात उद्या स्वयंपाकाला सुटी ... फक्त भात मांडीन ( नागपुरी भाषेत चहा, भात वै मांडतात)
दालबाटी पाहून किल्लीताईंची आठवण नाही येणार असं होईल का?
श्रवु , हा घे फोटो ... काल खूप प्रयत्न केला अपलोड होतच नव्हताScreenshot_20200729-145741_0.jpg

मंजूताई.. धन्स..
मला ते गोडाचे आप्पे फार आवडतात.. गणपतीच्या नेवैद्यला अप्पेच लागतात.आमच्याकडे.

सौमित्र ची राधाक्का..चहा..जेवण..संसार..सगळे मांडते..
हाहा
भारीच

चहा/भात मांडतात.. कदाचित पाणी (आधण) ठेवणार्या पदार्थांसाठी वापरत असतील... चहाच आंधण ठेवू का किंवा आधणात तांदूळ वैरून टाकू का असं म्हणतो रुन्म्याच्या भाषेत बोलतो ...

कुठेतरी वाचले होते कि मुंबई आंदण म्हणून दिली होती...इतिहासाच्या पुस्तकात! इंग्लंडच्या राजाला आंदण म्हणून मुंबई मिळाली होती.
सर्वांचे फोटो मस्त!

आंदण वेगळं ,आधण वेगळं , आम्ही पण आधण ठेवलंय म्हणतो. गोडाचे अप्पे मस्त, नाचणीचे थालीपीठ हेल्दी आणि दिसतंय पण छान .
श्रवूने केलेले डोसे मागच्या पानावर. त्यावरून मिश्र डाळींची धिरडी केली
20200729_100646.jpg
बिडाच्या तव्यावर केली. झाला बाई तयार तवा आता.

हो देवकी बरोबर आहे.. त्यानंतर आंदण हा शब्द कधी ऐकलंच नाही..मुंबई आणि आंदण हे समीकरण मनात पक्के बसलेय.. तेच आठवले आता..

आंदण म्हणजे भेट (गिफ्ट).
आंधण नाही. आंधण म्हणजे चुलीवर शिजवण्याच्या उद्देशाने तापत ठेवलेले पाणी. त्याला आधण सुध्दा म्हणतात.

वा! धिरडी काय जाळीदार झाली आहेत.

सावधान, श्रावण चालू आहे Happy


..

आंदण. - मुलीच्या बापानें मुलीस किंवा जावयास ठराविक देणगी किंवा हुंडा याखेरीज लग्नांत जें विशेष बक्षीस द्यावयाचें तें, जमीन, गुरेंढोरें, दासदासी इ

आई किंवा आजीला लग्नात माहेरून मिळालेल्या भांड्यांवर कोरलेली नावे पहा. त्यात आंदण असं लिहिलेलं दिसेल.

आधण - आधण—न. १ विस्तवावर तापविल्यामुळें कढत होऊन उकळूं लागलेलें पाणी; उकळण्यासाठीं विस्तवावर ठेवलेलें पाणी.

हॉट मँगलोर बन्स / केळ्याचे वडे - कणीक आणि रवा वापरून,
मैदा वापरून करतात बरेच जणं, पण असेही छान होतात.
खोबर्‍याच्या चटणीबरोबर, बटाटा सोंग बरोबर छान लागते.
घरची राजेळी केळी असल्याने, साखर/ गुळ टाकावेच नाही लागले.

3D584079-EEA5-4258-89A8-DE78A921386D.jpeg

Pages