कोरोना चे तुमच्या जीवनावर परीणाम

Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39

सभ्य स्त्री पुरुष हो,

कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.

( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वार आणि तारीख कोणती आहे ते वारंवार आठवावे लागत आहे. काही दिवसांनी तर, समोर कॆलेंडर आणले तर गोंधळच होईल असे वाटते.

चेर्नोबिल परमाणु दुर्घटना घडल्यानंतर तिथले प्रायप्याट शहर संपूर्णपणे अणूकिरणोत्सर्ग बाधित झाले होते. एकेक वस्तू न वस्तू स्पर्श करण्यासाठी सुद्धा धोकादायक बनल्या होत्या. लोकांनी घरदार जसेच्या तसे टाकून शहर सोडून पोबारा केला होता. आजही या शहरात कोणीही राहत नाही. सध्या हे शहर "घोस्ट सिटी" अर्थात भुताटकीचे शहर, म्हणून ओळखले जाते. मागच्या वर्षी का काय ह्या शहराविषयी वाचले होते. कोरोनाव्हायरसच्या पुण्यातील प्रादुर्भावामुळे आणि हवेत तीन तासांपर्यंत तर वस्तूंवर तीन दिवसपर्यंत राहू शकतो हे वाचनात आल्यापासून त्या बाधित शहराची कथा राहून राहून आठवत आहे. सुदैव इतकेच कि विषाणूच्या बाबतीत वरचेवर हात साबणाने धुणे या उपाय आहे. पण बाहेर जाणे, वस्तूंना स्पर्श करणे, काही खरेदी करून आणणे ह्या नेहमीच्या गोष्टी आता धोकादायक वाटू लागल्या आहेत. क्वचित बाहेरून काही आणले कि ते शक्यतो आधी साबणाने धुवून घ्यावे (जसे कि दुधाची पिशवी) अन्यथा बाकीच्या वस्तू जितके शक्य तितके (जास्तीत जास्त तीन दिवस) घरीच पण हात लागणार नाही अशा ठिकाणी बाजूला क्वारंटाइन करून ठेवाव्या लागतात. सोसायटीनेच सर्वांसाठी जे परिपत्रक काढले आहे त्यात या सूचना आहेत. बाहेर जायचे तरीही अंगभर कपडे घालून मगच बाहेर जाणे असे सूचित केले आहे. खरेच चेर्नोबिल मध्ये काय हाल झाले असतील कल्पनाच न केलेली बरी.

कधी कधी जणू भयगंडाने पछाडले आहे अशी अवस्था होते नि आपला "मिस्टर बिन" होतो. परवा तर हद्द झाली. दुकानातून काजूबियांचे पॅक घेऊन आलो. डीप फ्रीजर मध्ये काजूबिया खूप काळ टिकतात म्हणून तिथे ठेवायची नेहमीची सवय. विचार केला कि क्वारंटाइन म्हणून बाहेर ठेवण्यापेक्षा थेट आतच ठेऊ. फक्त तीन दिवस हात लावायचा नाही इतकेच, काय फरक पडतो? असे म्हणून ते पॅक फ्रीजर मध्ये ठेवले खरे. पण रात्री झोपेत मनात विचार आला, कि त्या पॅकवर जर कोरोना विषाणू असतील तर फ्रीजर मध्ये काजू बी प्रमाणे ते सुद्धा जास्त काळ टिकून राहतील नाही का? बोंबला. झोप पार उडाली. ताडकन उठलो आणि ते पॅक बाहेर काढून क्वारंटाइन विभागात ठेवले. हात पुन्हा साबणाने धुतला आणि अंथरूणावर अंग टाकले. तोच पुन्हा विचार मनात आला, "अरे, पॅक तर आपण बाहेर काढले खरे. पण त्यावरचे काही विषाणू फ्रीजमध्येच चिकटून राहिले असतील तर?" Biggrin Biggrin

तर सांगायचा मुद्दा हा कि कोरोनाचा जीवनावर असाही परीणाम झाला आहे Happy

नौटंकी, अहो उद्या गुढीपाडवा आहे, दिवाळी चा पाडवा नाही >>

खरंय पण असा रिकामा नवरा परत लवकर सापडणार नाही. Lol आणि असंही आमच्याकडे गणपती आणि गुढीपाडवा अशी दोन वेळा साफसफाई असते. आय मीन नवर्याची टर्न असते. माझी वर्षभर बारीकसारीक चालूच असते.

सगळे घरी आहोत, तर जरा एकमेकांसोबत वेळ घालवू, असं दोन दिवस नवऱ्याला समजवत होते. सतत टीव्ही आणि मोबाईल पाहून त्याची चिंता वाढली होती. तसाही त्याचा स्वभाव "चिंतातूर जंतू" असाच आहे.
आज जरा शांत आहे तो. सकाळी फ्रीज साफ केला दोघांनी. लेकीला तर खूप छान वाटतंय, शाळा नाही, आजी-आजोबा,मम्मीपप्पा सगळेच घरी. तिची धमाल चाललीय. जेवणही वाढलंय तिचं.

रच्याकने,
घरच्या वजन काट्यानुसार तिसर्या दिवशी मी तिसर्या फेज मधे पोहचलो आहे. इति वजनाचा गुणाकार
खरच रूम क्वारंटाईन ची गरज आहे. देव माझे भले करो.

लवकरच गोवेकर बाई इंटरनेटवर 'करोना लॉकडाऊन मध्ये दर 2 तासांनी खाऊन निरोगी कसे राहावे' यावर एक फेसबुक पोस्ट टाकतील.वाट पाहा.
तसेच हेलथीफायमी, फिटबीट वगैरे वर चॅट बॉट कडून 'लॉक डाऊन डायट' नावाचा नवा प्लॅन माफक जास्त किंमत घेऊन विकला जाईल.
प्रत्येक संकटात संधी.

वार आणि तारीख कोणती आहे ते वारंवार आठवावे लागत आहे. >> अगदी अगदी . मला वाटत माझेच नाही घरच्याचे ही हेच हाल आहेत . कारण आम्हि आठवडाभर घरी आहेत .
शनिवारी सकळी साबा मला विचारत होत्या , तुझ ऑफिस चालू आहे ना नेहमीप्रमाणे . म्हटलं नाही हो , आज शनिवार आहे Happy .आज सुट्टी आहे .

पण निदान मी दिवसभर लॅपटॉप घेउन असते त्यामुळे सारख उजव्या कोपर्यात खाली लक्श असतं Happy

मला स्वयंपाक जमत नाही म्हणून जेवण हवे असल्यास छोट्या पोराचे आंघोळपाणी, शीशी-सूसू, कपडे बदलणे, जेवण भरवणे वगैरे काम माझ्याकडेच असते. याऊपर दोघांसोबत खेळणे आलेच. ते एकत्र आपसात खेळताना सोबत त्यांना मी लागतोच अन्यथा ते भांडण मारामारीच करतात. आधीही ऑफिसमध्ये काम करून आल्यावर हे सारे करावे लागायचे. पण निदान ऑफिसमध्ये फावला वेळ मिळायचा. आता त्या फावल्या वेळातही डोक्यावर ही कामे असतातच. आधी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी ही कामे दिव्सभर असायची, पण त्या दिवशी ऑफिसचे काम नसायचे.
थोडक्यात सध्या दोन्ही कामे दिवसभर झाल्याने सर्व गॅप्स फिल झाल्या आहेत. त्यातूनही मी वेळ काढून माबोवर ही पोस्ट लिहितोय हे कौतुकास्पद आहे.

शनिवारी सकळी साबा मला विचारत होत्या , तुझ ऑफिस चालू आहे ना नेहमीप्रमाणे . >>

त्यांनी कपाळावर मारलेला हात दिसला नसणार ना??? Wink Wink

तारीख वार फार दूरची गोष्ट.. या आठवड्यात कधीतरी गुढीपाडवाही येऊन जाणार आहे. तो सुद्धा समजणार नाही. शनिवार ते मंगळवार कॅलेंडरवाईज सर्व दिवस समानच वाटले.

त्यांनी कपाळावर मारलेला हात दिसला नसणार ना....हा हा

अरे आता हांता नावाचा नवीन व्हायरस चायानामध्ये आलाय.1 जण दगावला.32 जण संशयित.

आज टीम मिटींगमध्ये शेड्युलिंग करत होतो. एकाने एका सबमिशनची डेट एक दिवस जास्तीची सांगितले. एक्स्ट्रा दिवस का लागतोय असे विचारताच तो साळसूदपणे म्हणाला गुढीपडव्याची एक सुट्टी आहे ना?? सेक्शन मॅनेजरनी तिथेच त्याला झाप झाप झापला. खायच्या आधीच त्याच्या पुरणपोळ्याही बाहेर काढल्या. सारे आपापला माईक म्यूट करून वेड्यासारखे हसत होते.

अरे आता हांता नावाचा नवीन व्हायरस चायानामध्ये आलाय.1 जण दगावला.32 जण संशयित.
>>>
घाबरण्याचे कारण नाही. तो कोरोनासारखा हात मिळवल्यावर पसरत नाही. ऊंदीर खाल्ला तरच होतो.

त्यातूनही मी वेळ काढून माबोवर ही पोस्ट लिहितोय हे कौतुकास्पद आहे.

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 24 March, 2020 - 18:42

_/\_ वेळात वेळ काढून लिहिल्याबद्दल धन्यवाद

एक्स्ट्रा दिवस का लागतोय असे विचारताच तो साळसूदपणे म्हणाला गुढीपडव्याची एक सुट्टी आहे ना?? सेक्शन मॅनेजरनी तिथेच त्याला झाप झाप झापला>>>

का??? . माझ्या बॉसने दुपारी 1 ला मीटिंग invite टाकले आणि मला झापतो, मेल बघत नाही म्हणून. मी म्हटले 1 ला माझा लंच टाइम आहे. मी तेव्हाच लपटॉप बंद करून जेवायला बसले. मेल कशि बघू?? तू व्हाट्सप ग्रुपवर तरी लिहायला हवे होतेस, ते बघितले असते. मग मीही झापले. Wfh म्हणजे नो लंच, टी ब्रेक, नो हॉलिडे असे अजिबात नाही म्हणून.

उद्याच्या गुढीसाठी काठी धुऊन ठेवली. ती बांधायला सुतळ्या शोधून ठेवल्या.
वारंवार हात धुण्याचे काम वाढले आहे.डोअर नॉब्स, डोअर बेलचे बटन डेटॉलने पुसण्याचेही. केर लादी भांडी ही कामे वाटून घेतली आहेत. ओले वाटाणे २/३ किलो आणले होते तेही प्रत्येकाचे वाटे ' घालून' सोलून झाले. प्रत्येकाने दिवसातून तीनदा मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या आणि वाफारा हे 'मष्ट '. हे ॲडिशनल काम. रात्री लवकर झोपायला लावणे (८-९ तास झोपेसाठी) हेही मष्ट. (हे स्वेच्छेने आणि कसोशीने पाळले जातेय. टीवी लवकर बंद करायलाही सम्मती आहे. कारण कार्यक्रमच नाहीत.)सकाळी अर्धे लिंबू गरम पाण्यातून प्यायचे हे मष्ट करायचा प्रयत्न फसला. म्हणून बरे झाले, लिंबे भराभर संपू लागली होती.
वगैरे

मला वाटते कचरा पिशवीत काढून बाहेर ठेवला तर बरे पडेल. कचऱ्याच्या डब्याला हात लागणार व परत तो डबा घरात
येणार.

प्लास्टिक ऐवजी वर्तमानपत्रात गुंडाळून कचरा ठेवला तर बरे. कचरा कुंडीत गुरे व कुत्रे प्लास्टिक।चिवडत बसतात ते बघवत नाही.

आम्ही असेच करतो. पिशवीखाली एक जाडसर कागदाचा तुकडा ठेवतो. पिशवीतून पाणी गळलेच तर या कागदाने ते शोषून घ्यावे आणि बाहेरच्या लादीवर डाग पडू नये म्हणून. हा कागदही कचरेवाल्याला पिशवीबरोबर न्यायला सांगितलेय

जर आपण घराबाहेर पडणार नसू, आपल्याला भेटायला कोणी येणार नसेल, बाहेरून गोष्टी/ सामान वगैरे आणून लोकांना भेटून २-३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ ऊलटला असेल तर वारंवार हात धुणे, चेहर्‍यलाअ हात न लावण्याची कायम दक्षता घेणे, सरफेस डिसईन्फेक्शन करत राहणे आणि तरीही ईन्फेक्शन होण्याची भिती बाळगत राहणे कितपत गरजेचे आहे?

गेली 3 वर्षे माझ्याकडून पुढे पुढे ढकलला जाणारा छोटा hydroponics project यावेळी पूर्ण होईल असं वाटतंय....

त्याशिवाय आणखी बरेच वैयक्तिक प्रोजेक्ट्स (सोलर चार्ज कंट्रोलर पासून automated फार्म कंट्रोल सिस्टम पर्यंत) पूर्ण होतील एव्हढा वेळ मिळालेला आहे ( तीन weeks घरी बसणे म्हणजे अत्याचार आहे)

त्याशिवाय एक कुटुंब परिसरातील गस्तीवर असणार्या पोलिसांना नास्ता देणार आहे. त्यांना काही मदत करता येते का ते पहायचे आहे.

Pages