Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39
सभ्य स्त्री पुरुष हो,
कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.
( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुढी खिडकीतच लाव, नैतर पोलीस
गुढी खिडकीतच लाव, नैतर पोलीस गुढी उभारतील
D mart वरून गहू व थोडे
D mart वरून गहू व थोडे बिस्किट इ. मागवले होते मागील आठवड्यात. रविवार ची डिलीवरी होती पण curfew मुले ती सोमवारी केली. पैसे already paid. अजून डिलिवरी नाही केलीय व रोज मैसेज पाठवतात की डिलीवरी कधी होईल सांगता येत नाही. काल वाण्याकडे लोकांच्या रांगा लागल्या होत्या . घरात 3 आठवडे चं सामान आहे पण अचानक मला काल एकदम bollywood style ' घर पे बुढे माँ बाप व मै बेबस अकेली औरत' असं वाटत होतं व हसू पण येत होतं.
आज कुठलातरी हिंदी मूवी पहायचा बेत करतेय. कुणी सुचवेल का ? फारेण्ड, श्रद्धा यांनी लिहिलेले बघून झालेत अजून सुचवा. Prime Netflix youtube वरील .
गुढी खिडकीतच लाव, नैतर पोलीस
गुढी खिडकीतच लाव, नैतर पोलीस गुढी उभारतील
नवीन Submitted by BLACKCAT on 25 March, 2020 - 09:41 >>
पोलीस यायचे का तुझ्या घरी गुढी उभारायला? बाकी आजपर्यंत कोणी रस्त्यावर गुढी उभरल्याच ऐकिवात नाही... हा पण पोलिसांना लाठी मारायला सोपे पडेल अशा पोजमध्ये काही लोक रस्त्यावर बसल्याच ऐकिवात आहे...
मला आज गवार बटाटा भाजी बद्दल
मला आज गवार बटाटा भाजी बद्दल प्रशस्ती पत्रक मिळाले आहे.
(हे इथे ठेवायच नाही. हे त्याच्यात घालायच नाही. आमच्यात अस चालत नाही. आईने शिकवले नाही अस दिसतय. वगैरे
)
सोबत सासू सुनेला कसे टोमणे मारते याचे प्रात्यक्षिक .
माझी खुप गंभीर परिस्थिती आहे.
माझी खुप गंभीर परिस्थिती आहे...मला वेड लागायची पाळी आलीय... बायको माहेरी गेलीय.. घरात एकटाच आहे...बिल्डींगमधले सगळे दार लाऊन घरी असतात.. कोण कोणाशी बोलत नाही.. शनिवारपासून केवळ मी दुकानदाराशीच प्रत्यक्ष बोललोय..बाकी सगळं फोनवरच.
घरात कामाचा ढीग आहे परत मी टीम लिडर असल्यामुळे कंटीन्यू फोन चालू आहे...co ordination साठी co worker बरोबर.. नंतर बाॅसेसबरोबर.. त्यात माझ्या टीममधले दोन मुले नाहीत..त्यांचही काम मलाच करावं लागत आहे.. मग हे रिपोर्ट ते रिपोर्ट.. मुलांच्या इश्शूसाठी आय.टी ना फोन त्यात माझ्या घरातली कामे, पाणी भरणं, जेवण करणं, भांडी घासणं.. माझं प्रोडॅक्शन आणि रिपोर्टची कामे रात्री करतोय.. सकाळी फक्त काॅर्डीनेशन आणि फोनमिंटींग्स वैगेरे.. केवळ तीन चार तासच झोप मिळतेय..
घर खायला उठतयं...मनात नको नको ते विचार येतायेत.. बायकोचा फोन येतो पण माझी चीड चीड होतेय.
त्यात मला सिगारेट प्यायची सवय आहे..किमान दिवसातून एक तरी मिळाली तरी चाललं असतं पण ते पण नाही...
बाकीच्यांना माझी मनस्थिती सांगितली तरी ते काळजीत पडतील...बायको आधीच खुप हळवी आहे म्हणून तिला सांगत नाही...मित्रांचे नातेवाईकांचे फोन येतात पण माझा फोन सतत बिझी असतोय त्यामुळे त्यांच्याशीही नीट बोलता येत नाही..
काय करू?? कुणाला सांगू ? म्हणून इथे लिहलंय..
सहन करा , गाणी एका
सहन करा , गाणी एका
आज खूप दिवसातून येस बॉस ची सगळी गाणी ओळीने ऐकली
अजय चव्हाण तुम्हाला करायला
अजय चव्हाण तुम्हाला करायला खूप काम आहे हीच बऱ्याच जणांसाठी असुयेची गोष्ट आहे.
@filmy करायला खुप कामे आहेत.
@filmy करायला खुप कामे आहेत..करायला ना नाही पण त्यातून येणार फस्ट्रेशन काढायला वेळ नाहीये. आणि कुणीतरी हवं सोबतीला...मला समोर बोलायला वैगेरे खुप आवडतं..फोनवर नाही आवडतं..
या तीन आठवड्यात करण्यासारख्या
या तीन आठवड्यात करण्यासारख्या नवीन शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही जेवण बनवायला शिकू शकता, एखादं वाद्य धूळ खात पडलं असेल तर ते शिकू शकता, शेअर मार्केट शिकू शकता , योगासने शिकू शकता, मुलांसाठी वेळ देऊ शकता, गाणं शिकू शकता, नाच शिकू शकता. पण कॉर्पोरेट लाइफस्टाइलच्या चौकटीत आपलं रुटीन बांधलं गेलं आहे. ते एव्हडं जखडलं गेलंय की त्यापलीकडे जायचं म्हटलं की आपण अस्वस्थ होतो.
बिग बास्केटवर ऑनलाईन ऑर्डरची
बिग बास्केटवर ऑनलाईन ऑर्डरची नोंद होत नाहीय. शिवाय काही वस्तू आउट ऑफ स्टॉक आहेत.
सध्या डोकं शांत ठेवण गरजेचं
सध्या डोकं शांत ठेवण गरजेचं आहे. परवा कांदे बटाटे , टमाटे व तीन फळ भाज्या व कणिक तांदूळ ह्या दोन गोष्टी अगदी आवश्यक होत्या आता मला चौदा तारखेपर्यंत बाहेर पडलं नाही तरी चालणार आहे रॅदर पडणारच नाहीये. ह्या भाज्या संपल्यानंतर आणणारच नाहीये जे घरात आहे त्यातच भागवणार .
मला एकाहत्तरच्या युध्दाची स्थिती आठवली किंवा बरेचदा सणावारी रवा साखर तूप (डालडा) गायब व्हायचं मग ते लाईनीत लागून आणावं लागायचं. घरची परिस्थिती ही बेताची त्यामुळे बर्याच आव्हानांना, संकटांना तोंड देत आलो व त्यातून खूप चांगल्या सवयी लागल्या, खूप काही शिकता आलं ( मुख्य म्हणजे समाधानी वृत्ती व हव्यास नाहीये कशाचा )ते पहाता आता कितीतरी गोष्टी आहेत हे पाहून बरं वाटतं.
भाजीवाल्याची गर्दी पाहून वाटलं जीवापाक्षा भाजी महत्वाची का?
दोन दिवस झाले फक्त पर्सनल मेसेज वाचतेय.लेकीचा फोन मेसेज येत असतो त्यामुळे बंद नाही करता येत.
अंध मुलांसाठी आॅडिओ बुक्स करते त्याला बराच वेळ देता येतोय आजूबाजूचे बांधकाम बंद असल्याने.
प्राईम व मॅक्स वर वाटलं तर पहाते व काही वाचन.
व्यायाम, मेडिटेशनचं व्यसन आहे, ते चालू आहे.
बीपीच्या महिन्याभराच्या गोळ्या आहेत
मावसबहीणला व मला एकमेकींना बोललं की बरं वाटतं तर रोज एकदा तरी बोलतो.
अडीअडचणीला हवी म्हणूण झाडूपोछालाच मावशी आहेत बाकी कामं दोघं मिळूनच करतो . बांधकाम नाही, वाहन कमी झाल्याने धूळ कमी झालीये.
काय को रोना
१० किलो कणीक आहे म्हणून
१० किलो कणीक आहे म्हणून निवांत होते.पण ते पॅक आधी फोडल्याचे लक्षात राहिले नाही. अर्धे वापरून झाले होते.८ दिवसांपूर्वी मिळालेली २ किलो कणीक जोडीला आहे.जे हातावर पोट असणारे लोक आठवले की ,माझ्याच टेन्शनची खरंच लाज वाटते.
मात्र सहकार भांडारमधे १०-१० च्या २ बॅग्ज मिळाल्या जरी असत्या तरी एकच घेतली असती हे नक्की.
आमच्याकडे दूध, भाजी, किराणा
आमच्याकडे दूध, भाजी, किराणा सगळे घरपोच मिळायला लागले आहे. फक्त फोन करून नगरपालिकेने ठरवून दिलेल्या त्या त्या भागाच्या संबंधितांना यादी सांगायची.
आज बिग बास्केटवर सामानाची
आज बिग बास्केटवर सामानाची ऑर्डर बुक होतच नव्हती अर्धापाऊण तास. शेवटी ३१ तारखेचं बुकिंग मिळालंय. डिलिवरी कधी मिळेल कोण जाणे.
It would be like going on 21
It would be like going on 21 days sailing , cut off from the World ....only water water everywhere . No land could be seen. There was no TV (no internet or mobile anyway)
But this time during this sailing , family is there onboard . Friends are in contact to enjoy the fun. No Rolling Pitching , No sea-Sickness . Fresh & hot food available....So it's faaar better than my naval sailing.
:I remember my days on board INS vikrant in 1990. We were to sail for 21 days but returned to harbour after 46 days. There was no touching to any port except for first day to embark and last day to disembark aircrafts and the maintenance stores from Goa 6 hrs each time only.
The only vegetables we were left were potato and yam(suran) for last 15 days.
The atta had small insects and was having a smell of expiry.
The cooks on board Vikrant were genius. They used to put ajwain (अजवायन) and make paranthas to mask the smell.
We used to have tomato soup made from tomato ketchup and corn flour.
But no one could make out.
Of course I was not married.))=((
If you are sea sick god help you. Your semicircular canals are in constant motion. So when you walk on land after coming back, you walk with a gait like drunkard because the brain is perceiving that you are still in motion.(46 days of constant motion in 3 dimensions)
तेंव्हा एवढं काही वाटलं नव्हतं.कदाचित मनाची तयारी होती किंवा जबाबदारी काहीच नव्हती किंवा अगतिकता पण होती.
चारी बाजूला समुद्रच फक्त दिवस रात्री उडणारी विमानं आणि हेलीकॉप्टर पाहणे आणि वैमानिकांशी गप्पा मारणे एवढाच विरंगूळा होता.
खरे, छान लिहिलंय!
खरे, छान लिहिलंय!
खरे, छान लिहिलंय!
खरे, छान लिहिलंय!
डी मार्ट वर १४-१५ तारखेला
डी मार्ट वर १४-१५ तारखेला समान उशिरा मिळेल असे दिसत होते.
मग अपना बाझार मध्ये जाऊन उचलून आणले कणीक तेवढी राहिलेली. आज आणायला गेले किराणा दुकानात तर सगळे सामान संपले आहे. कणीक नाही बटाटे नाही लसूण कांदे पण नाही.दही पण नाही. दूध पण मोजून देत आहेत.
इतके वाईट वाटले.
खूप डिप्रेस्ड. घरी आहे सगळे काम अवरून मग work from home.
मुलगा रडकुंडीला आलाय आई बाबा दोघे घरी आणि कोणीच माझ्याशी खेळत नाही.
सगळ्या बिल्डिंग मध्ये भीतीदायक शांतता.
आज पाडवा आहे असे पण वाटत नाही.
मला किराणा दुकानात असताना डोळ्यात पाणीच आले.
काय हे किती वाईट. आपला काय दोष
दुकानदार मात्र म्हणाला घाबरु नका देवाची आपण आठवण काढत नाही ना म्हणून.
मनात सारखे विचार येतात. गोर गरीबाचे कसे होईल. हाय वे वर
अडकलेले लोक काय करीत असतील.
काहीही विचार येतात.
मग काय विश्र्वपर्थना म्हणते.
आमच्या नगरसेवकाने (सेकटर 26,
आमच्या नगरसेवकाने (सेकटर 26, निगडी प्राधिकरण) आज मास्क , संत्री आणि सॅनिटायजर अशी एक बॅग दिली घरोघरी. रोज रिक्षा फिरत असते सकाळी काय काळजी घ्यायची त्या संबंधी. दोन दिवसाआड शेतकरी भाजी बाजार असतो ठराविक अंतरावर आणि मोठ्या सोसायटीजवळ जेणेकरून गर्दी होणार नाही. इथले नगरसेवक, आमदार बऱ्यापैकी अप्रोचेबल आहेत सर्वच पक्षांचे.
देवाला प्रार्थना करू की आपण
देवाला प्रार्थना करू की आपण 14 एप्रिल पर्यंत करोना राक्षसाला अगदी मारला नाही तरी जर्जर केला असेल.
आपल्या जवळपास करता येण्या सारखी जितकी मदत आहे तितकी हातावर पोट असलेल्या ओळखीच्या लोकांना करू.
सरकार करेल न करेल वेळेत करेल न करेल(यात कोणते सरकार वगैरे मुद्दे डोक्यात नाहीत, कारण ते आधीचे सरकार असतानाही नवहते.) , सध्या आपण जितके कुवतीत आहे तितके सरकार बनू.
सर्व लोकांना खायला प्यायला मिळू दे.किमान तितके तरी पैसे गाठीला असुदेत.ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना साठा असलेले जवळचे दुकान मिळुदे. माझ्याकडून काही मदत करण्यासारखी असेल, मायबोलीवर एखादा उपक्रम राबविला असेल तर अवश्य मदत करेन.(यापेक्षा जास्त विशफुल थिंकायला आता सुचत नाहीये.)
आमच्या येथे अजूनही एकही
आमच्या येथे अजूनही एकही पॉझिटीव्ह नाही त्यामुळे दिलासा आहे पाडव्याच पणीर आणयच ठरल होत पण तेही कॅन्सल केल आज पासून तर भाज्या ही घेण बंद करून टाकल उगाच रिस्क नको म्हणून... डरा डरा के मारेगा
घरातच स्थानबद्ध राहण्याच्या
घरातच स्थानबद्ध राहण्याच्या अशा स्थितीचा कुणालाच अनुभव नसल्याने लोकांची मने सैरभैर झाली आहेत.
अशी स्थिती मी लष्करात बऱ्याच वेळेस अनुभवली असल्याने यातून आपले मन काय स्थितीतून जाईल याचा एक आढावा घेत आहे.
अशा कठीण पेचप्रसंगात सुरुवातीला माणसाला
१) धक्का(shock) बसतो. हे असे का झाले हे समजत नाही. किंकर्तव्य विमूढता येते( काय करावे कळत नाही. यात मानसिक तणावाची भर पडते.त्यात स्त्रियांना आपल्या मुलाची नवऱ्याची काळजी वाटत असते तर पुरुषांना आपल्या आर्थिक नुकसानीची आणि कुटुंबाची वाताहत होण्याची भीती वाटत असते.
त्यानंतर
२)राग( anger) येतो. पण हा राग कुणावर काढायचा हे समजत नसते. नशिबावर कि राज्यकर्त्यांवर कि चीन देशावर किंवा त्यांच्या नागरिकांवर
३) विरोध( acceptance) यानंतर माणसाचे मन बदलाला विरोध करते. यामुळेच काहि माणसे हा बंदी हुकूम मोडून मी रस्त्यावर फिरणारच म्हणून आडमुठेपणा दाखवतात. काही जणांना यात वैफल्य(FRUSTRATION) पण येऊ शकते.
४) स्वीकार (acceptance) काही काळ गेल्यावर माणसाचे मन या बदलाला स्वीकारते. बऱ्याच वेळेस तुमचे मन सारासार विचार करून एका निर्णयाप्रत येते तर काही वेळेस उपाय नाही म्हणून(resolving to fate)
५)आशा/ जखम भरणे (hope/healing ) एकदा हा बदल स्वीकारला कि मानवी मनाला उभारी येते आणि परत आशेची पालवी फुटू लागते. मन परत आशादायी होऊ लागते आणि आपल्या जखमेची भरपाई सुरु करते आणि शेवटी संकट दूर होते किंवा मानवी मन आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारते.
अशी स्थिती माणसांची स्वतःला किंवा जवळच्या माणसाला दुर्धर आजार झाला किंवा एखादे भयानक संकट आले तरी होते.
अर्थात या पाच स्थिती एकामागोमाग एक अशाच येतात असे नाही तर एकाच वेळेस धक्का आणि राग किंवा धक्का राग आणि विरोध या दोन किंवा तीन स्थिती एकत्रही दिसू शकतात. किंवा आशादायी असणारे मन परत निराश होऊ शकते किंवा परत संताप होऊ शकतो.
याला मानसशास्त्रात SARAH मॉडेल म्हणतात SHOCK, ANGER,RESISTANCE, ACCEPTANCE आणि शेवटी HOPE/HEALING
आपण थोडे आत्मपरीक्षण केले तर आपल्याला आपले मन कोणत्या स्थितीत आहे हे समजून घेता येईल. आणि मग आपण करत असलेल्या विचित्र वागणुकीची संगती लावणे सोपे जाईल .
आपल्या नवऱ्या किंवा बायकोवर किंवा मुलांवर चिडचिड करणे, रडावेसे वाटणे, उदास वाटणे, एकदाच संपवून टाकावे असा विचार येणे (यात अगोदर मानसिक आजार असेल तर आत्महत्येचे विचारही मनात येतात).
अशा वेळेस आपले मानसिक तणाव कुणाला तरी बोलून दाखवावे असे स्त्रियांना वाटते तर पुरुष जास्त गप्प होतात.
अशा स्थितीत कुणाला तरी बोलून दाखल्याने आपल्या मनाचा निचरा(CATHARSIS) होतो. जसे सासू देवळात बसून आपल्या मैत्रिणीला सुनेचे गार्हाणे सांगत असते त्याने निष्पन्न काहीही होत नाही परंतु सासूचे मन हलके होते.
असे विचार मनात येत असतील तर आपण काम करत असताना देवाचे/आपल्या गुरूंचे/इष्टदेवतांचे नाव घ्यावे( आपण आस्तिक असलात तर) किंवा आपल्या गत आयुष्यात झालेल्या सुंदर गोष्टींच्या आठवणी काढत राहावे उदा. आपल्या बाळाचे लहानपण, शाळेतील मित्रमैत्रिणींबरोबर केलेली मौजमजा, आपल्या विवाहाच्या अगोदरचे किंवा त्याकाळचे दिवस आठवून पहा. एकदा करून पहा तुम्हाला त्या वेळच्या बारीक बारीक किती गोष्टी आठवतील याने आपले मन बरेच हलके होते.
हे संकट नक्कीच जाणारे आहे. फक्त त्यातून जाताना होणार त्रास हा ज्याचा त्याने सोसायचा आहे.
लंपन, आपल्या इथल्या
लंपन, आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींसारखी तत्परता सगळीकडे दिसली तर खूप सोय होईल लोकांची. दोन दिवसांआडच्या भाजीबाजाराची कल्पना तर सगळीकडे राबवण्यासारखी आहे. पण या लॉक डाउन मध्ये ती कितपत राबवता येईल कळत नाही.
ऋन्म्या लेका वाचत असशील तर,
ऋन्म्या लेका वाचत असशील तर,
)
तुला अनुभव लिहायचा चांगला अनुभव आहे, (मुळ आयडी ने
छानशी डायरी लिहून वातावरण हलके करशील का?
रुनम्या म्हणजे मायबोलीवरचा
रुनम्या म्हणजे मायबोलीवरचा करोना आहे,
तिकडे एक काऊंट वाढला की एक धागा वाढला
>>मला आज गवार बटाटा भाजी
>>मला आज गवार बटाटा भाजी बद्दल प्रशस्ती पत्रक मिळाले आहे.<<
आम्हाला अजुन एंड-टु-एंड भाजी बनवायची पावर दिलेली नाहि. कांदे/बटाटे कापणे, लसुण सोलणे इ. स्किल्स अवगत असल्याने आता भेंडि, शिराळं, पडवळ, कारलं, दुधी इ. भाज्या चिरण्याचं काम देण्यात येतं. भाजीच्या आकारानुसार ती कमीत-कमी वेळात, आणि श्रमात अगदि बारिक कशी चिरायची याबाबतची एक मेथड मी डेवलप केली आहे...
@ मंजूताई >> प्रतिसाद आवडला.
@ मंजूताई >> प्रतिसाद आवडला.
माझा लवचिक स्वभाव असल्या मुळे
माझा लवचिक स्वभाव असल्या मुळे कोणत्याही परिस्थिती मध्ये जुळवून घेण्याची दैवी देणगी च प्राप्त आहे.
जी स्थिती असेल त्या मध्ये रममाण होत असल्या मुळे कंटाळा येत नाही .
खाण्याविषयी हेच पाहिजे तेच पाहिजे ही भानगड नाही.
शहरी वातावरणात सुद्धा आनंदात राहु शकतो आणि अगदी खेडे गावात सुध्दा मजेत राहू शकतो
आणि श्रमात अगदि बारिक कशी
आणि श्रमात अगदि बारिक कशी चिरायची याबाबतची एक मेथड मी डेवलप केली आहे...
नवीन Submitted by राज on 25 March, 2020 - 20:36
)
>>>
आम्हाला पण शिकवा की. फटके कमी खावे लागतील. (शाब्दिक बर का. अजून घराबाहेर पडायचे डेरिंग नाही.
@हीरा, हो लोकप्रतिनिधी बरेच
@हीरा, हो लोकप्रतिनिधी बरेच ठिकाणी अजिबात अवेलेबल नसतात. अशा परिस्थितीत तर नाहीच. इथे भाजीबाजार शक्य आहे कारण मावळतला शेतकरी इथे शेतमाल पोचवू शकतो कमी खर्चात आणि कमी वेळात. इथले डेअरी वाले पण देहूरोड, तळेगाव इ भागातले आहेत. अजूनतरी सगळे चालू आहे नीट.
Pages