खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अस्मिता
ऋ तूच मागे लाग बायको करताना आणि तिथल्या तिथे लिहून घे पाककृती, नुसते फोटो नको आता Wink !
>>>>
फोटो काढायला किचनमध्ये यायची परमिशन देते हेच खूप आहे. तिला किचनमध्ये माझी लुडबूड आवडत नाही. तुझे काय ते करून घे आणि किचन रिकामे कर हे तिचे नेहमीचे असते..

@ चंपा
गेहूचा आटा वाटत नाहीये तो, बेसनच वाटतय.
>>>>>
मलाही पैला तेच वाटलेले. चव बघितल्यावरच खात्री पटली.

येनी वेज,
ज्यासाठी आलोय ते काम करतो. आजचा मेनू टाकतो Happy

एग फ्रॅण्की - त्या चपातीत मैदा आणि गहू दोन्ही मिक्स होते.
हल्ली हे फार बनते आमच्याकडे. वर्क फ्रॉम होम करता करता सकाळचा हेवी नाश्ता होतो.

आणि मग रात्रीच्या जेवणात चमचमीत चायनीज मिळून गेले कि एक चटकमटक दिवस पुर्ण होतो Happy
..

..

..

@ShitalKrishna - Thank you Happy Sa. Ba khush zalya pan tyanchya peksha mich khush zale, Goad khup khayla milala mhanun Lol

मानसी, कांदा कोबी आहे वाटते यात. मागे सिम्ला सुद्धा टाकलेली. आणि मग चटण्या सॉस मायोनीज सॅन्डवीच स्प्रेड चिल्ली फ्लेक्स चाट मसाला अस काहीबाही टाकते ती.
तुम्ही काय टाकता? काही आयड्याज मिळाल्या तर त्याही ट्रय करू...

@ ब्लॅककॅट, अहो चायनीज बॅन करायचेय म्हणून तर आता घरच्या घरी हे शिकतोय Happy

Mi kakdi kanda aani chaat masala.कांद्यात बारीक मिरची आणि खूप लिंबू वा चिल्ली sauce.chhan lagte

मी तर ह्या प्रकारच्या खाद्यपदार्थांना चायनीज म्हणू नये; नॉर्थ-ईस्ट इंडियन cuisine म्हणायला पाहिजे असे म्हणते. बाकी नावामधे चायना /चायनीज संदर्भ असलेल्या हॉटेल आणि मेनू पण नकोत. तसं पण सगळं इंडो version आहे .

श्रवु, सगळे पदार्थ मस्त आहेत.
किल्ली, गरीबाचा मसाला डोसा आणि चटणी आणि बटाट्याची भाजी ईतकी छान असेल तर मला गरीब राहायलाच आवडेल Happy

aambyache raite chapatibarobar khayche..

आज माझ्या आईचा वाढदिवस आहे.
काल रात्री बाराच्या सेलिब्रेशनला म्हणून बायकोने Mug Cakes केले होते. पोरांच्या आवडीचे प्रकरण आहे Happy

Pages