Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39
सभ्य स्त्री पुरुष हो,
कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.
( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरवात माझ्या पासून.
सुरवात माझ्या पासून.
आज आमचा घरगुती बिग बाॅस चा ३ रा दिवस. सध्यातरी बायकोशी गोड गोड बोलणे चालू आहे.
ॲमॅझोन वरची यादी वाढते आहे. क्रेडिट कार्ड चे बील दणक्यात येणार
आवो पर त्या अॅमेझाननंबी
आवो पर त्या अॅमेझाननंबी कालपासनं डिलीवरी बंद करणार मनून सांगितलं नव्हं ! काल बातम्यात दावलं मनं टिवीला.
पण परवा जी खरेदी झाली आहे
पण परवा जी खरेदी झाली आहे क्रेडिट कार्ड वर ते येईल तेव्हा येईल पण पैसे गेले ना
आमच्याईथे छान परीस्थिती आहे.
आमच्याईथे छान परीस्थिती आहे. आमच्या कॉलनीत दोन बाहेरून आलेले होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे घराच्या बाहेर कॉलनीतही फक्त कुत्री मांजरी कबूतरेच दिसतात. नाही म्हणायला गेटवर एक वॉचमन त्याच्या केबिनमध्ये शांत बसून असतो. गाडीही बाहेर जात नाही त्यामुळे ते देखील त्याला काम नाही.
मी शुक्रवार संध्याकाळनंतर दोन वेळाच ऊंबरठा ओलांडला आहे. दोन्ही वेळा वाणी आणि मेडीकल शॉपमध्ये जाऊन आलो. दोन्ही घराच्या समोरच आहेत. फक्त रस्ता ओलांडावा लागतो. दोन्ही वेळा आंघोळीआधी जाऊन आलो. घरी आल्यावर थेट आंघोळच केली. त्याआधी कपडे वेगळ्या खुंटीला टांगून ठेवले. बायको म्हणाली दुकनदाराने दिलेले सुट्टे पैसे वा कार्ड सुद्धा सॅनिटाईजरने धुवुया पुसुया. पण त्याला आळस केला. किती आणि काय करणार असे होते. घरी आई आहे. आपण बाहेरून कोरोना घेऊन यायचो आणि तिला घरब्सल्या काही व्हायचे या विचाराची भिती वाटते.
बातम्या २४ तास बघतोय पण जास्त विचार केला की डिप्रेसिंग वाटते ऊगाच. भारतात हजारो लाखो लोकं मरताहेत अशी स्थिती आली तर काय होईल. त्यात आपण वा आपल्या कुटुंबातील कोणी असेल नसेल वगैरे विचार डोक्यात येत राहतात. ऑफिसचे कामही अश्या विचारात होत नाही. फक्त पोरांशी खेळताना काही डोक्यात नसते. खाली दिमाग शैतान का घर. अजून पोरं झोपली आहेत. लवकर ऊठली तर बरे असे सध्या वाटतेय. ते उठले की त्यांचे फोटो विडिओ काढतो. आणि ते फेसबूक व्हॉटसपवर शेअर करत लोकांना स्टे ॲट होमचा संदेश देतो.
अवांतरः पाफा, तुम्ही डोळे
अवांतरः पाफा, तुम्ही डोळे वटारून बघणार्या बाळाचा जो फोटो डकवला आहे तो मला खूपच आवडला आहे.
डोळे वटारून बघणारे बाळ
डोळे वटारून बघणारे बाळ कोरोनाला दम देत आहे असे या धाग्याच्या पार्श्वभूमीवर वाटत आहे.
I too loved baby photo. So
I too loved baby photo. So cute.
सध्या करायला काही नसेल आणि
सध्या करायला काही नसेल आणि सतत निगेटिव्ह बातम्या पाहून, भयकारी चर्चा करून, शहर बंद मुळे, सोशल डिस्कनेक्ट मुळे अगदीच डिप्रेशन सदृश्य स्थिती येत असेल तर मेडिटेशन आणि विनोदाशिवाय उपाय नाही. या वेळी थोडा विनोद, थोड्या हलक्या गप्पा मारल्या तर आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेसाठी चांगलं असेल. बरं पण तो विनोद असाही नको की कोरोना या जागतिक साथीबद्दलची गंभीरता घालवून टाकेल आणि लोक हवी ती काळजी घ्यायचं विसरून जातील. त्यामुळे या कोरोना साथीने आयुष्यात काय उलथापालथ माजवली आहे , आपण त्यावर काय विचार करतोय, या बंदच्या वेळी घरात काय प्लान्स आहेत, घरात सगळेच एकत्र असल्याने काय भानगडी होत आहेत, किंवा चक्क या साथीबद्दल जागरूकता आणण्यासाठी याचा एखादा मजेशीर व्हिडियो बनवा आणि डिजिटल जत्राला पाठवा ! किंवा आलेले विनोदी , हलकेफुलके व्हिडीयो बघण्यासाठी युट्युब चॅनल बघता येईल
पोरगी २ वर्षाची होती तेव्हा
पोरगी २ वर्षाची होती तेव्हा चा फोटो आहे तो. नुकतीच आंघोळ झाली होती. रम्य ते बालपणीचे दिवस
ऋ+१
सुदैवाने फार विपरीत परिणाम
घरी थांबणे आणि घरून काम करणे हे जे अनेकांच्या बाबत झाले आहे मी सुद्धा त्यातलाच एक. सोसायटीत इतका सन्नाटा यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. इतकी लहान मुले सदोदित खाली गार्डनमध्ये खेळताना दिसायची. ती गार्डन आता सदैव रिकामी दिसत आहे. अख्ख्या सोसायटीत एक गूढ सन्नाटा भरून राहिला आहे. इथे माणसे राहतात कि नाही असे वाटावे अशी परिस्थिती आहे. शांत शांत वातावरण एका अर्थाने बरेच वाटत आहे. पण मध्येच कधीतरी हि भयाण शांतता नको सुधा वाटते. बाकी, पक्षी प्राणी यांच्यासाठी फार वेगळा अनुभव असेल. मांजर जी नेहमी नेहमी खायला मागायला घरी यायची ती आता बाहेरच असते. खिडकीतून पाहिल्यास आसपास झाडाझुडपातून फिरताना दिसते. पण घरी येत नाही. माणसांचा वावर कमी झाल्याने पक्षी आणि इतर अनेक छोटे मोठे प्राणी यांना मुक्तपणे वावरता येऊ लागले आहे. अन्नसाखळी नीट सुरु असेल. खाणे मिळवण्यासाठी माणसांवर अवलंबून राहायची तिची आता गरज राहिली नाही.
इतक्या दीर्घकाळासाठी जगातले अनेक मोठमोठाले उद्योग बंद आहेत. विषाणूचे परिणाम काय असतील? आणि कर्फ्यू चे परिणाम काय असतील? येणारा काळ कठीण असेल याबाबत चिंतेने ग्रासले आहे.
आमचा 10 जणांचा staff आहे
आमचा 10 जणांचा staff आहे
काल मी एकटा होतो
आज 2 आलेत
वाईट्ट परिणाम झालाय...
वाईट्ट परिणाम झालाय...
घरातील मदतनीस येऊ शकत नाही. तिचे काम मीच करतेय. लादी, भांडी, कपडे, जेवण. त्यातल्या त्यात लादिवर फक्त असूनमधून झाडू व व्हॅक्युम मारून बोळवण करतेय पण कपडे, जेवण, भांडी करावीच लागतात.
मी ऑफिसात जाऊ शकत नाही. ते काम मी घरून करतेय .
मी उद्या मेले तर काय घ्या ह्या भीतीने बॉस उद्याचे कामही आजच कर म्हणून लकडा लावतोय..... .
कोरोनाचे माहीत नाही पण कामाचे डोंगर उचलून नक्कीच मरेन असे वाटायला लागलेय आता
इतक्या दीर्घकाळासाठी जगातले
इतक्या दीर्घकाळासाठी जगातले अनेक मोठमोठाले उद्योग बंद आहेत. विषाणूचे परिणाम काय असतील? आणि कर्फ्यू चे परिणाम काय असतील? येणारा काळ कठीण असेल याबाबत चिंतेने ग्रासले आहे>>
सहमत. माझी कंपनी मोठी आहे, अजून तरी पगाराची काळजी नाही. पण लहान कंपन्या, पार्टनेरशीप फर्म मध्ये काम करणाऱ्यांच्या पगाराचे काय?? हातावर पोट असणारे काय करणार? फुकट रेशन वाटणार असे ऐकलंय फक्त. प्रत्यक्ष माहीत नाही.
आज मी पहिल्यांदा आयुष्यात
आज मी पहिल्यांदा आयुष्यात कणिक तिंबून पराठा केला. बायको बाजूला उभी होती.
पालक पनीर आणि पराठा.
बाकी झाडू मारणे कपडे वाळत टाकणे भांडी घासणे ही कामे आम्ही चौघे(मी बायको मुलगा मुलगी ) सगळे करतो आहोत.
ही संचारबंदी बराच काळ चालू राहील हे गृहीत धरून आहोत.
या काळात कमीत कमी पूर्ण मराठी स्वयंपाक शिकण्याचा मी निर्धार केला आहे.
जगायचं कसं कण्हत कण्हत
की
गाणं म्हणत
हे आपणच ठरवायचं आहे.
पाफा, तुम्ही डोळे वटारून
पाफा, तुम्ही डोळे वटारून बघणार्या बाळाचा जो फोटो डकवला आहे तो मला खूपच आवडला आहे.>>>> अगदी अगदी!
दूरगामी परिणाम म्हणजे
दूरगामी परिणाम म्हणजे माझ्यामते अन्न टंचाई ! प्रचंड अन्न टंचाई होईल हे माझं प्रामाणिक मत
रोज रात्री एकही स्वप्न ना
रोज रात्री एकही स्वप्न ना पडता शांत झोप लागते आहे, शारीरिक काम थकवा आणते.
कितीही planning केलं आणि महिन्याचं विचार करून सामान भरलं असलं तरी रोज काहीतरी आठवतच, हवं असलेलं. आज आमच्याकडे दूध आणि morning delivery अँप्स नी डिलिव्हरी दिलेली नाही. उद्या दोन डिलिव्हरी येणार आहेत BB आणि prime,बघायचं येतात का.
परवाच घरी येणार्या तायांना
परवाच घरी येणार्या तायांना सध्यातरी ३१ मार्चपर्यंत येऊ नका सांगितले आहे.नंतरचे नंतर कळवेन म्हटलं आहे.
त्यामुळे भांडी घासताना माबोवरचा एक धागा आठवतो की त्यात बर्याचजणींनी भांडी घासायला आवडते म्हटलंय.
दररोज ही कामे करताना त्या तायांचे नवल वाटते की आपापल्या घरची कामे करून त्या इतर घरातली कामे रोज कशी करतात?
ममो, अन्न टंचाई होईल असे का
ममो, अन्न टंचाई होईल असे का वाटते तुम्हाला? कृत्रिम अन्न टंचाई निर्माण केली जाऊ शकते पण खरीखुरी टंचाई निर्माण होईल असं वाटत नाही आत्ता तरी. उलट मागणी कमी झाल्याने साठ्यांत वाढ होऊ शकते. भाज्या फळफळावळ महागेल पण ते तसेही उन्हाळ्यात होतेच.
धान्य असेल पण ते आपल्यापर्यंत
धान्य असेल पण ते आपल्यापर्यंत पोचायला अडचणी येऊ शकतात. इटली इराण सारखी परिस्थिती उद्भवली तर कोण धान्य विकणार, विकणाऱ्यापर्यंत कसे पोचणार??
मी अजिबात काही जास्तीचे घेतले नाही. दूध पावडर आहे त्यावर 1 कप चहा करते. रोजची डाळ भात कडधान्ये भाकरी एवढ्यासाठी सामान आहे, पीठे आहेत . महिन्यापेक्षा जास्त दिवस जातील त्यात असा अंदाज आहे. तसेच काम असेल।तरच घराबाहेर पडायचे ठरवले आहे.
>>> कितीही planning केलं आणि
>>> कितीही planning केलं आणि महिन्याचं विचार करून सामान भरलं असलं तरी रोज काहीतरी आठवतच, हवं असलेलं. आज आमच्याकडे दूध आणि morning delivery अँप्स नी डिलिव्हरी दिलेली नाही. उद्या दोन डिलिव्हरी येणार आहेत BB आणि prime,बघायचं येतात का.<<
+१०००००
मला तर वाटतेय की, मी रोज भरपूर स्वंपाक करतेय तरी संपतं कसं?
रोजच करावे लागतेय... डोक्यात असतं कधी संपणार हे?
ऑफीसमधले काम करून , बसून थकते मग इतर कामं. घरातल्या कामचोरांना काम देणे सुद्धा काम आहे, करतात नीट पण सांगेन तेव्हाच.
त्यात ते सतत वाढीव कपड्याचे धुणी जरा बाहेर जावून आलं भाजी वगैरे घेवून...
>>>> त्यामुळे भांडी घासताना माबोवरचा एक धागा आठवतो की त्यात बर्याचजणींनी भांडी घासायला आवडते म्हटलंय.
दररोज ही कामे करताना त्या तायांचे नवल वाटते की आपापल्या घरची कामे करून त्या इतर घरातली कामे रोज कशी करतात?<<<<
+१००००००
मला जरा सुद्धा आवडत नाही... आमचे वार ठरलेत आता कोण कधी घासणार घरच्या सदस्यात.
धान्य असेल पण ते आपल्यापर्यंत
धान्य असेल पण ते आपल्यापर्यंत पोचायला अडचणी येऊ शकतात. इटली इराण सारखी परिस्थिती उद्भवली तर कोण धान्य विकणार, विकणाऱ्यापर्यंत कसे पोचणार?? >> साधारण असच वाटतय म्हणजे अन्न असेल सुद्धा पण सप्लाय चेन distrub होईल. रिटेलर पर्यंत अन्न धान्य पोचवणारा श्रमिक वर्ग ऑलरेडी शहर सोडून गेला असेल. हल्ली कोणातच देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नसतो सगळेच काहीतरी इम्पोर्ट करतात काही बाहेर पाठवतात. त्यामुळे ही टंचाई निर्माण होऊ शकेल . माझ्या कडे आज मितीला कोणती ही आकडेवारी नाहीये पण जस्ट हे मला वाटतय. दोन्ही यद्धांनंतर भीषण रेशनिंग जगभर सुरू होत , कोरोना युद्धापेक्षा ही भयानक आहे हे ही कारण आहे.
@ममो,
@ममो,
तुम्ही RBI मधे होता का?
असल्यास, तुमच्या कामाच्या प्रोफाईल प्रमाणे इथे आर्थिक परिणामांवर काही प्रकाश टाकू शकाल का?
होय पाफा , होते पण आता उरले
होय पाफा , होते पण आता उरले पेन्शन पुरती अशी गत आहे. ☺
ऑन सिरीयस नोट लिहिते .
घरी बसून लाइफ स्किल्स शिकतोय.
घरी बसून लाइफ स्किल्स शिकतोय.
माझ्या नवऱ्याने सगळा हॉल,
माझ्या नवऱ्याने सगळा हॉल, सीलिंग, भिंती, जिना, बेसिन, बाथरूम, wc सगळं साफ केलं. म्हणजे मी करायला लावले. आता थोड्या वेळाने मी किचन आवरायला घेईन. बेडरूमस् आणि गॅलरी आज रात्री किंवा उद्या दुपारी.
मोबाईल मधील डाटा दिवसाच्या
मोबाईल मधील डाटा दिवसाच्या मानाने फारच अल्प ठरत आहे तेव्हा मोबाईल कंपन्यांनी आजच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून किमान १ महिन्याचे डाटा बलेन्स मोफत दिल्यास जनतेला दिलासा मिळेल ..कारण दुकान बंद आहे ...
मनीमोहोर +१
मनीमोहोर +१
डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान
डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान भारतात बेबी बूम येईल असं मला वाटतं.
@ नौटंकी, अहो उद्या गुढीपाडवा
माझ्या नवऱ्याने सगळा हॉल, सीलिंग, भिंती, जिना, बेसिन, बाथरूम, wc सगळं साफ केलं. म्हणजे मी करायला लावले. आता थोड्या वेळाने मी किचन आवरायला घेईन. बेडरूमस् आणि गॅलरी आज रात्री किंवा उद्या दुपारी.
Submitted by नौटंकी on 24 March, 2020 - 15:59
>>>>>>>>
@ नौटंकी, अहो उद्या गुढीपाडवा आहे, दिवाळी चा पाडवा नाही.
Pages