चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.
आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.
शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.
मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.
तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.
तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.
चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.
पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.
आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.
मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.
https://www
https://www.urbantransportnews.com/stec-bags-rs-1126-crore-civil-contrac...
शांघाय टनेल कम्पणीला मेट्रोची ऑर्डर मिळाली
वा मोदीजी वा
खोदकामासारखी हलक्या दर्जाची
खोदकामासारखी हलक्या दर्जाची कामे चीनला देवून आपण दीपमाळा सारखं उच्च तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे लक्ष केंद्रित करावे असे सरकारचे जनतेला आवाहन आहे. चमकोगिरी महत्त्वाची.
लै अवघड आहे राव .
लै अवघड आहे राव .
तंत्र ज्ञान ने वाईट सवयी लावल्या ! नाहीतर हम भी थे कुछ काम के !
त्या YZ चीन ला वठणीवर आणण्यासाठी चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकावा च लागेल , पर्याय नाही !
Whatsap वर एक फॉरवर्ड येतेय
Whatsap वर एक फॉरवर्ड येतेय की जपान वर अमेरिका ने अणुबॉम्ब टाकला होता म्हणून जपानी लोकं Made In USA काहीच खरेदी करत नाहीत, हे खरे आहे का ?
https://ustr.gov/countries
https://ustr.gov/countries-regions/japan-korea-apec/japan
इथे पहा
https://twitter.com/suchitrav
https://twitter.com/suchitrav/status/1273230211371405312
(No subject)
गेली सहा वर्षे झोपले होते का?
गेली सहा वर्षे झोपले होते का? सहा वर्षापूर्वी चिनी मालावर बहिष्कार घालायला सुरुवात केली असती तर आजपर्यंत आत्मनिर्भर झालो असतो आपण.
काहीही असो !
काहीही असो !
राजकारण बाजूला जर ठेवले तर या घडीला चीन बद्दल राग न येणारा माणूस विरळाच म्हणावा लागेल.
(No subject)
चीन कडून अवास्तव अपेक्षा
चीन कडून अवास्तव अपेक्षा ठेवणे आणि नंतर पाठीत खंजर खुपसून घेणे हे गुण भारतीय लोकामध्ये ठासून भरले आहे .
हिंदी चिनी भाई ! भाई !
Submitted by Sanjeev Washikar
Submitted by Sanjeev Washikar on 11 June, 2020 >>>> +१
घटना दुर्दैवी आहे पण किमान अर्थभान आणि अर्थव्यवस्थेची जाण असणारा व्यक्ती हे चीन च्या मालावर बहिष्कार, टीव्ही फोडणे असली बाष्कळ थेरं कधी करणार नाही. आत्मनिर्भर वगैरे घोषणा प्रत्यक्षात यायला अजून काही दशके जावी लागतील. चीन बरोबरचा ट्रेड डेफिसिट एकदा अभ्यासावा म्हणजे आपण कुठे आहोत हे लक्षात येईल.
आत्ममग्न शासक, अजित डोवाल , गुप्तचर यंत्रणा यांना जाब विचारताना कोणी दिसलं नाही.
आत्ममग्न शासक, अजित डोवाल ,
आत्ममग्न शासक, अजित डोवाल , गुप्तचर यंत्रणा यांना जाब विचारताना कोणी दिसलं नाही.>>> असं विचारणं म्हणजे राष्ट्र द्रोह होतो.
https://m.lokmat.com/national
https://m.lokmat.com/national/protest-china-bjp-leaders-burned-statue-ki...
भाजपा नेत्यांनी जिनपिंग ऐवजी किम जोंगचा पुतळा जाळला.
VIVO कंपनी आणि बीसीसीआय
VIVO कंपनी आणि बीसीसीआय यांच्यात ५ वर्षांचा करार झाला आहे. प्रत्येक वर्षासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून ४४० कोटी रुपये मिळतात. मिळणारा पैसा चिनी कंपनीकडून येत असला तरीही तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामाला येत असल्याचं धुमाळ म्हणाले. २०२२ मध्ये बीसीसीआय आणि VIVO यांच्यातला करार संपणार आहे. “जेव्हा तुम्ही भावनिक होऊन विचार करता त्यावेळी तर्क आणि विचार मागे पडतात. चिनी कंपनीला पाठींबा देणं आणि भारतीय स्पर्धेसाठी त्यांची मदत घेणं या गोष्टींमधला फरक आपल्याला समजावून घ्यावा लागेल. चिनी कंपनी भारतात आपलं जे काही उत्पादन विकते. त्यामधून मिळणाऱ्या पैशाचा काही भाग ही कंपनी बीसीसीआयला स्पॉन्सरशीपच्या स्वरुपात देते. या स्पॉन्सरशीपच्या पैशांसाठी बीसीसीआय नित्यनियमाने कर भरत आहे. त्यामुळे एका अर्थाने हा पैसा भारताच्याच कामी येत आहे.” धुमाळ पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
https://www.loksatta.com/krida-news/chinese-sponsorship-in-ipl-helping-i...
चीन बरोबरचा ट्रेड डेफिसिट
चीन बरोबरचा ट्रेड डेफिसिट एकदा अभ्यासावा म्हणजे आपण कुठे आहोत हे लक्षात येईल>>>>>> भारताच्या ट्रेड असोसिएशनने हे पाऊल बहुदा उचलले आहे. मी वाचलेले की त्यांनी चीनमधून आयात होणाऱ्या परंतु भारतात बऱ्यापैकी त्याच क्वालिटीमध्ये तयार होणाऱ्या मालाची यादी करून त्या मालावर आयातबंदीचा निर्णय घेतला आहे जो स्वागतार्ह आहे. चिनी माल घ्यावा कि नको याचा निर्णय ग्राहकांवर टाकण्याऐवजी आयातबंदीचा घेतलेला निर्णय जास्त परिणामकारक आहे.
https://m.facebook.com/groups
https://m.facebook.com/groups/2280064302101994?view=permalink&id=2853471...
ह्यूआन श्वांग आधी मोदींच्या गावात गेला
मग तिथून जिनपिंग च्या गावी गेला होता.
चिनी कंपनी भारतात आपलं जे
चिनी कंपनी भारतात आपलं जे काही उत्पादन विकते. त्यामधून मिळणाऱ्या पैशाचा काही भाग ही कंपनी बीसीसीआयला स्पॉन्सरशीपच्या स्वरुपात देते. या स्पॉन्सरशीपच्या पैशांसाठी बीसीसीआय नित्यनियमाने कर भरत आहे. त्यामुळे एका अर्थाने हा पैसा भारताच्याच कामी येत आहे.” -----> इथे बीसीसीआय ला देण्यासाठी जो पैसा आहे तोही भारतातून आलेला आहे आणि तो कंपनीला मिळणाऱ्या फायद्याच्या नाममात्र आहे हे धुमाळ विसरले का? या पैश्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पैसा ती चिनी कंपनी चिनी गव्हर्नमेंट कडे टॅक्स म्हणून भरत असेल ज्याचा उपयोग चीन भारताविरुद्ध करत आहे याची जाणीव बीसीसीआय ला नाही का?
घटना दुर्दैवी आहे पण किमान
घटना दुर्दैवी आहे पण किमान अर्थभान आणि अर्थव्यवस्थेची जाण असणारा व्यक्ती हे चीन च्या मालावर बहिष्कार, टीव्ही फोडणे असली बाष्कळ थेरं कधी करणार नाही. आत्मनिर्भर वगैरे घोषणा प्रत्यक्षात यायला अजून काही दशके जावी लागतील. चीन बरोबरचा ट्रेड डेफिसिट एकदा अभ्यासावा म्हणजे आपण कुठे आहोत हे लक्षात येईल >>>>>>
सखोल विचारांती व्यक्त केलेले मत + १११११
पूर्ण सहमत .
विचारांचे उथळ प्रदर्शन घडविणाऱ्या इतर लोकांपेक्षा हे उत्तम नक्कीच .
कोण कोणाला भेटून गेला असले विचार या दुदैवी परिस्थिती मध्ये व्यक्त करून काय फायदा ?
पण काही लोकांना समजून घेणेच अवघड आहे .
सगळ्या इंडस्ट्रीज ने पण चीन
सगळ्या इंडस्ट्रीज ने पण चीन वरून माल घेणे बंद करावे लागेल . आयात मध्ये
इलेक्ट्रॉनिक्स ३५ % आहे , आणि बाकीचे मेडिकल कंपन्यांची केमिकल्स , स्टील , फर्निचर , हार्डवेअर आठवणार नाहीत इतक्या इंडस्ट्रीज चीन चा स्वस्त माल उचलतात .
मग एकच पर्याय शिल्लक राहतो क्वालिटी ची कारणे सांगून सरकार पातळीवर सगळ्या ऑर्डर्स कॅन्सल करत राहणे !!!!
शिवाय भारतात वेगवेगळ्या ठिकाणी चाललेली इन्फ्रा development ची कामे पण चिनी कंपण्याकडेच कडेच आहेत !
गेल्या एक महिन्यापासून चीन बरोबर वाद चालू आहे तरी १२ जून ला उत्तर प्रदेश मधील १२५० करोड चे कॉन्ट्रॅक्ट चिनी कंपनीला दिले गेले आहे .
त्यामुळे बहिष्कार बहिष्कार फक्त आपण च नाचून काही उपयोग नाही त्या साठी सरकारी पातळी वरच प्लॅनिंग करावे लागेल .जर बाजारात चिनी माल च नसेल तर आपण घेवूच शकत नाही !
यासाठी मोदी मंत्रिमंडळाला च कठोर निर्णय घ्यावे लागतील !
काय होईल देशाचे अंदाज पत्रक थोडेसे फुगेल पण चीन ची नांगी पक्की ठेचली जाईल !
कटू पण सत्य .
इथे धडाडधुडुम वस्तू बनवायला
इथे धडाडधुडुम वस्तू बनवायला सुरू करा मग आपोआपच चिनी मालाची खरेदी कमी होईल.
एकूण चीनी मोबाईलच्या विक्रीमुळे संमसंगची घसरण झालेली ती आता थांबेल.
https://youtu.be/Iiu54pbriOw.
https://youtu.be/Iiu54pbriOw.
लडाख चे सोनम वांगचुक यांनी मार्मिक शब्दात सरकार आणि जनतेचे डोळे उघडले आहेत .
या माणसाला मानले पाहिजे , किती स्पष्ट विचार ! देशभक्तीचे बिलकुल ढोंग नाही . त्या मानाने आपण आणि भाजप चे सगळे नेते याच्यापुढे मुंगी पण नाही .
चिनी वस्तूंवर बहिष्कार एक
चिनी वस्तूंवर बहिष्कार एक स्वप्न !
(विशेष आभार: गिरीष टिळक)
__________________________
तुम्ही ज्या मोबाईलवरून चिनी मालाच्या बहिष्काराचे आवाहन करत आहात त्याचे निम्म्यापेक्षा जास्त स्पेअर पार्ट चिनी बनावटीचे आहेत, किंवा तो संपूर्ण फोनच चिनी बनावटीचा आहे.
तुम्ही कॉम्प्युटर वापरताय त्याचे निम्मेअधिक स्पेअर पार्टस चिनी बनावटीचे आहेत.
जगातील सर्व मोठे ब्रॅण्ड्स चीन मध्ये असेम्बल होतात.
तुमच्या लॅपटॉप मधले अर्ध्यापेक्षा जास्त पार्टस चिनी आहेत.
तुम्ही वापरत असलेल्या वाहनाचे कितीतरी पार्टस चीन मधून आयात केलेले आहेत.
तुमच्या घरात फ्रिज आहे ? मग त्याचे पार्टस चीन मध्ये बनलेले आहेत हे लक्षात ठेवा.
तुम्ही वापरात असलेली साबण, पावडर, शाम्पू, सेंट, डियो, पावडर यासाठी लागणारे कितीतरी केमिकल्स चीनमधून आयात होतात.
तुमच्या घरात असणाऱ्या प्लास्टिक वस्तूंपैकी कितीतरी वस्तू चीनमधून आयात केलेल्या आहेत, किंवा त्याचा कच्चा माल चीनमधून आणलेला आहे.
तुम्ही बाहेर एखाद्या शोरूम मधून फर्निचर विकत घेतलेलं आहे ? मग तेसुद्धा चीन मधून आयात केले असण्याची ८०% शक्यता आहे.
तुमच्या घरात सोलर वॉटर हिटर आहे? मग तो एक तर पूर्णपणे चीनमधून आयात केलेला आहे किंवा किमान त्याच्या ट्यूब चिनी बनावटीच्या आहेत.
तुम्ही जी सौंदर्यप्रसाधने वापरता ती सुद्धा बरीचशी चीनमधून आणलेली आहेत.
तुम्हाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या शेकडो, हजारो वस्तूची या एक तर चिनी बनावटीच्या आहेत किंवा त्यांचा कच्चा माल चीनमधून आयात केलेला आहे.
ज्या वस्तू भारतात बनतात त्या वस्तूंसाठी लागणारा ४०-५०% पेक्षा जास्त कच्चा माल चीनमधून आयात केला जातो.
तुम्ही पूर्णपणे चिनी बनावटीच्या वस्तूंनी घेरलेले आहात.
म्हणजेच चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे मेसेज पाठवताना तुम्ही स्वतःशीच बेईमान असता.
नुसतं फटाके आणि मोबाईल वर बहिष्कार म्हणजे देशभक्ती अशी जी काही भावना तुमच्या डोक्यात आहे ना ती निव्वळ फसवी आहे.
कारण तुम्हाला वास्तवच माहित नाही, तुम्ही स्वतःलाच फसवत आहात, किंवा तुम्ही फक्त सोशल मीडियावर बोलणारे बोलबच्चन आहात.
कोणत्याही देशाच्या वस्तूवर बहिष्कार घालण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यापेक्षा जास्त चांगल्या आणि स्वस्त वस्तू बनवल्या तर त्यावर आपोआपच बहिष्कार पडेल हे आपल्या लक्षातच येत नाही किंवा आपल्या इतका खोलवर विचारच करायचा नाहीये.
उथळ पाण्याला खळखळाट फार अशी आपली अवस्था झाली आहे.
पण खरी ताकद खोल पाण्यातच असते हे आपण लक्षातच घेतच नाही,
ते शांत असलं तरी त्याच्या अंतरंगात खूप काही दडलेलं असत. शांत राहून जे करता येत ते उथळ बडबड करून कधीच सध्या होत नाही हे कधी लक्षात घेणार आपण?
आता वास्तवात या...
कौतुक आणि वास्तव यातला फरक ज्याला कळतो त्यानेच खालील माहिती वाचावी नाहीतर इथेच थांबून घ्यावं.
कधी स्वतःला विचारलंय ?
इतका चिनी माल आपल्या देशात का बरं येतो ?
फक्त आपल्याच देशात नाही तर जगात सर्वत्रच हा चिनी मालाचा धुमाकूळ का चालू आहे ?
ज्या वस्तू चीन बनवू शकत त्या आपण सुद्धा बनवू शकतो कि मग तरीही चीन ची गरज का पडावी ?
कारण आपण बनवत असलेल्या वस्तूंची प्रोडक्शन किंमत चिनी वस्तूंच्या च्या विक्री किमतीपेक्षा सुद्धा जास्त आहे.
एखादी वस्तू दोन जण सारखीच बनवत असतील तर त्यापैकी जी स्वस्त असेल त्यामागेच ग्राहकांची झुंबड उडणार हा मार्केट हा नियमच आहे.
साहजिकच आपल्याला कुणी दारातही उभं करत नाही.
का बरं चिनी मालाची प्रोडक्शन कॉस्ट इतकी कमी राहत असेल ? ते फक्त खराब माल वापरत असते तर Apple Iphone सारखे जगविख्यात मोबाईल चे पार्टस चीन मध्ये बनलेच नसते.
चीन ची एक खासियत आहे. तुम्हाला काय हवंय ते सांगा आम्ही देऊ.
ते नाही कशालाच म्हणत नाही.
"कोई भी धंदा छोटा या बडा नाही होता और धंदे से बडा कोई धरम नाही होता"
हे वाक्य सर्वार्थाने चीनलाच लागू पडतं.
तुम्हाला क्वालिटी पाहिजे ? मिळेल....
तुम्हाला स्वस्त पाहिजे ? ते सुद्धा मिळेल....
अगदी हूबेहून I-Phone सारखे मोबाईल तिथे २ हजारात सुद्धा मिळतात. आणि खऱ्या I-Phone चे पार्टस सुद्धा तिथेच बनतात.
म्हणजेच मेड इन चायना हे काही आपल्याला वाटतं तसं बकवास नक्कीच नाही.
चिनी उत्पादन हे आज जगात सर्वोत्तम पातळीवर आहे. जगातील सर्वोत्तम आणि मोठ्या कंपन्यांच्या रांगेत चीनमधील कितीतरी कंपन्या आहेत.
कोणत्याही उद्योजकाला हेवा वाटावा अशी चीन ची इंडस्ट्री आहे.
आणि कोणत्याही उद्योजकाने शिकावं अशीही हि इंडस्ट्री आहे.
चीन आज जगातील सर्व वस्तू बनवू शकतं, ते आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी स्वस्त देऊ शकतं, ते फक्त आपल्याच देशात नाही तर जगात सर्वत्र किमतीच्या जोरावर धुमाकूळ घालत आहेत,
कशामुळे ?
या प्रश्नाचे उत्तर शोधा... चीन ला मागे टाकण्याचं उत्तर सापडेल.
चीनचा मुख्य भर आहे तो वस्तू स्वस्त देण्यावर.
यासाठी ते भयंकर कॉस्ट कटिंग करतात.
अगदी त्यांच्या कंपन्या टी ब्रेक च्या १५ मिनिटात सुद्धा पूर्णपणे शट-डाऊन केलेल्या असतात.
कामगार पूर्ण क्षमतेने काम करतात किंवा त्यांच्याकडून करवून घेतले जाते, पण कामगारांकडून जास्तीत जास्त आऊटपुट मिळेल यासाठी कंपन्या प्रयत्नशील असतात.
कामगारांवर होणारा खर्च हा सर्वात जास्त असतो. त्यामुळे या खर्चावर नियंत्रण आवश्यक असते. म्हणूनच कामगारांकडून जास्तीत काम करून घेणे हे प्रत्येक कंपनीचे पहिले लक्ष्य असते.
अगदी काम चालू असताना कामगार कुणाशी गप्पा मारत नाही किंवा थोडासुद्धा टाईमपास करत नाहीत.
सरकार निर्यातीवर भरपूर सवलत देत असतं. निर्यातीसाठी मोठ्या सुविधा उपलब्ध असतात.
एक कंपनी एकाच वस्तूचे उत्पादन करण्यावर भर देते. पण ते खूप मोठ्या प्रमाणावर असते.
यालाच मास प्रोडक्शन म्हटले जाते.
तसेच खर्चावर खूप कात्री लावली जाते. पगार, इतर खर्च, इलेक्ट्रिसिटी चा खर्च, यासारख्या खर्चावर भरपूर नियंत्रण असते.
अनावश्यक पैसे कुठेही खर्च होणार नाही यासाठी चिनी कंपन्या कायम प्रयत्नशील अासतात.
कॉस्ट कटिंग करताना अगदी ०.००१ % चा सुद्धा विचार केला जातो.
मशिनरींवर दररोज नवनवीन संशोधन होत असते ज्यामुळे उत्पादनाचा वेग वाढवता येईल.
या मोठमोठ्या इंडस्ट्रीजच्या खालोखाल लघुद्योगांचे मोठे जाळे विणलेले आहे. ज्यामुळे मोठ्या कंपन्यांना कच्चा माल स्थानिक पातळीवर मिळतो.
एकाच ठिकाणी सर्व काही, यामुळे वाहतूक खर्चासारखे अनावश्यक वाढणारे खर्च कमी होतात.
अशा वेगवेगळ्या मार्गाने प्रोडक्शन कोस्ट कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. फक्त मोठ्याच नाही तर लहान लहान कंपन्यांमध्ये सुद्धा याच प्रकारे कॉस्ट कटिंग केली जाते.
कारण लहान कंपन्यांकडूनच मोठ्या कंपन्यांना माल जात असतो. लहान कंपन्यांची प्रोडक्शन कॉस्ट कमी म्हणजे मोठ्या कंपन्यांना सुद्धा कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य असते.
त्यामुळे कॉस्ट कटिंग हि ग्राउंड लेव्हल च्या कंपन्यांपासूनच सुरु होते.
प्रत्येकामधून अर्धा पाव टक्का खर्च वाचला तरी एकूण उत्पादन खर्चावर खूप मोठा फरक पडतरो.
आणि हाच फरक त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सहाय्य्यभुत ठरतो.
जे काही करताल ते मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने करा...
कमी वेळात, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन हाच चिनी कंपन्यांच्या यशाचा गाभा आहे.
आता आपल्याकडे काय परिस्थिती आहे बघु या ?
सकाळची नऊ ची शिफ्ट असेल तर कामगार बरोब्बर ९ वाजता कंपनीत येतात मग त्यानंतर एंट्री करणे, हात धुणे, पाणी पिणे यासारख्या क्षुल्लक कामांसाठी वेळ वाया घालवून ९-१५ ला काम सुरु होते.
यानंतर दिवसभरात पाणी पिणे, बाथरूम ला जाणे यासारख्या कारणाखाली एखाद तास वाया घातला जातो. यात गप्पा वेगळ्या.
संध्याकाळी पाच ला सुट्टी असेल तर पंधरा मिनिटे आधीपासूनच कामात टंगळमंगळ सुरु झालेली असते.
या सगळ्या कौशल्यामुळे कामगारांकडून दिवसातले २ तास वायाच गेलेले असतात. म्हणजे उत्पादन खर्चावर परिणाम करणारा सगळ्यात मोठा भागच आपलं काम चोख बजावत नाहीये.
कामगार वर्गाकडून काम करताना कंपनीशी कोणतीही अटॅचमेंट नसते, फक्त पर्याय नाही म्हणून काम करायचे अशा मानसिकतेमध्ये असताना १००% काम होऊ शकत नाही.
बर.... यात एखाद्याला हटकावं तर लगेच गोंधळ सुरु होतो.
युनियन कामगारांसाठी असते कि युनियन अध्यक्षाला पोसण्यासाठी हेच कळत नाही.
स्थानिक लेबर कॉन्ट्रॅक्टर कडून होणार त्रास विचारायलाच नको
सर्व प्रकारच्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटीच्या रूपात वेळोवेळी खंडणी द्यावी लागते.
एखादी कंपनी सुरु व्हायला लागली कि लगेच कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, सिमेंट, खाडी, लोखंड सप्लायर्स यांचे माफियांच्या आवेशात काम देण्यासाठी धमकीवजा संपर्क सुरु होतात.
यांना काम न दिल्यास कंपनी सुरूच होऊ शकत नाही.
उद्योजकांना सुद्धा प्रोडक्शन कॉस्ट कटिंग चे पुरेपूर ज्ञान नाही
छोटछोट्या खर्चांकडे कानाडोळा करण्याची सवय लागलेली आहे.
एखादी कंपनी सुरु होण्याआधी आणि सुरु झाल्यानंतर कित्येकांना वेळोवेळी खंडणी द्यावी लागते.
लहान लहान उद्योजकांना व्यवसायाचे योग्य प्रशिक्षण नाही.
सरकारकडून सवलती नाहीत, योग्य मार्गदर्शन नाही,
कच्च्यामालाचे आणि मोठ्या कंपन्यांचे योग्य नियोजन नाही,
अशावेळी उत्पादन खर्च वाढणारच आहे.
चिनी मालावर बहिष्काराचे मेसेज पाठवून तुम्ही चीन च काहीही वाकडं करू शकत नाही.
यासाठी आपल्या कंपन्या चिनी कंपन्यांपेक्षा जास्त सक्षम कराव्या लागतील.
ते करण्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागेल, कामात १००% ऊर्जा द्यावी लागेल, ज्याची अजूनतरी आपल्याला सवय लागलेली नाही.
तुम्ही चीन सारख्या देशावर बहिष्कार टाकूच शकत नाही.
कारण बहीष्कार टाकायचा म्हटलं तर तुम्हाला तुमच्या जवळच्या ८०% वस्तूंचा त्याग करावा लागेल.
जे तुम्हाला कधीच शक्य नाही. चीन ची घोडदौड थांबवण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे आपल्या देशाला उत्पादन क्षेत्रात आणि एकूणच सर्व क्षेत्रात चीनच्या दोन पावले पुढे नेणे.
यासाठी फक्त सरकारवर अवलंबून राहून काहीच होऊ शकत नाही.
प्रत्येकालाच प्रयत्न करावे लागतील. सरकार फक्त योजना आणू शकतं, शेवटी काम तर आपल्यालाच करायचं असतं.
आणि हे काम कोणतंही असू शकेल.
तुम्ही जे काम करता ते पूर्ण क्षमतेने करा. प्रत्येकाचा थोडाथोडा हातभार एकूणच प्रगतीला कारणीभूत ठरत असतो.
आपल्या कामाने काय फरक पडणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे.
तुमचं काम करणं हि तुमची नाही तर तुमच्या देशाची गरज आहे.
आणि हे तुम्ही जेवढं लवकर लक्षात घ्या तेवढं लवकर आपला देश प्रगतीची शिखरे पार करील.
whatsapp msg
(No subject)
______________________________________________________
______________________________________________________
China Threatens India:
China Threatens India: Boycott China Biting Beijing ? | NewsX : https://www.youtube.com/watch?v=TidcFJpAyO4
चीनी वस्तूंवर बहिष्कार घालणे शक्य आहे. जर जास्तीत जास्त भारतीयांनी या साठी हातभार लावला तर शक्य आहे. कदाचित लगेच शक्य होणार नाही पण सुरुवात झाली आहे ती तशीच पुढे वाढत रहावी. चिनी कंपन्या भारतीय कंपन्यांमध्ये डायरेक्ट / इन्डायरेक्टली गुंतवणूक करून भारतात वस्तू विकण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी अश्या कंपन्यांची आणि वस्तूंची लिस्ट वेळोवेळी प्रकाशित करणारी यंत्रणा हवी.
चीनला आपण धडा शिकवला पाहिजे.
चीनला आपण धडा शिकवला पाहिजे. या सर्वांची सुरवात आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून करायला हवी. चीनमधून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे. जे अजूनही चिनी वस्तू वापरत आहेत त्यांनी अशा वास्तूंचा वापर बंद केला पाहिजे. असं न केल्यास त्यांचे पाय तोडले पाहिजे आणि त्यांच्या घरांची लूटपाट केली पाहिजे,” - पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते जॉय बॅनर्जी
आपलं शौर्य दाखवायला यांना सीमेवर पाठवायला हवं की नको?
चीनी वस्तू /सेवां ची
चीनी वस्तू /सेवां ची मायबोलीवर जाहिरात करणारे धागे
https://www.maayboli.com/node/71509
https://www.maayboli.com/node/53544
चीनी वस्तू /सेवां ची
चीनी वस्तू /सेवां ची मायबोलीवर जाहिरात करणारे धागे>>
ज्या मोबाईलवरून बहिष्कार करा असे लिहितात तो कुठे बनविलेला आहे हे पाहत असतात काय हे लोक? सकाळी बहिष्कार टाकल्याची पोस्ट टाकली आणि दुपारी वन प्लस फोन खरेदी केला असे चिक्कार देशप्रेमी दिसले नुकतेच.
(No subject)
(No subject)
Pages