Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39
सभ्य स्त्री पुरुष हो,
कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.
( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्यांना निराश/उदास वाटतंय
ज्यांना निराश/उदास वाटतंय त्यांनी हे बघा
https://youtu.be/yoMLaZBjEd8
मला वर्क फ्रॉम होम नाही करता
मला वर्क फ्रॉम होम नाही करता येत. आज एक कामासाठी ऑफिसात जावे लागेल रिक्षा मिळाली नाही तर चालत जायची तयारी ठेवली आहे. >> अमा हे चालणार नाही. घरी बसा. स्वतःलाच धोक्यात कशाला टाकताय.
जनहो. परिस्थिती काही ठिकाणी गंभीर असू शकते. पण ज्या गोष्टीला आपण जबाबदार नाही किंवा त्याबद्दल काही करू शकत नाही त्याबद्दल चिंता कशाला करायची. आत्त्ता काय करता येइल ते तुमच्या तुमच्या जागी ते शांत पणे करा.
मी गेल्या पाच दिवसात गवार-बटाटा, वांगी-बटाटा या भाज्या, गाजर, काकडी कोशिंबीर, सा. खिचडी इतके पदार्थ सुपरविजन खाली केले. पुढच्या आठवड्यात एकटे एकटे. आता हा मला चॅलेंज आहे की पब्लिकला हे नंतरच समजेल.
वर्क फ्रॉम होम चालू आहे. जास्त चांगले काम होते. फोकस येतो. दुसर सद्ध्याच्या परिस्थितीमुळे उपस्थिती १०० टक्के.
ट्रॅफिकचा वैताग गेला.
वेजिटेरियन खाणे, अपेयपान व पान बंद, न चुकता व्यायाम (यू ट्युब वर कार्डिओ स्टार्टर १,२,३ असे छान मिळालेत.) असा सात्विक दिनक्रम चालू आहे.
पण या सर्वांवर पाणी फिरेल अशी एक बातमी काल कळाली. माझा इंडोनेशियातील जुना सहकारी करोनाची लढाई जिंकू शकला नाही. अल्लाला प्यारा झाला. ओळखीतला करोनामुळे पहिला मृत्यू.
असो. पुढे चला.
Ho Vikram Singh that
Ho Vikram Singh that assignment was cancelled by ceo himself. Stayed home.
मैत्रेयी,
मैत्रेयी,
आमच्या राज्यात काल पर्यंत तरी इंडीयन ग्रोसरी मिळत होती, शहरात राहाणार्या माझ्या मैत्रीणीने आणली परंतू सोमवार पासून ती दुकाने बंद होतील असे ती म्हणाली. स्प्रिंग सुरु झाला की पावसात ग्रोसरी आणणे नको म्हणून आम्ही सुदैवाने १ मार्चला देशी ग्रोसरी आणली. त्यामुळे डाळ, तांदूळ, गव्हाचे पीठ, रवा, कडधान्यं असे सामान घरात आहे. गावच्या ग्रोसरी स्टोअरमधे बेसीक अमेरीकन ग्रोसरी मिळत आहे. 'अमुकच हवे' असे म्हटले तर मिळेल याची खात्री नाही पण अॅडजस्ट करायची तयारी असेल तर काही ना काही पर्यायी मिळत आहे. मी १५ मार्चला तशी ग्रोसरी केली. अर्थात लहान गावांत तसे इतर वेळीही असते त्यामुळे तडजोडीची सवय आहे. सुदैवाने हिवाळा कडक नव्हता त्यामुळे ब्लिझर्डची तरतूद म्हणून आणलेले थोडे कॅन गुड्सही आहेत. तसेही आम्ही दोघच आहोत त्यामुळे देशी आणि अमेरीकन ग्रोसरीत स्टार्च आणि प्रोटिन /भाजी अशी महिनाभराची मिल्स नक्की होतील. जे आहे ते राशन केले, सर्विंग साईज जरा कमी केला तर ६ आठवडे जातील.
गावात कर्ब साईड पिकअप उपलब्ध आहे तसेच थर्ड पार्टी थ्रु घरपोच ग्रोसरीची सोय नुकतीच सुरु केली आहे. अगदीच गरज पडली तर तो पर्याय आहे. परंतू तिथे वेटिंग आहे आणि उद्या पगार झाले की २-३ दिवस ते अजूनच वाढेल. सध्या सोशल डिस्टंसिंग हे सगळ्यात महत्वाचे,
आत्ता तरी जे आहे त्यात भागवायचा निर्णय घेतलाय. मधेच ग्रोसरी मिळाली तर तो बोनस समजणार.
>>आमच्या घरात पुढील आठवड्यापासून पगार येणार नाही. नो पे किंवा रजा वापरा.
हे वाचून आश्चर्य वाटले. >>
साधना , इथे हे फार कॉमन आहे. एरवीही आठवडाभराचे प्लांट शटडाऊन असतात तेव्हा असेच असते. अगदी आवश्यक कामांसाठी थोडे कामगार लागतात, त्यांना पगार मिळतो मात्र ते वॉलेंटियर असतात, कामावर आलेच पाहिजे असा आग्रह करता येत नाही.
एकदा प्रॉडक्शन बंद म्हटले की पैशाचे सोंग नाही आणता येत. त्यामुळे एक आठवडा ८०% पगार एवढेच शक्य आहे. नंतर शटडाऊन आणि पुढे टेंपररी लेऑफ/फर्लो वगैरे ओघाने येते. नवरा 'bucks stop here' मंडळात असल्याने त्याचे कामाचे आणि पगाराचे गणित मोजूनमापून कधीच नव्हते. आत्ताच्या परीस्थितीत तर अजिबातच नाही. आर्थिक घडी विस्कळीत होईल पण शेवटी 'सर सलामत तो ..' यातून सगळे सुखरुप बाहेर पडोत हेच देवाकडे मागणे.
. आर्थिक घडी विस्कळीत होईल पण
. आर्थिक घडी विस्कळीत होईल पण शेवटी 'सर सलामत तो ..' यातून सगळे सुखरुप बाहेर पडोत हेच देवाकडे मागणे.>>>
Yes, परत सगळे उभे करता येईल, बस हे दिवस जाऊदेत.
.
.
आमच्या कॉलनीत मुनिसिपलीटीने मघाशी सॅनिटाइझर फवारले. एवढी मोठी कॉलनी, सगळ्या रस्त्यांवरून, गाड्यांवरून जे काही दिसले त्या सगळ्यांवर... होप it हेल्पस...
आज माझ्या एका ऑफिस कलीग शी
आज माझ्या एका ऑफिस कलीग शी बोलले, बिचाऱ्याचे लग्न होते १५ एप्रिल ला , मंगळसूत्राची ऑर्डर दिली होती जे पाडव्याला मिळणार होते. तेही घ्यायचे बाकीय. बरेच जणांना लग्न पत्रिका सुद्धा देऊन झालीये. पण आता लॉक डाउन मुळे सगळेच अनिश्चित झालेय.
माझ्याही लग्नाला आता दोन महिने पूर्ण होतील. नशिबाने लग्नही व्यवस्थित झाले अन आमची कौटुंबिक दिल्ली , आग्रा , मथुरा अन वाराणसी अशी दहा दिवसांची सहलही नीट झाली.
आता विचार करतेय की ज्यांची जवळपास सगळी खरेदी अन बाकीची तयारी झालीये त्यांनी काय करावे?
त्यांनी काय करावे?>>>> वाट
त्यांनी काय करावे?>>>> वाट पहावी इतकेच सांगू शकते. त्यांचा मूड जातो हे खरंय पण नाईलाज आहे.
वेळीच लग्न पुढे ढकलावे.
वेळीच लग्न पुढे ढकलावे. याआधी मुहुर्त काढला असल्यास आता पुन्हा काढू नये. सोयीची तारीख बघावी.. पत्रिका नव्या न छापता संबंधितांना नवी वेळ तारीख कळवावी. विवाहस्थळ तेच राहील. हॉलवाल्याकडून नवीन डेट घ्यावी. कॅटरर्सबाबतही तेच. ईतर खरेदी वाया जात नाही. मधुचंद्र मात्र आणखी पुढे ढकलला गेला हे क्लेषदायक आहे त्यात अरेंज मॅरेज असेल तर हा काळ आणखी कष्टदायक आहे
खरेदी वापरता येईल पण हॉलचे
खरेदी वापरता येईल पण हॉलचे पैसे अडकले ना.. तो हॉलवाला तरी काय करणार? त्यानेही कोणा कोणाला ऍडव्हान्स दिले असतील तर एकरकमी परत तरी कसा करू शकेल..
VB अभिनंदन!!!
VB अभिनंदन!!!
VB अभिनंदन !!
VB अभिनंदन !!
धाग्याला सोडून लिहिते आहे
धाग्याला सोडून लिहिते आहे त्याबद्दल क्षमस्व. पण हे कुठे विचारायचे हे मला माहीत नाही .
सीमन्तिनी हे तुमच्यासाठी आहे .
हे तुमचे खरे नाव आहे का ? असले आणि नसले तरीही या नावाचा अर्थ काय हे सान्गाल का ?
कारण असे की माझ्या मुलाने त्याच्या मुलीचे नाव सीमन्तिनी ठेवले आहे .
मला असे वाटत होते की हे नाव श्रीमन्तिनी या शब्दावरून आले आहे व याचा अर्थ लक्ष्मी असा आहे
पण सीमान्त करणारी म्हणजे खूप पुढे जाणारी असा अर्थ त्याच्या मते आहे.
अर्थात दोन्ही अर्थ छानच आहेत आणि मला हे नावही खूप आवडले .
पण सहज कुतूहलापोटी विचारले .
हे त्यांच्या विपू मधे विचारता
हे त्यांच्या विपू मधे विचारता आले असते..
मी वाचक जास्त आहे .लिहित
मी वाचक जास्त आहे .लिहित जवळजवळ नाहीच . त्यामुळे मला हे माहीत नाही .
तर पुन्हा एकदा क्षमस्व.
माझ्या एका मित्राचा फोन होता
माझ्या एका मित्राचा फोन होता आताच. त्याची आई व मुलगी भारतात, मुलगी मुंबईत व आई नव्या मुंबईत, मुलगा अमेरिकेत व मित्र बाईकोसमवेत सौदी अरेबियात. काळजी कोणाकोणाची करणार अशी परिस्थिती.
यावर उगीच फालतू जोक्स करून आम्ही ताण कमी करत राहिलो

आज शेवटची भाजी 'भरली भेंडी'
वीबी, अभिनंदन! बाकी लग्नासाठीची खरेदी वाया जाणार नाही. हाॅलवाल्याने समजून घ्यायला हवे.
साधना, खरंच काळजी करण्यासारखं असतानाही तुम्ही वातावरण हलकं करताय, हे छान करताय
आज शेवटची भाजी 'भरली भेंडी' केली. आता पाच टमाटे , एकेक किलो कांदेबटाटे व कडधान्यावर मदार आहे कारण चौदा तारखेपर्यंत बाहेर पडायचं नाही असं ठरवलंय. उपलब्ध साहित्यातून करता येणार्या पदार्ंथांची यादी तयार आहे. बाकी व्यवस्थित चालू आहे....
चौदा तारखेपर्यंत बाहेर पडायचं
चौदा तारखेपर्यंत बाहेर पडायचं नाही असं ठरवलंय --- खूप छान
मी पण BB, amazon काहीही delivery मिळते का ते बघायचं नाही असं ठरवलं आहे. सामान आलं की ते usable करायला फार उठाठेव करावी लागतय. शिवाय सोसायटी आता लोकांना आत येऊ देत नाहीये.
धिरडी, थालपीठ, डोसे, वेगवेगळ्या प्रकारचे भात आणि उसळी वर काम भागेल असं वाटतंय.
आजपासून माझे WFH चालू झाले.
आजपासून माझे WFH चालू झाले. सगळ्या सेटपला ४ तास लागले.
उद्यापासून मागतील ते रिपोर्ट देता देता जमेल तशी चक्कर मारत जाईन इथे.
सुखभरे (८) दिन बिते रे भैया अब काम आयो रे.
व्हीबी अभिनंदन.
व्हीबी अभिनंदन.
भौत नाइंसाफी है!
घरच्यांना चालत असेल तर लग्न करून घेऊ दे की. इटली वगळता बहुतेक देशात १० पेक्षा अधिक लोक एकत्र असू नये असे आदेश आहेत. लग्नाला ५च लागतात (भटजी, काझी, इ जो कोण लग्न लावणारा असेल तो आणि दोन साक्षी). अनायसे वेळ आहे दोघांना एकत्र घालवयला तर बाकीच्यांना जेऊ नाही घातले म्हणून तो वाया का घालवायचा??!! नंतर करायचं रिसेप्शन इ इ. कोण मेलं घरात तर सोशल डिस्टन्सिंग म्हणून तसंच थोडी ठेवणार घरात, येतीलच चार लोक, होईलच पुढचं सगळं. मग बिचारे हे वाग्दत्त वर-वधू ऐकतात म्हणून त्यांचं लग्न अस पोस्टपोन करायचं
धन्यवाद साधना ताई, पियू अन
धन्यवाद साधना ताई, पियू अन मंजुताई☺️
कॅटरर अन हॉल वाल्यांनी पैसे कसे परत करणार , खर्च झाले असे सांगितलंय. तसेही लॉक डाउन १४ ला संपेल तुम्ही थोडक्यात उरका लग्न असे सांगितले आहे.
पण ते शक्य नाही. मुलाचे कपडे बाकीयेत, मुलीचे ब्लॉउज शिवायला टाकलेत ते अजून मिळाले नाहीत. मोठी खरेदी जरी झाली आहे तरी लग्न घरात खूप कामे असतात.
खूप वाईट वाटले पण लग्न पुढे ढकलावेच लागेल बोलत होता, त्यामुळे खूप आर्थिक नुकसान होणार आहे पण त्याला इलाज नाही
फोनवर खूप निराश अन उदास वाटला, अर्थात ह्यालाही ईलाज नाही. पण त्याच्याशी बोलल्यावर मलाही खूप उदास वाटत होते म्हणून इकडे लिहिले.
व्हीबी अभिनंदन. थोडक्यात हे
व्हीबी अभिनंदन. थोडक्यात हे करोनाचे संकट टळले.
सीमंतिनी धन्यवाद.
सीमंतिनी धन्यवाद.
मी वर लिहिले आहे की लग्न शक्य होईल असे वाटत नाही.
ओक्के व्हिबी. (आता ह्या
ओक्के व्हिबी. (आता ह्या धाग्यावर रिकामटेकडेपणा अपेक्षित आहे म्हणून...) अरे कोण आहे रे तिकडे, मुलाला मुलीला कोणी जरा ढंगके कपडे द्या आणि आई-बापाने पैशे भरलेल्या हॉल मध्येच "पळून" जाऊन लग्न उरकू द्यात.

हाय काय नि नाय काय.... हल्लीच्या जनतेनं 'साथिया' नाय पाहिला म्हणून असले कपडे नि केटरर्स फालतूचे चोचले सुचतात
या दिवसात घरकाम आणि स्वयंपाक
या दिवसात घरकाम आणि स्वयंपाक उत्तमपणे जमू लागलेल्या पुरुषांनो वेळीच सावधान व्हा आणि जरा इतर छंद जोपासा. हा कोरोना काय काही दिवसात जाईल परंतु जमू लागलेले नवे काम मात्र बायको कायम करून घेईल (ह घ्या)
सीमंतिनी ☺️,. कपड्यांचे एक
सीमंतिनी ☺️,. कपड्यांचे एक कारण झाले हो, अजूनही असतील काही गोष्टी ज्या लोकांना उघड पणे सांगता येत नाही.
असो, सध्यातरी त्याचे मनोधैर्य वाढवायचा प्रयत्न करतोय सगळे, अन सोबत स्वतःचाही.
<<< व्हीबी अभिनंदन. थोडक्यात हे करोनाचे संकट टळले.
Submitted by सामो on 31 March, 2020 - 21:21>>> सामो धन्यवाद. खरंय थोडक्यात टळले संकट. माझ्याही लग्नाची तारीख मार्च महिन्यात होती. पण दोघांना जोड्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेता येईल म्हणून लग्न घाईत अन थोडक्यात आटोपले. फक्त आम्ही दोघे फिरायला जाणार होतो मे महिन्यात ते आता शक्य नाही कारण दोघांनाही सुट्ट्या मिळणार नाही. पण तरीही किमान लग्न अन कौटुंबिक सहल निर्विघन पार पडले यातच आनंद आहे. फेबमध्ये जेव्हा वाराणसीत होतो तेव्हा कितीतरी चिनी मस्त मोकळे हिंडत होते तिथे, तेही मास्क न लावता. तेव्हा काही वाटले नाही पण आता त्यांचा खूप राग येतोय.
VB अभिनंदन. स्वाती२, साधना
VB अभिनंदन. स्वाती२, साधना प्रतिसाद आवडले.
ठीपके काढण्यात लक्षात आले की core muscle weak झालेत. व्यायाम सुरु . मुलांना आबा लहान असतानाच्या दुसर्या महायुद्धातल्या अन्नाच्या तुटवड्याच्या गोष्टी सांगितल्या. माझे आजे सासरे रझाकाराशी लढताना तुरुंगात गेले होते. तेव्हा माझे सासर्यानी आईने दूध मागीतले असे खोटे सांगून, चोरून दूध पिले.
हा अगदी योग्य काळ आहे शिकण्याचा आणि शिकवण देण्याचा.
आम्ही San Antonio,Texas इथे असतो. इथे शंभरच्या वर बाधीत रुग्ण आहेत. Death rate is low, thank God.
मुलांना घरुन homework आहे. नवराही घरूनच काम करतोय एका आठवड्यापासून. मुलीला हे असे आवडत नाहीये, खूपच अभ्यास देतात असे वाटते. काही शिक्षक online videos देतात काही नी नुसता homework दिला आहे. मुलाला हे.आवडते आहे. त्याची debate tournament, ROTC servicesरद्द केल्या. बोर्ड परिक्षा STAAR TESTS रद्द. American grocery curb pick up करतो. बहुतेक सामान मिळते.
आम्ही घरात बसून असतो. संध्याकाळी घराजवळ फिरायला जातो. लोक समोरून कुणी येत असेल तर रस्ता बदलून जातात. परवा एक रनर मुलीच्या power wheelchairपासून तीन फुटावरन गेला. She had no option to move but he had. Some people are still ignorant. खूप चिडचिड झाली. ती immuno-compromised असल्याने आम्ही खूप दक्ष आहोत. नेमकी तीच सर्वात कंटाळली आहे. तिला करमावे म्हणून खडूने रांगोळी काढली. Overconfident होऊन 25ते 25 ओळीची निवडली आणि ओणवे बसून 625
भारतीय किराणा अति आणला नव्हता. पंधरा दिवसांत संपेल. आटा मिळणार नाही याची काळजी वाटत होती, पोळीशिवाय पोट न भरणाऱ्यापैकी आहोत. काही लोकांची प्रियजन आयुष्याशी झगडत असताना मला कणकीची काळजी वाटते हे जाणवून स्वतः ची लाज वाटली. आता रात्री पोळी न खायचे ठरवले आहे. अन्नाची गरज मानसिक असते कधी कधी.
मी quarantine सद्रुष्यच आयुष्य जगते आहे ,तीन वर्षांपासून त्यामुळे इतरांबद्दल वाईट वाटते.
सर्वांंना काळजी घ्या आणि सुखरूप रहा ह्या सदिच्छा आणि विनंती
काही लोकांची प्रियजन
काही लोकांची प्रियजन आयुष्याशी झगडत असताना मला कणकीची काळजी वाटते हे जाणवून स्वतः ची लाज वाटली.>>>
It's ok. सगळ्यांची सगळीच दुःखे वाटून घेता येत नाहीत. इतरांसाठी जे करता येणे शक्य आहे ते आपण करत असतोच ना, मग अशा वेळी उगीच अभावग्रस्त राहू नये असे मला वाटते.
अशावेळी क्रेविंग पण येते. मी गोड खायचे टाळते तरी काल रात्री जबरदस्त क्रेविंग आले. कॅडबरी किंवा मिठाई खावीशी वाटत होती. शेवटी थोडी खीर करून खाल्ली
परवा एक रनर मुलीच्या power wheelchairपासून तीन फुटावरन गेला. She had no option to move but he had. Some people are still ignorant>>>>>>
आधी कळलेच नाही रनर कोण ते. मला तो कार्टूनमधला रोड रनर आठवला एकदम

विवाह घरगुती ठेवला तर जास्त
विवाह घरगुती ठेवला तर जास्त बरे वाटते, सगळा थाटमाट वगळला गेल्यानंतर फक्त विवाहविधी शिल्लक राहतात, त्यांच्याकडे वधुवर व त्यांचे जवळचे नातलग यांचे व्यवस्थित लक्ष जाते, आपण काय करतोय याचे गंभीर्य लक्षात येते व नव्या मेम्बरांनाही कुटुंबाशी जवळीक लवकर साधता येते - कोरोनामुळे हे लक्षात येऊन लोक यापुढे विवाह साधेपणाने करायला लागले तर किती छान होईल.
पुल व सुनिताबाईंचा विवाह कसा
पुल व सुनिताबाईंचा विवाह कसा झाला तो जाणून घ्या. व रजिस्ट्रार घरी बोलावून किंवा ऑनलाइन रजि. करून लग्न करून घ्या. ब्लाउज शिवुन यायचे आहेत वगैरे स्ट्रुपिड कारणे आहेत. इट इज ऑल एक्स्टर्नल. मिया बिवी राजी तो क्या करेगा करोना. घरी गोड शिरा करा. व जोडप्याला एकांत द्या. एकमेकांस समजोन घ्यायची ह्या पेक्षा सोन्याची संधी व वेळ परत जीवनात येणार नाही. सी द संधी हिअर. उगीच का तोंड वाकडे करून जगायचे. आयसोलेट देम पोस्ट म्यारेज. मंगळ्सूत्र, मुंडावळ्या घरी बनवता येतील. मुहुर्त मणी आणलेला असेल तर तो चालेल. मग पुढे सोन्याचे गाठवलेले घाला. बेस्ट विशे स फॉर द कपल.
महत्वाचे म्हणजे हापूस आंब्याचा सीझन आला आहे. तर आता एक्स्पोर्त तर होत नाही. मग आपल्या सारख्या लोकल चाहत्यांना मिळेल काय देवगड हापूस? काय परिस्थिती आहे कोक णात जरा अप डेट द्या म्हातारीस.
साधना गॅलेक्सी नावाचे चॉकोलेट
साधना गॅलेक्सी नावाचे चॉकोलेट कोणी खात नाही पण आमच्या कडे खपते. ते मी आणोन ठेवले आहे. रविवारी रवीवारी स्पेशल दिवशी खायला किट कॅत आहे. सुपर्मार्केटे भरलेली होती मालाने तेव्हा चुकून आणलेले आहे. आणि एक अमूल श्रीखंड आहे घरी पाडवा म्हणून आणले होते आधीच.
Pages