खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG-20190823-WA0069.jpg

कॉर्न टिक्की

भातावर चुरली की नागपुरी गोळा भात होतो

Proud

घावणे मस्त दिसतायेत

भरत , विचित्र का वाटलं ? चहासोबत घावण खाण गावी सर्रास चालतं. इंफॅक्ट मी ही खाते

चहासोबत घावण खाण गावी सर्रास चालतं. इंफॅक्ट मी ही खाते
>>>

गावी कश्याला... मी तर मुंबईत लहानपणापासून खातोय
चहा घावणे आमच्याकडे टॉप ५ न्याहारीपैकी एक आहे.
सोबत खोबरयाची तिखट हिरवी चटणी घ्यायची. ती घावण्याला लाऊन तो चहात बुडवून खायचा. हळूहळू चटणी चहात विरघळून विरघळून चहा मस्त तिखट होतो Happy

चिकन मटण रश्यासोबतही छान लागतात. घावणे किंवा आंबोळ्याही.
काही जण मासे वा कोलंबीच्या सारासोबतही खातात. मला नाही आवडत.

ओके भरत .

रून्मेष, मला आवडतात कोलंबी प्लस घावणे कॉम्बो Happy

धन्यवाद.. घावने मम्मीने बनवले..
भरत कोकणात घावने कोऱ्या चहासोबत, नारळाची चटणी, काळ्या वाटाण्याची उसळ यांच्यासोबत खातात... कोऱ्या चहासोबत भन्नाट लागते घावन... खाऊन बघा एकदा Happy

घावणे मस्त दिसतायेत

भरत , विचित्र का वाटलं ? चहासोबत घावण खाण गावी सर्रास चालतं. इंफॅक्ट मी ही खाते

Submitted by जाई. on 25 June, 2020 - 11:46
<<<<< +11111

Ghavan barobar kairchi chuntney hi mast lagte.. nirdose & kairchi Chutney... tondala Pani sutle.....

IMG-20200625-WA0009.jpg
कालचा मेनू

ठेचा, चटणी , भाकरी ,मिरची , कांदा आणि दही

Pages