खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ तुझी बायको आहे की सुपरवूमन. मी तर एवढं बनवायचा विचार करूनच थकून जाईन. सॉलिड आहेत एक एक पदार्थ. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बायकोला तूझ्या सा. न.

सगळयांना अनुमोदन .. एवढे पदार्थ बघूनच थकायला झालं पण एक से एक भारी दिसत आहेत ... मिल्क & चॉकलेट डोनटस मस्तच .. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

धन्यवाद सर्वांचे
कौतुक आणि शुभेच्छा बायकोपर्यंत पोहोचवतो Happy

ऋन्मेष लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! दृष्ट लागावी असे कुटुंब आहे तुमचे. मेन्यु बद्दल तर क्या केहने? अफाट आहे. #respect

हाय अमृता, धन्यवाद रेसिपीसाठी. Happy मी खूप वर्षांपूर्वी कोल्हापुरात फडतरेंची मिसळ खाल्लेली. प्रचंड आवडलेली. तेव्हापासून कोल्हापुरी रश्शांवर विशेष प्रेम.

एवढं चांगलं चुंगलं आदल्या दिवशी खाल्यावर आणि दुसरया दिवशी दुपारीही तेच उरलेले फस्त केल्यावर रात्री अगदीच भाजी चपाती नको म्हणून कढीपकोडा केले. नव्या कुठल्यश्या रेसिपीने. अगदी अफाट झाले होते. खाताना थांबूच नये असे वाटत होते Happy

हो राजसी छान होते ही डिश. त्यात गुलकंद, टुटी फ्रुटी , थोडे ड्रायफ्रुट्स आणि मेल्टेड व्हॅनिला आईस्क्रीम टाकले आहे.

आज वर्क फ्रॉम होम करताना सहज डेस्कटॉपच्या मोठ्या स्क्रीनवर मायबोली आणि हा धागा उघडला आणि आई ग्ग निसता थिजून गेलो. फक्स्त जीभ गळत होती

ब्रेड पिझ्झा
जवळपास पिझ्झाच खातोय असे वाटले. कारण खरी मजा तर मोझारेला चीज आणते.

पिकू , वडापावची आठवण येऊन पोटात खड्डा पडला . आताच्या आता एक खावस वाटतो .
ऋन्मेष , तुमची बायको सुगरण आहे . भारी आहेत सगळेच पदार्थ.
कढी पकोडा पाहून स्टेटस हॉटेलातील जेवण आठवलं. कधी परत जाणं होईल कोणास ठाऊक !!!

कढी पकोडा पाहून स्टेटस हॉटेलातील जेवण आठवलं.
>>>
नरीमन पॉईंटवाले का.. गुजराती थाली.. मागे मंत्रालयात जाणे व्हायचे तेव्हा तिथेच पावले वळायची

कौलांवर पण करता येते का तंदुरी. कसली बनलेली असतात ही कौले. तंदुरी करून झाली की फेकून देतात की परत वापरता येतात.

Pages