चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.
आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.
शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.
मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.
तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.
तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.
चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.
पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.
आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.
मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.
सत्ता गेली की भाजपे दंगल ,
सत्ता गेली की भाजपे दंगल , नामांतर , हिंदू मुस्लिम , आरक्षण ह्यात जीव अडकवतात
नवीन Submitted by BLACKCAT on 4 January, 2021 - 19:03
--
औरंगाबाद चे संभाजी नगर करण्याची मागणी भाजपाने कधी केली होती ? काही पुरावा ?
https://m.lokmat.com
पुरावा की गाडावा , तुमचे तुम्ही बघा
https://m.lokmat.com/maharashtra/give-power-bjp-aurangabad-municipal-cor...
सत्ता द्या, लगेच औरंगाबादचे नामांतर करतो , मा चंद्रकांत पाटील
चंपा बॅग भरून चांदणी चौकात
चंपा बॅग भरून चांदणी चौकात कोल्हापुर एस.टी. ची वाट बघत उभा है.. त्याला आता खोत्रुडातल्या सासुरवाडीपेक्षा कोल्हापुरातल्या संभाजीनगर मधे सुरक्षीत वाटत असेल.
(No subject)
अरे दारु , सिगरेट पण एका
अरे दारु , सिगरेट पण एका दिवसात सुटत नाही..... सोडायचा प्रयत्न केला की त्रास होतो!
इथे तर चिनी मालाचे एव्हढे मोठे बिझनेस मॉडेल आहे.... स्टेप बाय स्टेप कमी करावे लागेल..... ज्या कच्च्या मालाला/ टेक्नॉलॉजीला तितका रास्त पर्याय उपलब्ध नाही आणि जे वापरुन आपण काहीतरी लोकोपयोगी करतोय तर त्याला विरोध करु नये.
पण छोटेमोठे फिनिश्ड प्रॉडक्ट, खेळणी, ॲप्स वगैरे न वापरुन आपण दबाव तर आणूच शकतो ना?
हे सगळे फक्त आणि फक्त राजनैतिक दबावासाठीच चाललेले आहे!
चीन, पाकिस्तानविरुद्धही जर
चीन, पाकिस्तानविरुद्धही जर आपल्या पंतप्रधानांच्या बरोबर उभे राहू शकत नसाल तर तुमचे राजकारण, व्यक्तिद्वेष कुठल्या पातळीवर गेलाय याचे जमले तर आत्मपरीक्षण करा!
बाकी बरेच मुद्दे आहेत की राजकारण-राजकारण खेळायला!
टनेल खोदायला चिनी लागतात का ?
टनेल खोदायला चिनी लागतात का ?
पांडव लाक्षागृहातून टनेल खोदून पळाले ना ?
आधी आपले पंतप्रधान चीन आनि
आधी आपले पंतप्रधान चीन आनि पाकिस्तानच्या विरोधात उभे आहेत हे स्पष्ट होऊ द्या.
>> हे स्पष्ट होऊ द्या.<<
>> हे स्पष्ट होऊ द्या.<<
ते आणि कसे करायचे म्हणे?
म्हणजे काय केल्याने तुमची खात्री पटेल?
ईटालियन फॅमिलितील 'राष्ट्रीय
ईटालियन फॅमिलितील 'राष्ट्रीय विदुषकांने' मान्य केले
तरच त्या फॅमिलीच्या चाटूना खात्री पटेल.
तो काय चीनबरोबर झुला झुलायला
तो काय चीनबरोबर झुला झुलायला बोलला का ?
झुलतो बाई रास झुला
<< आधी आपले पंतप्रधान चीन आनि
<< आधी आपले पंतप्रधान चीन आनि पाकिस्तानच्या विरोधात उभे आहेत हे स्पष्ट होऊ द्या. >>
------- गलवान मधे झालेल्या भांडणात भारताचे मोठे नुकसान झाले. पहिला हल्ला मे २०२० मधे झाला, मग पुढे १५ जून ला झालेल्या हल्ल्यात ( fight with rods, studded rods, stick, fist fight) भारताचे किमान २० जवान शा धारातिर्थी पडले. शेकडो जवान जखमी, जायबंदी झाले.
पुढे सर्वपक्षिय सभेत, पंतप्रधान मोदी, यांनी चीनचे नाव घेणे टाळले. चीन हजार चौरस कि. मी. देशांत आत आला आहे. आणि प्रधान म्हणतात, " न कोई वहा हमारी सिमा मे घुस आया है.. न कोई.... " गुगल्यावर हे मिळमिळीत भाषण मिळते.
पैसे मोजून राफेल किंवा अत्याधुनीक रडार किंवा अजुन काहे तंत्रज्ञान विकत घेता येते... सिरिया, कतार, ओमानही राफेल विकत घेतो. पण विस - विस जवान मारल्या गेल्यावरही शत्रूराष्ट्राचे साधे नाव घेण्याचे धाडस देशाच्या प्रधानांना होत नसेल तर असे धाडस जगाच्या कुठल्या बाजारांत विकत मिळते? ( तरी सनी देओल पक्षाचे खासदार आहेत)
किती चिनी सैनिक मेले ही
किती चिनी सैनिक मेले ही माहितीही हुडकून आणा.
नुसते मावळे आणि कोथळे म्हणजे जहाल भाषण नव्हे हे तुम्हाला लवकरात लवकर उमगावे यासाठी शुभेच्छा!!
<< किती चिनी सैनिक मेले ही
<< किती चिनी सैनिक मेले ही माहितीही हुडकून आणा.
नुसते मावळे आणि कोथळे म्हणजे जहाल भाषण नव्हे हे तुम्हाला लवकरात लवकर उमगावे यासाठी शुभेच्छा!! >>
------- तुमच्या कडे माहिती असेल तर तुम्ही लिहा , चीनशी लढणे म्हणजे तिन दिवसांत सेना तयार करण्या एव्हढे सोपे नाही हे तुम्हाला (तुमच्या विचारसरणीच्या लोकांना) लवकरांत लवकर उमगावे यासाठी शुभेच्छा.
जहाल भाषण अपेक्षित नाही. त्यांचा जहाल पणा केवळ दुर्बळ जनतेसमोरच, आणि कष्टकरी शेतकर्यांसमोरच दिसते. चीन देशात घुसलाच नाही असे सर्वपक्षिय सभेत सांगणे हा मोठा देशद्रोह आहे.
https://thewire.in/government/narendra-modi-china-video-pmo-censor
चीनचे किती गेले याने ब्भारताचे २० जवान गेलेले परत येणार नाहीत. आणि तुमचे भारताच्या जवानांप्रती असलेले प्रेम पुलवामा मधे दिसले. चाळिस जवान शहिद झाले, पण हल्ला कुणी घडवला हेच आजही माहित नाही. साधी चौकशी नाही...
पुलवामा येथे कार्य करणारा DSP देवेंद्र सिंह हा अतिरेक्यांसोबत प्रवास करतांना पकडला गेला.... गंभिर आरोपानंतरही त्याला जामिन मिळतो.
हातातोंडाशी आलेला पराभव पुलवामा मुळे टळला....
बालाकोट झालं की नाही? :).:)
बालाकोट झालं की नाही? :).:)
>>हातातोंडाशी आलेला पराभव
>>हातातोंडाशी आलेला पराभव पुलवामा मुळे टळला....<<
दिल बेहलाने के लिये ये खयाल अच्छा है!
<< बालाकोट झालं की नाही? :).:
<< बालाकोट झालं की नाही? :).:) >>
---- बालाकोट झाले वा झाले नाही हे महत्वाचे नाही आहे, यापेक्षा ४४ जवानांना हकनाक प्राण गमवावा लागला त्या स्फोटाची साधी चौकशी झाली नाही याचे दु:ख मला आहे.
३०० किलो चे स्फोटके देशात आलेच कसे ? जवानांचा मोठा ताफा रस्त्याने जाणार होता त्याची माहिती आणि वेळ या बद्दलची खडानखडा माहिती स्फोट " घडवणार्याला " कुणी पोहोचविली ?
DSP देवेंद्र सिंहचा काही संबंध आहे का?
स्फोट झाल्याच्या अर्ध्या तासांतच स्फोट कुणी घडवला याचे अनुमान काढले गेले (कारण जैशने तशी जबाबदारी स्विकारली होती - पुरावा काय तर जैशचा कबुलीजबाब). जसे काही सर्व स्क्रिप्ट आधी तयारच होते.
प्रत्येक जिव महत्वाचा आहे, आणि येथे ४४ जवान बळी पडले... जवानांच्या हौतात्म्याचा फायदा निवडणूकीत घेतला आणि आता त्यांना विसरले असे तर नाही ना? हौतात्म्य विसरले नसतील तर सखोल चौकशी झाल्याचे काही अहवाल? कुठे पाठपुरावा?
बालाकोट घडविले कारण या स्फोटाची चर्चा करायचीच नव्हती.... चौकशी आणि शिक्षा तर फार दुरची गोष्ट आहे.
ध्रुव सक्सेना,माधुरी गुप्ता व
ध्रुव सक्सेना,माधुरी गुप्ता व काल 4वर्षे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निवृत्त जवान सुधीर शर्मा या मुस्लिमांना ATSने अटक केली आहे. हे तबलिघी देशासाठी घातक आहेत.
पूर्व लडाखमधील चुशूल
पूर्व लडाखमधील चुशूल सेक्टरमध्ये असलेल्या गुरंग हिल भागात एका चिनी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं होते. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराचा हा जवान शनिवारी भारतीय हद्दीत शिरला होता. या सैनिकाला तात्काळ सोडण्याची मागणी चीनकडून करण्यात आली आहे. अंधार असल्यानं तो सैनिक रस्ता चुकला, असं चीनकडून सांगण्यात आलं आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/china-calls-for-immediate-retu...
चीनचे सामानही असेच चुकून येते की काय
एकच मेसेज किती ठिकाणी
एकच मेसेज किती ठिकाणी चिकटवतात लोक्स
हातातोंडाशी आलेला पराभव
हातातोंडाशी आलेला पराभव पुलवामा मुळे टळला....
नवीन Submitted by उदय on 10 January, 2021 - 00:58
--
तुमचा 'गळू' का ठसठसतोय त्याचे खरे कारण आता कळले.
पुलवामा मधे जवान शहिद याचे दुखः तुम्हाला नाही, दुख: कसले तर पराभव टळल्याचे ?
“ना कोई वहाँ हमारी सीमा में
“ना कोई वहाँ हमारी सीमा में घुस आया है, ना ही कोई घुसा हुआ है, ना ही हमारी कोई पोस्ट किसी दूसरे के क़ब्ज़े में है”
https://navbharattimes.indiatimes.com/world/asian-countries/china-has-bu...
चौकीदार नरेंद्र थापा हाजीर हो
चीनी नववर्षाच्या सर्वांना
चीनी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा !
Fascinating Chinese document
Fascinating Chinese document surfaces, with insights into how PLA reads Indian strategic mind : https://www.youtube.com/watch?v=DDYM8qXRRZQ
अतिशयच इंटरेस्टिंग माहिती आणि अॅनालिसिस बाय शेखर गुप्ता.
चीनी नववर्षाच्या सर्वांना
चीनी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा >> थॅंक्यु
<< अतिशयच इंटरेस्टिंग माहिती
<< अतिशयच इंटरेस्टिंग माहिती आणि अॅनालिसिस बाय शेखर गुप्ता. >>
------ छान माहिती दिली आहे. लिंक बद्दल धन्यवाद.
आयपीएल ला चिनी विवो कम्पनीची
आयपीएल ला चिनी विवो कम्पनीची स्पॉन्सरशीप
भाजपचे अभिनंदन
चीनमधून होणार्या गुंतवणुकीला
चीनमधून होणार्या गुंतवणुकीला यापुढे परवानगी लागेल असा नियम एका वर्षाच्या आतच सैल केला.
https://www.business-standard.com/article/economy-policy/automatic-appro...
The government is looking at easing restrictions for Chinese foreign direct investment (FDI) by allowing companies from the bordering country to invest up to 25 per cent in a company through automatic route.
चीन अमेरिकेला मागे टाकून
चीन अमेरिकेला मागे टाकून भारताचा टॉप ट्रेडिंग पार्टनर झाला. अमेरिकेत मोदींचे लाडके मित्र डोलांड ट्रंप राष्ट्राध्यक्ष असताना आणि चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी करून कित्येक वर्षांत पहिल्यांदाच आपल्या सैनिकांना ठार केलं त्या वर्षात हे घडलं हे विशेष.
https://indianexpress.com/article/business/border-tension-aside-china-in...
<< चीनने आपल्या हद्दीत
<< चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी करून कित्येक वर्षांत पहिल्यांदाच आपल्या सैनिकांना ठार केलं त्या वर्षात हे घडलं हे विशेष. >>
------ तुम्ही पंतप्रधान यांचे भाषण एकले नाही का ? त्यांनी सांगितले आहे, " न कोई वहा हमारि सिमा मे घुस आय आया है, न कोई घुसा हुआ है, न हि हमारी कोई पोस्ट किते किसी दुसरे के कब्जे मे हौ है... "
https://twitter.com/PMOIndia/status/1274003446195040256
भारताची मिडिआ चिडीचूप पण चीन ने मोदी यांच्या क्लिपचा मस्त प्रसार केला. याला म्हणतात मास्टर स्ट्रोक. आपली भुमिका सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशाच्या शत्रूचीच प्रचार यंत्रणा फुकटात वापरायची. आखिर मे गुजराथी ब्यापारी दिमाग है.
Pages