चीन शी व्यापार करावा की नाही ?

Submitted by नितीनचंद्र on 19 April, 2020 - 02:52

चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.

आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.

शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.

मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.

तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.

तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.

चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.

पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.

आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.

मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

शांघाय मध्ये 1 महिना काढला होता.त्यात हे जाणवलं की चीन मध्ये 2 प्रकारच्या वस्तू बनतात: एक आपण ट्रॅफिक सिग्नल वर/रस्त्यावर/छोट्या गिफ्ट शॉप मध्ये बघतो त्या, लगेच खराब होणाऱ्या.आणि दुसऱ्या म्हणजे थोड्या प्रगत देशात निर्यात करण्या साठी चीन मध्ये बनलेल्या, उच्च दर्जाच्या.पु-शि मध्ये आपल्या मंगलदास मार्केट सारखे क्लॉथ मार्केट आहे.तिथे ब्रँडेड दुकानात महागात मिळणारे डिझायनर गाऊन्स, जॅकेट्स याची थोड्या बदलासहित नक्कल काही तासात कमी किमतीत शिवून मिळते.उत्तम चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिक वस्तू मिळतात.उत्तम कॉटन चे कपडे मिळतात.
आपल्याकडे 'चिनी माल' म्हणून नाकं मुरडली जातात त्याचं कारण चीन मधून ज्या प्रकारचा माल आपल्या देशात येतो ते आहे.
चीन ची राष्ट्रीय इच्छाशक्ती खूप चांगली आहे.अनेक इन्व्हेन्शनस, आपल्याला कल्पनाही येणार नाही अश्या वस्तू चिनी बनावटीच्या आधी बनतात.
जे चीन उत्तम प्रतीचं आणि वाजवी किमतीत देतं ते चीन कडून घ्यावं.जे आपल्या ओरिजिन चं आहे, आपल्या इथे चांगलं बनू शकतं ते आपलं घ्यावं.यात जो वेळ, किंमत आपली वाचेल ती आपल्या इथे तश्या चांगल्या प्रतीच्या वस्तू बनवायला टेक्नॉलॉजी आणि मशिन्स बनवायला वापरावी.
चीन मध्ये लेबर लॉ जवळजवळ अदृश्य आहेत.खाण कामगारांच्या सुरक्षेचे कायदे काहीच नाहीत.आणि यामुळेच कमी किंमतीत देणे परवडते.यातून त्यांना स्वतःला बाहेर यावे लागेल.पेपर मध्ये वाचले तर दर दीड वर्षात एक खाणीच्या अपघाताची बातमी वाचायला मिळते.

कामगारांची पिळवणूक होते म्हणून ते वस्तू स्वस्त विकतात ही त्या प्रकारची च एक थाप आहे.

माझा सख्खा चुलत भाऊ गेली 5 वर्षे वर्षात 3-4 महिने चीनमध्ये विपणनासाठी जात असतो. त्याने पाहिलेली वस्तुस्थिती आणि आपल्या मित्राला दाखवली गेलेली वस्तुस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे एवढेच मी नम्र पणे आपल्याला सांगू इच्छितो.

असू शकते .
चीन विषयी अशी पण सर्व माहिती जगाला मिळत नाही.

मी जी माहिती लिहिली आहे ती माझ्या चुलत भावाकडून मिळालेली चक्षुरवईसत्यम माहिती आहे.
त्यात तफावत असू शकेल परंतु थाप नक्कीच नाही.
चीनच्या पोलादी पडद्याआड काय चालले आहे ते कुणालाच 100% कळणे शक्य नाही परंतु वूहन मध्ये
फक्त 82हजार कोव्हिडं केसेस आणि 4600 मृत्यू आहेत यावर कोणीही विश्वास ठेवणे शक्य नाही. अमेरिकेत 7 लाखाच्या वर एकदा गेला आहे. कॉव्हीडला कोणताही उपाय नाही हे जगात सर्वांना माहिती आहे.

भारतीय म्हणजे फसवेगिरी/ इंटेग्रिटी-शून्य व्यवहार ... या जगात पसरलेल्या समजाचे शिलेदार शिवाजी महाराज असतील असं वाटलं न्हवतं. (हे सारकॅस्टिक लिहिलंय. हे खास ब्रिगेडी लोकांसाठी स्पष्ट करतो.) वर आशुचँप म्हणतोय तेच वाटलं.
बाकी जागतिक व्यापार विविध देशांत आता इतका घट्ट विणीने विणला गेलाय की एक उत्पादन तयार करायला लागणारा कच्चा माल किती देशांच्या सीमा अनेकोनेक वेळेला पार करतो त्याला गणती नाही. जास्तित जास्त लेव्हरेज घेऊन जो काही व्यवहार करता येईल/ करार करता येईल तो भारताने कायमच करावा. चिनी माल नको हे ज्या उपकरणाच्या सहाय्याने लिहितो त्यातील कित्येक पार्ट (आणि बहुतेक ते उपकरण ही) कायम चीन मध्येच बनलेले असतील हे लक्षात घेऊन हे लिहा म्हणजे झालं.

कित्येक पार्ट (आणि बहुतेक ते उपकरण ही) कायम चीन मध्येच बनलेले असतील.

भविष्यात अशीच स्थिती असेल असे नाही

आज झूम ऐवजी एक भारतीय अँप लॉन्च झालंय से नमस्ते म्हणून. फारसे चांगले नसेल सुरुवातीला परंतु एकदा मनावर घेतले तर अशक्य नाही.
जर तुम्ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अणू पाणबुडी बनवता स्वतःचे उपग्रह बनवता, स्वतःची जी पी एस(नाविक) बनवता तर चीनच्या मदतीशिवाय बऱ्याच गोष्टी करणे अशक्य नाही.

भले यास तुम्ही मूर्खपणा म्हणा किंवा भाबडा आशावाद.

चीन वर टीका करून किंवा द्वेष करून आपण चीन वर मात करू शकणार नाही.
त्या साठी उच्च प्रतीच्या वस्तूची ची निर्मिती आपण केली पाहिजे,
किमती योग्य असल्या पाहिजेत.
अवकाश संशोधनात आपण बर्या पैकी प्रगती केली आहे.

तत्काळ सेवा आणि उच्च प्रतीच्या वस्तू आणि योग्य किंमत ही त्री सुत्री च वापरून चीन वर मात करता येईल.

भारताने प्रत्येक कंपनीला एक दोन स्टँडर्डाईज्ड ग्याजेटस काढणे सक्तीचे केलं पाहिजे. (उदाहरणार्थ फोन मॉडेलस - ब्याट्री साईज , स्क्रीन साइज, बटणांच्या जागा, क्याम्रा मोड्यूल असलेले) म्हणजे वस्तू स्वस्त होतील.
१९९८ साली इकडची फिलिप्स कंपनी चार पाच बँडचा ट्रान्झिस्टर रेडिओ ९०० रुपयास विकत असे. रस्त्यावर चिनी बनावटीचे (दहा बँड अधिक टिवी )किशिबो ट्रान्झिस्टर रेडिओ १५०, २२० रुपयांना मिळायचे. अजूनही ते चालू आहेत!
आमच्या दिवाळी गणपतीसाठी रोषणाईच्या चिनी इलेक्ट्रिक माळा ६०-१०० रुपयांस मिळू लागल्यावर लोकांना आणि देवांनाही किती आनंद झाला असेल!!

आज तुमच्याकडे बराच कच्चा माल चीन कडून येतो आहे पण 30 वर्षांपूर्वी असं होतं का?
तेंव्हाही भारतीय औषध निर्मिती व्यवसाय मोठा होताच.
तेंव्हा चीन कुठेच नव्हता.
ही स्थिती परत येऊच शकणार नाही का?
अर्थात कुणी कम्युनिस्ट चष्माच घातला असेल तर प्रश्नच संपला.
कारण बीजिंग मध्ये पाऊस पडला तर कलकत्त्यात छत्री उघडणारी ही माणसं. पण ते आता औषधपूरतेच उरले आहेत.

ज्याची उत्पादने चांगली आणि टिकाऊ आहेत ती घ्या, दरम्यान चा वाचलेला वेळ आणि पैसा रिव्हर्स इंजिनिअरिंग करून तशी उत्पादने लोकल मार्केट मध्ये बनवा.कोणालाच 'तुमचं काही नको' असं म्हणण्याच्या पोझिशन ला सध्या आपण नाही.छान पुरणपोळ्या बनवायच्या आहेत झटपट, तर उसाचा रस उकळून गूळ पण मीच बनवणार असा हट्ट सध्या नको.डाळ मी शिजवणार,मी कणिक मळणार ठिके.

इथले उत्पादन वाढले तर इथे रोजगार पण वाढेल.
त्या मुळे चीन ची तळी भारतीय उचलणार नाहीत.
काही तरी आपले चुकतंय हे नक्की.
भारतीय शेतकऱ्या ना कसलेच संरक्षण नसताना अन्न धान्य मध्ये देश दुसऱ्या देशावर अवलंबून नाही .
उलट फळे,भाज्या,कड धान्ये,कांदा, आंबा
आणि इतर वस्तू निर्यात च करत आहे.
उद्योगांना का जमाना ते ह्याची करणे शोधणे आणि बदल करणे गरजेचे आहे.
भारतीय मोबाईल निर्मिती कंपनी मायक्रोमॅक्स
चांगले फीचर असलेले मोबाईल निर्माण करत होती आता नामोनिशाण नाही तिचे.
काय कारण
सर्व्हिस बरोबर नव्हती .
मोबाईल बिघडला तर ग्राहकांची काळजी कंपनी घेत नव्हती.
सहा सहा महिने लागायचे repair होवून परत फोन यायला

चीन मधून येणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही सुरक्षित आहेत का? हा एक प्रश्न आहे.
दुसरे चीन जगाला आपल्या स्वस्त उत्पादनावर अवलंबित करून जगाला आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीलंका पाकिस्तानला कर्जबाजारी करून ठेवलेले आहेच।अनेक आफ्रिकी देश त्याच मार्गावर आहेत. उद्या कुठल्या अतिमहत्त्वाच्या कच्च्या मालासाठी तुम्ही चीनवर पूर्णपणे अवलंबून राहिलात तर मोक्याचे वेळेस चीन त्याची जबर किंमत वसूल केल्याशिवाय राहणार नाही.
इतिहास हेच सांगतो आहे.
चीन बद्दल जगभरात असलेल्या संतापाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्याची हीच वेळ आहे.

तरी कोणताच देश आपले दरवाजे सताड उघडे ठेवत नाही.काही ना काही मार्ग काढून स्वतःच्या उद्योगांना संरक्षण देतो च.
कारण तसे करणे गरजेचे पण असते.
प्रतेक देशाची ताकत अलग अलग आहे
धावपटू बरोबर सामान्य व्यक्तीची धावण्याची स्पर्धा लावता येणार नाही तसेच आहे हे.

भारतातून एकूण 7500 पेक्षा जास्त वस्तू 190 देशांना निर्यात होतात. आपल्या देशाचा आयात व्यापार निर्यात व्यापारापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर 6000 वस्तू 140 देशांतून आयात केल्या जातात. आपल्या देशातून 75 टक्के निर्यात फक्त 5 राज्ये मिळून करतात. त्यात आकडेवारीनुसार महाराष्ट्र (22.3%), गुजरात (17.2%), कर्नाटक (12.7%), तामिळनाडू (11.5) आणि तेलंगणा (6.4%) इत्यादी राज्यांचा समावेश होतो.

निर्यात 5 राज्ये करतात
कारण त्यांच्याकडे बंदरे व विमानतल आहेत म्हणून

बाकी लहान राज्यातुंन माल तिथे येतो व हे फक्त पोच करतात

त्याला च infrastructure म्हणतात
आणि ते चांगले असेल तरच व्यापार वाढतो.
नाहीतर वीजनिर्मिती भरपूर करतोय आणि वितरण करायची यंत्रणा च नाही तर त्या वीज निर्मिती ला काही किमांत नाही.
उत्तम दर्जाच्या गाड्या आहेत पण चांगले रस्तेच नाहीत तर त्या उच्च दर्जाच्या गाड्या काही कामाच्या नाहीत.
30,km/h ni pan palnar नाहीत

ब्लॅक कॅट
तुमच्या लाडक्या बंगाल,केरळ,दिल्ली चे यादीत नाव नाही आणि गुजरात,महाराष्ट्र चे नाव आहे म्हणून थोडे दुःख होत असेल ना

We don't have any other option!!!

Create options.

No one gave you atomic bomb.
1974 atomic explosion has prevented China from invading INDIA.
No one gave you technology for satellites, missiles, GPS, nuclear submarine.
Create options.

People with physical disability have climbed Mount Everest

Mental disability will get you no where.

भारत कडे चीन ल टक्कर देण्याची ताकत आहे.
लाल फितीचा कारभार बंद करणे
उद्योगांना जमीन ,पाणी,वीज पुरवणे(शेतकऱ्यानं वर अन्याय न करता)
उत्तम दर्जाचे रस्ते बांधणी आणि
जलद न्याय व्यवस्था ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
प्रशासन स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे.
त्याची सफाई करणे.
शेती ला नक्की काय हवंय ते पुरवणे कर्ज माफी सारखा उनाड पना करू नये.
त्या पेक्षा बाजार पेठ,पाणी,वीज पुरवणे.
आणि सर्वात महत्वाचे नफ्यावर बंधन घालणे.
भरमसाठ नफा कमवता येणार नाही.
हे सर्व केले तर भारत चीन ला आरामात टक्कर देईल

Dear Mr. Khare

If you are thinking me as one of your patients and I am having a mental disability, please get a check up from right person. I already told you on another thread a doctor should give the blessing rather than always cursing the people with opposite thoughts.
Second thing.
It's about business, not about technology. and you can't run a business with only just motivational speech and blah blah blah!!!!
1. Now a days Indian MSME's can't run a single day operation because the supply of raw material from china is badly hampered and they won't even after lockdown.
2. The mobile phone manufacturers aren't willing to come in india, due to unions and red tape policies. There are various hubs in china, where they can produce at very cheap cost, and sell them worldwide.
Btw mobile phone manufacturers increased the price of phones, just because government increases GST.
I have may points to say, but... Sorry, because now I really don't think you have the stability to hear other side and think over it.
Bye. Last post..

तुम्हाला चीनला टक्कर देण्याची गरज नाही.
चीन वरचे अवलंबित्व संपवा.
विशेषतः निर्णायक आणि महत्त्वाच्या उत्पादनाबाबत.
जसे आज पाकिस्तानने 370 कलम रद्द केल्यामुळेआपल्याशी व्यापार बंद केला. त्याने आपल्याला शष्प फरक पडला नाही तसेच.

Pages