चीन शी व्यापार करावा की नाही ?

Submitted by नितीनचंद्र on 19 April, 2020 - 02:52

चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.

आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.

शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.

मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.

तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.

तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.

चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.

पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.

आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.

मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

राहुल बाबा ने राफेल वेळी पण असेच अगम्य आकडे सांगून पूर्ण देशाचे मनोरंजन केले होते !
Now again he is back !
Happy
कोणाला व्यसनाने नशा होते तर कोणाला ढोल वाजवल्या वर सुद्धा नशा होते !
या बाबाला मात्र न्यूज कॅमेरे दिसले की नशा होते आणि मग कसले ही आकडे फेकायला सुर वात करतो .
Happy

<< या बाबाला मात्र न्यूज कॅमेरे दिसले की नशा होते आणि मग कसले ही आकडे फेकायला सुर वात करतो . >>

---- खोटे बोलण्याच्या बाबत मोदी यांचा अव्वल क्रमांक आहे, मोदी हे मास्टर आहेत तर राहुल गांधी बालवाडीत.

चीनबद्दल च:
डोळे लाल करण्याची तारिख निश्चित झालेली आहे असे एक राज्य स्तरावरचे नेते बोलले. याचा काय किती गंभिर अर्थ निघतो ? असे वक्तव्य किती धोकादायक आहे हे कोण सांगणार ?

चीनपासून सावध राहा, असा इशारा भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी नेपाळला दिला आहे. नेपाळने आशियातील श्रीलंकेसह अन्य देशांकडून शिकायला हवे आणि चीनपासून सावध राहायला हवे, असं त्यांनी सांगितलं आहे. नेपाळचा घास गिळला जात असताना हिंदुस्थानचे सरकार तेव्हा हा प्रकार षंढासारखे बघत राहिले. नेपाळ हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम व सीतामाईंशी नात्याने जोडलेला हा देश, पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले? असा सवाल शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.

सामनाच्या अग्रलेखात लिहिले आहे की, नेपाळचा घास याआधीच चिनी ड्रॅगनने गिळला आहे. नेपाळमध्ये जाऊन हस्तक्षेप करणे म्हणजे दुसऱ्या देशातील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे या सबबीखाली आपण नेपाळचा रंग बदलताना उघड्या डोळ्याने सहन केला. मग आता नेपाळला फुकट सल्ले देण्यात काय फायदा? आज चीन हिंदुस्थानपेक्षा नेपाळच्या जवळ जास्त आहे. चीनने नेपाळची संस्पृती बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. चिनी भाषा शिकवणारे 25,000 शिक्षक नेपाळच्या गावागावात घुसवले आहेत. चीनने नेपाळला कर्जाच्या ओझ्याखाली दाबले आहे. नेपाळी जनतेला गुलाम केले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-modi-shivsena-sanjay-raut-u...

पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले? >>>>>>
आम्ही काय केलं ?
बघा कोण विचारतय ? Happy
बलाकोट surgical strike वरून लष्कराच्या पराक्रम वर संशय आणि पुलवामा वरून केंद्र सरकार
वर संशय घेणाऱ्या बालिश पप्पू ला मांडीवर बसवणारा विचारतोय आम्ही नेपाळ बद्दल काय केलं ?
ते सुध्दा हिंदू , राम आणि सीता शब्द वापरून !
म्हणजे हिंदुत्व सोडलं नसल्याचे वडा पाव वाल्यांना दाखवायचं त्याच बरोबर भाजप वर निशाणा साधून माय नो ला खुश ठेवायचं !
फुल्ल डोंबाऱ्याचा खेळ चालू केलाय संपादक ने . त्याच्या पक्षाची गरम डोकी सोडली तर इतर कोणीही सुशिक्षित डोकं शाबूत असलेला व्यक्ती संपादक ला सिरियस ली घेत नसावा !
काल पासून तर उठा ला पंतप्रधान पदी बसवायचा ध्यास घेतला म्हणे Happy
आमचा राहुल उठा ला कसं काय पंतप्रधान होवून देईल ? Lol
किती बोलाव ? , काय बोलावं ? याला काही मोजमाप च नाही . उचल जीभ की लाव टाळ्याला !!!

छ्या ! असे कोणी पेटंट घेवू शकते का ?
पण तुमच्या शब्दर्था प्रमाणे राऊत लालांचे डोळे सध्या हिरवे झाले आहेत , मग त्यांना राम नाम घेताना संकोच कसा वाटला नाही ? Happy

काँग्रेसमध्ये आहेत किंवा काँग्रेसशी युती केली तर रामाचे नाव घ्यायचे नाही का ? तुम्ही पेटंट घेतले का ? >>>>>>>
ते जाऊ द्या !
राऊत लाला नी " उठा ला दिल्ली खुणावते आहे , आणि उठा मध्ये पंतप्रधान होण्याचे गुण आहेत " असे सनसनाटी वक्तव्य केलंय . या मध्ये बाळ राहुल कडे दुर्लक्ष न करता तुम्ही काय विचार प्रदर्शित करू इच्छिता ? Happy

Happy समजलं !
होती अशी गोची कधी ! कधी !!

दिल्ली सर्वांची आहे
देश सर्वांचा आहे
नवीन Submitted by BLACKCAT on 19 December, 2020 - 18:29
>>
बरोबर. नैसर्गीक न्यायाच्या तत्वाने दिल्ली नगरपालीका (असते का?) व दिल्ली राज्याचा कारभार सर्व २२ भाषांमधुन प्रकाशीत केला जावा.
दिल्लीत गेल्यावर मराठीत बोलले तर त्वरीत मराठी भाषांतरकार आणुन सर्व सराकरी सेवा दिल्या जाव्यात.
सर्व फलक एकतर इंग्लिश या एकाच भाषेत असावे किंवा सर्व २२ भाषेत लिहावेत.
पोलीस, रेल्वे, लोकसभापती, राष्ट्रपती यांनी मराठीत कारभार करावा व मराठीत विचारलेल्या प्रश्नांना मराठीत उत्तर द्यावे.
ज्या देशाचे सरकार माझ्या भाषेत बोलत नाही, ते सरकार माझे कसे मानायचे?

Proud

दिल्ली सर्व देशाची संसदेत आहे

दिल्ली लोकल पालिका हे लोकल नियमानुसार असते

इतिहास 50 मार्क आणि ना शास्त्र 10 मार्क शिकवून हे दुष्परिणाम झाले आहेत

दिल्ली लोकल पालिका हे लोकल नियमानुसार असते
>>
मग फक्त NCR चा भागाला व केंद्र सरकारच्य्या थेट अखत्यारीतील ईमारती , विभाग, रस्ते व जागा यांना वरील नियम लागू करावे. ज्यात पोलीस, लोकसभापती व राष्ट्रपतीही येतात. व सर्व केंद्र सर्कारी कार्यालये सीबीआय, रॉ, सैन्य वगैरे ही येतात.
तसेच ज्याप्रमाणे दिल्ली लोकल पालिक लोकल नियमानुसार आहे, त्याप्रमाणे मुंबईही लोकल नियमाप्रमाणेच चालेल हे ही ध्यानात ठेवावे. इथे येईन तुमच्या इमोशन लादु नये व हिंदी लादु नये.

>>>काँग्रेसमध्ये आहेत किंवा काँग्रेसशी युती केली तर रामाचे नाव घ्यायचे नाही का ? तुम्ही पेटंट घेतले का ?

आजिबात नाही, राम राम ऐवजी मरा मरा म्हटलं तरी चालेल..वाल्याचा वाल्मिकी is in process Happy

बघा हळूहळू कसे सगळे रामावर हक्क सांगायला लागले, देवळात जायला लागले, गोत्र वगैरे सांगायला लागले, जानवी घालायला लागले..
7-8 वर्षापूर्वी हेच 'राम काल्पनिक आहे, रामसेतू असं काही नाही' इ. इ. कोर्टात लिहून देत होते stamp paper वर.
अयोध्येत राम मंदिर नव्हतच असं छातीठोकपणे सांगत होते..

रामाचं नाव कसंही घेतलं तरी ते काम करतंच..रामनामाचा महिमा अपरंपार आहे...

राम राम ऐवजी मरा मरा म्हटलं तरी चालेल..वाल्याचा वाल्मिकी >> धाग्याशी संबंधित नाही, पण एक जेन्यूईन प्रश्न आहे; वाल्या कोळी मराठी बोलायचा का? ही 'मरा मरा' ष्टोरी बरीच वर्षे ऐकतो आहे.

काल पासून तर उठा ला पंतप्रधान पदी बसवायचा ध्यास घेतला म्हणे >>>>>> Rofl आधी आहे त्या खुर्चीवर नीट बस म्हणावे. Proud

आमचा राहुल उठा ला कसं काय पंतप्रधान होवून देईल ? >>>>> मग ! हायेच आमचा रावल्या हुश्शार !

सोनिया गांधींनी पत्र पाठवुन अनुसुचीत जाती जमातींसाठी तरतुदी करायला सांगीतल्यात. बहुतेक वरतुन आदेश आल्यावरच मामु काम करत असतील.

>>असा सवाल शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.<<

सन्माननीय सदगृहस्थ त्याच कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते ना? किती वेळा या विषयावर बोलले महाशय?
का नाही वाचा फोडली तेंव्हा?
वर्तमानपत्रातून जाब विचारायला काय लागते?
इथले फुटकळ आयडी पण विचारतात मोदींना जाब!
त्याने काय होतय?

नसेल किंवा असेल मराठी, पण राम सरळ म्हणायचं नाही म्हणून उलटं म्हणून सुद्धा सिद्ध झाली एक व्यक्ती..
Intentionally he wanted to make fun/ not trust / disrespect..whatever...तरीही over the period of time it worked

हं

मग तुम्हीही दिमो दिमो हाश हाश म्हणा

मोदी तरी कुठे संसदेत , पत्रकार परिषदेत उत्तर देतात ?
सगळे ट्विटर वर लिहितात

पाकिस्तानची कुणाची आई मेली तर त्यांनी मोठे पत्र लिहिलंय म्हणे सांत्वनाचे
आणि 20 शेतकरी मरूनही इथे ना पत्र ना सत्र

पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले? >>>>>>
औरंगाबाद चे संभाजी नगर करणे यांना आज पर्यंत जमले नाही , महाराजांच्या नावाने विड्या बनवणाऱ्या कंपनी कडून खंडण्या घेवून हायात घालवली , आजान च्या स्पर्धा घेण्याची स्वप्न यांना पडतात आणि काळजी कुठली तर नेपाळ मधील हिंदुत्व संपत असल्याची !!!!!

शीर्षक वाचून लेखकाला चीनशी व्यापार करावा की नाही याबद्दल शासनाने मत विचारले असावे, त्यामुळे लेखक मायबोलीवर जनमत चाचणी घेऊन निर्णय घेणार असावेत असा अंदाज केला. बरोबर आहे का?

औरंगाबाद चे संभाजी नगर करणे यांना आज पर्यंत जमले नाही

Proud

अहमदाबादचे कर्णावर्त कधी होणार ?

सत्ता गेली की भाजपे दंगल , नामांतर , हिंदू मुस्लिम , आरक्षण ह्यात जीव अडकवतात

Pages