Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39
सभ्य स्त्री पुरुष हो,
कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.
( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१. त्यात मला सिगारेट प्यायची
१. त्यात मला सिगारेट प्यायची सवय आहे..किमान दिवसातून एक तरी मिळाली तरी चाललं असतं पण ते पण नाही...
<<
पहिले २ ते ३ दिवस वाईट जातात. त्यानंतर क्रेव्हिंग संपते. सिगारेट, तंबाकू स्सगळं एकाच वेळी बंद केलेलं चांगलं. सुटली तर खुष रहा. मी १० वर्षांपूर्वी सोडली.
२. कचरा व डिसइन्फेक्शन.
घरातली ब्लीच, उदा. जीवन ड्रॉप्स वा आला व तत्सम. यांत सोडियम हायपोक्लोराईट उर्फ ब्लिचिंग पावडरचे पाणी असते. याचे ०.०५% द्रावण फवारल्यास व्हायरस मरतो.
याऐवजी लायसॉल नामक डिसइन्फेक्टंट वापरू शकता.
लायसॉल मिळेना झालं असेल आतापर्यंत. ब्लीच आहे अजूनही.
३. मानसिक संतुलन.
https://www.youtube.com/watch?v=TvDs4DkHxqk
हे गृहस्थ क्वलिफाईड सायकिअॅट्रिस्ट (एमडी, ससून मधून पास झालेले) आहेत. याशिवाय विपस्सना गुरू आहेत.
४. उन्हाने हा व्हायरस मरणार नाहिये. ५६ अंश सेल्सियस तापमान लागते. आपल्याकडे सावलीत ४० पर्यंत जाते. आमच्या खानदेशात ४२.
भर उन्हात रस्ते, गाड्यांचे टप, लोखंडी रेलिंग्स वगैरे ५० च्या पुढे जातात. तरीही उन्हाळा आपल्याला वाचवेल याची १००% खात्री नाही.
०.
सध्याचा लॉकडाऊन म्हणजे करोना मारायचा इलाज नाही. याचा फायदा इतकाच होतो की अॅक्युट केसेसची संख्या अचानक पीक होऊन्/झपाट्याने वाढून आरोग्य सेवांवरचा ताण असह्य होत नाही. हा ताण अती झाला तर वृद्धांना मरू द्यावे लागेल अशी एक्झिक्युटिव्ह डिसिजन घ्यावी लागते.
तेव्हा २-३ अठवड्यांनी करोना जाऊन पुन्हा नॉर्मल होईल अशी परिस्थिती नाही.
दु:खात सुखाची बाब अशी आहे की अजूनही मॉर्टॅलिटी रेट २%च आहे. तेव्हा घाबरून जाऊ नका. यापेक्षा जास्त जीवघेणे साथीचे आजार येऊन गेलेत. हा जगभर पसरतो आहे, अन त्यापेक्षा जास्त वेगाने व्हॉट्सॅप जीव घेतं आहे इतकाच प्रॉब्लेम आहे.
आज सकाळी गुढी आणि
आज सकाळी गुढी आणि शुभेच्छासंदेश, फोन यामुळे वेळ बरा गेला. संध्याकाळी कुठल्यातरी चॅनेलवर ' दंगल' लागला होता. माझ्या ऑल टाइम फेवरिट यादीत असल्याने वेळ बरा गेला. जेवण सकाळी एकदाच केले जाते. फक्त भात ताजा असतो. घासायची भांडीही कमी होतात.
खरे तर घरात राहून अधिक सोश्यल व्हायला झाले आहे.
घरातून काम असल्यामुळे सध्या
घरातून काम असल्यामुळे सध्या मिळणाऱ्या फावल्या वेळात आध्यात्मिक वाचन करत आहे. सध्या आदि शंकराचार्यांनी लिहिलेले 'भज गोविंदम' वाचत आहे. त्यात त्यांनी म्हणल्याप्रमाणे सगळा जन्म फक्त संसाराचे प्रश्न सोडवण्यात किंवा त्यातच रममाण होण्यात जातात परंतु मन:शांती काही शेवटपर्यंत मिळत नाही. रोजचे जीवन फक्त प्रॉब्लेम आणि ते सोडवण्याची धडपड यातच खर्च होते पण शेवटपर्यंत काही प्राब्लेम संपत नाही पण जीवन संपत जाते. बालपण खेळण्यात तारुण्य संसारात आणि वृद्धत्व चिंतेत जाते आणि त्यातच जगणे संपून जाते. शंकराचार्यांनी म्हणलेले बरेच रिलेट होतंय खास करून सध्याच्या काळात. त्यांनी म्हणल्याप्रमाणे भव समचित्तः सर्वत्र त्वं म्हणजेच सर्व परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करतोय. उलट मनाला त्रास करून घेण्यापेक्षा अवघड परिस्थितीत शांतचित्त कसे राहता येईल आणि गरज कमी कश्या करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी सद्य परिस्थितीचा उपयोग करून घ्यायचे ठरवले आहे
कोरोनाच्या उद्रेकामुळे अचानक
कोरोनाच्या उद्रेकामुळे अचानक आपण सगळेच घरात बंदिस्त झालो आहोत. दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा विळखा मनाला उदास करणारा आहेच पण ह्या पासून स्वतःला आणि इतरांना ही वाचवायचं असेल तर घरातच रहाणे हाच एकमेव उपाय आहे म्हणून घरात रहाण्याचं महत्व ही मनातून पटत आहेच. सध्या आमच्याकडे आम्ही दोघेच आहोत त्यामुळे घरात कंपनी फारशी नसल्याने, आनंदी राहण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत आहे.
कामवाल्या बाईला दहा दिवसांपूर्वीच सुट्टीवर पाठवल्या मुळे घराची साफसफाई आणि इतर रोजची कामं करण्यात वेळ जातोय. परंतु आहे ते अन्नधान्य जास्तीत जास्त दिवस पुरवायला हवे ह्या विचाराने सैपाक अगदी जेवढ्यास तेवढा करत असल्यामुळे हातात वेळ मिळतोच आहे.
वेळ असला हातात तरी फार क्लिष्ट ,कठीण असं काही वाचण्याचा सध्या मुड नाहीये. बातम्या फार पाहून खूपच उदास वाटत म्हणून त्या बघत नाहीये. त्यामुळे रोज पेपर ( आता इ पेपर वाचणे), त्यातील शब्दकोडी आणि सुडोकू सोडवणे ह्यात वेळ चांगला जातोय. तस ही मी एरवी ही ह्या दोन गोष्टीची फॅन आहे.
परवा जुने फोटो काढून बसले होते. ते फोटो बघण्यात दोन दिवस कसे गेले ते समजलं ही नाही. तीच गोष्ट जुन्या पत्रांची. मुलं ओरडत असतात काय काय साठवलं आहे म्हणून पण काल कळलं ही किती मोठी संपत्ती आहे ते. काही खुशालीची, काही दुःखद बातम्या सांगणारी , आईवडिलांची, मैत्रिणींची , कोकणातल्या मूळ घराकडून आलेली ती पत्र वाचताना मी पुन्हा त्या काळात गेले, त्यातल्या सध्या हयात नसलेल्या किती तरी लोकांना मनाने परत भेटले ते ह्या घरात रहाण्यामुळेच. ती पत्र वाचून परत ताजीतवानी झाले. बरं, त्यासाठी पत्रच पाहिजेत असं नाहीये, फोनवरच जुनं जुनं
(डिलीट केलं नसल्यास ) चॅटिंग वाचायला ही तेवढीच मजा येतेय बर का.
प्रत्यक्ष भेटता येत नाही तर फोन वरून सगळ्यांशी गप्पा मारतेय. हल्ली सगळ्यांनाच वेळ असल्याने मस्त रंगतायत गप्पा. .☺ रोज परदेशात असलेल्या मुलांना ही एकदा तरी व्हिडीओ कॉल करते. हे दहा पंधरा मिनिटाच बोलणं माझ्यासाठी दिवसभर उत्साही राहाण्याचं टॉनिक आहे हे मुलांना ही माहीत आहे.
परत परत त्याच त्याच गोष्टी करण्याचा मला कंटाळा येत नाही जे बऱ्याच जणांना बोअरिंग वाटत. ती रिपीटेड ऍक्शन करताना मला एक लय सापडते आणि त्या लयीत माझ्या काळज्या, चिंता वाहून जातात हा अनुभव आहे. त्यामुळे गव्हले वळण, कापडाचे छोटे तुकडे जोडून क्वीलटिंग करणं, विणकाम भरतकाम करणं अस काहीतरी मुडनुसार करणं ह्यात ही मन रमवते आहे.
बाहेर जाण शक्य नसलं तरी रोज संध्याकाळी कपडे बदलुन तयार होते आणि घरातल्या घरातच अर्धा तास फेऱ्या मारते. संध्याकाळी देवाशी दिवा, स्तोत्र म्हणणे हे मनोबल वाढण्यासाठी हल्ली न चुकता करतेय रोज.
एवढे जरी उपाय मी जाणून बुजून मुद्दाम करते असले तरी हे सगळं कधी आणि कसं सम्पणार आहे हा विचार मनात गारूड होऊन कधी कधी खूप उदास, निराश वाटतच. काही वेळा आपोआप डोळे गळू लागतात ते तसेच वाहू देते. त्याने ही हलकं वाटत. मग शेवटचा उपाय म्हणजे हे निराशाजनक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाकायचे, हे सगळं लवकरच थाम्बणार आहे आणि सगळं जग परत पहिल्या सारख होणार आहे हा विचार मुद्दाम मनात आणून देवाचे आभार मानते आणि झोपायचा प्रयत्न करते.
मंडळी गुढी पाडवा आहे व
मंडळी गुढी पाडवा आहे व रामनवमी जवळ आली आहे तर आता रोज मोठ्याने रामरक्षा म्हणत जा. घरातील व्हायब्रेशन्समध्ये फरक पडेल. पाडवा ते रामनवमी उत्सव असतो हा सगळ्यात बेस्ट काळ रामरक्षा म्हणायला चालू करण्याचा. गीतरामायण ऐकणे हे अजून एक सजेशन.
घरात भगवदगीता असल्यास ती वाचणे.
आरारा, उत्तम पोस्ट.
आरारा, उत्तम पोस्ट.
करोना मुळे कायम टिकणारे नुकसान फुफ्फुसांना याबाबत काही माहिती देऊ शकाल का?
चिकनगुणिया नंतर काहींना कायम स्वरूपी सांधेदुखी होते तसे करोना नंतर कायम स्वरूपी लंग कपॅसिटी कमी होते का?
शिवाय ती जेम्स बॉण्ड वाली ओलगा घरातच बसून करोना बारा करतेय म्हणे.असंही शक्य असतं का?म्हणजे केसेस वाढल्या तर काही लोकांना घरातल्या घरात उपचार/मॅनेजिंग करून बरे होणे वगैरे.
@मनीमोहोर ताई
@मनीमोहोर ताई
हे सगळं कधी आणि कसं सम्पणार आहे हा विचार मनात गारूड होऊन कधी कधी खूप उदास, निराश वाटतच.
साधारणपणे संध्याकाळी जेंव्हा प्रकाश कमी होतो तेंव्हा एक अनामीक भीती मनात ठाव देऊन राहते आशा वेळेला घरातील जितके दिवे लावता येतील तितके लावा.
कारण संध्याकाळ ही दिवसाच्या अंताकडे जाणारी म्हणून एक निराशा आणणारी असू शकते जेंव्हा तुम्ही भरपूर प्रकाश निर्माण करता तो आपल्या मनाला आश्वस्त करत असतो की अंधार नष्ट करता येतो. थोडा वेळ जास्त वीज जाळली तरी चालेल. परंतु मध्यमवयात अशी काळोखि मनात दाटून येते त्याला हा उत्तम उपाय आहे.
10 -15 मिनिटातच आपले मन उभारी धरू लागते.
स्तोत्रे पर्वचा म्हणणे हे कर्मकांड आले तरी मनाला नक्कीच आधार देत असते.
नवरा, मुलगी व मी - घरीच आहोत.
नवरा, मुलगी व मी - घरीच आहोत. काल मुलीचे डोके दुखू लागले तेव्हा धस्स झाले. टॅलेनॉलने थांबले नशीब. बाकी दिवसभर वेळ कॉम्प्युटरपुढे, कामात जातो. रात्री मी स्तोत्रे म्हणते. आजपासून तर चैत्री नवरात्र सुरु होतेय. त्यामुळे प्रसन्न वाटते आहे. बाकी कॉफी जर संपली व मिळाली नाही तर खूप डिप्रेशन येइल. मूड कॉफीवर फार अवलंबून आहे. २ कप कॉफी लागतातच. पण तशी नौबत येणार नाही.
बाकी एकंदर भीती, चिंता वाटतेच.
ही मकर राशीतली प्लूटो-शनी युती संपू दे एकदाची. मकर, प्लूटो, शनी तीघेही डार्क फोर्सेस आहेत. सध्या ज्योतिषांचे म्हणेणे वाचते आहे. शनि=मंद. मंद सरकतो त्यामुळे, चटकन युती तुटणार नाही. ज्योतिषांचे म्हणणे आहे - मकरेत ट्राफिक जॅम होउन बसलाय - मंगळ, शनि, प्लूटो, गुरु
Mars 26° Capricorn 30′ 08″
Jupiter 23° Capricorn 34′ 49″
Saturn 00° Aquarius 15′ 47″
Pluto 24° Capricorn 45′ 3
कॉर्पोरेट वर्ल्ड मकर राशीच्या कारकत्वाखाली येते. प्लूटो म्हणजे ट्रान्स्फॉर्मेशन.
>>>>>सूर्य, चंद्रादि वैयक्तिक ग्रहांपेक्षा, प्लूटो हा ग्रह "व्यापक मानसिकतेवर" अधिराज्य करणारा ग्रह समजला जातो. म्हणजे त्याचे परीणाम बघताना व्यक्तीपेक्षा , त्या पीढीतील जनमानसावर काय समग्र परीणाम झाला ते साधारण पहातात. पण याचा अर्थ असा नाही की वैयक्तीक काहीच परीणाम होत नाही. हा ग्रह क्रूर आणि अशुभ समजला जातो कारण ज्या घरात हा पडतो त्या घराच्या कारकत्वाखाली येणार्या गोष्टींची हा उलथापालथ करतो. कोणत्याही गोष्टीची संपूर्ण काया पालटून टाकणे हे याचे मूळ काम मग ते भल्याकरता असो वा बुर्याकरता. या कायापलटामध्ये अनावश्यक गोष्टींचा संपूर्ण र्हास होतो जी की खूप पीडा-क्लेशदायक घटना असू शकते. पण जी आपल्या चांगल्याकरता आवश्यक असते. हा ग्रह फिनीक्स या पक्षाने देखील दर्शविला जातो. फिनीक्स हा स्वतःच्या राखरांगोळीतून भरारी घेणारा ग्रीक "मायथॉलॉजीकल" पक्षी. विध्वंस-पुनर्निर्मीती हे चक्र प्लूटो दर्शवितो.>>>>>>
https://www.maayboli.com/node/71979
पाडवा ते रामनवमी उत्सव असतो
पाडवा ते रामनवमी उत्सव असतो हा सगळ्यात बेस्ट काळ रामरक्षा म्हणायला चालू करण्याचा>>>>> अगदी बरोबर. हे स्तोत्र सिद्ध करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नवरात्र. गीता प्रेस गोरखपूर यांच्या पुस्तकात म्हणल्याप्रमाणे कोणत्याही नवरात्रीचे ९ दिवस ब्राह्ममुहूर्तावर रोज ११ वेळा रामरक्षा पाठ केला की स्तोत्र सिद्ध होते. असे सिद्ध झालेले स्तोत्र नंतर नियमितपणे म्हणल्यास फळ देण्यास फारच उत्तम मानले गेले आहे . त्यात करोनामुळे या नवरात्रीत रामरक्षा म्हणणे अधिकच सयुक्तिक.
धन्यवाद कोहंसोहं
धन्यवाद कोहंसोहं
>>>>पाडवा ते रामनवमी उत्सव असतो हा सगळ्यात बेस्ट काळ रामरक्षा म्हणायला चालू करण्याचा. >>
+१००१
आम्ही मुलांबरोबर काही योगाचे
आम्ही मुलांबरोबर काही योगाचे प्रकार करतो जसे कि १२ सूर्य नमस्कार, प्राणायाम, भस्रिका वगरे... वेळ पण छान जातो आणि आरोग्यासाठी उत्तम. नंतर मुलांबरोबर रामरक्षा, भीमरूपी वगरे स्तोत्रे म्हणतो.
तसेच विवेक बुवा गोखले यांचे दत्त कवच स्तोत्र ऐकतो ... लिंक खाली दिलेली आहे
https://youtu.be/n0gewCPqWeY
>>>>>>>>> https://youtu.be
>>>>>>>>> https://youtu.be/n0gewCPqWeY>>>> धन्यवाद. यांना शोधत होते. आता सबस्क्राइबच करुन टाकते.
माझ्या दोन मित्रांना कोरोना
माझ्या दोन मित्रांना कोरोना झाला आहे. New york. होम क्वारंटाईन मध्ये आहेत. माईल्ड आहे.
करोना लागण झालेल्या वस्तू
करोना लागण झालेल्या वस्तू दिसू लागल्या तरी खूप फायदा होईल.
हाताला काम आवश्यक. सध्या
हाताला काम आवश्यक. सध्या मायबोलीवर फिरताना प्रकर्षाने जाणवते आहे. खाली दिमाग शैतान का घर.
२१ तारखेपर्यंत सोसायटीत अर्धा
२१ तारखेपर्यंत सोसायटीत अर्धा तास फेर्या मारायचे.फेर्या मारणारी मी एकटीच असायचे.घरी आल्यावर आंघोळ.नंतर मात्र बंद केले. माझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून.काल मात्र माझा घसा किंचित खवखवू लागल्यावर मी टरकले.माझं सोडा,घरातल्यांचे काय म्हणून बेटाडीनने गुळण्या केल्या.मानसिक असेल किंवा तात्पुरते असेल्,पण रात्री गरम पाणी+ हळद घेतली.मुख्य म्हणजेरात्री लवकर झोपले.
मी मुंबईत आणि आई चिंचवडला आहे. फेब्रुवारीपासून बोलावूनही ती,"मला इथेच बरे वाटते आहे" म्हणून काहीशा हट्टाने राहिली आहे.वय वर्षे ८७.जबरदस्तीने आणीन म्हटले पण या वयात तिला २-३ तासांचा प्रवास,हवा,पाणी यांत बदल होऊन सर्दीताप होईल या भितीने आणले नाही.नंतर तर कोणीही जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे.परवाच तिला म्हटले बाई काळजी घे.ती मनाने दणकट आहे.आता कधी आमची भेट होते ते पाहू.
निराश वगैरे नाही आम्ही दोघीही.आलिया भोगासी असावे सादरच्या पातळीवर आहे.
मी मुंबईत आणि आई चिंचवडला आहे
मी मुंबईत आणि आई चिंचवडला आहे>>>
देवकी, माझें कुटुंबही मुंबई पुणे असे विखुरलेय, प्रत्येकजण एकेकटा आहे. वृद्ध आईची काळजी वाटते पण तीही तुमच्या आईसारखीच 'मला इथेच बरे वाटते' मोड मध्ये होती. आता काही करणे शक्य नाही. शिवाय महिनाभर घरातच काढायचे तर जिथे आपण कायम राहतोय तिथेच ते काढणे जास्त सोयीचे पडते. आपले राहते घर सोडून बाकी सगळे शेवटी परके वाटते, त्यामुळे ज्याला जिथे बरे वाटते तिथे राहूदे म्हणून विचार करणे बंद केले. एकट्या वृद्ध लोकांना काळजी घ्या म्हणून सांगत राहण्यापेक्षा काहीतरी चांगले बोलून त्यांचे मनोधैर्य उंचावणे बरे. कारण दिवसभर विचार करून त्यांनी बीपी वगैरे वाढवून घेतले तर अजून पंचाईत व्हायची.
काल संध्याकाळी घर आवरता आवरता
काल संध्याकाळी घर आवरता आवरता रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि आता इथे रामरक्षेबद्दल वाचून खूप छान वाटलं.
मी गेले कित्येक दिवस मोलकरणीच्या काम करण्याच्या पद्धतीला कंटाळले होते. दोघी जुन्याच आहेत त्यामुळे काढवत नव्हत आणि ठेववत नव्हतं. माझ्याकडे सकाळी 6 आणि 7 ला येतात त्यामुळे मला सकाळी सकाळी अजिबात बॅड फीडबॅक द्यायचा मूड नसतो.
अतिपूर्वी ही सगळी कामं 2 वर्ष केलेली असल्यामुळे करता येईल असा ताठा होता, तो पण आजकाल कमी व्हायला लागला होता. आता परत ही सगळी कामं करायला लागले त्यामुळे पुढची दहा वर्षे पुरेल इतका आत्मविश्वास परत मिळेल.
कोरोना नंतर कामवाल्यांच्या
कोरोना नंतर कामवाल्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता हाच विचार काल काम करताना मनात होता. आणि आज ही राजसी ची पोस्ट .
कामवाली फार आवडत असते अस नाही पण आपण तिच्यावर mentally अवलंबून असतो . हिच्या शिवाय माझं होणारच नाही हा mind set. आता त्याला सुरुंग लागून कामवाल्या भविष्यात नोकऱ्या गमावू शकतात.
मी त्यांना कामावरून काढणार
मी त्यांना कामावरून काढणार नाहीये पण मी हे करु शकते हे माझा आत्मविश्वास माझ्या देहबोलीतून आणि वागण्यातून त्यांना नक्की जाणवणार आणि जुनं काम असल्याने जी शिथिलता आलेली आहे तिला नक्की आळा बसणार.
वाय महिनाभर घरातच काढायचे तर
वाय महिनाभर घरातच काढायचे तर जिथे आपण कायम राहतोय तिथेच ते काढणे जास्त सोयीचे पडते. आपले राहते घर सोडून बाकी सगळे शेवटी परके वाटते, त्यामुळे ज्याला जिथे बरे वाटते तिथे राहूदे म्हणून >>>>>>>> अक्षरशः खरंय.हेच मी २ वर्षांपूर्वी तिच्या हॉस्पिटलायझेशननंतर आईला सांगितले आहे.आता काहीही झाले तरी मी तिथे रहाणार नाही.यायचं असेल तर मुंबईत या.
आता परत ही सगळी कामं करायला लागले त्यामुळे पुढची दहा वर्षे पुरेल इतका आत्मविश्वास परत मिळेल.>>>>> राजसी,___/\___.
कपाटात वर्षानुवर्षे बांधून
कपाटात वर्षानुवर्षे बांधून पडलेली आयुर्वेदिक पुस्तके- जुनी बाडे काढलीत. ज्वर-श्वासकास प्रकरणं वाचून काढतोय प्रत्येकातील. दोन महिन्यात आयुर्वेदज्ञानात थोडी भर पडेल ही अपेक्षा
प्रत्येकजण सानिटाईजर वापरू
प्रत्येकजण सानिटाईजर वापरू लागेल. मोठ्या सोसायटीत याचा महापूर खालच्या सेप्टिक ट्यानकमध्ये येईल. मैला कुजवून त्याचा मिथेन करणारे जंतूही मरतील. कुजणे बंद होऊन दुर्गंधी सुटेल. टाक्यांतून ते चोकप होउन पुढे तसेच सरकले तर नगरपालिकेचे मलनि:सारण बंद पडेल.
मैला वाहण्यासाठी आणि बाथरुम
मैला वाहण्यासाठी आणि बाथरुम चे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र लाईन असते. बाथरुममधुन (वॉश बेसिन मधून) आलेले पाणी सेप्टिक टँकच्या पुढील टाकीत सोडले जातात. त्यामुळे साबणाचे पाणी एकत्र होत नाही.
तसं होत असेल तर बरं आहे.
तसं होत असेल तर बरं आहे.
डाॅक्टर भावा ने या LIMCEE
डाॅक्टर भावा ने या LIMCEE नावाच्या C vitaminच्या गोळ्या चघळायला सांगितल्या आहेत. सकाळी १ संध्याकाळी १
हे औषध नाही, फक्त immunity वाढायला मदत होते. वाटले म्हणून शेअर करतोय.
ईम्युनिटीची ढाल गरजेची आहे.
ईम्युनिटीची ढाल गरजेची आहे. मुख्यत्वे घरातील वृद्धांसाठी
@देवकी काही हवे असेल तुमच्या
@देवकी काही हवे असेल तुमच्या आईला तर सांगा. मी प्राधिकरणमध्ये आहे. मदत्त करणे शक्य आहे.
लिमसी बाजारात मिळणे फार
लिमसी बाजारात मिळणे फार पूर्वीच दुर्मिळ झालेले आहेत.
लिमसीच्या जागी लिंबाची चतकोर फोड डब्यातून नेली व भाजीवर पिळून ती भाजी खाल्ली तर लिमसीपेक्षा जास्त उपयोग होईल. लिंबे वर्षभर मिळतात आणि टिकतातही.
भाज्या 30rs पावशेर केल्या
भाज्या 30rs पावशेर केल्या आहेत. बटाटे 40rs per kg.
Limited choices
Pages