खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो श्रवू नक्की..
आमच्याकडे शेवग्याच्या पानांची करतात भाजी..

आमच्याकडे शेवग्याची पाने उकडून घेऊन चांगली पिळून घेतात. मग जीरे-मोहरीची फोडणी, लसूण,कांदा लालसर झाला की हळद, तिखट टाकून मग पिळलेली भाजी टाकायची. काळे लांब तीळ थोडे परतून त्याची भरडसर पूड करुन भाजीत टाकायची. ओले खोबरे टाकायचे. चांगली वाफ काढायची. बास.
ऊग्र कडवटपणा जाण्यासाठी ती उकडून घेतात.
कॅल्शिअम भरपूर प्रमाणात देणारी भाजी.

cuty दोन पद्धतीने करता येते.. शेवग्याचा पाला वाफवून घ्यायचा आधी आणि फोडणीला कांदा, हळद, लाल तिखट घालून परतून घ्यायची आणि दुसरी पद्धत माझी आवडती आहे फोडणीला चिरलेला कांदा, मिरची परतून वाफवलेला पाला घालायचा आणि ओलं खोबर घालायचं

lunch..Saambar rice.. phansachya garachi bhaji..ambyache sasav.. N madgane..

चिकन लॉली पॉप
घरच्या घरी पहिला प्रयोग Happy
माझी शाकाहारी बायको लॉकडाऊनमध्ये नॉनवेज सुद्धा बनवायला लागली Happy

..

आणि हे बाहेरचे - हा माझा प्रयोग
वॅनिला आणि चोकोचिप्स अश्या दोन आईसक्रीम - सोबत स्विस चॉकलेट केक ओवनमध्ये गरम करून - भारी कॉम्बिमेशन लागत होते. सिझलिंग ब्राऊनी सारखे वाटत होते.

SAVE_20200623_162528.jpegSAVE_20200623_162539.jpeg

बोरानी बैगन
अफ़गानी डिश

हो

मूळ कृतित वांगयाचे काप तलून घेणे आहे
पण आम्ही तिखट , मिठ , बेसन व शेवटी रवा लावून शैलो फ्राय केले
मग त्यावर लाल टोमेटो शिजवून केलेली ग्रेवी घातली

Pages