Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39
सभ्य स्त्री पुरुष हो,
कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.
( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठाण्यात आता भाजीपाला मिळायला
ठाण्यात आता भाजीपाला मिळायला लागलाय...
आधीही होता पण अतिशय तुरळक ठिकाणी...
किराणा दुकानांच्या दारात आईस्क्रीमचे कुलर आडवे लाऊन प्रवेश बंद केलाय..
आत कोणी जायचं नाही.. दुकानदारच माल आतून आणून देईल त्या कुलर वर.. आणि पैसेही तिथेच घेईल..
पोलिसांनी काल रात्री स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने अशा दुकानांपुढे अंतरा अंतरावर चौकोन आखलेयत जेणेकरुन खरेदीदारांच्या मधे योग्य ते अंतर राहिल.. आणि एक एक दंडुकाधारी पोलिस दुकानासमोर तैनात केलाय..
लोकंही शिस्तीने उभे रहातायत.
वस्तु मिळतायत हे कळल्यावर गर्दीही होत नाहीये..
सार काही या स्तरावर आलबेल आहे..
लंपन, देउ केलेल्या
लंपन, देउ केलेल्या मदतीबद्दलधन्यवाद! सर्वप्रथम तुमची सुरक्षा महत्वाची आहे.
तसेही आईकडे,तिचा बराच कम कम असलेला मदतनीस,त्याची बायको आहे.म्हणजे घरी रहात नाही,पण दिवसातून ३-४ फेर्या असतात.माझ्या पोस्टमुळे कदाचित मी पॅनिक झाल्यासारखे वाटत असेलही.पण परिस्थिती कूल आहे.
आमची बिग बास्केटची ऑर्डर रद्द
आमची बिग बास्केटची ऑर्डर रद्द केली गेली. वस्तू घरपोच करायला परवानगी नाकारली गेलीय.
साधना +1
साधना +1
तुम्ही कामावर जात आहात? सध्या लाॅकडाऊन मुळे लिंबा चे शाॅर्टेज आहे.
२१ दिवसाचा लॉकडाऊन् दिक्लेर
२१ दिवसाचा लॉकडाऊन् दिक्लेर केला त्याआधी मी किराणा सामान आणून ठेवलं होत...पण तेव्हाही गव्हाच पीठ नाही मिळालं...आता आहे ते दोन तीन दिवस पुरेल...गहू आणून ठेवले आहेत पण गिरण्या बंद....पंचाईत होणार आहे..
गिरण्या सुरू आहे आमच्याकडे.
गिरण्या सुरू आहे आमच्याकडे.
तुम्ही कामावर जात आहात?>>>
तुम्ही कामावर जात आहात?>>>
नाही, आम्ही गेल्या बुधवारपासून घरून काम करतोय. मी सोमवार संध्याकाळपासून दरवाजाबाहेर पाय ठेवला नाही

पण आमच्या इथे भाजी मिळतेय, लिंबूही मिळताहेत।
तुमचा प्रश्न आता लक्षात आला... गेली 30 वर्षे दुपारचे जेवण डब्यातले खाल्लेय
आता सवय कशी मोडणार

लिमसी गेले काही महिने गडप आहे. माझी मुलगी अधूनमफहून गोळ्या आणायची चघळायला. तिच्याकडूनच कळले होते. याची रिप्लेसमेंट मार्केटात आहे. मी तिला लिमसीपेक्षा लिंबाचा सल्ला दिला.
गिरण्या सुरू आहे आमच्याकडे.>>
गिरण्या सुरू आहे आमच्याकडे.>>>
हो मला त्यासाठीच जावे लागले होते. तोही म्हणाला होता सुरू ठेवणार. तो लोकल मराठी आहे.
बहुतेक गिरणीवाले भय्ये आहेत. ते गावी पळाले असतील तर गिरणी बंद राहणार.
कांदे ५० रु किलो, बटाटे ४०
कांदे ५० रु किलो, बटाटे ४० रु किलो, टोमॅटो ४० रु वगैरे. आज दुकानातून आणावे लागले. सकाळी ९ वाजता. तुरळक लोक होते तरीही कोणी एक मीटरचं अंतर पाळत नव्हतं.
आमच्या इथे दोन गिरण्या आहेत..
आमच्या इथे दोन गिरण्या आहेत...दोन्हीही बंद आहेत...आत्ताच घरी गहू दळून देतात त्यांची चौकशी केली आहे....आहेत एक...पण सध्याच्या कंडीशन मध्ये देतील की नाही माहीत नाही...
माझ्याकडे जाते आहे आणि
माझ्याकडे जाते आहे आणि दळणासाठी नाचणी व बाजरी तयार करून ठेवली ती तशीच पडलीय.
आता चक्की पिसिंग पिसिंग ची अपूर्व संधी आलेली आहे

आता चक्की पिसिंग पिसिंग ची
आता चक्की पिसिंग पिसिंग ची अपूर्व संधी आलेली आहे ---
ओव्या background ला वाजवून व्यवस्थित होऊन जाऊ दे
उगीच style मध्ये कमतरता नको
( जातं आहे हे सुचल्याबद्दल _/\_
1 no..sadhana(•‿•)
1 no..sadhana(•‿•)
आता चक्की पिसिंग पिसिंग ची
आता चक्की पिसिंग पिसिंग ची अपूर्व संधी आलेली आहे --- Happy ओव्या background ला वाजवून व्यवस्थित होऊन जाऊ दे Happy उगीच style मध्ये कमतरता नको >>> कित्ती भारी, मस्तच एकदम
रोज दोन भाकर्यांचे पीठ दळेन.
रोज दोन भाकर्यांचे पीठ दळेन.
व्यायाम का व्यायाम और उपर रोटीके इंतजाम...
एका दगडात 2 पक्षी

यु ट्यूबवर ओव्या लावेन.
आजूबाजूला बरेच जण त्रासात
आजूबाजूला बरेच जण त्रासात आहेत हे खरे, पण मी तरी हे दिवस मस्त एन्जॉय करतेय. फॅमिली टाईम मिळतोय त्याचा आनंद घेतेय.
Yes, family time +1 चांगल्या
Yes, family time +1 चांगल्या कारणांनी मिळाला असता तर अजून मजा आली असती.
माझा 1 टीम मेट काल खूप
माझा 1 टीम मेट काल खूप वैतागलेला. त्याची बायकोही बोलायला लागली की खूप कंटाळलाय हा म्हणून. त्याला सांगितले की बायकोला किचनमध्ये मदत कर, भाजी कटिंगपासून सुरवात कर. त्याला आयडिया आवडली. आज सकाळी 1 पराठा करून व्हात्सापवर फोटो टाकला.
त्यातली भाजी ह्याने कापलेली.
जातं कसं काय घरी?
जातं कसं काय घरी?
मुद्दाम लिगसी म्हणून जपून ठेवलं होतं का?
आलेली आहे --- Happy ओव्या
आलेली आहे --- Happy ओव्या background ला वाजवून व्यवस्थित होऊन जाऊ दे Happy उगीच style मध्ये कमतरता नको >>>>> + हेसाधना, एक छान व्हिडीओ काढशील तर नव्वारी पण नेस हं (सुलोचना, जयश्री गडकर स्टाईल) मधे एकदा घाम पुस आला नसला तरी
सगळ्यांच्या सकारात्मक पोस्ट वाचून छान वाटलं.
आज कपड्यांच कपाट आवरायला घेतलं. दोन वर्षे कपडे नाही घेतले तर चालणार काय धावणार आहे.रोजच्या वापरातले कपडे निव्वळ तेच तेच घालून कंटाळा आलाय ह्या नावाखाली गाठोडं बांधणार होते. पण जुने दिवस आठवले. प्लान बदलला. आम्हा सिसींना ह्या रुटीनची सवय असल्याने फार फरक पडला नाहीये. मुलांशी रोज बोलणं होतंय. कुठलीही एन्झायटी नाहीये तरी ममो म्हणतेय तसं कातरवेळेला हुरहूर वाटते. ती कदाचित इतक्या शांततेची सवय नसल्यामुळे कदाचित. टिव्हीपूर्व काळातही जाणवायची. बर्याच गोष्टी करायला आईची मनाई . थांबा थोड्यावेळ , तिन्हीसांज टळली की करा ..... म्हणायची.
जातं कसं काय घरी?
जातं कसं काय घरी?
मुद्दाम लिगसी म्हणून जपून ठेवलं होतं का?>>>
हौस, अजून काय... अधून मधून वापरते.
काही वर्षांपूर्वी तुर्भे नाक्यावर 1 पाथरवट बसायचा. त्याच्याकडून करून घेतले होते. रस्ता रुंदीकरणात तो इकडे तिकडे करत शेवटी चंबूगबाळे आवरून गुल झाला.
हेसाधना, एक छान व्हिडीओ काढशील तर नव्वारी पण नेस हं >>>
नाही आहे गं, ओढणी घेईन डोक्यावरून

आता चक्की पिसिंग पिसिंग ची
आता चक्की पिसिंग पिसिंग ची अपूर्व संधी आलेली आहे Happy Happy
ओ तै .........ते डोईवरला पदर, बांबुच्या कामट्यांचे सुप (प्यायचे नव्हे पाखडायचे) आणी लोखंडी बत्ता (मधुन मधुन जात्याचा खुंटा ठोकायला) बाजुला माडुंन ठेवायला विसरु नका माबोकरांना साग्रसंगीत रिपोर्ट करावा लागेल म्हणुन आधीच सांगुन ठेवतोय नाहीतर म्हणाल कोणी बोललं नाही ते.
आणि ती लहानशी चिंधी नको का, दळून झाले की पीठ झाडायला ???
व्हय जी ते विसरलोच. आ़जी दळुन झालं की वरचा भाग रजनीकांत स्टाईलने गरकन फिरवुन मग उचलुन पीठ झाडायची ते आठवले.
आणि ती लहानशी चिंधी नको का,
आणि ती लहानशी चिंधी नको का, दळून झाले की पीठ झाडायला ???
हौस, अजून काय... अधून मधून
हौस, अजून काय... अधून मधून वापरते. 1 पाथरवट बसायचा. त्याच्याकडून करून घेतले होते. >>>>>> प्रणाम घ्यावा.
ऑफिस संपूदे, मग काढतेच..
ऑफिस संपूदे, मग काढतेच..
जातं निघालं. आता पाटावरवंटा
जातं निघालं. आता पाटावरवंटा आणि घाटणं (रगडा) ही येऊ दे कुणाकडे असेल तर. तेव्हढीच मिक्सरला विश्रांती आणि विजेची बचत. आणि वेळेचा सदुपयोग. शिवाय व्यायाम.
आम के आम और ..
पण खरंच, शहरी भागात कुणी जातं अजूनही वापरतंय, वापरू शकतं ह्याचं कौतुक आणि आश्चर्य वाटलं. साधना + 100
साधना छान जाते. माझ्या कडे
साधना छान जाते. माझ्या कडे होते ते आम्ही गांवीनेऊन ठेवले. मला एकटीला ते कधी ओढताच आले नाही ☹️
सध्या घरघंटी आहे आईला चक्की वर ओझे घेऊन जायला लागछ नये म्हणून घेतलेली, पण D mart वरून गहू मागवलेले आलेच नाही 17 तारीख ची order २२ ला येणार होती पण रोज सकाली
Dear customer, as there are severe restrictions on mobility and transport in the city, we currently have limited resources available for completing order deliveries. Due to this, deliveries for existing orders are delayed. We are working and trying our best to deliver your orders as early as possible. However, we cannot confirm the estimated delivery time for your order as of now. We will send you an sms as soon as possible with the status of your order. We are sorry for the inconvenience caused to you and request your cooperation in this situation. असा मैसेज येतोय.
Order cancel ही होईना.
शेवटी आईने वाण्याकडून आणले .
Yes, family time +1
Yes, family time +1
>>>
मी आधीपासूनच फॅमिली टाईम खूप द्यायचो. पण आता तोच अंगाशी आलाय. कारण आधी घरात असताना मी ऑफिसचे काम सोडा साधा तो विचारही मनात आणायचो नाही. कधी ऑफिस कामाचा साधा फोन कॉलही व्हायचा नाही. ऑफिसहून वेळेवर घरी या आणि शनिवार रविवार वा सुट्टीच्या दिवशी एक्स्ट्रा काम करायला जाऊ नका हे तत्वही कसोशीने पाळायचो. कधी मुलीच्या शाळेला सुट्टी असली की मी सुद्धा ऑफिसला दांडी मारायचो. एकूणच त्यामुळे बाप घरात असताना तो आपलाच. आपल्याला हवा तेव्हा उपलब्ध हे पोरांच्या मनावर बिंबले आहे. त्यामुळे माझे वर्क फ्रॉम होम त्यांना सहनच होत नाहीये. त्यांच्या मर्जीनुसार हवा तसा ब्रेक मला कामाच्या मध्ये घ्यायलाच लागतोय. उदाहरणार्थ पोराला पाणी पाहिजे आहे आणि तो म्हणाला पप्पा देणार तर पप्पाच देणार. विषय संपला. कोणाच्या हातून तो पिणारच नाही. मलाच मग ऊठून त्याला पाणी द्यावे लागणार. आणि असे हट्ट त्याचे दिव्सभरात पंधरावीस असतात. या आधी मन सुखवायचे की वा आपण पोराचे किती लाडके आहोत. पण आता कामाच्या मध्ये सतरा ब्रेक झाल्याने त्रास झालाय. परीणामी मी सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ब्रेक ब्रेक घेत चोवीस तास ऑन ड्युटी असल्यासारखेच काम करतोय. गेले चार दिवस पीसी शटडाऊनच केला नाहीये
जात्यावर दळण्याला सलाम घ्यावा
जात्यावर दळण्याला सलाम घ्यावा.
[जात्यासाठी वापरला जाणारा दगड (= कुरुंद) वेगळा पांढुरका असतो. चक्कीवाले सकाळी त्यास टाकी लावतात तसला. त्यावर छिन्नीने मारताना (टणत्कार) आवाज येतो तसा खणखणीत या काळ्या दगडातून येत नाही.
हा दगड पाटा वरवंटा करण्यासाठी ठीक असतो. ]
जात्याच्या दोन भागांना पाळं
जात्याच्या दोन भागांना पाळं(पाळीं) म्हणतात पण प्रत्येक भागाला वेगळं नाव आहे बहुतेक. कुणाला ठाऊक आहे का?
Pages